|
Aschig
| |
| Sunday, October 15, 2006 - 8:37 am: |
| 
|
संपादक, ज्यांचे साहित्य निवडल्या गेले आहे त्यांना camera ready copy proofreading करता पाठवणार का? PDF ?
|
Sampadak
| |
| Monday, October 16, 2006 - 2:41 am: |
| 
|
आर्च, सगळ्यांना पोच देत आहोत. तुम्हाला काही शंका असेल तर संपादकांना जरुर ईमेल करुन विचारा. आशिष, Proof-reading चे काम संपादक मंडळातील सभासद करत आहेत. धन्यवाद.
|
Aschig
| |
| Monday, October 16, 2006 - 3:47 am: |
| 
|
dhanyawaad .. .. .. ..
|
अन्क केव्हा पर्यन्त प्रकाशित होऊ शकेल? याबारीला नाय जमल पर आता वर्षभर आधीच तयारी करुन ठेवतो फुडल्या दिवाळी अन्कासाठी, कार्टुन्स, व्यन्गचित्रान्ची मालिका, हलती चालती बोलती चित्रे अर्थात gif किन्वा flash files , कथा, कविता, वात्रटीका.... कितिक काय करता आल असत, केल नाही, या पुढे करीन! (सुचलच उशिरा, अन वेळ मिळाला नाही)
|
Paragkan
| |
| Monday, October 16, 2006 - 5:03 pm: |
| 
|
LT , तू लिही रे कधीही. तशीही तुझ्या साहित्याची एक वेगळी 'पुरवणी'च काढावी लागेल ना 
|
Sampadak
| |
| Tuesday, October 17, 2006 - 1:25 am: |
| 
|
हितगुज दिवाळी अंक २००६ ...लवकरच प्रकाशित होत आहे. प्रतिभावान मायबोलीकरांच्या साहित्याने नटलेला हितगुजचा दशकपूर्ती विशेषांक! त्याची ही पहिली छोटीशी झलक.... ****************** "..या वाड्यात काहीतरी वेगळेपणा होता खास! नारायण धारप, स्टीफन किंग यांच्या भीतीकथा, सर्वसामान्य, नियमित जगातून अगदी अचानक अज्ञाताच्या गूढ, अनियमित जगात प्रवेश करतात. ते स्थित्यंतर वाचताना उमटते तशीच शिरशिरी हा वाडा पाहून माझ्या अंगावर. उमटून गेली....." - शब्दागणिक उत्कंठा वाढवणारी श्रीनि ची कथा 'आधार.' "लग्नाक जावची तयारी चललली, तुका आमंत्राण इला नाय?" "लगीन? कोणाचा? माका कोणी सांगलां नाय ता?" - आपल्या खास शैलीत 'सुमाचं लग्न' लावत आहेत विनय देसाई. जावे त्यांच्या देशा...घ्यावा मातीचा सुगंध. देशोदेशींचे मायबोलीकर आपले अनुभव, तिथली संस्कृती यांची ओळख करून देत आपल्या देशाची सफर घडवून आणत आहेत 'मृद् गंध' मध्ये! ....पण माझं मात्र लक्ष गेलं होतं एका काळ्या ड्रेस मटेरिअल कडे. ते मटेरिअल पाहिलं आणि एकदम बालपणीचा माझा आवडता फ्रॉक आठवला .. असाच काळा भोर, सॅटीनचा फ्रॉक, त्यावर शेवाळी रंगाच्या चांदण्या. आईने तो फ्रॉक शिवायला टाकताना टेलरला सांगितलं होतं, "गुड्डी बाह्या शिवा, छान दिसतात तिला". - तुम्हाला आठवतात तुमच्या शाळा - कॉलेजच्या काळच्या फॅशन्स? परकर पोलके, मॅक्सी, साधना कट... दीपांजली मात्र लिहिते आहे तिच्या 'आठवणीतल्या फॅशन्स.' रिंगटोन! अगदी 'जयोस्तुते' पासून 'लगे रहो' पर्यन्त सगळे ऐकले असतील तुम्ही कदाचित. पण असा नक्कीच नाही! ऐका तर मग प्रसाद शिरगांवकरांचा आगळावेगळा 'श्रवणीय' प्रेमाचा रिंगटोन! "मी आणि मायबोली".. हिच्याबद्दल काय लिहावं? कसं व्यक्त करावं हे नातं? आपली कल्पनाशक्ती वापरून यशस्वीपणे हे नातं व्यक्त केलेले दोन विजेते.. त्यांच्या साहित्यासह अंकात जाहीर होणार आहेत. ******************** हितगुज दिवाळी अंक २००६ प्रकाशन : 'नरक चतुर्दशी', २१ ऑक्टोबर, २००६. US(EST)
