|
Kandapohe
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:23 am: |
| 
|
यश, योग छान वृत्तांत. वविच्या इतिहासात असा जळका वृत्तांत प्रथमच आला असेल नाही? :P एका बावडीने(विहिर) लक्ष वेधुन घेतले>>> मी म्हणलो त्याप्रमाणे आतमधे उडी मारून खाली बसलो असतो तर जुलै मधे लोकांना एप्रिल फुल करता आले असते. hangaover जबरी असणार वाटेत व्रत केलेत की काय बुधवारचे? 
|
Zakasrao
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:43 am: |
| 
|
योग्या तुजा डॅन्स जल्ला सगल्याम्होर व्ह्यायला पायजेल रे. लय भारी लिवलस बग.
|
बाकी आम्हा बैलांना त्या म्हशीने काहि इंप्रेस केले नाही.. ना त्या केपीला.. बिचार्या त्या म्हशीला केपीने चांगलेच निराश केले आता उचलुन घेईल, आता कुशीत घेईल म्हणुन वाट बघत होती.. हे सगळ्यात जबरी आहे!
|
Shivam
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:54 am: |
| 
|
योगी, लय जबरी. खल्लास रे...
|
Arun
| |
| Wednesday, July 18, 2007 - 6:01 am: |
| 
|
योग्या, यश : जबरा लिवलेत वृतांत. लई भारी ..............
|
Krishnag
| |
| Wednesday, July 18, 2007 - 6:30 am: |
| 
|
धबधब्या कडे पायी निघाल्यापासून गायत्री कुठे दिसेना तेंव्हा समजले तिला नंदिनी नावाची मैत्रीण मिळाल्या पासून ती आमच्या सोबत यायला तयारच नव्हती! तिथ पासून मग परत निघे पर्यन्त गायत्रीने नंदिनीची पाठ सोडली नाही! जलक्रीडा करून परत आल्या सारे बर्यापैकी भुकावले होते. मग पटापटा फ्रेश व्हावे आणि आधी पोटपुजा आटोपावी ह्या उद्देश्याने सारे जण दिल्या कक्षांत प्रविष्ट झाले. कक्षामध्ये असलेला पोटमाळा पाहून अनेकांच्य मनात अनेकविध कल्पनांनी जन्म घेतला. असो त्या सार्या इथे सांगणे उचित नाही! चटचट आटोपून समस्त मायबोलीकर भोजनाच्या आस्वादास सज्ज झाले. भुकेले झाल्याने भोजनाच्या चवीपेक्षा आवश्यकतेवर भर देत सार्यांनी भोजनोस्वाद लुटला. तरी काहींना मोदी रेसोर्टची आठवण ह्यानिमित्तने आलीच! भोजन पश्चात कार्यक्रमांची रुपरेषा सां स. सदस्यांकडे तयार होती. परन्तु यजमानांचे पुरस्कृत बाली नृत्य आधी आले व त्यांचा वाद्यघोष सुरु होताच मायबोलीकरांची चुळबुळ सुरु झाली! सां स. सदस्य, आपण मागविलेले ध्वनी वर्धक वापरतायेत म्हणून जरा नाखुष होते. तरी आता हा ३० मि. कार्यक्रम सहन करणे अपरिहार्य असल्याने मनोमन खट्टू होऊन बरे जण कक्षात जाऊन विसावले. अर्थात त्या छोट्याश्या आदिवासी गटाने आपले नृत्य आणि कसरती कौशल्य आपल्या परीने छान सादर केले. एव्हाना ३.३० वाजले होते. त्यांचा कार्यक्रम आटोपताच लगबगीने सां स ने परिस्थितीची सुत्रे ताब्यात घेऊन सर्व मायबोलीकरांना कार्यक्रमाच्या जागी पाचारिले आणि मायबोलीच्या कार्यक्रमाची सुत्रे मिनू व श्र यांनी ताब्यात घेतली. पेशवाई थाटात आलेल्या फ ने काही फर्मान काढले त्या फर्मानांत पेशव्यांपेक्षा महंमदाचा लहरी पणा जास्त होता! मजा आणली ह्या फर्मानांनी! अस्मादिकांच्या सौभाग्यवतीच्या पर्स मध्ये चक्क वाकड्यापेक्षा जास्त वैविध्यपुर्ण चिल्लर निघाल्याने तिलाही एक बक्षिसाचे घबाड मिळाले! मायबोलीवरील एव्हरेस्टचा मान यशोवर्धन तर मायबोलीवर सर्वाधिक