Chyayla
| |
| Saturday, June 30, 2007 - 4:59 am: |
| 
|
अरे तुम्ही सगळे वर्षा विहारला जात आहात की, म्हशी-विहारला जात आहात? निदान लिम्बु तरी म्हशी असणार म्हणुन अगदी हुरळुन गेलाय.... अन्गात म्हसोबा आला काय तुझ्या? दीवा घेशील पण अख्या BB वर तुझी म्हशीची अनुभुती रवन्थनिय आहे
|
आता म्या काय केल???? त्या सगुणा पार्क वाल्यानीच दावलय त्यान्च्या साईटवर म्हशीन्च डुम्बण! मी माझ्या मनच थोडीच सान्गतोय???
|
Phdixit
| |
| Saturday, June 30, 2007 - 12:12 pm: |
| 
|
आयला लिम्ब्या खरेच तिथे म्हशी हेत की रे. मी पण आत्ताच ती Site चेक केली
|
फदी, बघितल ना???? गम्मत हे ना? तरी पण या "च्यायला" चा फीडबॅक करायचा का?????? लेकाचा "वविला" "म्हशीविहार" म्हणतो अन ते पण वविच्याच बीबीवर म्हणजे काय??????? (हे चालवुन घेता कामा नये... हाणाऽऽ माराऽऽऽ ठोकाऽऽऽ बदडाऽऽऽऽ...... जिकडे तिकडे धावपळ अन गोन्धळ..... चित्कार, किन्चाळ्या, आरडाओरडीचे आवाज..... खणखणाट....) DDD
|
आमी ल्हानपणी कालीजात असताना एक खेळ हमखास असायचा गाढवाच चित्र काढलेल असायच, आपले डोळे बान्धुन त्याला शेपुट काढायची असा प्रकार! या मुकाभिनयात मुकाभिनया ऐवजी चित्र काढण्याचा पर्याय नाही का घेता येणार???
|
............................जाहीर सूचना - वैयक्तिक गुणदर्शन व वि ला येणार्या समस्त मायबोलीकरांकडून या पत्रकाअन्वये खालील मनोरंजन प्रकारांसाठी बंद मेलमधून एंट्र्या मागविणेत येत आहेत. सदर बंद मेल्स आमचेकडे दिनांक ०७ जुलै, इसवी सन २००७ पर्यंत पोचणे आवश्यक आहे. मनोरंजनाच्या ज्या प्रकारांसाठी एंट्र्या मागविणेत येत आहेत त्या येणेप्रमाणे:- १ थाळीनृत्य २ ' मै तेरी दुश्मन ' गाण्यावर नाच ३ डोक्यावर घागर घेऊन नाचणे ४ आयुष्यात कधीच न भेटलेल्या व्यक्तीची नक्कल ५ सतत अदृश्य असल्याने वैतागलेल्या आत्म्याची नाट्यछटा ६ झेनकथा व त्यातले अंतिम सत्य उलगडून सांगणे वरील प्रकार कठीण वाटत असल्यास समिती नियमावली कलम २ ब, विभाग ४, पृष्ठ ४५७ अन्वये मायबोलीकरांना स्वतःच्या मनाप्रमाणे मनोरंजन प्रकार निवडणेस मुभा देण्यात येत आहे. कथा, नकला, इ. प्रकार यात अंतर्भूत होऊ शकतील. नियम व शर्ती: १ कविता व गाणी या नेहमीच्या एशस्वी प्रकारांसाठी बंद मेल एंट्री आवश्यक नाही. इतर कार्यक्रमांच्या जोडीने त्यांना काही वेळ नक्कीच दिला जाईल. कविता व गाणी यांसाठी उत्स्फूर्त एंट्र्या व वि च्या दिवशीच घेतल्या जातील. २ सादर करणार असलेला प्रकार ५ ते ८ मिनिटांपेक्षा जास्त वेळाचा असू नये. ३ सर्वांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेलच, पण ' समय बडा बलवान... ' हे कृपया लक्षात ठेवावे. बंद मेलमध्ये धाडावयाची माहिती येणेप्रमाणे: नाव:: मायबोली आयडी: सादर करणार असलेला प्रकार: थोडक्यात माहिती: लागणारा वेळ: (हा स्टॉपवॉच लावून, वेळ मोजून मिलिसेकंदांपर्यंत अचूक कळवावा :-P ) मेलचा विषय IP: मायबोली आयडी: सादर करत असलेला प्रकार अशा स्वरुपात लिहून बंद मेल आम्हाला vavi_sasa@yahoo.co.in या पत्त्यावर पाठवावे. सांस्कृतिक समिती. वर्षा विहार, पुणे व मुंबई विभाग.
|
Radha_t
| |
| Wednesday, July 04, 2007 - 8:38 am: |
| 
|
सगळ्यात पहिला GTG वृत्तांत कुणी लिहिला ?
