|
मंडळी, पुणेकरांसाठी वविचे रविवार सकाळचे बस वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.. सकाळी ६.२०: सावरकरभवनला (बालगंधर्व पुलाशेजारी)चढणार्या वविकरांची जमण्याची वेळ ६.३०:सावरकरभवन बस थांब्यावरून बसचे प्रयाण ६.४५: किमया हॉटेल (कोथरुड)बस थांब्यावर बसचे आगमन ६.५५: किमयावरून सगुणाबागच्या दिशेने बसचे प्रयाण सावरकर भवनला चढणार्या लोकांनी ६.२० पर्यंत बस थांब्यावर यावे बस डॉट साडेसहाला तिथुन सुटेल. किमयापाशी चढणार्या पब्लिकने ६.४० पर्यंत बस थांब्यावर यावे... म्हणजे बस आल्यावर पाच ते दहा मिनिटात निघता येईल... एक लक्षात घ्या आपल्याला सगुणाबागला दहापर्यंत पोहोचायचे आहे आणि बसप्रवास अडीच ते तीन तासांचा आहे तेव्हा वेळेवर या म्हणजे ईप्सित स्थळी पोहोचायला उशीर होणार नाही आणि पुढच्या कार्यक्रमांनाही. एक सूचना:-बसचा नंबर आणि रंग याबातचे डीटेल्स उद्या इथेच दिले जातील किंवा वविकरांना समस करून कळविण्यात येतील.
|
... आता मुंबईकरांसाठी सूचना. आपली बस बोरीवलीहून निघेल. हाय वे ने JVLR वरुन मुलुंड ऐरोली पुलाखाली पिक अप आहे. जवळ जवळ सगळेच ईथे जमणर आहेत. तेव्हा ६.३० पर्यंत ईथे जमायचे आहे हे लक्षात ठेवा. बसचे details ऊद्या कळवु किंवा त्यादिवशी सकाळीच कळवण्यात येतील!
|
Zakasrao
| |
| Friday, July 13, 2007 - 5:39 am: |
| 
|
बसचा नंबर आणि रंग याबातचे डीटेल्स उद्या इथेच दिले जातील किंवा वविकरांना समस करून कळविण्यात येतील>>>>>> बसचा रंग दिप ला विचारुन ठेवलाय का? सगळ्यानी एंजॉय करा. भरपुर फ़ोटो काढा. चांगले चांगले व्रु. लिहा. मी आहेच पुढच्या वर्षी.
|
पुणेकरांसाठी बसचे details पुढीलप्रमाणे बस नंबर- MH-12 DG7248 बसचा रंग्- क्रिम कलर एक सूचना:- अडीच तीन तासांचा प्रवास आहे. तेव्हा आपापल्या पाण्याच्या बाटल्या घेऊन या. शिवाय पावसात भिजायचे असल्याने एक extra ड्रेस आणि टॉवेलही घेऊन या.
|
या वर्षीचा वर्षाविहार अतिशय उत्तम रितीने सुफ़ल संपूर्ण झाला.. या वर्षाविहारात वर्षेने जरी आपले अस्तित्व कमी दाखवले तरी पब्लिकला पाण्यात भिजायचा आनंद मात्र मिळाला... खूप धमाल केली सर्वांनी... मंडळी,आता पटापटा वृत्तांत येऊ द्यात.. ज्या लोकांनी यावर्षी पहिल्यांदा वर्षाविहार अनुभवला त्यांनी आपले अनुभव आणि अभिप्राय जरूर टाका...
|
Bee
| |
| Monday, July 16, 2007 - 2:58 am: |
| 
|
इतकी मेहनत घेतल्यानंतर ववि छान कसा नाही होणार...
