Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 05, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Pune » Pune GTG - 25 Feb 2007 » Archive through April 05, 2007 « Previous Next »

Bhagya
Tuesday, April 03, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Fate chooses your relations, you choose your friends."
- Jacques Delille (1738 - 1813) French poet.

मैत्रीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर मी वरील कवीने लिहिल्यापेक्षा भाग्यवान आहे. कारण मायबोलीमुळे मला खूपच चांगले मित्र-मैत्रीणी एकाच ठिकाणी मिळालेत.
आत्तापर्यंत तर या सगळ्यांना मी मायबोलीवरच भेटत होते, पण फ़ेब्रुवारी २००७ च्या भारतवारीत बर्‍याच जणांना भेटण्याचा योग आला. २५ फ़ेब्रुवारीला झालेल्या या GTG बद्दल खरंतर आधीच लिहायला हवं होतं. पण परत इकडे आल्यानंतर नवीन जागेत शिफ़्ट झालो. सामान पहिले pack करणं, नंतर unpack करणं, घरी internet connection नसणं, uni मध्ये इतके दिवसाच्या बुडलेल्या कामाला न्याय देणं आणि अशाच अनेक गोष्टींमुळे लिहायला उशीर झाला.

तर, काही कारणांमुळे (आजारी पडणे, मधमाशा चावणे, विमानात गलेलट्ठ आणि गुटक्याचा प्रचंड भपकारा सोडणारा गुजराथी शेजारी असणे, तिकडचे काम इकडे करायला घेउन येण्याचा मूर्खपणा करणे आणि इतर अनेक हो) फ़ारशा चांगल्या न झालेल्या या भारतवारीत हे GTG ही एकच गोष्ट अगदी लक्षात राहण्याजोगी आणि छान झाली. भारतात गेल्या गेल्या पहिले दिनेशदांना फोन लावला आणि जरी GTG ची तारीख ठरली नसली, तरी ते येणार असल्याची खात्री करुन घेतली (खरं तर त्यांनी येणार असल्याचं आधीच कबूल केलेलं होतं.). पण इतकं उमदं, सगळ्या MB च्या लोकांचं लाडकं व्यक्तिमत्व आलं नसतं तर चाललं नसतं. पुण्याला पोचल्यावर गोविंद ( GS1 ) ला फोन लावला. कारण इतके गडकिल्ले चढणारा (लोकांना पण चढायला लावणारा) आणि त्यांच्या चढाईचे हेवा वाटेल असे वर्णन करणारा माणूस बघायचा होता. त्याचं घर अगदी जवळच निघालं.
वसुमति, म्हणजे मूडी पुण्यात असल्याचं दिनेशदा कडून कळलं होतंच. तिलापण फोन लावला. तिच्याकडून संपदा ( sampada_oke ) पण फ़ेब्रुवारीच्या सुमारास पुण्यात असणार असं कळलं. या दोघींची आणि माझी भेट अनुक्रमे लंडन आणि frankfurt ला हुकली होती. पुन्हा तसं होऊ नये अशी माझी इच्छा होती. दिनेशदा, गोविंद यांनी अजून काही ंB करांना बरीच फोनाफोनी केली आणि रविवार दि. २५ फ़ेब्रुवारीला सिंहगड रोडवर 'अभिरुची' त भेटायचे ठरलं.
सकाळी ११ वाजता भेटण्याचं ठरलं होतं. त्याप्रमाणे मी तयार होते. गोविंद मला आणि इतर काहींना त्याच्या गाडीतून नेणार होता. बरोबर अकरा वाजता दिनेशदानी पुणेकर मंडळींना उद्देशून sms पाठवला- 'पुणेकरांनो, एकदा तरी वेळेवर या...' मी पुणेकर नसुनही मला कानकोंडे झाल्यामुळे मी लगेच दिनेशदांना फोन लावला. मला कळलं की ते सकाळी ५|| वाजताच पुण्यात आलेत. इकडे गोविंद चा पत्ता नव्हता. शेवटी तो आल्यावर त्याच्याशेजारी अज़ून एक मायबोलिकर बसलेला दिसला. चौकशी करता कळले की तो सुभाष ( cool ) आहे. गोविंदने सांगितले कि तो कूलचा लोकल पालक आहे आणि कूलला आणताना त्याला उशीर झाला. कूलने हळुच, गोविंदचे लक्ष नसल्याचे बघून मला उशिराचे कारण तो नसून गोविंदचा मेक्-अप हे असल्याचे सांगितले. अशा मुलांचे लोकल पालक बनणे सोपे नाही, हे लगेच लक्षात आले.