ज्येष्ठतेचा मान मिल्याने पटकावला! वेधक वेषभुषेत बरीच चुरस होती पण छोटा पार्थ अचूक लक्षवेधी ठरला आणि बक्षिसाचा वेध करण्यात एकमताने यशस्वी झाला! मायबोलीवरील प्राचीन अर्वाचिन माहिती विषयक सामान्यज्ञान स्पर्धेत भ्रमाने बापू कृपेने (मला इथे ते शिव लिलामृतातल्या पारध्याची गोष्ट आठवली) तर पूनमला प्रयत्नांच्या पराकाष्ठेने यश मिळाले! (प्रयत्ने वाळूचे.....) उलटापालट केले शब्द आणि म्हणींची सरमिसळ भन्नाट जमली होती कर्याक्रमाची लज्जत वाढविणारी. हे शब्द आणि म्हणी संपादित करायला सां स. ने किती मोठा शब्द कोष अभ्यासला असावा हे आयोजिलेल्या शब्दांवरून ध्यानी येत होते. महीनमहाल, दाभणकाडी आदी शब्दांची भर त्यायोगे बर्याच मायबोलीकरांच्या मेंदूत पडली! मुकाभिनय स्पर्धा काय नांव ते दमशिराज(?) हा कार्यक्रम तर भन्नाट रंगला!! राकू, राफा, मयूर यांनी आपल्या तरल विनोद बुद्धीने धोनी स्टाईल फटकेबाजीने तर घारू अण्णांनी द्रविड ('राहूल' संकल्प नव्हे) स्टाईल फलंदाजीने गाजवला शेवटी करंडक घारू अण्णंनी पटकावला पण सामना वीर ठरली ती छोटी धनश्री!! ऐन वेळी मुख्य संघातून जादा खेळाडू म्हणून खेळलेली धनश्रीने सर्वाची उस्फुर्त दाद मिळविली!! मुकाभिनय कार्यक्रम हा सार्या कार्यक्रमांचा मेरूमणी ठरला! एव्हाना ६ वाजून गेल्याने सां स नी वैयक्तीक गुणदर्शनांना फाटा दिल्याने काही बहुगुणी कलाकार थोडे हिरमुसले पण समसुचकता बाळगून त्यांनी मनाची समजूत घातली. सगुणाबागेतले एक दिवसाचे वास्तव्या आटोपते घेतांना समस्त मायबोलीकर तृप्त होते. प्रत्यक्ष न भेटलेल्या पण रोज भेटत असलेल्या मित्र मैत्रीणींना त्यांच्या कुटुंबियांना भेटून सारेच मनोमन संतोषले होते! वर्षातील एक दिवस खरोखर अगदी आनंदात गेला ह्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्यावर झळकत होते! मुंबईकर आणि पुणेकरांनी एकमेकाचा स-ह्रुदय निरोप घेत आपापल्या गाड्यामध्ये बसून दोन भिन्न दिश्यांना प्रस्थान केले. वर्षा विहार यशवी करण्यामागे संयोजक मयुरेश, अरुण, संकल्प, संदीप, दत्तराज ( ह्याची उणीव विशेष भासली), मिलींद, आनंद, श्रद्धा, मिनाक्षी, मुक्ता आदींचे कठोर परिश्रम होते हे विसरून चालणार नाही त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन. आभार मानत नाही कारण ते अश्या अनौपचारीक स्नेहमेळाव्यात ते खुपच औपचारीक वाटेल!! परतीच्या प्रवासात सारेच थकले भागले होते तरी, अस्मादिकांची कन्या गायत्रीचा उत्साह शाबूत होता. रामकाकांना "तुमचे घर देवळात आहे काहो?" असे विचारून तिने सर्वांना हसविले. थोडावेळा रामला तर थोडा वेळ अरुणला त्रास देऊन शेवटी अंधार झाल्यावर ती देखील आईच्या मांडीवर येउन विसावली. घरी पोहोचल्या जास्त काही खायची इच्छा नव्हती थोडेसे खाऊन जमिनीला पाठ टेकताच दिवसभराची सारी दृष्ये डोळ्यांपुढे झळकून गेली आणि त्या अतीव सुखातच डोळा केंव्हा लागला कळले नाही. समाप्त!!(?) नव्हे पुढच्या वर्षी पुन्हा!! वि. वि. एवढे मोठे लिखाण करण्याचा हा माझा पहिला प्रयत्न अनावधाने काही चुका झाल्यास क्षमस्व! संपूर्ण वर्णन तपशिलवार करताना शितलपवार (हा मिनूने गाडीत सांगितलेला अजून एक शब्द!) झाले असण्याची शक्यता आहे!
