|
सन्योजक, मारली टिचकी! स्थळ चान्गल हे! थॅन्क्यू ("स्थळ" म्हन्जे सान्गुन आलेले नव्हे! जागा या अर्थाने घ्या! )
|
ववि गृपकरता डिस्काऊण्ट दिला हे का माणशी ५० रुपयान्चा??? मग??? नाण्याच्या दुसर्या बाजू, तुझा काय विचार हे?? जाणारेस का????
|
नाण्याच्या दोन्ही बाजू घासुन घासुन खडबडीत झाल्या आहेत... आल्या तरी ठीक नाही तर संग्रहलयात...
|
इन्द्रा, खडबडीत कशा रे होतील? आमच्यात तर घासुन घासुन नर्मदेच्या गोट्याप्रमाणे गुळगुळीत होतात! Ddd बर, कुठवर आली तयारी? या वेळेस पम पम गाडीन जा, झुक झुक गाडी नको! गर्दी अस्तीया! या सगुणा फार्म मधे अजुन काय काय हे? पुण्याच्या अभिरुची सारख कुम्भाराच चाक वगैरे आहे का? बरोबर काय काय घेवुन जायच अस्त??? यादी बनवा की राव! तरी बर, १४ लाच अवस होवुन जातीये!
|
वा हे अगदी मायबोलिकरानसारख चालु आहे कोणालाही ते धबधबे, सुन्दर पक्षी आणि छान मासेमारीचे तळे दिसले नाही सर्वानी फक्त म्हशी बघीतल्या गूड!!!!!
|
Lalu
| |
| Tuesday, June 05, 2007 - 4:58 pm: |
| 
|
यंदा टी-शर्ट नाहीत का? असतील तर कळवा. आणि विनय येतोच आहे तिकडे तेव्हा.... व. वि. ला शुभेच्छा!
|
मागच्या वविच्या सीडीच वाटप होऊन गेल का??? 
|
लालु, T-shirt बाबतीत विचार चालु आहे.. फ़ायनल ठरले की T-shirt च्या बीबीवर कळविण्यात येईल.
|
"म्हशीवर बसताना घ्यायची काळजी" यावर अनुभव आणि अनुभुतीतुन काही स्फुटलेखन करावे का? झकास, तुला दान्डगा अनुभव असेलच, तर तूच सुचना लिहुन काढ ना काय काय काळजी घ्यायची याच्या!
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 06, 2007 - 8:55 am: |
| 
|
नाहि रे लिम्बु मला असा फ़ार अनुभव नाहि म्हशीच्या पाठीवर बसण्याचा. कारण मी लहाणपणापासुनच गुट गुटीत आहे आणि त्या म्हशीच्या पाठीवर बसण्यासाठी जी उडी मारावी लागते ती जमत नव्हती. १-२ वेळा बसलो पण अनुभुती लिहिण्याइतक काही नाहि. हा एकदा एक म्हैस शिंग रोखुन पाठीमागे लागली होती त्यावेळी जी बोंब मारली होतीना त्याची अनुभुती डोक्यात पक्की बसली आहे. दुध काढु शकेन बहुतेक. आता खुप वर्ष झाले ते काम करुन.
