|
मीही टायपूनच घेते वृत्तान्त.. आयत्या वेळी माझं वविला येणं रद्द होतय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आदल्या सलग तीन दिवसरात्रीचं जागरण अंगात ताप आणि खोकला असताना आणि सोमवारी मरेस्तोवर काम करायला लागणार आहे हे माहीत अस्ताना खरं तर मला येणं जमलंच नसतं.... पण म्हटलं एकदा ठरवलय तर जायचंच... काही झालं तर बघायला आपलीच माणसं आहे.. इथे घरात मरून पडलं तर कुणाला समजणार्सुद्धा नाही. आणि एकावेळेला तीन क्रोसीन गिळून मी निघाले. पण आल्याचं पूर्ण समाधान मात्र मिळालं. खूप मजा आली. एक तर लाडकीने मला आम्ही दहा मिनिटात पोचतोय असं सांगुन सीबीडीला बोलावलं. आणि तब्बल एक तासानंतर सर्व उगवले. मध्यरात्री सहा वाजता उठलेली मी.. असली वैतागलेली होते मी.. अगदीच स्टॉपवर उभी आहे असं वाटायला नको म्हणून मी सरळ आलेल्या एस्टीवाल्यावर सूड घेतला. कोल्हापूरला जाणार्या बसवाल्याला विचारायचं "गोव्याला जाते का हो काका?" आणि साखरप्याला जाणार्या बसवाल्याला विचारायचं "सिंगापूरपासून किती पुढे जाईल?" असो. तो मी केलेला इब्लिसपणा या सदरात मोडेल. एकदाचे हे मुंबईकर उगवले. आणि बसचं दारच उघडेना... बराच वेळ झटापट (दाराशी) केल्यावर एकदाची मी बसमधे शिरले. तर मी बसमधे शिरलेसर्वानी जल्लोषात माझे स्वागत केले. मीही सर्वाना मिठाई देऊन "आमचा प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला बरं का.." हे सांगितलं.. गाणी गात गात. आनंदची बडबड (गीते) ऐकत ऐकत निघालो.. मधेच एका टपरीवर चहा घेतला. तिथेच बाकीच्या मायबोलीकरीणीची यथेच्छ चोउकशी आणि ओळख करून घेतली. कोण कुठे काम करतं वगैरे फ़ालतु प्रश्न विचारले. माझ्या आईने लाडकीबरोबर पाठवलेले मेथी पराठे खाल्ले. ते आदल्या दिवशी केलेले आहेत हे पाहून काही जणानी हात आवरता घेतला.; ( हे मी गेल्या तीन दिवसात खाल्लेलं धड खाणं.) मग परत बसमधुन कर्जत गाठलं. वाटेतेच पुणेकर पोचल्याची बातमी मिळाली (सगुणा बागेत सुखरूप रित्या). मग आम्हीपण पोचलो. उतरून फ़्रेश झालो आणि आधी नाष्टा केला. त्याचवेळेस एक पुणेकरीण येऊन तू नंदिनी.. वगरे आम्हा सर्वाना ओळखून गेली. ही कोण? असं आम्ही एकमेकाकडे प्रश्नार्थक चेहर्याने पाहतानाच "मी पूनम" अशी ओळख करून दिली. (नशीब आमचं) त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाना (हॉरीबल स्पेलंग आहे. आता कळलं ते स्वत्:ला सा. स. का म्हणवून घेत होते ) सुरुवात झाली. पर्दा है पर्दा.. खेळ जेव्हा ऐकला तेव्हाच समजलं अपने बस की बात नही.. आयला पाच वर्षं शाळेत बरोबर असलेल्या मित्राला तो रस्त्यात भेटल्यावर मी जेव्हा "काका तुम्हाला कुठेतरी पाहिलय" असं