|
राधा, प्रश्ण क्लिअर नाही हे! (सगळ्यात पहिला GTG वृत्तान्त) GTG/ वविला जावुन की न जाता (कोण लिहिला) असे दोन उपप्रश्ण पडताहेत! कृपया खुलासा व्हावा!
|
राधा, मी वाचलेला पहिला वृत्तांत तुमचाच होता, मुंबईतल्या GTG चा.
|
Ajjuka
| |
| Thursday, July 05, 2007 - 3:00 am: |
| 
|
नाही साफ चूक. पुण्यात १९९९ च्या डिसेंबर मधे एक छोटेस्से GTG झाले होते. मी, स्तोर्वी, मिल्या भेटलो होतो. अजून पण कुणी होतं की नाही ते लक्षात नाही. रूपाली मधे भेटलो होतो. तिघंही त्याकाळात उसगावकर होतो आणि सुट्टीसाठी भारतात आलो होतो. ते पहिलं GTG त्याचा वृत्तांत आम्ही तिघांनीही टाकला होता. मी प्रचंड भारी कपड्यात गेले होते कारण माझ्या भावाच्य लग्नाचे सीमांतपूजन होते नंतर आणि मी परास्पर जाणार होते. त्यामुळे मला बघून 'अशी काय ही!' अशी प्रतिक्रिया रूपालीमधल्या अनेकांच्या आणि मिल्याच्याही चेहर्यावर उमटली होती हे अजूनही लख्ख आठवतंय.
|
Ajjuka
| |
| Thursday, July 05, 2007 - 3:02 am: |
| 
|
मायबोलीवरची पहिली कादंबरी कोणी आणि कोणी लिहिली होती? आणि पहिले नाटक कोणी लिहिले होते.
|
मंडळी, धन्यवाद... आपण जो प्रचंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल! आपण जाहीर केल्यानुसार नावनोंदणीची अंतिम तारीख उलटुन गेली आहे. जे कोणी स्वतंत्रपणे येउ ईच्छितात, ते ७ जुलै पर्यंत नावे नोंदवु शकतात! आता ८ जुलै रोजी आपल्याला पैसे भरायचे आहेत. मुंबईकर आणि पुणेकर यांनी पैसे कुठे जमा करायचे आहेत, हे वर नमुद केले आहेच. जर काही कारणामुळे ठिकाण बदलले तर दोन्ही ठिकाणाचे संयोजक आपणास तसे कळवतील. आणि हो... T-Shirts साठी चे पैसे देखिल ८ जुलै रोजीच भरायचे आहेत. तर मग भेटुया ८ जुलै रोजी!
|
अरे ! अरे ! काय हे सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तर इथे फोडु नका .. आपापल्या क्वीज वविला खेळायचय या बीबीवर नाही ..
|
Ajjuka
| |
| Thursday, July 05, 2007 - 9:47 am: |
| 
|
माफ करा माझ्या लक्षात आलं नाही. मी वविला येणार नाहीये त्यामुळे राह्यलं. तसंही या बीबी वर मी येणं योग्य नाही हे विसरले.
|
Zakki
| |
| Thursday, July 05, 2007 - 12:21 pm: |
| 
|
मागच्या व. वि. च्या वेळी मी म्हंटले होते की तुम्ही त्या व. वि. चा (ची, अथवा चे) व्हिडिओ real time मधे मायबोलीवर का टाकत नाही? एडिट न करता? वास्तविक या बाबतीतले तज्ञ लोक भारतात अनेक आहेत, त्यातले कुणि मायबोलीवर नाही का? वाटल्यास थोडे शुल्क लावा, काय? कारण या गोष्टी करायला खर्च येणारच! म्हणून म्हंटले.
|
तसंही या बीबी वर मी येणं योग्य नाही हे विसरले. असं का बरं अज्जुका??
|
Ajjuka
| |
| Friday, July 06, 2007 - 6:27 am: |
| 
|
नाही आवडत काही एका गटाला. मग घेत बसतात तोंडसुख संधी मिळाली की. काहीही संबंध नसताना. उगाच बडबड कशाला ऐकून घ्यायची त्यापेक्षा न आलेलंच बरं असो.
|
चला तर मंडळी.. भेटुयात मग परवा... पुणेकर बालगंधर्व रंगमंदिराच्या तिकीटखिडकी शेजारील बोधीवृक्ष आणि मुंबईकर शिवाजी पार्क,उद्यान गणेश मंदिराचे प्रांगण.. वेळ संध्याकाळी ५.३० ते ८.. स्थळ आणि वेळ नीट लक्षात ठेवा.. भेटुच मग..
|
Zakki
| |
| Friday, July 06, 2007 - 1:34 pm: |
| 
|
ते व्हिडियो चे तेव्हढे लक्षात ठेवा बरं का.

|
किती हा लोचटपणा म्हणायचा!!
|