|
दिनेशभावू, म्हशीने नक्कीच नाही लिहायचे! कारण की तिला (आपल्यासारख) या नेटच्या जन्जाळात डुम्बता येत असते तर ती पाण्यात कशाला डुम्बायला गेली अस्ती?????? हो की नाही??? तर जावु दे! झकोबा लिहित नाही तर मीच सुचना लिहुन ठेवतो! तऽऽरऽ....... म्हशीच्या पाठीवर बसणार्यान्नी घ्यावयाची खबरदारी १. शक्यतो फुल पॅण्ट घालुनच जावे अन्यथा म्हशीचे राठ केस बरेच दिवसात भादरलेले नसतील तर तारेच्या ब्रशने खरवडल्याप्रमाणे हात, कोपर, मान्ड्या, पोटर्या यान्ना ओरखडे पडतील! २. म्हैस आधीपासुनच पाण्यात डुम्बत बसली हे की; तुम्ही तिच्याबरोबरच पाण्यात उतरताय की; म्हैस आता डुम्बुन परतायच्या बेतात हे... या तिनही वेगवेगळ्या परिस्थिती असुन घ्यावयाची खबरदारी वेगवेगळि हे! म्हैस आधीपासुनच पाण्यात डुम्बत असेल तर आधी तिला चुचकारले पाहीजे, तिचे लक्ष नीटपणे वेधुन घेतले पाहीजे, तिच्या अन्गावर पाठीवर पाणी उडवुन तिला आपलेसे केले पाहीजे, अन्त्यथा आमनधपक्याने तिच्या पाठीवर उडी मारुन चढू पहाल तर डुम्बण्याच्या अवीऽऽऽट सुखातील तुमचा व्यत्यय सहन न होवुन म्हैस धबाकदिशी पाण्यातुन उसळी मारुन बाहेर येइल व तुम्ही पाण्यात पडाल.....! जर तुम्ही म्हशी बरोबरच पाण्यात उतरत असाल तर चुकुनही तिच्या पाठीवर बसुन पाण्याकडे जावु नका! एकदा का उन्हाने आणि गोचिडिन्च्या पिसवान्च्या चाव्याने कावलेल्या म्हशीला पाणी दिसले रे दिसले की पाठीवर कोण हे याची तमा न बाळगता ती पाण्याकडे धाव घेते आणि धाऽऽऽडदिशी पाण्यात अन्ग झोकुन देते! यावेळेस स्वतःला तिच्या पाठीवर शाबुन ठेवणे हे घोड्यावर ठोकलेल्या माण्ड पेक्षा अवघड काम अस्ते! म्हैस अशी धसमुसळेपणे पाण्यात शिरताना तुम्ही खाली पडलात तर गटान्गळ्या खाल्याच समजा! राहिल ते जर म्हशीला डुम्बता डुम्बता गोठ्याची अन तिथल्या चार्याची, असलाच तर रेडकाची ओढ लागुन ती निघण्याच्या तयारीत असेल अन नेमके तेव्हाच तुम्ही तिच्या पाठीवर टपकलात, तर म्हैस वैतागुन कदाचित घाबरुन किन्वा तुमचे ओझे फेकुन देण्यासाठी जीवाच्या आकान्ताने किनार्यावर धाव घेईल.... अशी तिची धाव थाम्बवायला तिला लगाम नस्तो हे कुणीही विसरू नये! तसेच तिच्या तोन्डावर बान्धलेल्या दाव्याला धरुन काही करायचा प्रयत्न करू नये..... अस झालच तर... शान्त बसुन रहावे..... उन्च सखल, वर खाली अशा वेगाचा अनुभव घ्यावा! ३. पाण्यात म्हशी जवळ उभ असताना, ती पाण्यात उभी हे की बसलेली याचा आधी अन्दाज घ्यावा! तसेच आपला पाय तिच्या पायाच्या जवलपास एक फुटाच्या कक्षेत नाही याची काळजी वहावी! जसे तुमचे पाय नदीतल्या गोट्यान्वरुन, चिखलातुन घसरू शकतात तसेच तिचेही घसरू शकतात! अशा वेळेस तोल सावरण्या करता म्हैस तिची तन्गडी वर उचलुन जिथे दूर ठेवत तिथेच नेमका तुमचा पाय