|
सर्व व. वि. संयोजकांचे यशस्वी संयोजनाबद्दल हार्दिक अभिनंदन !!! मयुरेश ह्याचे विशेष अभिनंदन. बाकीचे संयोजक कार्यतत्पर होतेच पण मयुरेशने नेहमीप्रमाणेच विशेष जबाबदारीने काम केले त्याचे कौतुक वाटले (उदाहरणार्थ, पुढे ड्रायव्हर च्या शेजारच्या सीटवर बसून बस योग्य मार्गाने जात आहे ना हे जाता येता तपासणे - त्यासाठी बसमधे चाललेल्या धुमाकूळात संपूर्णपणे सहभागी न होता येणे.. अर्थात तरीही मधेच येऊन व्हिडीओ शूटींग करणे ) वाकड्या, अखेर मागच्या व ह्यावेळचे 'उंच गोरे' म्हणजे मीच हे तुम्हास उमगले काय ? उंचीत आणि गोरेपणात मात देणारी इतर मंडळी असल्याने आता माझा आयडी ने उल्लेख करण्यास हरकत नसावी . तुमच्या मुलीने अगदी बाजी मारली.. खेळ नवीन असूनही अतिशय धिटाईने तिने अभिनय करुन गुण पटकावला. मस्त !!! आता आयशॉट चा वृतांत टाकण्याचा मोह होत आहे
|
Manjud
| |
| Monday, July 16, 2007 - 5:18 am: |
| 
|
वाकड्या वृत्तांत छान आहे. लवकर फोटो टाका कोणीतरी..... नावांसहीत राफा, खास तुमच्या शैलीत लंबाचोउडा वृत्तांत लवकर येऊ दे.
|
वाकड्या छान वृत्तांत. मुख्य म्हणजे दर वर्षाची तुमची लांबलचक वृत्तांताची परंपरा मोडून आटोपशीर लिहील्याबद्दल हार्दीक अभिनंदन. धनश्रीने खरच हुशार आहे. तिने एक वार पंखावरती हे सांगताना सुरेख अभिनय केला. गाडीवर ती पेंगणे स्वाभावीक होते. येताना तू हा विचार सुद्धा केला नसशील.
|
Krishnag
| |
| Monday, July 16, 2007 - 5:22 am: |
| 
|
वर्षा विहार २००७, स्थळ: सगुणाबाग नेरळ! 'वर्षा विहार' गेले २ वेळा जाणे जमले नाही! कुठे ना कुठे मांजर आडवे येत होते! यंदा मात्र मनात खुणगाठ बंधली कुठल्याही मांजराला न जुमानता जायचे! अगदी आडवेच आले तर ओलांडून जायचे! अर्थात ते मुकाभिनयाचे वेळी राकुने दाखवलेल्या बोक्या सारखे नसावे! शनिवारी रात्रीच घरात चरचा किती कपडे घ्यायचे खायला काही घ्यायचे का? म्हटले सकाळी ५ वाजता लवकर उठायचे आणि किमयेला पळायचे हे पहिले उद्दिष्ट. खाणे वैगेरे संयोजकांच्या गळ्यात! तेंव्हा सख़ाली लवकर उठून आवरले तरी रिक्षा शोधयला २ फर्लांग पायपिट करावीच लागली! दरंया मोरोपंतांची भ्रमणध्वनीवर हाक आलीच तेंव्हा नुकतेच त्या तीन चाकी वाहनात स्थानापन्न झालेलो! तसा विलंबच झाला तरी वेळेत पोहोचलो म्हणायचे! मारुती मंदिरासमोर गाडीचा क्रीम रंग दुरुनच दिसला त्यामुळे गाडी शोधण्याचे प्रयास वाचले! गाडीतल्या अनौपरीक स्वागताने भारावून जावून स्थानापन्न झोलो व संयोजकांनी त्वरीत डबल दिली आणि गाडी सगुणा बागे कडे मार्गस्थ झाली! गाडी सुरु होता भेंड्या आणि गाणी दणानली गाडी ती टाळ्या घोषणांनी ह्यांचा प्रत्यय घेत गाडीने अती जलद महामार्गाने धावावयास सुरुवात केली! गाण्याची भेंड्यांची अहमहमिका इतकी चालू होती की दोन्ही गटातली एकमेकांसाठी गाणी गात होती! ह्या दरम्यान