|
Monakshi
| |
| Monday, July 16, 2007 - 10:17 am: |
| 
|
केपी सहीच, और आन दो. तुम्ही हे गुलमोहोराच्या इनोदी सदरामध्ये का टाकत नाही??
|
Pha
| |
| Monday, July 16, 2007 - 10:22 am: |
| 
|
वा.. सगळे वृत्तांत छान आलेत! *** मायबोलीकर मोड ऑन *** अजून येऊ द्या! *** मायबोलीकर मोड ऑफ *** केप्या, म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. शिंगरू म्हणजे घोड्याचे पिल्लू. :P
|
केप्या मला खालील प्रश्न पडले आहेत : १. (पुनरुक्तीचा प्रमाद पत्करून विचारतो की ) केप्याशी संवाद साधायला म्हैस 'रेडी' तरी कशी झाली ? २. तिचा तळ्याकडे ओढा आहे (राईड देण्यासाठी) हे कसे लक्षात आले असेल ? ३. सर्कशीत हत्तीला चड्डी घालतात मग त्या पर्फ़ोर्मिन्ग आर्टिस्ट म्हशीला 'तशीच' का ठेवली होती.. ४. नस्त्या जबाबदार्या ती तरी 'अंगावर' कशाला घेते ? ५. म्हैस माणसाळलेली होती पण काल शेपूट पिरगाळल्यावर तिने 'जबाबदारी' झटकली असती म्हणजे ? वगैरे
|
फ, धन्स रे. दुरुस्ती केली आहे. माझे कन्फ्युजन झाले होते. गुलमोहरामधे टाकले असते पण इतर लोकांना संदर्भ लागत नाही. लडकी पहील्या पानावर टाकायला आम्हाला पावर नाय
राफा, द. को. करंडक पुसुन ठेवला आहे कधी पाठवू?
|
केप्या जबरी रे भो
|
Zakasrao
| |
| Monday, July 16, 2007 - 10:27 am: |
| 
|
म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. शिंगरू म्हणजे घोड्याचे पिल्लू.>> फ़ सेम पिंच रे. केपि तु अशी घोडचुक कशी काय केलीस? केप्या मुलाखत मात्र लय भारी जमली आहे. राफ़ा आयशॉट
|
Rajkumar
| |
| Monday, July 16, 2007 - 10:34 am: |
| 
|
सर्व संयोजकांचे आणि सांस्कृतिक समितीचे आणि विशेषकरुन मयुरेशचे हा ववि यशस्वी केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! वाकड्या,क्रिस वृत्तांत छान! अजून येउ देत. केप्या,राहुल(या नावाने तुला कुणी हाक मारतं का हल्ली..?
|
Psg
| |
| Monday, July 16, 2007 - 10:47 am: |
| 
|
म्हैस 'रेडी' , तळ्याकडे ओढा , 'जबाबदारी' झटकली
राहुल, खरच 'आयशॉट' आहे हे! पॉश!
|
Himscool
| |
| Monday, July 16, 2007 - 11:11 am: |
| 
|
केप्या आयशॉट... लय भारी बरका.. अगदी सहावीतल्या मुलाला पडतील असे प्रश्न विचारलेस...
|
काल या वेळेस काय चाल्ल होत?
|
Rajya
| |
| Monday, July 16, 2007 - 11:22 am: |
| 
|
लिम्ब्या, काल या वेळेस पेशवे (फ) फर्माईश चालु होती.
|
म्हन्जे काय चाल्ल होत? या गोष्टी वृत्तान्तात तपशीलाने काय नाही येतेत? वविकर, चान्गले मोठमोठाल्ले वृत्तान्त लिहा!
|
Krishnag
| |
| Monday, July 16, 2007 - 11:37 am: |
| 
|
केपी, जबरीच! लेका, ज्ञानेश्वरांनंतर तूच!! राफा...
|
क्रिश! छान आहे व्रुंतांत , ..केपी मुलाखत सही आहे.. बाकिच्यांचेही व्रुंतांत येवु द्या की..
|
Rajya
| |
| Monday, July 16, 2007 - 11:51 am: |
| 
|
म्हणजे लिंब्या ते असं होतं आपले फ झाले होते पेशवे. मग पुण्याचे पेशवे म्हटल्यावर त्यांचं चालु झालं आम्हाला हेच पाहीजे, तेच पाहीजे, मग सर्व मायबोलीकरांनी पेशव्यांना जरा राऊंडात घेतला आणि विचारले, आपल्याला काय हवे आहे? मग पेशव्यांची फर्माईश, सर्वात उंच मायबोलीकराने समोर यावे? यात आपले यशवर्धन व भ्रमा यांचात चुरस होती व यात यशवर्धन सर्वात उंच ठरले. मग पेशव्यांनी त्यांना एक छान भेट दिली. पेशवे पुढे म्हणाले, "सर्वात जुना मायबोलीकर कोण?" अर्थात मिल्या, त्यालाही एक भेट मिळाली. वेग वेगळी चित्रं असलेली सर्वात जास्त नाणी कुणाकडे? यात वाकड्याकडे ९ व सौ. कृष्णाजी यांच्याकडे १० नाणी निघाली. मग पेशवे म्हणाले वेधक वेषभुषा कोणाची? यात बरीच चुरस होती, स्पर्धक होते, घारुअण्णा, राकु, योगी, नंदिनी, अतल्या, केप्या, रीना वगैरे सर्वात जास्त मतं मिळाली घारुअण्णांना पण हाय रे दैवा त्या कुणीतरी लहान मुलानं (कोण हो तो?) बक्षिस पटकावलं
|
स्पर्धक होते, घारुअण्णा, राकु, योगी, नंदिनी, अतल्या, केप्या>>> मी फक्त फोटोस्पर्धक होतो. 