थोडे (कि खूप?) पुढे गेल्यावर गोविंदने परत गाडी थांबवली. अज़ुन एक MB करीण येणार होती म्हणून. एक फोन आणि थोडा वेळ वाया गेल्यानंतर गाडीच्या मागच्या काचेतून एक मुलगी रस्त्याच्या मधून डुलत डुलत चालत येताना दिसली. ती आरती ( its_me )असल्याचे कळले.
गाडीत ती आल्यावर कूलला फ़ारच जोर चढला. आणि अभिरुची येईपर्यंत आरती आणि सुभाष ही बालके काही ना काही कारण काढून GS1 ला नाना तर्‍हेने छळत होती व टाकून बोलत होती. GS1 अगदी शांतपणे सगळे सहन करत होता. शेवटी माझ्या चेहर्‍यावरचे भाव त्याला समजले असावेत. त्याने मला समजावले कि हि मुले अशी असली तरी मनाने फ़ारच चांगली आहेत, त्यामुळे त्यांच्या अशा वागण्याकडे मी दुर्लक्ष करावे. I had to take his word for it... .


Bhagya
Tuesday, April 03, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mod , हे प्लीज़ योग्य तिथे हलवणार का? कारण मला सामाजिक या बी बी वर पुणे इथे नवीन thread उघडता आला नाही.

Bhagya
Tuesday, April 03, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मॉड.

तर, अभिरुची ही जागा एकदम झ्याक होती. आजुबाजूला सारख्या concrete च्या इमारती बघून वैतागलेल्या डोळ्यांना पर्वणी. हिरवाई बरीच दिसली. तिथे प्रवेशद्वाराजवळच बाकीची मंडळी भेटली. सकाळपासून पेपर वाचून कंटाळलेले पण चेहर्‍यावर त्रासिकपणा जराही नसणारे दिनेशदा, मिहिर आणि भक्ति (भक्तिचा सलवार कमीज़ फ़ारच सुंदर रंगाचा होता- कुठून घेतला हे विचारायचं राहिलंच) आणि मृण्मयी (आयडी Mru ). दिनेशदा मी कल्पना केली होती, त्याप्रमाणेच अगदी शांत आणि मृदुभाषी निघाले. आणि पुढे त्यांना असणार्‍या चौफ़ेर माहीतीची पण झलक मिळालीच. गोविंदचे गडकिल्ले सर करणे वाचून मला तो एक धिप्पाड, पायात दणकट बूट, हातात दोरी आणि कायम मोठ्या आवाजात बोलून इतरांना हाकणारा, लाल रंग दिसताच हाणणारा, अंगाला धूळ्-माती लागलेला माणूस असेल अशी कल्पना होती (प्रतिमा हो). पण तो अगदी सभ्य, नीटनेटका, सहनशील आणि हुशार माणूस निघाला. शिवाय त्याने आणि कूलने पण लाल रंगाचा शर्ट घातला होता. आत आमराई, पेरूची बाग, जांभळाची खूप झाडे दिसली. फ़ळे कशालाही लागली नव्हती, नाहितर Australia त राहूनही माझी फ़ळे चोरून तोडून खायची सवय सगळ्यांना कळली असती. आमराईकडे जाताना दिनेशदाने चंदनाचे झाड दाखवले. काळ्या खोडाचे हे झाड इतके सामान्य होते, कि त्याने दाखवले नसते तर मी त्याकडे दुर्लक्षच केले असते. पुढे कुंकवाचे पण झाड दाखवले. त्याचे फ़ळ उघडुन बघितल्यावर आत लाल बिया दिसल्या, मिरचीच्या बियांपेक्षा थोड्या मोठ्या. त्या कुटून कुंकू तयार करतात ही माहिती मिळाली. पलिकडे वार्‍यावर डुलणारे cosmos , भाजी दिसत होती. झाडांखालून जाणार्‍या पायवाटा, गावात असतात तशा झोपड्या, खाटा, बैलगाड्या, झाडांवर बांधलेली मचाणे, झोके, एक कृत्रिम छोटा धबधबा असा मस्तच setup होता.
आमराईतल्या त्या धबधब्यापाशी सगळे थांबलो. काही उत्साही मंडळी पाण्यात उतरली आणि पाणी उडवू लागली- अर्थातच दुसर्‍यांवर. मला बरोबर दोन दिवसापुर्वीच पायाला, हाताला, पाठीला मधमाश्या चावल्या असल्याने (ज्याला चावल्यात त्यालाच कळते कशा वेदना होतात ते-सगळीकडे गूं गूं असा आवाज येतो पुढचे काहि दिवस. ) मी पाण्यात उतरण्याची हिम्मत केली नाही. हो, नाहितर पाण्यातही काही चावायचे आणि GTG त विघ्न यायचे. अगदी झाडांवर पण मी चढायची हिम्मत केली नाही याच कारणांमुळे. मला तोपर्यंत थोडी भूक लागली होती. हे ओळखूनच की काय, दिनेशदाने खास गोव्याहून आणलेला अप्रतीम चवीचा carrot केक काढला. त्याचा आस्वाद घेत असतानाच सगळ्यांना त्याने भेटवस्तू वाटल्या. 'निस्वार्थ, निरपेक्षपणे देणे' हा second nature असलेल्या या माणसाबद्दल काय म्हणायचे?
तेवढ्यात एक हसरी, उत्साही असेल अशी वाटणारी मुलगी येताना दिसली. ती आपली प्रतिभावंत कवयित्री क्षिप्रा निघाली. थोड्यावेळाने गिरी शीतल बरोबर आला (शीतलनेच त्याला संभाळून आणले असे माझे मत आहे. आणि शीतलला बघून गिरी ला इतकी चांगली मुलगी मिळाल्याचा आनंद पण झाला) . सचिन अर्थात bombay viking पण आम्हाला सामिल झाला. इतके होईतो, गोविंद एका मचाणावर चढून झोपी गेला. आणि काही मुली झोके घेण्यात मग्न झाल्या. थोड्या वेळाने ३-४ लहान मुले मचाणावर चढली आणि गोविंदला अचानक बघून ती घाबरलीयत, गोविंद झोपेतून जागा होउन इतकी मुले आजूबाज़ुला बघून गोंधळलाय असे दृश्य आम्हाला दिसले.
थोड्या गप्पा गोष्टी झाल्यवर मी न लाजता भूक लागल्याचे जाहिर केले आणि आम्ही जेवणाकडे वळलो. तिथे थोडा वेळ असल्याचे कळले. एक जादुगार जादूचा प्रयोग दाखवत असल्याचे दिसले, तिथे जाऊन बसलो.