|
ववि छान झाला आता व्रुतान्त लवकर लवकर येउद्यात
|
Wakdya
| |
| Monday, July 16, 2007 - 3:36 am: |
| 
|
सालाबादप्रमाणे मायबोलीचा यंदाचा वर्षाविहारही जोशात आनंदात पार पडला. काही अपरिहार्य कारणांमुळे, शेवटच्या क्षणापर्यंत माझे जाणे अनिश्चित होते तरीही सकाळी सव्वासातला निघुन रात्री नऊ वाजता घरी परत सुखरुप पोहोचलो. काही मोजके वेचक नि वेधक्: गेल्या वर्षी एकच उंच नि गोरे गृहस्थ होते या वर्षी मात्र त्यांच्याशी उंचीबाबत स्पर्धा करायला अजुन दोघांची उपस्थिती होते. त्यांच्या आयडी मला कळल्या नाहीत नंदिनी, लाडकी आणि अजुन कोणतरी अशा तीन कॉलेजकन्यकांची उपस्थिती धमाल उडवुन देत होती, खास करुन त्यांनी म्हशीच्या पाठीवरुन केलेली रपेट आणि इतरेजनांच्या त्यावरील प्रतिक्रिया हास्यकल्लोळ उडवुन देत होत्या. किशोर जोशी यांचे सहकुटुंब आगमन एकंदरीत सोहळ्यास वजन प्राप्त करुन देते झाले. मला वाटते की अन्य काहीजण देखिल सहकुटूंब होते ज्यात विडंबनकार मिल्याही होते यावेळेस एका गोर्या घार्या शेंडी असलेल्या तरुणाने मुकाभिनयाच्या खेळात जबरदस्त रंगत आणली व एकही फाऊल न घेता सर्वच्या सर्व नावे त्यांच्या अभिनयामुळे त्यांच्या टिम मेंबर्स ना ओळखता आली. मला त्यांच्या आयडी बद्दल संभ्रम आहे, ते भ्रमा होते की घारूअण्णा होते? मधे कोणतरी "योण्णा योण्णा" असे जे ओरडायचे ते कुणाला उद्देशुन ते कळले नाही. सकाळचे नाष्ट्या करिता दिलेले उपीट मस्त होते पण त्यावरचे फरसाण तितकेसे चांगले नव्हते. दुपारचे जेवणातील भाज्या तिखट होत्या असा काही जणांचा अभिप्राय ऐकु आला पण मला तसे जाणवले नाही, जेवण चांगले व भरपेट होते. बांबुची बनवलेली बाकडी सुंदर होती. आपणही तशीच बनवायची असा निश्चय मी केला. यावेळेस मी नेहेमीप्रमाणे मयुरेश, तसेच कांदापोहे, नील, तो शेंडीवाला तरुण, किशोर जोशी, जेवताना योगायोग यांचेशी बोललो आणि मागिल वर्षीच्या सुत्रधार उंच गोर्या व्यक्तीस (यांची आयडी माझे लक्षात रहीली नाही) तसेच राकु, मिल्या व अजुन दोघे तिघे (आयडी माहित नाही) याचेशी हाय हॅलो केले. प्रत्यक्षात सकाळी दहा वाजता तिथे पोहोचल्यापासुन संध्याकाळी सहा वाजता परत निघेस्तोवर असंख्य उत्तेजित करणार्या घडामोडी झाल्या, त्या एकेकाच्या वृत्तांतात येतिलच. मधेच कुणाला तरी मी माझ्या जवळचे गेल्या वर्षिच्या वविचे फोटो दाखविले. धबधब्याच्या ओढ्यात लहानथोरांसहीत सगळेच खेळले, पुर्ण भिजले, लोळले. तरिही माझ्या सारखे काही जण कुणि गुढग्या येवढे तर कुणी घोट्याइतकेच भिजले. मुकाभिनयाच्या खेळात आधी संपुर्ण काळ्या वेषात व नंतर पांढर्या वेषात असलेल्या बाईंनी माझ्या धाकट्या मुलीला केव्हा घेतले ते मला आधी कळलेच नाही. त्यांचे नाव बहुधा मिनु असावे. त्यांना काहीजण मधेच आज्जी असे का संबोधत होते ते कळले नाही. मुकाभिनयाच्या खेळात माझ्या मुलीने अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा क्षणभर मी दचकलोच आणि आता ही काय दिवे लावणार अशी चिंता करु लागलो. सुदैवाने ती करीत असलेला अभिनय तिच्या टीमला कळुन त्यांना मार्क्स मिळाले व सर्वात लहान सहयोगी म्हणुन मुलीला एक छन फ्लॉवरपॉटही बक्षिस म्हणुन मिळाला. संयोजकांची ही समयसुचकता उल्लेखनिय. कारण असे बक्षिस वा भेट म्हणा, अनपेक्षितरित्या मिळाल्या नंतर मुलगी जाम खुष झाली होती. गेल्या वर्षी सौला विचारले होते, या वेळेस मुलीला विचारले, की काय ग? कसे वाटले तुला इथे येवुन? कशी होती लोक? ती म्हणाली "सगळीच मज्जेशीर होती" तिला विचारले की पुन्हा आवडेल का असे यायला तर अर्थातच तिचा होकार होता पण आता पुन्हा त्यासाठी एक वर्षभर थांबाव लागेल म्हणुन तिच्या स्वरात नाराजीही होती. माझी मुलगी तिथे येवुन न कंटाळता उलट आनंदी बनली हेच माझ्या दृष्टीने वविचे व वविच्या संयोजकांचे यश म्हणावेसे वाटते. परतीच्या प्रवासास मला उशिर झाला होता, व सगुणा बाग सोडल्यावर लगेचच मुलगी पेंगु लागल्याचे लक्षात आल्यावर कर्जत यायच्या आधीच तिला लेज चे पाकीट घेवुन दिले व डोळ्यावर पाणी मारावयास सांगितले. लेज खाताना ती मला न धरता बसत्ये असे लक्षात आल्यावर माझ्या चिंतेत भर पडली. तिथुन पुढे दोन तिनदा थांबुन उतरुन तिची अनावर झोप घालवत व "बाळा जागी आहेस ना? झोपू नको, मला धरुन बस, माझ्या अंगावर रेलु नकोस नाहीतर झोप लागेल" असे सारखे सारखे बजावीत कसेबसे कामशेत पार केले पण शेवटी एके ठिकाणी पेट्रोल भरल्यावर तिला पुढे बसवले. तिची उंची बर्यापैकी असल्याने तिचे हेल्मेट घातलेले डोके माझ्या समोर येत असल्याने व मागे सरकुन बसल्यामुळे गाडी चालवायला त्रास होत होता व सर्वच प्रवासात वेगावर मर्यादा पडल्या होत्या. तरीही देवदयेने घरी वेळेवर सुखरुप पोहोचलो जसे आठवले तसे वविचे मला भावलेले समजलेले वर्णन विस्कळित स्वरुपात का होईना, पण थोडक्यात आणि परिच्छेदात करायचा प्रयत्न केला असे
|
वाकड्या,चांगला अहे वृत्तांत... ते शेंडीवाले मुकाभिनय तज्ञ म्हणजे आपले फ़ेमस घारुआण्णाच बरे
|
Krishnag
| |
| Monday, July 16, 2007 - 4:12 am: |
| 
|
सुप्रभात! व वि उत्तम रित्या आयोजित करून व्यवस्थित पार पाडल्या बद्दल समस्त संयोजकांचे कारावे तेवढे कौतुक थोडेच आहे!! समस्त संयोजकांचे हार्दिक अभिनंदन!!
