|
सांगा सांगा लवकर सांगा .. " मायबोलीची स्थापना किती साली झाली? " " १९९६. " " मेनू टाकायचे असतील तर कुठल्या BB वर जाल? " " पार्ले.... " " हितगुज दिवाळी अंकाला पुरस्कार किती साली मिळाला? " " अं.... नाही आठवत. " " अरेरे... ओके! कुणाला येतंय उत्तर? " लोकहो, ' नेमेचि येतो.... ' तो पावसाळा ऋतू आलेला आहे आणि त्यासोबतीने व वि सुद्धा! गेल्या वेळच्या वविमध्ये राहुलफाटक, राजकुमार आणि मिल्या ( सर्व माननीय) यांनी सांस्कृतिक समितीची जी परंपरा सुरू केली आहे, तीच उज्ज्वल परंपरा यंदा आम्ही ( व वि च्या मुख्य पोस्टमध्ये नावे वाचावीत!) पुढे नेत आहोत. त्यासंदर्भातले हे आमचे पहिले पोस्टपुष्प! पोस्टच्या सुरुवातीला असलेल्या प्रश्नोत्तरांवरून चाणाक्ष मायबोलीकरांच्या (' मायबोलीकर हे चाणाक्षच असतात, द्विरुक्ती कशाला हवीये? ' असं कुणीसं म्हटल्यासारखं वाटलं. तर ते असो.) लक्षात आलंच असेल. यंदाच्या वर्षा विहारासाठीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आहे ' मायबोली - प्रश्नमंजुषा ' ( म्हंजे आपण ज्याला मराठीत क्विझ म्हणतो ते... कळलं?)! आपल्या आवडत्या मायबोलीची आपल्याला खरोखरच किती माहिती आहे बरं? या प्रश्नमंजुषेत तुम्हाला ते नक्कीच तपासून पाहता येईल. रुपरेषा : स्पर्धक ऐनवेळी निवडले जातील. एकावेळी एका स्पर्धकाला तीन प्रश्न विचारले जाणार आहेत. तिन्ही प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यास त्याला विजेता घोषित केले जाईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर न आल्यास दुसर्या स्पर्धकाची निवड होऊन त्याला तीन प्रश्न विचारले जातील. या स्पर्धेत एकूण पाच विजेते निवडले जाणार आहेत. व वि साठी नावनोंदणी आपण केली असेलच! आता सुरू करा प्रश्नमंजुषेची तयारी.... १५ जुलैला तसा अवकाश आहे अजून! तेव्हा, उठा, जागे व्हा ( ताजेतवाने व्हायला चहा प्या हवंतर! :-P ) आणि जमवा मायबोलीशी निगडित असेल तेवढी सगळी माहिती! ' शोधा म्हणजे सापडेलच! '
|
मंडळी, t-shirt बाबत अधिक माहितीसाठी खालील लिंक चेक करा /hitguj/messages/34/3822.html?1182165974#POST959991
|
Manee
| |
| Thursday, June 21, 2007 - 4:29 pm: |
| 
|
ववि... ह्म्म..... यंदा जमेलसं वाटत नाही. 
|
मनी नाही म्हणजे मुंबईकरांचा "आवाज" गेला!
|
Meenu
| |
| Friday, June 22, 2007 - 5:17 am: |
| 
|
ए अरे क्वीझची आयडीआ कशी वाटतेय ते सांगा की ..? आणि हा बीबी असा थंडावलाय का ..?
|
Psg
| |
| Friday, June 22, 2007 - 10:14 am: |
| 
|
क्विझची आयडीया मस्त आहे मीनु, एकदम वरिजिनल अजून कायकाय आहे? भ्रमा, जास्त आवाज करू नकोस!
|
>>>क्वीझची आयडीआ कशी वाटतेय ते सांगा की ..? आयडीआ मस्त... टपाटप विकेट्स पडतील...
|
अवो सन्योजक मन्डळी, स्पर्धक ऐनवेळी निवडणार ते "ऐच्छिकरित्या" की "चिठ्ठ्या टाकुन"???? त्यावर डिपेण्ड हे, खेळ किती कसा रन्गेल! (स्वतःहुन पुढे होवुन कोणत्याही स्पर्धेत भाग घेणारे दुर्मिळ, सन्ख्येने कमीच असतात, पण माझ्यासारखे जे स्वतःहुन भाग घ्यायला पुढे होणार नाहीत, (स्टेजची भिती वा चार पाच पेक्षा जास्त लोकान्पुढे उभारायची भिती, मुखदुर्बलता वगैरे कारणान्मुळे)ज्यान्ना "ढकलगाडी" प्रमाणे ढकलुन उभे करावे लागते त्यान्च्याकरता "ढकलण्याची" काय सोय हे????? DDD
|
मंडळी, उदंड प्रतिसाद! यंदाचा ववि एकदम दणक्यात होणार. लवकर नावे नोंदवा, बसची व्यवस्था करायला बरं पडेल.