महामार्गाचा टप्पा केंव्हा पार पडला कळलेच नाही! खोपोलीच्या पुढे कुठे तरी 'दरबार' दिसला आणि गडावरचे सकल मानकरी म्हणे इथेच टाकू तंबू! आणि त्या प्रशस्त दराबारा समोर प्रशस्त प्रांगण पाहून चौचक्र रथाच्या सारथ्यालाही तिथे आपला रथ थांबविणे श्रेयस्कर वाटले! दरबारात प्रवेश करताच कुणीतरी म्हणे आताचा अल्पोपहार हा TTMM त्यामुळी सकल मानकरी, सरदार ह्यानी कषाय पेयपान करायचे जाहीर केले! काहींना दरबारातील फक्त बार शब्द दिसला होता तरी ते देखील नाखुशीनेच कषाय पेय पानास राजी झाले! दबारातील पेयपान संपवून मंडळी बाहेर पडतांना संयोजकानी जाहीर केले की कुणीही खिश्याकडे हात नेऊ नये! आताच्या अल्पोपहार व पेय पानाची व्यय जबाबदारी समिती आपल्या शिरी घेत आहे!! नंतर कळले की ते TTMM संयोजकांपैकीच कुणी तरी ओरडले होते! ह्यातून संयोजकांची मुत्सदेगिरी दृष्टोत्पतीस आली! पुन्हा सर्वजण रथात स्थानापन्न होताच रथ सगुणा बागेकडे चौचाकी भरधाव निघाला! क्रमश:
|
आता आयशॉट चा वृतांत टाकण्याचा मोह होत आहे..राहुल,टाकच रे तू तो. तसाही वेळेअभावी तुझा कालचा ठरलेला प्रोग्रॅम होऊ शकला नाही वविला..
|
यंदा मात्र मनात खुणगाठ बंधली कुठल्याही मांजराला न जुमानता जायचे! अगदी आडवेच आले तर ओलांडून जायचे! अर्थात ते मुकाभिनयाचे वेळी राफानी दाखवलेल्या बोक्या सारखे नसावे!..क्रिश,
|
क्रिश, बोक्याचा अभिनय मी नव्हे तर अभिनयसम्राट राकु यानी केला होता आणि तो आम्हा अल्पमती लोकाना कळला नव्हता हे मी नम्रपणे नमूद करु इच्छितो (माझ्या नशिबी 'कुरवाळू' होते )
|
Neel_ved
| |
| Monday, July 16, 2007 - 5:30 am: |
| 
|
वाकड्या, मस्तच झाला आहे वृत्तांत.... नंदिनि, लाडकी आणि त्यांच्याबरोबर असलेली तिसरी मुलगी म्हणजे रीना होती... by the way त्या तीघीही कॉलेजकन्यका नाहीयेत... फक्त उनकी त्वचासे उनकी उमरका पताही नही चलता... आणि मी ही मिनुशी सहमत... धनश्री खुपच गोड आहे... रीना, तुझ्यामुळे यावर्षी वविला खुप धम्माल करता आली.... मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासात आनंद्_सुजुचे पाकिट हरवले.... ते शोधण्यासाठी १५ मिनिटे गाडी थांबवुन शोधाशोध करण्यात आली.. पण देवकृपेने कोणालातरी ते रस्त्यात पडलेले मिळाले आणी त्यानी तसे आनंदला फोन करुन कळवले.... आज तो ते collect करणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्तमोत्तम खेळ आणि स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल सांस्कृतिक समितीचे आभार....
|
Zakasrao
| |
| Monday, July 16, 2007 - 5:31 am: |
| 
|
मुत्सेद्देगिरी तो मयुरच असेल. experiance बोलता हे man अस त्याचय मनातुन आल असेल. कृ. सहीच जमतय. येवु दे पटपट. राफ़ा लवकर लिवा वो.
|
Krishnag
| |
| Monday, July 16, 2007 - 5:41 am: |
| 
|
राफा, ते राफा चुकून झाले दुरुस्त केलय! 