|
Atlya
| |
| Monday, July 16, 2007 - 12:16 pm: |
| 
|
के पी.... मुलाखात छान घेतली आहेस. वाकड्या...... थोड्क्यात पण छान...... अभिनन्दन......
|
Krishnag
| |
| Monday, July 16, 2007 - 12:44 pm: |
| 
|
वरती मिनूने लक्षात आणून दिले तसे एक महत्वाच्या कार्यक्रमाचा वृत्तन्तात लिहायचा रहिला. अल्पोपहारा नंतर पुणे व मुंबईकर मायबोलीकरांची ओळख हा कार्यक्रम नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय नाट्यमय रित्या सांस्कृतिक समितीने सादर केला! भला मोठा अंतरपाठ दोन गटात धरन्यासाठी होता! आधी कळेनाच हा काय प्रकार!! पण मिनू, श्र आणि सांस्कृतिक समितीने रंगीत तालीम दखविल्यावर उलगडा झाला. आधी प्रत्येक मायबोली कराने वा त्यांच्य कुटुंबियानी आपले नांव सर्वां समक्ष संगितले नंतर प्रत्येक गटातील एका व्यक्तीने पडल्या विरुद्ध बाजुस उभे राहून पडता बाजूस होता क्षणी समोरील व्यक्तीचे नांव सांगायचे! कल्पक बुद्धीच्या सां. स. संआ मायबोलीकरांनी अगदी नाट्यमय प्रतिसाद दिला कुणी पडद्या मागे उभे राहिले, कुणी बसले तर आनंदसारखे कुणी लेलॅण्ड होउन सहभागी झाले ह्या खेळात. शेवटी पुणेकरांच्या मदतीने मुंबईकर गटाने ह्या खेळात बाजी मारली! ओळखी हा अनोखा प्रयोग खुपच धमाला झाला! जाळ्यात पकडलेल्या सार्या माश्यांना यजमानांनी मात्र जीवदान दिले तरी कुणा जलचर भक्षिण्या उद्युक्त झालेल्या मायबोलीकराने मार्गदर्शकाला विचारले की जेवणात हे स्वादिष्ट जलचर सामील असतील का? मार्दर्शकाने तत्परतेने तुम्ही तसे अगाऊ सुचना दिल्या तर मिळेल असे सांगितले. मध्येच चि. नचिकेतने ते मासे मेल्यावरच खायचे असतात असे ऐकवले. त्यामुळे बहुदा त्या मायबोलीकराने मोह टाळला असावा! मत्स्य शेती आटोपून सारा लवाजमा दुसर्या एक तळ्या कडे आला तिथे एक महिषी सामोर्या आलेल्या ह्या मायबोलीकरांकडे व त्यातील काही भरभक्कम मायबोलीकरांकडे भय चकीत नजरेने पहात असल्याचे जाणवले! तेंव्हा कळले की 'बफेलो रायडींग' नावाचा प्रकार इथे असावा! त्या महिषीला दोघांनी धरून ठेवले होते अन्यथा ती बहुदा मागल्या मागे तळ्यात जाऊन लपून बसली असती! बर्याच जणांना त्या महिषी विषयी कणव जागृत झाल्याने त्यांनी स्वारी करण्याचे टाळले पण घारु अण्णांना रहावले नाही त्यांनी कन्येसह महिषीवर स्वार होऊन तिला समजावले! त्यानंतर नंदिनी स्वार झाली महिषासूर मर्दिनीच्या अभिनीवेशात स्वार झलेली नंदीनी मोठ मोठ्याने ओरडत होती तीचा तो आवेश अवर्णनिय होता तीच्या चेहर्यावर भय संतापाचे अगम्य मिश्रण झाले होते पण सुखरुप माघारी आल्यावर महिषीसह नंदिनीने देखील निश्वास टाकला! नंदिनीच्या पराक्रमामुळे मग रीनालाही स्फुरण चढले आणि तिने देखील मोठ्या हिमतीने महिष स्वारी पुर्ण केली. छोट्या पार्थाने मात्र अगदी अर्जुनाच्या आवेशात महिश स्वारी फत्ते केली. शेवटी इतरांना त्या म्हशी विषयी कण जागृत झाल्याने त्यांनी आपला बेत रद्द केला आणि बागेच्या यजमानांनी मोहमयी वर्णन केलेल्या धबधब्याकडे कूच करण्याचे सर्वानुमते ठरले. धबधब्याकडे जाताना पुण्याच्या रथातील काही प्रवासी कमी झाले होते? त्यामुळे वाकड्या ह्यांना रथात जागा मिळाली आणि दोन्ही रथ त्या चिंचोळ्या रस्त्यांवरुन धावू लागले.... उर्वरीत भाग आता उद्या!!
|
Meenu
| |
| Monday, July 16, 2007 - 1:21 pm: |
| 
|
सगळेच जोरदार .. केप्या तुझ्या मैत्रिणीशी तुझा संवाद चांगलाच जमलाय हो ! मस्त tuning आहेच तसं तुमचं .. नेहाचं काय मत आहे ? योण्णा, फ, राकु झ
|
Reena
| |
| Monday, July 16, 2007 - 1:54 pm: |
| 
|
हाय कसे आहात सगळे
|
|
|