|
Bee
| |
| Tuesday, October 17, 2006 - 2:36 am: |
| 
|
वा आता मात्र खरच अंकाची उत्कंठता वाढली आहे :-)
|
झक्काऽऽऽऽस! ये हुई ना बात! पीके, येस, माझ्यासाठी वेगळी लिम्बुटिम्बु अर्थात बालसाहित्याची पुरवणी काढावी लागेल! प्रेमाचा रिन्गटोन म्हन्जी गाण बिण ऐकायला मिळणार की काय दिवाळि अन्कात? भारीच की
|
Shonoo
| |
| Tuesday, October 17, 2006 - 12:27 pm: |
| 
|
बी उत्कंठा म्हण रे. उत्कंठता असा शब्द नाहीये.
|
Safaai
| |
| Tuesday, October 17, 2006 - 5:12 pm: |
| 
|
असं कसं म्हणता... विदर्भात कितीतरी तुम्हा पुण्या - मुंबईच्या लोकांना माहिती नसलेले शब्द असतात, त्यातला हा एक, हो की नाही रे बी
|
Arch
| |
| Tuesday, October 17, 2006 - 5:18 pm: |
| 
|
ह्यावरून एक गाण आठवल. " झलक दिखला जा. आ जा आ जा " शी. त्या हेमेश रेशमियाची आठवण झाली. 
|
अरे वा ! बरेच दिवसांनी श्रीनि ची गूढकथा !
|
Bee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 2:12 am: |
| 
|
हे मात्र नक्की आहे की विदर्भाची आपली अशी मराठी भाषा आहे. मराठीतील कैक शब्दांचा विदर्भात लयबद्ध अपभ्रंश झालेला आहे. पण हा काही अपभ्रंश वगैरे नव्हता.. ती माझी चुक होती आणि ती मान्य करण्यात मला कसलीच लज्जा वाटत नाही.. संपादक, आजचा ट्रेलर कुठे गेला?
|
Giriraj
| |
| Wednesday, October 18, 2006 - 6:55 am: |
| 
|
लज्जा आणि लाज या दोन्ही शब्दांमधून एकच अर्थ ध्वनित होत असला तरी त्यांच्या शब्दच्छाटा वेगळ्या आहेत का? कुणी यबद्दल सांगू शकेल का? एक आणखी शंका म्हणजे शब्दच्छटा या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो! आगाऊ धन्यवाद!
|
Shyamli
| |
| Wednesday, October 18, 2006 - 7:09 am: |
| 
|
लज्जा आणि लाज या दोन्ही शब्दांमधून एकच अर्थ ध्वनित होत असला तरी त्यांच्या शब्दच्छाटा वेगळ्या आहेत का? कुणी यबद्दल सांगू शकेल का? >>> गीरी..... उदाहरण देउ का मी तुला? बरं ते शब्दच्छाटा>>>>> च काय करायच आहे शब्द छाटायचे आहेत का?
|
Bee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 7:36 am: |
| 
|
अरे हा बीबी शब्दार्थाचा नाही आहे. इथे घोळ घालू नका :-)
|
स्वतःच्याच अस्तित्वामुळ स्वतःलाच वाटते ती लाज! दुसर्यामुळ दुसर्याच्या अस्तित्वामुळ वाटते ती लज्जा! चूकी मुळ अपराधीपणाची भावना निर्मा झाल्यामुळ वाटणारी ती लाज! अपराधीपणा वगैरे काहीही नसताना, मनाच्या कोमल तारा कुणि छेडल्यावर गालावर हळुवार उमलते, फुलते ती लज्जा! गिर्ई, अजुन हव हे विश्लेषण?