|
Wakdya
| |
| Monday, July 16, 2007 - 5:41 am: |
| 
|
भ्रमर, आठवला तो प्रसंग, पण मला नेमका तुमचा चेहरा आठवत नाहीये मिनू, सगळ्यांनीच टाळ्यांच्या कडकडाटाने तिचे कौतुक केले, शिवाय काही स्त्रिया आपापसात बोलताना तिचे कौतुक करीत असल्याचेही ऐकले. तिला संधि दिल्याबद्दल धन्यवाद (आपल्या अपत्याचे असे जाहीर कौतुक झालेले बघणे कोणत्या पालकांना आवडणार नाही?) राहुल, मला फाटक हे आडनाव आठवत होते पण कोणते फाटक ते लक्षात येत नव्हते, इथे दोन दोन फाटक आहेत, तुम्हाला लक्षात ठेवलेच आहे, आता तुमची आयडी देखिल नीट पणे लक्षात ठेविन. पेंढ्या, बी, मंजू इत्यादिक, धन्यवाद. >>>> येताना तू हा विचार सुद्धा केला नसशील. कांदापोहे, कशावरुन अस म्हणतोस? मी विचार केला होता. गाडीच्या डिक्कीत सुम्भ ठेवले होते, जर ती जास्त पेंगु लागली तर तिला माझ्या कमरेला बांधायला. तिला चार वाजल्या पासुन चल चल म्हणत होतो आणि ती आता एकच राऊंड आहे ना हो बाबा, आता थोडाच वेळ थांबू, दहाच मिंटे, अस सांगत सांगत शेवटपर्यंत थांबली. मी देखिल नंतर गेम कळल्याने आता रमली आहे तर रमु दे असे ठरवुन बघु काय करायचे तिच्या नंतरच्या पेंगण्याबद्दल, असा विचार केला (बहुतेक सगळ्यांनाच माझा "थोडक्यातील वृत्तांत" फारच आवडलेला दिसतोय! अहो बरेच किस्से गाळलेत, खास करुन द्रौपदी वस्त्रहरणाचा, कुठे "चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला" हे गाण अन कुठे वस्त्रहरणाकडे पोचलेला तो अभिनय, तुफान धमाल आली, गाण कळल्यावर हसता हसता पुरेवाट झाली, असो, बाकिच्यांना लिहायला काही शिल्लक ठेवल्याबद्दल सगळेच जण माझे आभारी झालेले दिसत आहेत)
|
मुत्सेद्देगिरी तो मयुरच असेल. experiance बोलता हे man अस त्याचय मनातुन आल असेल. दुसरा कोण असणार......क्रिश चांगला वृत्तांत.. वाकड्या... उंचीच्या स्पर्धेतील विजेता मी होतो...
|
Yogayog
| |
| Monday, July 16, 2007 - 5:51 am: |
| 
|
सर्वात प्रथम तर मी नील इन्द्र भ्रमर घारु आनंद मयुरेश अरुण आणि फ ह्याचे आभार मानतो कि त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे ववीची arrangement केली. त्यानंतर मिनु श्रद्धा आणि डिम्डु यानी जे सांस्क्रुतिक कार्यक्रम केले ते अप्रतिम होते.
|
राफानी दाखवलेल्या बोक्या सारखे नसावे!..>>> खि खि खि कृ. बोक्याचा अभिनय आधी टाय दाखवून मग टायचे आणखी शब्द करत करत बो वर जाउन 'का?' असे विचारले असते तरी कळले असते. 
|
नमस्कार मित्रमंडळी.. वाकड्या.. एकदम सरळ नि छान वृत्तांत.. किर्श्भाव.. रथ सगुणा बागेकडे चौचाकी भरधाव निघाला! rathaachaa>> पुढे येउदे.. मस्तच ..! ... फक्त उनकी त्वचासे उनकी उमरका पताही नही चलता... >> निलरे.. केपी..
|
कुठे "चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला" हे गाण अन कुठे वस्त्रहरणाकडे पोचलेला तो अभिनय, तुफान धमाल आली, गाण कळल्यावर हसता हसता पुरेवाट झाली.. चला म्हणजे माझ्या अभिनयाने लोकांची पुरेपुर करमणूक झाल्याची पावती मला मिळाली .. आता मला वविहास्यसम्राट पदवी प्रदान करा बरे अरेच्चा,पण तो 'कुरुवाळिते भाऊराया ' म्हणणारा माझा competitor आहे ना या स्पर्धेत btw जरी मुकाभिनयाचे बक्षीस घारूच्या group ला मिळाले तरी या खेळात लोकांची सर्वात जास्त करमणूक आमच्या group ने केली याबद्दल कोणाचेही दुमत नसावे तो मयुरच असेल. experiance बोलता हे man अस त्याचय मनातुन आल असेल...झकास,सही जवाब.. अशी मुत्सद्देगिरी दाखवावी लागते बाबा प्रसंगानुरूप...
