|
नमस्कार मंडळी! पहिला पाउस पडुन गेला आणि मायबोलीकरांना वेध लागले ते वर्षाविहाराचे. यंदा वर्षाविहाराचे पाचवे वर्ष. मागिल चार वर्षे आपण जो भरभरुन प्रतिसाद दिलात, त्याने संयोजकांचा हुरुप नक्कीच वाढला आहे. यावर्षीदेखिल आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहुन वर्षाविहाराचा आनंद द्विगुणित कराल याची खात्री आहे. यंदाच्या ववि संबंधि सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे तारीख: १५ जुलै, २००७ वेळ: १० am ते ५ pm स्थळ: सगुणा बाग, नेरळ या वर्षाविहारात registered मायबोलीकर व त्यांचे कुटुंबिय (पती, पत्नी व मुले) यांनाच भाग घेता येईल. आपण varshaa_vihaar@yahoo.com या ई-मेल आयडीवर मेल करुन आपले नाव नोंदवायचे आहे. नोंदणी करताना खालील माहिती आवश्यक आहे. १. नाव २. मायबोलीचा User ID ३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम) ४. कुठल्या शहरातुन येणार (मुंबई,पुणे ई.) ५. आपला नेहमी वापरात असलेला Email ID ६. सहभागी होणार्या एकुण व्यक्तिंची संख्या (प्रौढ/ मुले). ३ वर्षाखालील लहान मुलांची संख्या नमुद करावी. ७. स्वतंत्र येणार असल्यास तशी माहिती. नावनोंदणिची अंतिम तारीख १ जुलै आहे. स्वतंत्र येणारे ७ जुलै पर्यंत नावनोंदणी करु शकतात. सगुणाबागचे प्रवेश शुल्क प्रत्येकी २५०.०० रुपये आहे. ३ ते १० वयोगटातील मुलांसाठी वर्गणी शुल्कात ५०% सूट (१२५.०० रुपये शुल्क) आहे. पुणेकरांसाठी बसप्रवासाचा खर्च मागाहुन कळवण्यात येईल. एकुण ईच्छुक सभासदसंख्येनुसार बसभाडे ठरविण्यास मदत होईल. याकरता लवकरात लवकर नावनोंदणी केल्यास उत्तम! मुंबईकरांसाठी बसप्रवासाचा खर्च प्रत्येकी २०० रुपये आहे. तीन वर्षावरील सर्व व्यक्तीना हे बसभाडे लागु होईल. यंदा काही कारणास्तव online वर्गणीची सोय होऊ शकलेली नाही. वर्गणी प्रत्यक्ष भेटुनच द्यावी. महत्वाचे: आपण नाव नोंदविले असेल परंतू ८ जुलै पर्यंत वर्गणी जमा करणे शक्य झाले नाही, तर नावनोंदणि रद्दबातल समजण्यात येईल. ईतर माहिती जाणुन घेण्याकरता आपण ईथे पोष्ट टाकु शकता अथवा varshaa_vihaar@yahoo.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता. वर्षाविहार २००७ चे संयोजक मंडळ पुण्यातील संयोजक: मयुरेश Kmayuresh2002 अरुण Arun संकल्प Pha मुंबईतील संयोजक: संदीप Gharuanna निलेश Neel_ved दत्तराज Indradhanushya मिलिंद Bhramar_vihar आनंद Anandsuju सांस्कृतिक समिती: मिनाक्षी Meenu श्रद्धा Shraddhak मुक्ता Deemdu मंडळी, पैसे जमा करण्यासाठी माहिती देत आहोत. पुणेकर मायबोलीकरांसाठी: तारीख: ८ जुलै,२००७ स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली वेळ: सं. ५.३० ते ८.०० वर्गणी: प्रौढांकरता रु. ४७५ (सगुणा बाग रु. २५० + बस भाडे रु. २०० + ईतर खर्च रु. २५) मुलांकरता (३ ते १० वयोगटातील) रु. ३५० (सगुणा बाग रु. १२५ + बस भाडे रु. २०० + ईतर खर्च रु. २५) मुंबईकर मायबोलीकरांसाठी: तारीख: ८ जुलै,२००७ स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात वेळ: सं. ५.३० ते ८.०० वर्गणी: प्रौढांकरता रु. ४५० (सगुणा बाग रु. २५० + बस भाडे रु. १७५ + ईतर खर्च रु. २५) मुलांकरता (३ ते १० वयोगटातील) रु. ३२५ (सगुणा बाग रु. १२५ + बस भाडे रु. १७५ + ईतर खर्च रु. २५) ईतर खर्चा मधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्या खर्चाचा अंतर्भाव आहे. आपण नाव नोंदले असल्यास, परंतु ८ जुलै पर्यंत पैसे जमा न केल्यास नावनोंदणी रद्दबातल समजण्यात येईल. स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही. काही जणांनी आयत्यावेळेस येण्यासंबंधि शंका विचारली होती. आपण आयत्यावेळेस आल्यास सगुणाबागची फी आपल्याला स्वतंत्र भरावी लागेल. मायबोलीकरांसाठी मिळवलेली सूट तिथे लागु होणार नाही. ईतर सर्व कार्यक्रमात आपण सहभागी होउ शकता. आपल्या काही सूचना आणि शंका असल्यास विनासंकोच संपर्क साधा. धन्यवाद! व. वी. चे फ़ोटो येथे आहेत.