Bhagya
Wednesday, April 04, 2007 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी जशी जादुच्या प्रयोगांबद्दल उत्सुकता असायची, तशी काही आता नव्हती. पण त्या जादुगाराने नेहमीच्या प्रयोगांबरोबर एक दोन अगदी भन्नाट प्रयोग दाखवले. त्या प्रयोगांत त्याने काही MB करीणींना (मृ, क्षिप्रा ) पण सामिल केले होते. एका प्रयोगात त्याने एक कापडी चेंडू गायब केला. नंतर क्षिप्राच्या तोंडासमोर एक रिकामा काचेचा डबा धरला आणि तिला त्यात जोराने 'हा' म्हणायला सांगितले. तिने तसे म्हणताच, जणू काय क्षिप्राच्या तोंडातून निघाल्याप्रमाणे तो चेंडू त्या काचेच्या डब्यात येऊन पडला. सर्वात शेवटी त्याने लोकांना आपापल्या आवडत्या फुलाचे नाव घ्यायला सांगितले आणि त्या त्या फुलाचा वास त्या लोकांच्या हाताला आला. आम्ही सगळ्यांनी वास घेऊन बघितला... नाहीतर कुणाचा विश्वास बसला नसता. त्या जादुगाराचा फ़ोटो दिनेशदाच्या रंगिबेरंगी च्या पानावर आहे.
जेवायची वेळ झाली. बुफ़ेपाशी गेलो तर तिथे बहुधा housefull होते. मग जेवण्यासाठी छोट्या झोपड्या होत्या त्यात जाऊन बसलो. बसल्यावर लगेच एक माणूस्- म्यानेजर असावा, आम्हाला उठवायला आला. त्याला बाजुला नेउन अशी काही समज देण्यात आली, की तो नंतर जेवण सुरु असताना आमची प्रेमाने विचारपूस करायला आला. (अशी समज देता येणारे मित्रमैत्रिणी मिळणं ही किती भाग्याची गोष्ट आहे!)
जेवणाचा मेनु पाहिल्यावर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले. ज्वारी, बाजरी, मका, तांदळाच्या ऊन ऊन भाकरी. खमंग पिठलं. भरल्या वांग्याची, कोबीची भाजी. मटकीची मस्त उसळ. मसालेभात. जिलब्या आणि गुलाबजाम. राय आवळ्याचं लोणचं, मिरचीचा ठेचा आणि कारली आणि भेन्ड्यांचे तळलेले सांडगे. या सगळ्यात मी नेलेली काजूकतली हिरमुसली झाली, पण तिला पण न्याय देण्यात आला. तर हसत खेळत, गप्पा गोष्टी करत आम्ही जेवणं उरकली. जात्याच सभ्य असल्यामुळे आम्ही कोणाचाही, म्हणजे अनुपस्थीत व इतर MB करांचा विशेष उल्लेख वा अनुल्लेख केला नाही. वसुमती आणि संपदा येऊ न शकल्याने त्यांना मिसलं. फ़ोटो काढले. मी मुलांना आणले का नाही, आम्ही पण त्यांना सांभाळले असते असे मला सगळ्यांनी प्रेमाने सान्गितले. माझ्या डोळ्यांसमोर लगेच चित्र उभे राहिले- माझा मुलगा व मुलगी सैराट धावतायत, झाडांची फ़ुले तोडतायत, एक झाडावर चढून तिथून उडी मारण्याच्या बेतात, एक बैलांची शेपटी पिरगाळतोय आणि सगळ्यांना त्यांना सांभाळताना घाम येतोय! मुलं घरीच बरी!
शेवटी जड मनाने व पोटाने सगळे पांगलो. जाताना मला मी फ़ारच शांत आणि सभ्य असल्याचं प्रशस्तीपत्रक देण्यात आलं. माझा घसा बसलाय हे त्यामागचं रहस्य कोणालाच माहित नव्हतं. पुढच्या वारीत इतक्या चांगल्या मित्रमैत्रिणिंसाठी भरपुर वेळ ठेउन यायचा मी मनोमन निश्चय केला.