म्हणते तिथे एकदा चेहरा आणि नाव पाहून मी काय दिवे लावणार? तरीही खेळ मस्त एंजॉय केला. केपीने योगायोगला "नेहा" असं का ओळखलं असावं बरे?? जाऊ दे... आनंद धारातीर्थी पडूनही काही उपयोह झाआ नाही. काही गटबदलू पुणेकरामुळे मुंबईकर जिंकले. (आही हो आमच्यात पण खिलाडु वृत्ती... ) त्यानंतर मासे बघायला गेलो. तिथे मी एका माशाला (आयुष्यात पहिल्यान्दा) हातात घेतलं. माझ्या हातात शांत होता. रीनाच्या हातात गेल्यावर त्याने टूपकन उदी मारली. (माशाना स्पर्श ज्ञान असतं आणि त्याना शाकाहारी कोण आणि मत्स्याहारे कोण ते समजतं.. हा प्रयोगाचा निष्कर्ष.) सगुणा बागेत जातानाच माझ्या बॉसने मला "बफ़ेलो राईड घेच. खूप मजा येते." असं तीन तीनदा बाअवलं होतं. मला म्हशीच्या पाठीवर बसायला प्रॉब्लेम नव्हता. जल्ली ती म्हैस पाण्यातून जाणार होती ना.. आणि जर मी पाण्यात पडले तर.. याची जास्त भिती होती..... पण रीना आधी बसली आणि मग मी राईड घेतली.. जो होगा सो देखा जायेगा.. हा माझ्या वृत्तानंताचा exclusive भाग्: माझी म्हैसवारी. एकतर त्या म्हशीच्या पाठीवर कुणाच्यातरी नखानी जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्त येत होतं. आणि तो गाईड मला तिथेच घट्ट पकड असं सांगत होता. अरे, म्हैस झाली म्हणुन काय झालं जीव आहे की नाही तिला? मी आधी हात पकडलाच नाही. मग म्हशीना पाण्यात चालायला सुरुवात केली. आधी धड चालत होती बरं का. मधेच लचकायला मुरडायला लागली. मी आधीच घाबरले होते... मस्तपैकी आईऽऽऽ करून ओरडले. म्हैस घाबरली. आणि पुढेच जाईना. मी तिच्या शिंगाना पकडलं होतं. (या पॉज मूव्हमेंटमधे ) अजून थोडा वेळ बसेल म्हणेपर्यन्त त्या बयेने चक्क उभी राहिला. मी पडायचा अवस्थेत. मी आईऽऽऽऽ तिकेडे मातोश्रीना उचक्या लागल्या. शेवटी एकदाची ती राईड संपली. मी जाम टरकले होते. जमिनीवर आल्यावर जरा बरं वाटलं. मग आम्ही धबधब्याच्या पाण्यात खेळायला गेलो. मनसोक्त भिजून घेतलं. ताप काय असा तसा आलेलाच आहे हा विचार करून.. तापापेक्षा जास्त काळजी लेन्सेसची होती. आणि हो वाटेतच आमची "गायत्ली" या छोकरीबरोबर ओळख झाली. पठ्ठी बोलायला एकदम हुशार. आणि माझ्याबरोबर लाडकीबरोबर नीट राहिली. आपल्याला अशी बच्चे कंपनी जाम आवडते. उगाच आई बाबा असे भोकाड पसरणार्यापेक्षा.. "तु माझ्याकडे मुंबईला येतेस?" "कप्ले कुठाय?" इतकं मार्मिक उत्तर देणारी गायत्ली नंतरसुद्धा आमच्याच बरोबर खेळत होती. (या बाबतीत सर्वच पोराना मानायला पाहिजे. झोपळ्यावर खेळताना जागा जाईल या भितीने पार्थ (कुणाचा ते आठवत नाही) तहान लागलेली असताना सुद्धा खाली यायला तयार नाही. पाण्यात पण त्याने मनसोक्त भिजून घेतलं. घारुअण्णाच्या सुकन्येला आईने "पडायचं आहे का?" असा दम दिल्यावर तिने "पडू का?" अशी आज्ञा मागितली!!! क्रमश्:
