या बिबि कडे लक्ष असु द्या!
|
Zakasrao
| |
| Saturday, June 02, 2007 - 12:11 pm: |
| 
|
घ्या हो संयोजक माझ लक्ष आहे. ह्या चित्रात दाखवलेली सगळी काम करायची का ववि ला मग मी दोन्ही पायावर तय्यार.
|
ह्या चित्रात दाखवलेली सगळी काम करायची का ववि ला.. बारक्याशा फांदीवर कसं बसणार?
|
Jayavi
| |
| Monday, June 04, 2007 - 3:43 am: |
| 
|
१५ जुलै.... हं...शक्यता आहे ह्यावेळी. मृ........ अगं आधी general motors चा डाएट प्रोग्रॅम करुया तो प्रॉब्लेम नाहीये.... पण इतक्या म्हशी कुठून आणायच्या गं?
|
Zakasrao
| |
| Monday, June 04, 2007 - 3:44 am: |
| 
|
बारक्याशा फांदीवर कसं बसणार>>>>>>> ते बसण्याच नाही निरिक्षण करण्याच काम आहे. पक्षी,झाड इ. इ. निरिक्षण. दिनेशदा असतील तर माहितीत मोलाची भर पडेल.
|
पण इतक्या म्हशी कुठून आणायच्या गं? आपण संयोजकांना विनंती करु पेशल!
|
Dhumketu
| |
| Monday, June 04, 2007 - 4:22 am: |
| 
|
>> पण इतक्या म्हशी कुठून आणायच्या गं? ज्यांचा general motors diet प्रोग्रम फ़सला त्यांना पकडा
|
Psg
| |
| Monday, June 04, 2007 - 4:41 am: |
| 
|
वा! मस्त आहे स्पॉट म्हशी
|
Neel_ved
| |
| Monday, June 04, 2007 - 5:07 am: |
| 
|
माझ्यामते मायबोलीकरांच्या आकारानुसार फांद्या आणी म्हशी पुरवाव्या लागतील संयोजकांना... (मला माझी काळजी... )
|
आपल्या आकारानुसार फांद्यांची आणि म्हशींची व्यवस्था प्रत्येकाने करायची. काही झाल्यास खांद्यांचीही... डॉक्टरकडे न्यायला!
|
Zakasrao
| |
| Monday, June 04, 2007 - 5:48 am: |
| 
|
पण इतक्या म्हशी कुठून आणायच्या गं>>> असुदे सगळ्यानी मिळुन एकच म्हैस सारखी सारखी धुवुया म्हणजे नंतर त्या म्हशीला मिस पालमपुर स्पर्धेत पाठवायला हरकत नाही. सर्व लेडिज बायानी तिच्या मेक अप आणि पेडिक्युअर,मॅनिक्युअर अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे तर सर्व बापय पुरषानी तिच्या डायेट वर लक्ष द्यावे. आपल्या आकारानुसार फांद्यांची आणि म्हशींची व्यवस्था प्रत्येकाने करायची. काही झाल्यास खांद्यांचीही... डॉक्टरकडे न्यायला>>> भ्रमा पुण्यात चक्कर मारुन आलेला दिसतोयस.
|
Swa_26
| |
| Monday, June 04, 2007 - 7:21 am: |
| 
|
आयला सगुणा बाग!!! मस्तच!!! बरेच ऐकलय या स्पॉटबद्दल...
|
वर्षा विहार २००७ ला माझ्या हार्दीक शुभेच्छा..
|
Badbadi
| |
| Monday, June 04, 2007 - 12:32 pm: |
| 
|
वर्षा विहार २००७ ला माझ्या हार्दीक शुभेच्छा >> का रे या वेळी बाहेरून पाठिंबा!!! तू नसलास तर बस चा रंग बरोब्बर कोण सांगेल??? निदान त्यासाठी तरी ये...
|
माझा पण पाठिंबा... तसा मी येतोच आहे... तेव्हा भेटूच 
|
Dineshvs
| |
| Monday, June 04, 2007 - 5:22 pm: |
| 
|
अरे तिथे म्हशी धुवायच्या नाहीत. आपण तिच्या पाठीवर बसायचे, मग ती आपल्याला पाण्यातुन फिरवुन आणते.
|
झकोबा, नुस्त्या म्हशी धुवायचा नाहीत, कोल्हापुरसारख धारा पण काढायच्या! तुला जमल आयला, पण हे नेरळ कुठ हे?? सगुणा बाग??? हे काय नाव झाल???? आधी कधिच कस ऐकल नाही????? अवो सन्योजक, काय नक्शा बिक्शा हाये की नाही? अता पता द्या की! वायच गुगल अर्थ वरुन तरी चक्कर मारुन येतो, कस??? DDD
|
Zakasrao
| |
| Tuesday, June 05, 2007 - 3:56 am: |
| 
|
आपण तिच्या पाठीवर बसायचे, मग ती आपल्याला पाण्यातुन फिरवुन आणते>>>> मग सगळ्यानी जनरल मोटर्स चा डायेट प्रोग्राम दोनदा तरी उरकुन घ्या रे १५ तारखेपर्यंत. नहितर ती म्हैस आयत्यावेळी संप करेल सगळ्याना बघुनच. ववि च्या सर्व संयोजकांना आणि ववि ला शुभेच्छा. हे ववि च धनुष्य तुम्ही सगळेजण व्यवस्थित पेलाल ह्यात शंकाच नाहि. सर्व ववि संयोजकांचे आभार की ते असा क्षण सगळ्याना अनुभवण्यास मिळावा म्हणुन काम करत आहेत.
|
अवो सन्योजक, काय नक्शा बिक्शा हाये की नाही? सगुणा बागेवर टिचकी मारा.
|
Psg
| |
| Tuesday, June 05, 2007 - 4:40 am: |
| 
|
ववि च्या सर्व संयोजकांना आणि ववि ला शुभेच्छा. काय झकास, एकदम शुभेच्छांवर आलास ते? माघार घेतली काय?
|