|
व त्स सं व तो नो रं म न ज को य न मा पा माकडाच्या पाणी घड्यावर नाव फार सोनुबाई सोंगे अरे ! अरे ! थांबा थांबा ... आमचं डोकं अगदी ठीकाणावर आहे. आणि हो ! ही दुसरी कुठली भाषा नसुन हा आहे आपल्या वविमधला एक फक्कड खेळ ' शब्दखेळ !' तसं पाहीलं तर हे आपलं मायबोली विश्वच सगळं शब्दांवर अवलंबुन आहे नाही ? मग खेळु यात ना शब्दखेळ ? हा खेळ आपण दोन फेर्यात खेळणार आहोत. पहीली फेरी आहे टा ल पा ट ल उ अर्थात ' उलटापालट ' यात काय करायचं आहे ते सगळ्यांना कळलंच असेल. अक्षरांची उलटापालट करुन एक शब्द गटाला दिलेला आहे. योग्य शब्द ओळखायचा आहे. दुसरी फेरी म्हणींवर आधारीत आहे यात दोन म्हणींचे काही शब्द एकमेकांत उलटेपालटे अडकलेत. उत्तर देणार्या गटानी त्या दोन्ही म्हणी ओळखायच्या आहेत प्रत्येक प्रश्नाला वेळेचं बंधन आहे हं ..! चला तर मग वर दिलेले प्रश्न सोडवून ते तुम्ही किती सेकंदात सोडवलेत ते सांगा बरं चटकन ..?
|
नियम व अटी १. मायबोली क्वीजसाठी स्पर्धक ठरविले जाणार नाहीत. खेळाचे संचालक कुणालाही प्रश्न विचारायला सुरुवात करतील. त्यामुळे कुणीही कुणाला धक्के मारायची गरज नाहीये २. शब्दखेळासाठी तिन जणांचा एक याप्रमाणे चार गट केले जातील. यासाठीही आधीपासुन नावनोंदणी करायची नाहीये. आयत्या वेळी प्रथम स्वेच्छेने आणि कमी पडल्यास धक्का तंत्राने जागा भरल्या जातील. बाकी नियम स्पर्धेच्या वेळी सांगीतले जातील .. चालेल ना ..?
|
Shyamli
| |
| Monday, June 25, 2007 - 5:43 pm: |
| 
|
आयला देताय धमक्या आणि चालेल ना म्हणे 
|
Meenu
| |
| Tuesday, June 26, 2007 - 4:34 am: |
| 
|
अगं ! धमकी काय म्हणतेस श्यामले ? किती विनम्र के साथ लिहीलय
|
Arun
| |
| Tuesday, June 26, 2007 - 4:41 am: |
| 
|
श्यामले : 'आय' ला कोण कशाला धमक्या देइल ???????????? एक भा. प्र. ............
|
Himscool
| |
| Tuesday, June 26, 2007 - 5:25 am: |
| 
|
सही खेळ आहे.. चला गडवर टीपी करायला एक खेळ मिळाला...
|
Psg
| |
| Tuesday, June 26, 2007 - 5:32 am: |
| 
|
मला पण आवडला 'शब्दखेळ'. बक्षिस आहे का?
|
>>>बक्षिस आहे का? आहे तर... शब्दभेळ
|
ऐका हो ऐका !!! त्वरा करा ! त्वरा करा !! त्वरा करा !!! .. आता फक्त पाचच दिवस उरलेत. वविची बस भरत चालली आहे.. आपली जागा लवकरात लवकर बुक करा.. उशीर करू नका... अन्यथा इतर मायबोलीकरांना भेटायची आणि ववि enjoy करायची एक चांगली संधी मुकाल.
|
काय मंडळी मायबोली क्विजची तयारी चालू आहे ना ? कुणीकुणी शब्दकोश आणुन शब्दांचा अभ्यास करायला सुरुवात केलीये म्हणे ? अहो ! पण एवढे दोनच खेळ नाही खेळणार आहोत आपण .. मग.... ' ए ती बघ, कशी हातवारे करतीये! ' ' संध्यासारखी नाचून दाखवतेय असं नाही का वाटत? ' ' नक्कीच नक्कीच... ' ' ज्वानीच्या आगीची मशाल हाती... का? ' तर पुढचा मजेशीर खेळ आहे मूकाभिनय.. अर्थात dumb charades थीम आहे आपल्या सर्वांची आवडती... अर्थात सिनेमा .. हो, पण फक्त मराठी सिनेमा ..!! यातही आपण दोन फेर्या घेणार पहिली फेरी आहे सिनेमांच्या नावाची तर दुसरी फेरी आहे सिनेमातील गाण्यांची नियम व अटी १. ३ जणांचा एक याप्रमाणे चार गट २. नावं आयत्या वेळी ठरवली जातील (अर्थात स्वेच्छेने + धक्का तंत्राने) ३. बाकी नियम आयत्या वेळी .. चला तर लोक्स, आमची बरीच कामं राहिली आहेत अजून करायची! त्यामुळे आम्ही आपली व वि पर्यंत रजा घेतो. अरे, कोण आहे रे तिकडे ..? अरेच्च्या, हे काय आहे? अजून एक खेळ???? मंडळी जरा धीर धरा. व वि ला कळेलच, हे नक्की काय आहे ते.... तोपर्यंत.... पडदा है पडदा ..
|
अर्रे व्वाऽऽऽ! वविला बरेच खेळ हेत की! पर हे करता करता, ते म्हशीन्च्या पाठीवर बसुन हलाय डुलायच कधी? त्याला गाईड (सुत्रधार) कोण असणार हे??????
|
|
|