विशेष सुचना- GS1 बरोबर जाऊन उपाशी राहावे लागते हे अगदी खोटे आहे. तो मेनू आणि ठीकाण अगदी व्यवस्थीत निवडतो. लोकांनी त्याच्याबरोबर अगदी निर्धास्तपणे जावे.
सगळीच बालके खोडसाळ असली तरी खरीच गुणी व चांगली आहेत.


Bee
Wednesday, April 04, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान मजा केली तर तुम्ही..

Giriraj
Wednesday, April 04, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS ने हा वृत्तांत लिहून घेण्यासाठी बरेच द्रव्य खर्ची घातले आहे असे वाटते!
(करो बिचारा.. मलिन प्रतिमा सुधारण्यासाठी लोक काय काय करतात ना आरति,कूल! :-)


Gs1
Wednesday, April 04, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


भाग्यश्री, बर्‍याच दिवसांनी लिहून सुद्धा अगदी तपशीलवार लिहिले आहेस. त्या दिवशी मजा आलीच होती, आज तुझा वृत्तांत वाचून पुन : प्रत्ययाचा आनंद मिळाला.

गिरी, संत गोसो यांचे एक सुवचन लक्षात ठेव -
सत्य हे नेहमी खरे असते.


Itsme
Wednesday, April 04, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय भग्यश्री,

आम्ही GS ची चेष्टा करत होतो इथपर्यन्त ठिक आहे. पण त्याला टाकुन नक्किच बोलत नव्हतो.

त्यादिवशी आम्ही सगळे पण एक मेकांना बरेच दिवसांनी भेटत होतो, त्यामुळे थोडे अधिक उत्साहात असु.

आम्ही सगळे सतत एक्-मेकां बरोबर असतो. आणि आमची अनेक दिवसांचि ओळख आहे. तुझी ओळख एक दिवसाचीच आहे. त्यामुळे आमच्या बोलण्यातला मोकळे पणा तुला आवडला नसेलही. किंवा तुझा गैर्समज झाला असाव. त्यातही तो तु तुझ्या पर्यंतच ठेवला असतास तर मला काहीच objection नाही पण त्याची अशी जाहीर वाच्यता करण्यास माझा आक्षेप आहे.




Bhagya
Wednesday, April 04, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय आरती

माझा मोकळेपणा तुझ्या लक्षात आला नाही ग! please परत वाच. आणि आपल्या सगळ्यांची ओळख एक दिवसाची कशी असेल? माझा कुठलाही गैरसमज झाला नाही किंवा मला तुमचे वागणे आवडले नाही असे तर मुळिच नाही.
'किति टाकून बोलता रे तुम्ही मला' असे काहिसे वाक्य गोविंद ने उच्चारले (अर्थात विनोदानेच) त्या अनुषंगाने मी ते लिहिलेय. टाकून बोलणे हा वाक्प्रचार काही शब्दश्: घेण्याच्या अर्थाने मी लिहिला नाही व तसा माझा उद्देश तर मुळीच नव्हता. उलट मला सगळ्यांची चेष्टामस्करी खूप आवडली. आणि शेवटी मी कौतुकाने लिहिलेले 'बालके खोडसाळ असली तरी गुणी व चांगली आहेत' हे लिहिल्याचे वाचले नाहिस का?
तरी पण तुला ज्या वाक्यांची वाच्यता आवडली नसेल ती वाक्ये मला ई-मेल लिहून कळवलीस तर मी ती काढून टाकायची मॉड ना विनंती करेन.