असल्यास काही खैर नाही! म्हैस जर उभी असेल तर तिच्या जवळ असताना सतत तिचे निरीक्षन करावे! तिला केव्हा अन्ग झोकुन देवुन पाण्यात पहुडायची हुक्की येइल ते सान्गता येत नाही! त्यावेळेस आपण तिच्या पहुडण्याच्या कक्षेपासुन सुरक्षित अन्तरावर हलु शकू अशा तयारीत रहावे! ४. म्हशीन्च्या आसपास एखादा रेडा देखिल पाण्यात उतरलेला नाहीना याची खात्री करुन घ्यावी! यावर अधिक स्पष्टीकरणाची गरज हे काय? ५. काही म्हशी स्वभावतः धीट असतात तर काही लाजर्या बुजर्या! तर काही तापट, सरकू डोक्याच्या, खडुस असतात! धीट म्हैस तुमचे वाट्याला आली तर काही हरकत नाही पण लाजरी बुजरी म्हैस असेल तर तुम्ही पाठीवर नेम धरुन उडी मारायला जाल अन तेव्हाच ती पाठीची खालच्या बाजुस कमान करुन तुमच्या हाताच्या पकडीतुन वीजेच्या वेगाने पुढे सुळकाण्डी मारेल मासोळीसारखी, आणि तुम्ही पाण्यात तोन्डघशी पडाल याचा नेम नस्तो! जर का म्हैस उद्धट, बेरकी, खडुस, तापट असेल तर ती पळुन जाणार नाही पण तिच्या लाम्बलचक शिन्गान्नी मान वळवुन पाठीवरच्या तिला बान्डगुळाप्रमाणे वा गोचिडीप्रमाणे भासलेल्या तुम्हास उडवुन फेकायचा प्रयत्न करेल! इथेच हेही लक्षात घेतले पाहीजे की प्रत्येक म्हशीच्या शिन्गान्चा आकार वेगवेगळा अस्तो, अन त्यामुले तिने मान हलवुन केलेल्या शिन्गान्च्या हल्ल्याचा भौमितीक कोन वेगवेगळा असुन त्यानुसार तत्काळ मनातल्या मनात गणित करुन आपली जागा निश्चित करावी लागते. सबब ज्याची भुमिती चान्गली हे त्याने बिनधास्त मारक्या म्हशिन्पुढे जाण्यास हरकत नाही! ६. म्हशीच्या पाठीवर साधारणतः तिने मान वळवल्यावर तिचे शिन्गे मागे पोहोचणार नाहीत अशा म्हणजे वशिण्डाच्या थोड अलिकडे बसाव, त्याहुन फार मागे सरकलात तर ओल्या अन्गावर चाबकाच्या फटकार्याप्रमाणे बसणारे म्हशीच्या शेपटाचे फटके पाठीवर झेलायची तयारी ठेवावी! मला वाट्ट की आत्तापुरत्या येवढ्या सुचना बास झाल्या, बाकी सुचना लिम्बीला विचारुन घेवुन उद्या सान्गतो! तर तमाम म्हशीबरोबर डुम्बू इच्छिणार्या वविकर व्यक्तीस, कळकळीची विनन्ती हे की वरील सुचनान्चे नीटपने (अनुल्लेख न करता) पालन करुन आपली म्हशीन्बरोबर डुम्बायची सदिच्छा निर्विघ्न पणे पार पडे हीच माझी ही सदिच्छा! मॉड्स, ववि करता गेली दोन वर्षे मी नित्यनियमाने सुचना देत अस्तो! तरीही या सुचना येथे अयोग्य अस्थानी वाटल्यास दुसरीकडे योग्य जागी हलवाल का??? (धन्यवाद) तसेच ववि_सन्योजक! वरील सुचना "सगुणा फार्म" वाल्यान्ना दाखवुन घेवुन तपासुन बरोबर हेत की नाही याची जमल्यास जरुर खात्री करुन घ्याल का???? (धन्यवाद)
|
Sakhi_d
| |
| Wednesday, June 06, 2007 - 10:18 am: |
| 
|
लिंब्या मस्तच... तु म्हशींवर पी. एच. डि. वैगरे केली नाहीस ना?? ए. भा. प्र.
