Zakasrao
| |
| Monday, July 16, 2007 - 6:44 am: |
| 
|
तर दुसर्याने आपला पुणेरी बाणा सरसावत " नाही बोट एका तलावात आणि हाऊस दुसर्या तलावात आहे हे निदर्शनास आणून दिले>>>>>>>>
|
कृ : वृतांत छान. पूर्ण कर की लवकर ...... >>>>> ह्याचा अर्थ 'आटोपता घे आता' असा नसेल असेच मी गृहीत धरणार!! नाही पुर्ण वृतांत येऊ देत....
|
Milya
| |
| Monday, July 16, 2007 - 7:01 am: |
| 
|
अरे वा!!! वृत्तांत यायला लागले का? वाकड्या मस्त आटोपशिर वॄत्तांत कृष्णाजी छान आहे वॄ. अजून येऊदे... यशस्वी आयोजनाबद्दल व.वि संयोजकांचे हार्दिक अभिनंदन... रा.फ़ा ला अनुमोदन... मयुरेशचे विशेष अभिनंदन तसेच वेळ कमी असुनही सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेटके संयोजन केल्याबद्दल सांस्कृतिक समितीचे पण अभिनंदन... गेल्या पाच वर्षापासून त्या त्या वेळचे संयोजक स्वत:चा वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून व.वि यश्स्वीरित्या पार पाडतात हे खरेच कौतुकास्पद आहे.. काही काठावरची लोक नुसतेच नावे ठेवायचे काम करतात पण त्याने नाउमेद न होता किंवा कुठल्याही वाद-विवादात वेळ वाया न घालवता संयोजक व.वि तडीस नेतात हे खरेच स्पृहणीय आहे.. माझ्या ह्या मताशी व.वि ला आलेले सर्वच सहमत असतील hats off to व.वि संयोजक!!! इंद्राला मत्र सर्वांनीच miss केले. इंद्रा तुला लवकर बरे वाटो म्हणून खूप खूप शुभेच्छा
|
Balgya
| |
| Monday, July 16, 2007 - 7:05 am: |
| 
|
मिल्या, अरे मी गेल्यावेळेलाच बोललो होतो. उंटावरुन शेळ्या हाकणे सोपे असती त्यांचं काय जातय बोलायला.
|
Himscool
| |
| Monday, July 16, 2007 - 7:08 am: |
| 
|
सर्व संयोजकांचे आणि सांस्कृतिक समितीचे अजुन एक ववि सुरेखरित्या आयोजित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.... वाकड्या वृत्तांत अटोपशिर आणि छान आहे.. कृ लवकर पूर्ण करा वृत्तांत आणि अर्थातच सविस्तर.. व वि वर पण एखादी कथा लिहिणार आहे का कोणी?
|
नंदिनी लिहेल एखादी कथा...
|
Krishnag
| |
| Monday, July 16, 2007 - 7:58 am: |
| 
|
सगुणा बागेच्या यजमानांनी केलेल्या मार्गदर्शना नुसार समस्त मंडळी दिलेल्या दोन कक्षांकडे सरसावले खांद्यावरील पिशव्यांचे ओझे केंव्हा एकदा कक्षात ठेवतो असे प्रत्येकाला झाले होते! कक्षापाशी येताच समवेत दिलेल्या मार्दर्शाकाने कृपया पादत्राणे कक्षा बाहेर ठेवा असे विनंती वजा सुनावताच, बुट, चपला, सॅंडल आदीपायातून दूर सारून सर्वांनी खांद्यावरचे ओझे कमी केल्यावर हस्त, पाद, मुखादी प्रक्षालना साठी धाव घेतली. ताजे झाले पण तवाणे होण्या साठी क्षुधा शमनाची नितान्त आवश्यकता असल्याने 'मुंबई करांची वाट पहावी आधी आणि सर्वांनी सोबत अल्पोपहार करावा' हा निश्चय मुंबईकरांच्या येण्याच्या विलंबनाने कोलमडून पडला आणि यजमानांनी देऊ केलेल्या उपमा, पोहे आदी पदार्थाचा समाचार घेण्यास सुरुवात झाली! उपमा अनुपमेय नसला तरी चविष्ट होता. वर पेरलेल्या फरसाणाने रंगत वाढविली तरी लज्जत काहिसी बिघडवली होती तरी उत्तम होता! दरम्यान मुंबईकरांच्या निलरंगी रथातून निलवेद बाहेर डोकावलेला दिसताच मुंबईकर पोहोचल्याचे समजले. संयोजकांसह इतर मायबोलीकरही उपम्याच्या वाटा बाजूस सारून स्वागता साठी सरसावले. प्रवास कसा झाला, विलंब का झाला ह्या जुजबी प्रश्नांची मोजकी