|
Krishnag
| |
| Monday, July 16, 2007 - 4:14 am: |
| 
|
वाकड्या! वृत्तान्त आटोपशीर व छान आहे!!
|
Wakdya
| |
| Monday, July 16, 2007 - 4:17 am: |
| 
|
Mayuresh, घारूअण्णा होते का ते? मी त्यांना भ्रमा समजत होतो, आणि बहुदा भ्रमाला घारुअण्णा बाकी यावेळेस ओढ्यावर मुली बरोबर मी पाण्यात खेळायला उतरू शकत नव्हतो तरी तिला बिनधास्त पणे इतरांच्या बरोबर ओढ्याच्या पाण्यात सोडले होते व तेथिल आजी माजी संयोजकांपैकी व इतर जाणकार मंडळी योग्य ती काळजी घेत आहेत असे बघितल्यावर निर्धास्तही झालो होतो
|
Bee
| |
| Monday, July 16, 2007 - 4:20 am: |
| 
|
वाकड्या, छान लिहिलास वृत्तांत..
|
Zakasrao
| |
| Monday, July 16, 2007 - 4:22 am: |
| 
|
अरे वा! वृतांत यायला सुरवात झाली का! छान! सर्वप्रथम सर्व संयोजकांचे अभिनंदन. आता वृतांताचा पाउस येवु दे. आमच्यासारखे जे काही कारणास्तव येवु शकले नाहित त्याना थोडाफ़ार तिथे आल्यासारख वाटेल.
|
वाकड्या, तुमच्या मुलीचे नाव धनश्री असे कळल्यावर "अरेच्च्या, डुप्लिकेट आयडी" आसे ज्याच्या तोंडुन निघुन गेले, ते अस्मादीक! वृत्तांत टाका रे लवकर. बाकी बापुकृपेने मलाही बक्षिस मिळले!
|
Krishnag
| |
| Monday, July 16, 2007 - 4:30 am: |
| 
|
बाकी बापुकृपेने मलाही बक्षिस मिळले!>>>>> बापुंचा महिमा अगाध आहे!
|
Pendhya
| |
| Monday, July 16, 2007 - 4:39 am: |
| 
|
मधे कोणतरी "योण्णा योण्णा" असे जे ओरडायचे ते कुणाला उद्देशुन ते कळले नाही. >>>>>>>>> का हो योण्णा, लोकांना ओरडावं का लागलं?
|
Pendhya
| |
| Monday, July 16, 2007 - 4:40 am: |
| 
|
वाकड्या, संक्षिप्त, पण छान वृत्तांत. चला, वाकड्याने सुरवात तर केली, आता पुढचे वृत्तांत येऊ द्या.
|
Meenu
| |
| Monday, July 16, 2007 - 4:46 am: |
| 
|
त्यांचे नाव बहुधा मिनु असावे.>> हो हो मिनुच .. आणि आज्जी का म्हणतात ..? याचं उत्तर मी पण शोधत बसत नाही .. मागच्या वेळचे उंच गोरे .. राहुल फाटक आणि त्यांनाच योण्णा अशी हाक मारत होते इतर .. योण्णा का याचाही फार विचार करायची आवश्यकता नाहीये .. प्यारसे दियी हुयी चीज रख्खी जाती है .. (संदर्भ प्रहार .. ) बाकी तुमची मुलगी मस्तय खूपच smart... सगळ्यांनीच तीचं खुप कौतुक केलं .. आणि हो वृतांत आटोपशीर आणि छान !!
|
Pancha
| |
| Monday, July 16, 2007 - 4:56 am: |
| 
|
कोनी फ़ोटु काढले असतील तर टाका बर लवकर
|
|
|