|
सखे, पी एच डी वगैरे नाही ग! मायबोलीकर वविकरान्ची काळजी म्हणुन थोडी अनुभुती, थोडा अनुभव अन बराचसा तिखट मीठ मसाला लावुन सुचना फोडणीस परतल्या अन इथे वाढल्या! (बायदीवे, मी एकदाही म्हशीवर बसलेलो नाही! [फार फाऽऽऽर्र पुर्वी गाढवावर बसलो अन तो पराक्रम घरी सान्गितल्यावर आईच्या हातुन फटके खाल्लेले आठवताहेत! नान्देडला त्यावेळेस गाढव अन डुकर मोक्कार फिरत असायची अन त्यान्च्याशी खेळणे हा आमचा आवडता उद्योग असायचा] पण म्हशिन्चे निरिक्षण, परिक्षन वगैरे भरपुर केलेल हे! नदित डुम्बणार्या, तळ्यात डुम्बणार्या, ओढ्यात डुम्बणार्या, झालच तर डबक्यात अन दगडाच्या खाणित साठलेल्या पाण्यात डुम्बणार्या... अशा अनेक ठिकाणच्या डुम्बणार्या म्हशिन्चे निरिक्षन केलेल हे, त्यान्च्या बरोबर असणार्या गुराख्यान्चे निरिक्षण केल हे!) एनिवे...... या बीबी वर तर काहीच हालचाल नाही! अस का????
|
Jayavi
| |
| Wednesday, June 06, 2007 - 11:11 am: |
| 
|
" विनय येतोच आहे तिकडे तेव्हा.... व. वि. ला शुभेच्छा! " लालू..........what do u mean by this....? विनय येतो आहे म्हणून शुभेच्छा.......????? फ़ारच बिनधास्त लिहितेस गं तू तर 
|
हिम्मतवाली आहे लालू... इथुन तशी लांब राहते ना? म्हणून* 
|
Slarti
| |
| Wednesday, June 06, 2007 - 3:26 pm: |
| 
|
लिंबू, सुचना म्हणजे कहर आहेत. जबरदस्त निरीक्षण आहे बुवा. भूमिती... भा.प्र. बरोबर घेऊन जाण्याच्या वस्तू या यादीत शालेय भूमितीचे पुस्तक असू द्यावे का ?
|
Lalu
| |
| Wednesday, June 06, 2007 - 3:47 pm: |
| 
|
धन्यवाद संयोजक. lol जयू, विनय... पण "व वि" म्हटले की शुभेच्छा या आल्याच ~D . आता बघा नुकतीच कुठे ववि ची घोषणा झाली तोवरच लिंबू ची मो ss ठी पोस्ट्स येता हेत. ~D ज्यांना त्या सूचना पाळणे जमणार नाही त्यांनी पाठीवर बसण्यापेक्षा म्हशीचे शेपूट पकडून त्या नेतील तिकडे जावे असे माझे मत आहे. आता TP करत नाही, ववि ला पुन्हा शुभेच्छा!
|
यंदाही हितगुजचे Tee Shirts आपण बनवणार आहोत. त्यासंबंधिची घोषणा लवकरच करण्यात येईल. ववि संबंधी कुठल्याही बाबीचा खुलासा अथवा काही माहिती हवी असल्यास, ईथे पोष्ट टाका अथवा मेल करा!
|
Giriraj
| |
| Friday, June 08, 2007 - 6:35 am: |
| 
|
बाकी सुचना लिम्बीला विचारुन घेवुन उद्या सान्गतो! >>> लिम्ब्या,लिम्बीला तू म्हैस म्हणाला असा अर्थ ध्वनित होतोय.. हा अर्थ झकासामार्फत व्हाया त्याचं खटलं तुझ्या खटल्याकडे पोचवलं तुझं काही खरं नाय बुवा!
|
मॉड,धन्यवाद... आमच्या विनंतीला मान देऊन व.विच्या thread ला पहिल्या पानावर स्थान दिल्याबद्दल
|
|
|