उत्तरे देत मुंबईकरही क्षुधित असल्याचे जाणवले, त्यामुळे अती विलंब न करता ते देखील अल्पोपहारास सज्ज झाले. अल्पोपहाराचा कार्यक्रम आटोपताच यजमानांनी कार्यक्रम सुची पुनःश्च ऐकविली! ह्या दरम्यान ज्येष्ठ यजमान देखील त्या स्थळी पोहोचते झाले. एव्हाना त्यांच्या आपुलकीचा परिणाम मायबोलीकरांनाही झला होता. त्यामुळे एकाने आपुलकीने "आपली ही बाग किती एकराची" विचारताच. ज्येष्ठ यजमानांनी ५० एकरांची सांगत आपण ही कशी फुलविली आहे व आजकाल शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष होतय ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न केला दरम्यान आपुलकी साधू पहाणार्या त्या 'साधु' मायबोलीकराने तिकडे दुर्लक्ष करीत काढता पाय घेतला आणि आपल्या ग्रुपमध्ये येऊन मिसळला! एव्हाना सर्वजण ताजे आणि तवाने झाले होते. पायी मार्गक्रमण करीत मायबोलीकरांचा जथ्था मत्स्य शेती व मासे मारी ह्या विषयावर आपल्या ज्ञानात भर घालण्या साठी मत्स्य तलावा कडे मार्गस्थ झाला भगवान विष्णुंच्या त्या पहिला आवताराला जाळ्यात पकण्यास केपीनी देखील हात भार लावला! आणि जाळे काठावर येताच पहिल्या आवताराची विविध रुपे व गुणधर्म ह्यांविषयी कनिष्ठ यजमानांनी बहुमुल्य माहिती सांगून मायबोली करांचे प्रबोधन केले! काही मायबोली करांनी आपले क्यामेरे सरसावून विविध मत्स्य वर्गाचे विविध कोनातून छायाचित्रे टिपली. मासेमारीचा अनुभव घेऊन मंडळी दुसर्या एका तलावा कडे यजमानांनी सोबत दिलेल्या मार्गदर्शका सोबत मार्ग क्रमू लगले. आता नक्की कुठे जाणार ह्या संभ्रमात बरेच जण होते व एकमेकाला विचारून गंतव्य स्थाना विषयी माहिती घेत होते!..... कमशः....
|
Zakasrao
| |
| Monday, July 16, 2007 - 8:10 am: |
| 
|
उपमा अनुपमेय नसला तरी चविष्ट होता. वर पेरलेल्या फरसाणाने रंगत वाढविली तरी लज्जत काहिसी बिघडवली होती तरी उत्तम होता>>> तुम्ही काय मस्त शब्द पेरताय कृ. वृतांताची लज्जत आणि रंगत वाढतेय. दरम्यान आपुलकी साधू पहाणार्या त्या 'साधु' मायबोलीकराने तिकडे दुर्लक्ष करीत काढता पाय घेतला >>>
|
And what next????
does it needs any more comment?? .. माझ्या सुचना अनुभवास आल्या की नाय लोकहो???? 
|
Jo_s
| |
| Monday, July 16, 2007 - 8:46 am: |
| 
|
क्या बात है, लिंबू मस्त चित्र क्रिश न आलेल्याना ववि चा आनंद देतोयस, चांगले आहे, पुंण्य लाभेलहो तुला.....
|
ववि चे फोटो अपलोड करण्यास मदत करा, फोटो अपलोड होत नाही आहेत
|
Himscool
| |
| Monday, July 16, 2007 - 9:11 am: |
| 
|
गिरिविहार फोटो कुठे अपलोड करत आहात... आणि काय प्रॉब्लेम येत आहे?
|
Meenu
| |
| Monday, July 16, 2007 - 9:25 am: |
| 
|
बोक्याचा अभिनय आधी टाय दाखवून मग टायचे आणखी शब्द करत करत बो वर जाउन 'का?' असे विचारले असते तरी कळले असते. >>> हे सुचायला तुला आख्खा एक दिवस लागला .. तिथे दोन मिनीटेच वेळ होता .. कृ पडदा है पडदा गाळूनच टाकलत की हो .. असो. चालु दे तुमचं
|
Krishnag
| |
| Monday, July 16, 2007 - 9:31 am: |
| 
|
कृ पडदा है पडदा गाळूनच टाकलत की हो .. असो. चालु दे तुमचं >>>>> अरेच्या हे राहिलच की!! हो हा तर महत्वाचा कार्यक्रम राहिला सांगायचा! पुढच्या भागात समविष्ट करतो! मिनू, धन्यवाद!
|
गिरिविहार याहु ग्रुपमध्ये ग्रुप तयार केला आहे... त्यात टाका....