|
Manjud
| |
| Tuesday, July 17, 2007 - 8:49 am: |
| 
|
म्हैस घाबरली. आणि पुढेच जाईना. मी तिच्या शिंगाना पकडलं होतं. (या पॉज मूव्हमेंटमधे ) अजून थोडा वेळ बसेल म्हणेपर्यन्त त्या बयेने चक्क उभी राहिला. मी पडायचा अवस्थेत. नंदिनी.......जबरी लिंबूभाऊ, ह्या प्रसंगाचं एक चित्रं पाहिजे आपल्याला........ (फोटो कही दिसत नाहियेत. )
|
Zakasrao
| |
| Tuesday, July 17, 2007 - 8:55 am: |
| 
|
अजून थोडा वेळ बसेल म्हणेपर्यन्त त्या बयेने चक्क उभी राहिला. मी पडायचा अवस्थेत>>>>>>>... अर्थ काय तर म्हशीनाही स्पर्श ज्ञान असत. पाठीवर बसलेली व्यक्ती इब्लिस आहे हे लगेच कळाल्यामुळे तिने पण थोडासा इब्लिसपणा करुन घेतला असेल. जरा जास्तच घाई गडबडीत लिहित आहेस. निवांत पणे लिहि. म्हणजे अजुन व्यवस्थित येइल आणि भरपुर चिमटे घेता येतील.
|
फोटो अपलोड करायचाय पण accesss मिळत नाही
|
अरे गिरि अक्सेस आहे की...
|
याहू group वर access मीळतोय पण ववि २००७ वर नाही
|
Neelu_n
| |
| Tuesday, July 17, 2007 - 9:20 am: |
| 
|
>>>"सिंगापूरपासून किती पुढे जाईल?" नंदीनी lol तु आहे तिथे ईब्लिसपणा असणारच ना झकास
|
गिरि तुमचा सेल नं. द्या. मी फोन करुन सांगतो.
|
मन्जु, अग हिच्या वर्णना आधीच टाकलय की चित्र इथे
|
लंचला मस्तपैकी जेवलो. गायत्रीने आईबरोबर जेवताना नखरे केले आणि माझ्याबरोबर बसून नीट जेवली. "नीट बस.. पाठी काही सपोर्ट नाही" असं मी तिला सांगितल्यावर आधी ती गोंधळली. नंतर एकदा चेक करून म्हणाली. "आहे, मला पाठ पण आहे आणि पोट पण..." त्यानंतर बाल्याचा डान्स झाला, (मायबोलीकरापैकी कुणाचाही वैयक्तिक गुण दर्शन नव्हते) त्यानंतर शब्दखेळ सुरू झाले. काही काही शब्द अगदी सोपे होते. काहीचा अर्थ मला अजूनही समजला नाही.. काय तो शब्द न्यायघुरक्षण... जाऊ दे... याबाबतीत मिल्या आणि पूनमची टीम आणि आमची टीम समदु:खी होती. त्यानंतर टाय वर टाय असं खेळत आनंदची टीम "तडकाफ़डकी" जिंकली. मधेच पेशवे काहीतरी फ़र्माईश करत होते. आधी कितीतरी वेळ पेशवे एका कोपर्यात बसल्यामुळे परदानशीन वाटत होते. मग नंतर जरा सामोरे आले आणि त्यानी "अचाट आणि अतर्क्य" फ़र्माईशी केल्या... हा फ़रक.. आता इथे मुघल बादशहा असता तर कायतरी डान्स गाणं गिणं म्हणायला लावलं असतं ना... पण पेशव्यानी चक्क चिल्लर नाणी मागितली. दिवे घ्या हो पेशवे.... मग मायबोली प्रशनमंजुषा.. प्रश्न मजेदार होते. एका प्रशनाचं उत्तर आलं की दुसर्याचं येईलच याची खात्री नव्हती. इथे भ्रमाला "पुण्याई" कामी आली कारण पहिला प्रश्न गजालीवरचा आणि दुसरा "धार्मिक सदरात नुकताच गाजलेला बीबी कोणता?" हे म्हणजे, ओसामा बिन लादेनला जगाच्या नकाशावर अमेरिका कुठे आहे असं विचारणं... दिवे घे रे लादेन.. त्यानंतर मूकाभिनयाचा गेम झाला. घारुअण्णानी हा गेम कसा खेळायचा आणि जिंकायचा याचा पाठ दिला. सर्वच clues एकदम सही. राकु, राफा आणि मयुरेश यानी या खेळात करमणूक कशी करावी याचा पाठ दिला. राफाला बोका काही सांगता येईना. आणि राकु मांजर आणि कुत्रा सोडून पुढे जाईना. मयुरेशचा एक्शन बघून द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आहे. हे समजलं. गाणें काही केल्या कुणाच्याही लक्षात येइना. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला.." आणि मयुरा, बाबा साडी अशी लुंगीसारखी गुंडाळत नाहीत. आणि तो पदर गुजराती बायकासारखा का घेत होतास? ... राफाने "कुरवाळू" व्यवस्थित सांगितलं. राकुने "कुरवाळिते भाऊराया" असं गाणं ओळखलं. ह ह पु वा.... हा गेम खरंच खूप मस्त झाला.. अगदी मायबोलीच्या लौकिकाला साजेशा दंगा आणि हास्यकल्लोळात. मग मस्त कांदाभजी खाल्ली. आपपल्या बॅगा उअचलल्या. ग्रूप फोटो काढले आणि मग "भेटू परत" वगैरे टाटा अच्छा बाय बाय करून मार्गस्थ झालो. येताना राकु आमच्या बसमधे होता. (बसमधे चढायच्य आधी मी त्याला नाव परत विचारलं.. माझा भरवसा नाही परत नाहीतर घोटाळा व्हायचा. ) बसमधे योगीने धमाल डान्स केला. मजा आली. बेलापूरला मी उतरले, घरी येऊन सामान बांधलं आणि रात्री बारा वाजता लोणावळ्याला गेले.
|
Reena
| |
| Tuesday, July 17, 2007 - 9:44 am: |
| 
|
नमस्कार मुलुंडकर्स तुम्ही सगळे अगदी मजेत असालच, त्यामुळे खुशाली न विचारता सरळ व्रुत्तांताला कीबोर्ड घालते. आपल्या मित्र मंडळींनी तसे बरेचसे व्रुत्त अंत केलेले आहेत. त्यामुळे मी वविचे मोजके आणि माझ्या पंचद्रियांनी टिपलेले क्षण नमुद करते. (अरे बापरे, प्रस्तावनाच खुप मोठी झाली) सर्व प्रथम पुणे-मुंबईतील सर्व संयोजकांचे मनापासुन आभार.कार्यक्रमांच्या उत्तम आयोजनाबद्दल पुणेकरांचे कॉम्पुटर भरुन अभिनंदन अविस्मरणीय क्षण माझी बफ़ेलो रायडींग.. आम्ही दोघी ही घाबरलो होतो, (मी आणि म्हैस) .., योगीचा अप्रतिम डान्स पर्फ़ोमन्स, 'आनंदी-आनंद' ची धम्माल, योगायोगाचीगाणी, राकु ने केलेली नक्कल, द्रोपदीचे वस्त्रहरण पाहुन तर प्रत्यक्ष कोरवांना देखील ताप भरला असेल, आणि 'कुरवाळिते भाऊराया' नवी न कंपोझींग...धनुने केलेली सुंदर नक्कल, 'धुंद' समजावुन सांगताना तर मी स्वत्: च धुंद झालेले..