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through June 05, 2007 | 20 | 06-05-07 4:40 am |
  | Archive through June 08, 2007 | 20 | 06-08-07 8:33 am |
  | Archive through June 12, 2007 | 20 | 06-13-07 3:46 am |
  | Archive through June 15, 2007 | 20 | 06-15-07 2:14 pm |
  | Archive through June 29, 2007 | 20 | 06-30-07 3:24 am |
  | Archive through July 06, 2007 | 20 | 07-06-07 5:10 pm |
  | Archive through July 16, 2007 | 20 | 07-16-07 4:56 am |
  | Archive through July 16, 2007 | 20 | 07-16-07 6:41 am |
  | Archive through July 16, 2007 | 20 | 07-16-07 10:15 am |
  | Archive through July 16, 2007 | 20 | 07-16-07 1:54 pm |
  | Archive through July 17, 2007 | 20 | 07-17-07 8:36 am |
  | Archive through July 17, 2007 | 20 | 07-17-07 10:35 am |
  | Archive through July 18, 2007 | 20 | 07-18-07 4:49 am |
  | Archive through July 18, 2007 | 20 | 07-18-07 10:13 am |
  | Archive through July 19, 2007 | 20 | 07-19-07 9:48 am |
Kandapohe
| |
| Thursday, July 19, 2007 - 10:43 am: |
| 
|
तो कुंपणावर असतो नेहेमी>>> त्याचे काय आहे पूनम. सकाळी गाडीत बसल्या बसल्या अंताक्षरीचा पंच म्हणून तुम्ही मला कुंपणावर बसवलेत ना? तो मोड ऑफच केल नाहीत तुम्ही. त्यामुळे असे झाले. 
|
>>>>> 'एक वार पंखावरूनी' चा मुकाभिनय केला होता. कान्द्या, लेका ही रे कोणती तुझी मराठी भाषा????? "एक" आणि "वार" हे वेगवेगळे कसे? "एकवार" असा एकत्रित शब्द हवा ना तो????
|
Ravisha
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:14 pm: |
| 
|
म्हणजे इथे वेगळाच अभिनय अपेक्षित आहे... "एक वार पंखावरूनी"
|
Milya
| |
| Friday, July 20, 2007 - 6:48 am: |
| 
|
वा!! वा!! सर्वच वृत्तांत झकास आहेत... रविशा छोट्या धनश्रीने तेच केले ... पण त्यामुळेच सोप्पे गेले ना अभिनय करायला आणि ओळखायला...
|
Reena
| |
| Friday, July 20, 2007 - 1:02 pm: |
| 
|
चला मायबोलीकर्स बाय फ़ॉर द डे.... रविवारी भेटुया, उद्या माझी सुट्टी..
|
Chetnaa
| |
| Saturday, July 21, 2007 - 7:09 am: |
| 
|
हाय लोक्स, सर्वानीच खुप चान लिहिलेय... मी प्रथमच आले होते व.वि. ला... खरेच खुप धामाल आली.... प्रथमच सर्व भेटत होतो पण अगदी जुनी ओळख असल्या प्रमाणे वाटले. स्वाती प्रमाणे माझेही पुढील वर्षाची नाव नोंदणी आता पासुनच..
|
Neel_ved
| |
| Monday, July 23, 2007 - 8:30 am: |
| 
|
Mods ना विनंती कि त्यांनी इथुन संयोजकांचे mobile nos. काढुन टाकावेत.... धन्यवाद.
|
नंबर काढले आहेत. आणखी कुठे असतील तर सांगा.
|
वविचे बहारदार वृतांत वाचून संजय झाल्याची अनुभूती येत आहे... उत्तम उत्तम फ़क्त देहानेच काय ते तिथे नव्हतो... सर्व क्षणांचा साक्षिदार बनविल्या बद्दल सर्व वृ. लेखकांचे आणि यशस्वि संयोजकांचे आभार...
|
Wakdya
| |
| Wednesday, August 01, 2007 - 3:53 am: |
| 
|
रोल धुतल्यावर, अजुन काही फोटो ववि याहू ग्रुपवर टाकले आहेत
|
Anilbhai
| |
| Wednesday, August 01, 2007 - 5:22 pm: |
| 
|
आम्हास्नी नाय मिळणार का हो बघाया?. 
|
अनिलभाई??? तुमचीपण ही गत???? अरे रे अरे रे! तुमाला बघायला नाही, किमान पोच मिळेल अशी प्रभूचरणी आशा व्यक्त करतो! एनिवे, आता एक नियम केलाच पायजेल, की कन्च्याबी अधिकृत जीटीजी वर्षाविहाराचे फोटु Admin & Moderators ना (आणि जमल्यास माझ्यासारख्या "दसहजारी सरदारान्ना) पाठवलेच पायजेत! खर तर हे आपणहून व्हायला हव होत ना??? हे क. ब.????
|
Kanak27
| |
| Friday, June 13, 2008 - 4:25 am: |
| 
|
आज १३ जुन, तरिहि वर्षविहार चि काहिच माहिति नाहि. चर्चा दुसर्य BB वर चालु आहे का? कृपया कळवणे. दिपा
|
Himscool
| |
| Friday, June 13, 2008 - 12:00 pm: |
| 
|
दिपा, नविन मायबोलीवर लवकरच व वि च्या संदर्भात घोषणा केली जाईल. तेव्हा तिथेच लक्ष ठेवा.. आणि येणार असल्यास घोषणा झाल्या झाल्या बूकिंग करा
|
Kanak27
| |
| Tuesday, June 17, 2008 - 9:59 am: |
| 
|
Thanks ! Please can u give me mob no of any member from puna VV. Deepa
|
कनक,ज्यावेळी नविन मायबोलीवर वर्षाविहाराचे डीटेल्स टाकले जातील तेव्हा तुम्हाला तिथेच पुण्याच्या ववि संयोजकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पण मिळतील.. तेव्हा थोडी वाट पहा अजुन...
|
म ला ही या य च य व. वि. ला प ण ता री ख आणी वार कधी क ळेल?
|
|
|