|
Arun
| |
| Monday, July 16, 2007 - 6:24 am: |
| 
|
मयुरेश : अनुमोदक ......... तुला वविहास्यसम्राट ही पदवी बहाल करायला काहीच हरकत नाही. या नंतर तू तुझे लक्ष फा. को. करंडक मिळवण्यावर ठेव. तिथे तुला केप्या बरोबर टफ फाईट आहे ......... कृ : वृतांत छान. पूर्ण कर की लवकर ......
|
अजिबात दुमत नाही...दोघानाही वविहास्यसम्राट पदवी देण्याबद्द्ल मी पण अनुमोदन देतो....
|
Krishnag
| |
| Monday, July 16, 2007 - 6:33 am: |
| 
|
...सगुणा बागे कडचा प्रवास सुरु असताना. गाडी मध्येच कुठे थांबली! "बाबा आपली ट्रीप आली का?" असे चिरंजीव नचिकेत विचारत होता! तर काही ज्येष्ठ मायबोलीकर, अती उत्सुकतेने मार्गक्रमाना संपण्या कडे डोळे लावून होते! ह्या सर्व अबाल वृद्धांची वविची उत्सुकता किती शिगेला पोहोचली होते हे प्रत्ययास येत होते! गत वर्षी ज्या चौकात गाडी आपला मार्ग चुकली होती तो चौक पुन्हा येताच गतवर्षीच्या वविला उपस्थित हाच तो ऐतिहासिक चौक आणि इथेच आपण मार्ग चुकलो होतो असे म्हणाले. दरम्यान ह्या गडबडीत यंदाचा सारथी देखील संभ्रमित होऊन विपरीत मार्गाकडे मार्गक्रमना करु पहात होता! त्यास संयोजक मयुर ह्यांनी वेळीच अवरले व पुन्हा पश्च गतीने मागे येत वाहन सगुना बागे कडे नेण्यात सारथी यशस्वी झाला! दुतर्फा तलाव असलेल्या एका चिंचोळ्या पतहावर गाडी उभी रहाताच कुणी तरी म्हणाले अरे "बोट हाऊस आहे!" तर दुसर्याने आपला पुणेरी बाणा सरसावत " नाही बोट एका तलावात आणि हाऊस दुसर्या तलावात आहे हे निदर्शनास आणून दिले! काही असो त्या स्थळी पोहोचताच सार्यांची मने हरखली. निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ व्यतित करायला मिळावा ही इच्छ फलदृप होण्याची ती सुचिन्हे पाहून खरोखर मन उल्हासित झाले! दुतर्फा तळी, विविध रंगी फुले पाने पाहून सगळेच संयोजकांना धन्यावाद देऊ लागले! मग त्या दोन तळ्यांच्या मधून छोट्याश्या वाटेने मार्ग क्रमण करीत सर्वजण इप्सित स्थळी पोहोचताच नेहमी आधी पोहोचणार्या मुंबई करांचा रथ अद्याप मागेच राहिला आहे असे समजले! तेवढ्यात बागेच्या यजमानांनी एऊन ओळख करविली व 'आपण' इथे काय काय करणार आहोत ह्याची सुचि ऐकविली. यजमानांची आपुलकी एवढी अपूर्व होती की सुरवातीला यजमान देखील कुणी तरी मायबोलीकरच आहेत काय? असा संभ्रम अनेकांच्या मनात उत्पन्न झाला! कुजबुजत्या स्वरात तो एक दोघांनी बोलून देखील दाखविला. ..... क्रमश: वि. वि. : शुद्ध लेखानातील त्रुटीं साठी क्षमा असावी!!
|
Krishnag
| |
| Monday, July 16, 2007 - 6:41 am: |
| 
|
कृ : वृतांत छान. पूर्ण कर की लवकर ...... >>>>> ह्याचा अर्थ 'आटोपता घे आता' असा नसेल असेच मी गृहीत धरणार!! 
|
|
|