|
Krishnag
| |
| Wednesday, July 18, 2007 - 6:50 am: |
| 
|
नंदिनी, योगी, यश, रीना सर्वांचे वृतान्त अगदी छान!! वविमध्ये आलेल्या गमतीजमती अगदी अचूक शब्दात मांडल्यात सर्वांनी!! 
|
Maudee
| |
| Wednesday, July 18, 2007 - 6:54 am: |
| 
|
सर्वानीच छान वृतांत लिहिले आहेत.... म्हशीची मुलाख़त ख़ासच.... व. वी ला आलेल्या लोकांचे नाही पण तिथल्या निसर्गसौंदर्याचे फोटू तरी upload करा की आम्हा पामरांसाठी
|
Neel_ved
| |
| Wednesday, July 18, 2007 - 7:05 am: |
| 
|
वाकड्या, नंदिनि, रिना, केपी, योगी... मस्त जमलेत रे वृत्तांत.... यश, पुढचा भाग कधी टाकतो आहेस? याहू गृपवर फोटो टाकले अहेत होऽऽऽऽऽ
|
Zakasrao
| |
| Wednesday, July 18, 2007 - 8:29 am: |
| 
|
कृ मस्त वृतांत. छान जमलाय. धोनी ष्टाइल फ़टकेबाजी माही पण कसोटीमधे नांगर टाकुन राहणार्या द्रविड सारखे जमले आहे. आणि अधे मधे देखणे चौकार षटकार आहेतच.
|
वविकरान्नो, आपण हिला पाहिलत का?????
हिला ओळखणार्यास एक गाव झकोबा कडुन बक्षिस मिळेऽऽऽल होऽऽऽ.ऽ
|
Kandapohe
| |
| Wednesday, July 18, 2007 - 8:50 am: |
| 
|
कृ सविस्तर वृत्तांत असून पाल्हाळ लावल्यासारखे वाटले नाही. 
|
Reena
| |
| Wednesday, July 18, 2007 - 9:05 am: |
| 
|
मयुरेश, जल्ला, असा काय करतोस रे? तुम्हि नायतर कोण समजुन घेणार आम्हांला???योगी, फ़क्कड जमलाय व्रुतांत. आणि याच रे एक दिवस्स, कांद्यावरचे अंडे खायला, आमच्या खेडेगावात बरे
|
Krishnag
| |
| Wednesday, July 18, 2007 - 9:12 am: |
| 
|
याच रे एक दिवस्स, कांद्यावरचे अंडे खायला, आमच्या खेडेगावात बरे >>> रीना, हा काय प्रकार आहे? केपी, तुला काही ठाउक आहे का?
|
कृ,पहिला पण एक्दम छान वृत्तांत... तुमचा वृत्तांत वाचुन वविला न आलेल्यांना आपण तिथे काय काय केले त्याचे अगदी नेमके वर्णन वाचायला मिळाले
|
Neel_ved
| |
| Wednesday, July 18, 2007 - 9:36 am: |
| 
|
कृष्णा, कांद्यावरचे अंडे हि एक पुरातन पाककृती आहे... खेडेगावातली... त्या दिवशी परतीच्या प्रवासात रिना सांगत होती... मला नीट काही आठवत नाही पण कांदा निट परतुन घेउन गरम तव्यावरच जिवंत कोंबडीला उभे करायचे आणी मग चटके बसले कि ती कोंबडी त्या कांद्यावरच अंडे घालते... असा काहीसा प्रकार आहे तो.... हो ना गं रीना?
|
Kandapohe
| |
| Wednesday, July 18, 2007 - 9:43 am: |
| 
|
चटके बसले कि ती कोंबडी त्या कांद्यावरच अंडे घालते>>> बरे झाले असल्या पुरातन पद्धती बंद झाल्या ते. :P
|
Krishnag
| |
| Wednesday, July 18, 2007 - 9:49 am: |
| 
|
पुरातन पाककृती आहे... >>>> तव्यावरच जिवंत कोंबडीला उभे करायचे आणी मग चटके बसले कि ती कोंबडी त्या कांद्यावरच अंडे घालते>>> ही पाककृती की पाकविकृती?
|
Reena
| |
| Wednesday, July 18, 2007 - 9:57 am: |
| 
|
चटके बसले कि ती कोंबडी त्या कांद्यावरच अंडे घालते>>> yA kombdyache kahi eiku naka...khup chhan item asto to, Krishna, ek divas sagle pune-mumbai kar milun yach mazya ghari
|
अरे म्हशीपुराणात वविपुराणात हे काय भलतच अभक्ष्यभक्षणाच?????? चला पळा बघू, आपापल्या बीबीवर जावून टीपी करा, (नाहीतर मॉड्स येतिल दन्डुका घेवुन!) 
|
|
|