|
संवाद : म्हैस अर्थात अग अग म्हशी खरे तर हिची जागा घरामागच्या गोठ्यात. समोर पडेल तो चारा पेंड खाणे, अधुन मधुन एखाद्या रेडकाला जन्म देणे, दिवसातून एकदा गवत चरायला माळावर फिरणे असे आयुष्य. संध्याकाळी दिवेलागण झाली की छान रवंथ करणे, भरपुर शेण देणे व धारोष्ण दुध देणे हीच आयुष्याची चाकोरी. 'सगुणा बाग'च्या भडसावळे यांना मात्र या चाकोरीबद्ध आयुष्यातून म्हशीला बाहेर काढावे, त्यांना आधुनीक जगाची ओळख ध्यावी असा अचानक सक्षात्कार झाला. त्यांनी टॅलेंट हंटच्या माध्यमातून त्यांनी एका म्हशीला निवडले. पहील्या आलेल्या म्हशीला 'म्हैस राईड' चा नवा चेहरा म्हणून घेतले व त्या म्हशीच्या आयुष्यात कायापालट झाला. नुकतीच तिची आम्ही संवाद या सदराखाली मुलाखत घेतली ती इथे प्रकाशित करत आहोत. म्हैसजी तुमच्या backgroud विषयी काही सांगाल का? स्वच्छ नव्हती एवढेच सांगू शकते मी. आजकाल सगळ्या क्षेत्रात backgroud चांग्ली नसेल तरच प्राधान्य मिळते. पाण्यात तुमची गती आहे हे कधी दिसले? डुंबायला गेल्यावर मी मालकाला लाथ घालून जेव्हा जोरात पाण्यात शिरले व मालक वेसणीत अडकुन ओढले गेले तेव्हा हा साक्षात्कार झाला असे (थोडेसे लाजून शेपटीने माशी मारत) शेजारचा रेडा सांगत होता. माणूस पाठीवरून पडल्यावर काय होईल अशी काळजी वाटली होती का या Career चा निर्णय घेताना? खरे तर फारच भिती वाटली होती. मालक काठीने हाणून काढेल, मारकुटी म्हैस म्हणून प्रसिद्धी मिळेल या भितीने मी चक्क आजारी पडले होते. त्याचा परीणाम असा झाला की मी चार दिवस कमी दुध दिले. मालकने असे धोपटले की त्यापेक्षा काही वेगळे नसेल हे जाणवले. मग काय केला मनाचा हिय्या आणि घेतली बुडी. सॉरी उडी. या क्षेत्रात म्हशीच का? अगदी सुरुवातीला रेडे पण होते स्पर्धेत. पण मग आम्ही आंदोलन करून राखीव जागा वाढवून घेतल्या. पाण्यात रेडा जरी असला तरी 'म्हैस राईड' असे नामकरण पडल्याने त्यांनी या क्षेत्राकडे पाठ फिरवली. तुमच्या या क्षेत्रामुळे काही अडचणी आल्या का? हो पहीली अडचण म्हणजे फिगर नसल्याने लग्नाच्या बाजारात किंमत कमी होते. फिगर मेन्टेन केली तर बसणार्यांची पंचाईत होते. कारण लोकांन बसायला बेस पक्का लागतो. बर असे बोजड शरीर घेवून पाण्यात उतरायचे म्हणजे चेष्टा नाही. त्यात राईड घेणार्या स्त्रीवर्गास घाबरवण्याकरता, राईडमधे चित्तथराकपणा हवा म्हणून वारंवार माझी शेपटी पिळतात. त्याचा बोनस म्हणून एक दोन वेळा गुराख्याला लाथ घातली तरी चालते. मॅटर्नीटी लीव्ह कमी मिळते म्हणून आम्हाल प्लॅनींग करावे लागते आहे. PETA ला तक्रार द्यावी काय या करता या वार्षीक सर्वसाधारण सभेत ठराव मांडतोय आम्ही. म्हैसजी तुम्हाला मायबोलीविषयी काही माहीती आहे का? ईतके दिवास नव्हती पण तुमच्या २-४ मायबोलीकरीण माझ्या पाठीवर बसून गेल्यावर मायबोली काय चीज आहे ते कळले. आजून पाठ दुखते आहे हो. उद्या बदली कामगार बोलवावा लागणार असे वाटले होते. पण ती छोटी मुले बसली ना सगळा शिण गेला. अचानक मुलाखतीतून म्हैसजींना पळ काढावा लागला. एक नवा ग्रूप 'म्हैस राईड' करता वाट बघत होता.
|
Psg
| |
| Monday, July 16, 2007 - 10:03 am: |
| 
|
कुठाय तो याहू ग्रूप? मला जॉईन व्हायचे आहे. बाकी कृचा वृ मस्तच. पूर्ण करा.. केप्या मस्त रे!   
|
http://groups.yahoo.com/group/vavi2007/ ही घ्या लिंक.... पण अजुन कोणी फोटो टाकले नाही....अरे लवकर टाका ना फोटो....
|
Ladaki
| |
| Monday, July 16, 2007 - 10:12 am: |
| 
|
केपी छान आहे मुलाखत... मायबोलीच्या पहिल्या पानावर लिंक द्यायला हरकत नाही...
|
Arun
| |
| Monday, July 16, 2007 - 10:15 am: |
| 
|
केप्या : मस्तच आहे रे मुलाखत. तरीच काल मध्येच थोडावेळ तू गायब झाला होतास असं तुझ्यावर लक्ष ठेवणार्या कुणीतरी सांगितलं ...........
|