|
Shonoo
| |
| Wednesday, October 18, 2006 - 12:51 pm: |
| 
|
शब्दछटा म्हणजे nuances . समानार्थी शब्द असले तरी प्रसंगानुरूप, सन्दर्भानुरूप एखादा शब्द जास्त योग्य ठरतो. पण हे अनुभवाने आणि निरिक्षणाने येणारं ज्ञान आहे. माझ्या माहितीत मराठीत शब्दछटांबद्दल विवेचन कोणी लिहीत नाही. फार पूर्वी एम व्ही कामथ सम्पादक असताना इलस्ट्रेटेड वीकली मधे भाषा, वाक्यरचना, वाक्प्रचार, व्याकरण याबद्दल छान लेख येत असत. इथं अमेरिकेत न्यू यॉर्क टाइम्स चे विलियम सॅफायर पण याविषयावर अतिशय अभ्यासपूर्वक लिहितात. मोठी ऑक्सफ़र्ड इंग्लिश डिक्शनरी असते २०-२० भागांची- त्यात शब्दछटा, आणि शब्द वापरण्यासंबंधी फार तपशीलवार माहिती असते. विषयांतराबद्दल क्षमस्व मे.
|
Sampadak
| |
| Wednesday, October 18, 2006 - 4:19 pm: |
| 
|
हितगुज दिवाळी अंक २००६ ********************* " तुमचा कार्डसवरून सांगितल्या जाणार्या भविष्यावर विश्वास आहे का, सुनीता? " " म्हणजे ते टॅरो कार्डस् वगैरे? " " हं काहीसं तसंच! " " अजूनतरी मी असं भविष्य जाणून घ्यायच्या फंदात पडलेले नाहीय. " " मीही कधी मुद्दामहून तसा प्रयत्न केला नव्हता. पण गेल्या शनिवारी..... " - shraddhak ची दीर्घकथा "दैव जाणिले कुणी..?" Vegetarian Prawn Salad!! Vegetarian Duck Starter!!! "दिङ्मूढ" का काय म्हणतात ना मराठीत, तशी अवस्था झाली! मग सर्वत्र चौकशी सुरु झाली. एकाचं म्हणणं - "अगं म्हणजे ज्या प्राण्यांना शाकाहारी अन्न खाऊ घालतात त्यांचेच मांस." डोंबल! - आता हे कशाचं असतं, कसं दिसतं, कशाशी खातात.... ते रैना सांगते आहे 'एका जेवणाची गोष्ट' मध्ये. "...पण आपण आपल्या क्षमतेनुसार काय करू शकतो, मुळात काही करू शकतो की नाही हे सगळं तपासून पाह्यचं आहे. मोठमोठ्या गप्पा, वितंडवाद सहज घातले जातात, पण त्याला खारीच्या कृतीची जरी जोड मिळाली तरी या देशातले चित्रच बदलून जाईल. अन्यथा ही ललकारी ऐकायला आता फार वाट पहावी लागणार नाही... होश्शियार! कंपनी सरकार आ रहा है!!" 'चिंतन' या माहितीपूर्ण लेख असलेल्या विभागात लिहीते आहे - सई दरवर्षीप्रमाणे हा अंकही काव्यप्रेमींना पर्वणीच ठरावा असा आहे, ज्यांच्या काव्यांचा समावेश आहे अशा अनेकांपैकी हे काही - सखीप्रिया, बी, Sarag23 , क्षिप्रा, परागकण, वैभव जोशी आणि स्वाती आम्बोळे. तसेच विडंबनकार मिल्या! ***********************
|
Shonoo
| |
| Wednesday, October 18, 2006 - 4:29 pm: |
| 
|
आता नव्याने उत्कन्ठा वाढीस लागली आहे :-)
|
|
|