शब्द व म्हणीच्या खेळामधे'स्वाती' क्रुपेने मिळालेली फुलदाणी. घारू आण्णा चि तर, कमालच, एकही फ़ॉल पॉईंट न घेता निर्विवाद पणे त्यांनी आपल्या जोडीदारांच्या संगतीने स्पर्धा जिंकली. नंदुची आणी माझी म्हशी रायडींग वरुन तर शेवट पर्यंत मस्करी चालली होती.. ऐरोली ला खेडेगाव म्हणताना न थकणारे सारे आणि आमचीऐरोली किती चांगली म्हणुन सांगणारी मि.. पण उतरायच्या आधी भ्रमा ने विचारलेच,स्टॉप घरापासुन किती दुर, अगदी घरच्यांच्या काळजीने, बरे वाटले..आमची सर्वांची लाडकी झाली नुपुर..आणि तितकीच गोड- शिल्पा. चेतना, लाडकी, स्वाती, नंदु आनंदी-आनंद, अश्विन, मिनु, पुनम, वाकड्या, धनु, पार्थ आणि सरवच खुपच धम्माल आहेत.. या सर्व क्षणांचा शिलेदार म्हणजे- निल. ज्याच्या सांगण्या वरुन मी मायबोली जॉऍइअन केले.आणि आता तर मायबोलीचीच होऊन बसले. ऑर्कुट, जी-मेल, म्हणजे- पिज्झा, बर्गर तर मायबोली म्हणजे- झझणझणीत 'वडापाव'. त्यामुळे दिवसभर ओर्कुट, गुगल जाउअन आलेली पाखरे मायबोलीच्या घरट्यात विसावायला येतात. इअथ्रे आल्यावर आपल्या मातीत, आपल्या माणसांत आल्यासारखे वाटते.. जाताना अनोळखी असलेले चेहरे येताना मात्र आयुष्य भराची ओअळख देउअन गेले. आणि त्या बरोबरच दिल्या कधी न विसरता येणा र्या आठवणी ही आठवणींची साठवण ज्याचे मोल करताच येणार नाही. !!!!!!! सो, थ्री चिअर्स टु ऑल मुलुंडकर्स
|
Monakshi
| |
| Tuesday, July 17, 2007 - 9:50 am: |
| 
|
नंदिनी, एकदम छान. आता कळळं की लिंबूजी कोणाला घाबरले ते!
|
Arun
| |
| Tuesday, July 17, 2007 - 10:01 am: |
| 
|
नंदिनी, रीना : छान जमला आहे वृतांत .........
|
Manjud
| |
| Tuesday, July 17, 2007 - 10:07 am: |
| 
|
लिंबूभाऊ, ते चित्रं मी आधीच पाहिलं होतं. नंदिनी अशी दिसते?
|
मन्जु, काय माहित कशी दिसते? पण अशी नक्कीच दिसत नसावी! म्हशीवर बाप्या दाखवायचा की बाई या कन्फ्युजन मधे मी ते अर्धवट टाकल नन्दिनी, रिना उत्कृष्ट वृत्तान्त! अगदी नजरेसमोर उभ राहिल चित्र! किस्नाच कुठ अडुन बसलाहे काय कळत नाही!
|
तो पदर गुजराती बायकासारखा का घेत होतास? ... अनुभव नाही गं नंदिनी साडी नेसण्याचा ..
|
Psg
| |
| Tuesday, July 17, 2007 - 10:30 am: |
| 
|
मस्त वृत्तांत नंदिनी आणि रीना
|
मस्त वृत्तांत नंदिनी आणि रीना. बाकी मुंबईकर्स कुठे गायबले. थ्री चिअर्स टु ऑल मुलुंडकर्स >>> मायबोलीबद्दल लिहीता लिहीता हे काय मधेच. 
|
Neelu_n
| |
| Tuesday, July 17, 2007 - 10:33 am: |
| 
|
नंदिनी, रीना मस्तच लिहलायत. सर्वांचेच वृतांत छान. विषेश का.पो. यांची म्हशीची मुलाखत.. अफलातुन
|
Neel_ved
| |
| Tuesday, July 17, 2007 - 10:35 am: |
| 
|
मयुरेश आता हे नको सांगु कि साडी बघण्याचाही अनुभव नाहीये...
|
|
|