Kshipra
Wednesday, April 04, 2007 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संत गोसो :-)

भाग्या, मस्त लिहिल आहेस.


Dineshvs
Wednesday, April 04, 2007 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिले आहेस भाग्य. तुला भेटुन मलाहि खुप छान वाटले. तसे आपले बोलणे होत असायचेच म्हणा. पण मायबोलीच्या भाषेत म्हणायचे तर आयडी ला चेहरा आणि आवाज लाभला. मायबोलीकरांच्या बाबतीत, पहिल्याच भेटीत माणसं, ओळखीची वाटतात, हा अनुभव नित्याचाच. आणि अश्या काहि भेटीनंतर सगळा औपचारिकपणा गळुन पडतो. ( जसे आता आमच्या बाबतीत झालेय. )

आम्ही काय शब्दात तिथल्या माणसाना समज दिली, ते तुम्हा लोकांपर्यंत आले नाही तेच छान.

तुझ्या मुलाना मात्र आणायला हवे होतेस.

तू सगळ्यांच्याबद्दल लिहिलेस, पण तु म्हणजे एक प्रसन्न, हसरे व्यक्तिमत्व आहेस, हे मलाही आवर्जुन सांगायलाच पाहिजे.

बाकी मुलांबद्दल म्हणशील, तर माझी सगळी बाळं त्यादिवशी खुपच शहाण्यासारखी वागली. एरवी संभाळता संभाळता, नाकी नऊ येतात, माझ्या.



Kandapohe
Wednesday, April 04, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्या मी पण पुण्यातच होतो. मला बोलावले असते तर येता आले असते.

Robeenhood
Wednesday, April 04, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, संत गोसो यांचे एक सुवचन लक्षात ठेव -
सत्य हे नेहमी खरे असते.
>>>>>

अच्छा अच्छा ते संत आहे हे मला जरा नंतर कळले. मी एकदम पाहिले ते मला जंत गोसो असे दिसले!!!:-)

Dineshvs
Wednesday, April 04, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

KP हा माझा आणि भाग्यचाही विश्वासघात आहे. भारतात यायच्या आधी एक ईमेल नसती का टाकता आली ?

Killedar
Wednesday, April 04, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>गिरी, संत गोसो यांचे एक सुवचन लक्षात ठेव -

सत्य हे नेहमी खरे असते.
पण संत गोसो यांना मधूनमधून बरे नसते. :-)

म्हणून ते "असे" करतात


Bhagya
Wednesday, April 04, 2007 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

के पी, तू पुण्यातच होतास? अरे तू लंडनला आहेस असा माझा समज होता कारण तुझे London च्या GTG बद्दलचे लिखण वाचले होते...
असो, माझ्याजवळ तुझा पुण्याचा पत्ता किंवा फोन न. नाहीये....
मेल चेक कर न please.


Dhumketu
Thursday, April 05, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> गिरी, संत गोसो यांचे एक सुवचन लक्षात ठेव -
गिरी आणी संत गोसो ह्यांनी दोघांनीही एकच सांगीतले?


Itsme
Thursday, April 05, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संत : म्हणजे संगणक तज्ञ च ना रे GS ... ?

गिरी, थोडे थोडके नाही तर पुरे १५० रुपये खर्ची घातले आहे गोसो महाराजांनी. :-)


Giriraj
Thursday, April 05, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आतरी,तू नियम का मोडते आहेस? वक्याची सुरवात आणि शेवट अश्या दोन्ही वेळेस GS म्हणून त्याला त्रास द्यायचा असे ठरले आहे ना.. मऽग!

हे धुमकेतवा,सत्य खरे असते तसेच ते सर्वव्यापी असते त्यामुळे मी काय तो काय एकच सत्य सांगणार.. शेवटी त्याची काय माझी काय सगळी अचल आणि निर्जीव संपत्ति माझीच आहे हेच एक सत्य आहे!


Itsme
Thursday, April 05, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry Giri ....

GS संत : म्हणजे संगणक तज्ञ च ना रे GS ... ?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators