|
हितगुज दिवाळी अंक २००६ नमस्कार मंडळी, ह्या वर्षी दिवाळी लवकर आलीय. कसं होणार.. आमच्या पोटात मोठा खड्डा!!. तेव्हा मंडळी तुमच्या भरघोस पाठींब्याशिवाय हे काही शक्य नाहीये. चला तर.. सम्पादक कोणा कोणाला व्हायचय, देवनागरीकरण, प्रुफ़ रिडींग कोण कोण करणार. लवकर कळवा. आणी सगळ्यात महत्वाच म्हणजे आपल्या उत्कृष्ट कलाकृती तयार ठेवा बरं का. लक्षात असु द्या.. गुलमोहरवर प्रसिद्ध झालेले साहीत्या दिवाळी अंकात घेतले जाणार नाही.. ह्या पुर्वीचे दिवाळी अंक खालिल ठिकाणी उपलब्ध आहेत. हितगुज दिवाळी अंक ह्या वर्षीच्या दिवाळी अंका साठी साहित्य खालील ठिकाणी पाठवा दिवाळी अंक २००६ साठी साहित्य --------------------------------------------------------- मायबोलीच्या दशकपूर्ती निमित्त यंदाच्या दिवाळी अंकासाठी काही स्पर्धा जाहीर करत आहोत. आपल्याकडून भरपूर प्रतिसाद मिळेल अशी आशा. स्पर्धांची माहिती खालीलप्रमाणे - "मी आणि मायबोली" स्पर्धा आली म्हणजे नियमही आलेत. ते असे - १. तुमच्या स्वत:च्या मायबोलीवरच्या अनुभवाबद्दल कुठल्याही वाङमयप्रकारातून लिहिलेलं चालेल - - कथा (हो, कथाच ) - कविता - लघुनिबंध - ललितलेख - चारोळी - गीत - विनोद - अनुभव कथन - अभंग, पोवाडा शब्दमर्यादा जास्तीत जास्त १००० शब्द. कमी चालतील - श्रवणीय audio , - दृकश्रवणीय video - तुमच्या अनुभवावर आधारीत मायबोलीची जाहिरात - जिंगल, ऍनिमेशन जास्तीत जास्त ७ मिनिटे मर्यादा. कमी चालेल - छायाचित्र - व्यंगचित्र कुठलाही प्रकार असला तरी शक्य तेवढा तुमच्या खर्याखुर्या अनुभवाशी निगडीत असावा, काल्पनिक अनुभव नको. २. सर्व मायबोलीकर, स्वयंसेवक, नेमस्तक यांच्यासाठी ही स्पर्धा खुली आहे. हितगुज ऍडमीन (आणि त्यांचे नातेवाईक) तसेच प्रायोजक (आणि त्यांचे नातेवाईक ) यात भाग घेऊ शकणार नाहीत. ३. पारितोषिक - - प्रथम पारितोषिक रोख $50 - द्वितीय पारितोषिक रोख $25 (किंवा स्थानिक चलनात सममूल्य) पहिल्या दोन प्रवेशिका दिवाळी अंकात प्रसिद्ध होतील आणि इतर सर्व मायबोली वर इतरत्र. ४. प्रत्येक व्यक्तिमत्वाला एकदाच भाग घेता येईल. त्यासाठी खरं नाव पत्ता देणे आवश्यक आहे. साहित्य स्पर्धेसाठी आहे याचा स्पष्ट उल्लेख करावा. ५. सर्व प्रवेशिकांवर मायबोलीचा मालकीहक्क असेल. त्यामुळे भविष्यात पुस्तक किंवा CD रुपाने प्रसिद्ध करणे सोपे जाईल. पाठवलेली प्रवेशिका मायबोलीच्या लेखी संमतिशिवाय इतरत्र प्रसिध्द करता येणार नाही. [**आपल्यातलेच एक मायबोलीकर संतोष किल्लेदार यांनी ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. ही स्पर्धा प्रसाद देशमुख (महागुरू) यांनी सुचवली त्याबद्दल त्यांचेही आभार. **आपल्यातल्या कुणाला अशासारखे मायबोलिचे उपक्रम प्रायोजित करण्याची इच्छा असेल तर तर कृपया ऍडमीनशी संपर्क साधावा.] कथा स्पर्धा नियम - १. स्पर्धा संपादक मंडळातील व्यक्ती सोडून सर्व मायबोलीकरांना खुली आहे. २. कथा स्पर्धेसाठी एका user ला स्वलिखित एकच कथा पाठवता येईल. (स्पर्धेव्यतिरिक्त फक्त दिवाळी अंकासाठी वेगळ्या कथा पाठवता येतील. त्यासाठी इथले नियम लागू नाहीत.) ३. शब्दमर्यादा १००० शब्द. ४. पारितोषिक - - प्रथम क्रमांक - 'रंगीबेरंगी' ची १ वर्षाची मेंबरशीप विनामूल्य आणि "परदेसाई" पुस्तकाची एक प्रत. - द्वितीय क्रमांक - 'रंगीबेरंगी' ची १ वर्षाची मेंबरशीप विनामूल्य. ५. स्पर्धेसाठी कथा पाठवताना "मायबोली कथा स्पर्धा" असा स्पष्ट उल्लेख करावा. ६. पारितोषिक विजेत्या दोन कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध केल्या जातील. स्पर्धेतल्या बाकी कथा प्रसिद्ध करायच्या किंवा नाही हा निर्णय संपादक मंडळ घेईल. या स्पर्धांबाबत काही प्रश्न असतील तर ते इथे किंवा संपादक मंडळाला ईमेल करुन विचारावेत. स्पर्धेसाठी किंवा दिवाळी अंकासाठी इतर साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर, २००६ ही आहे. धन्यवाद! - संपादक मंडळ, हितगुज दिवाळी अंक २००६.
Bee
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:21 am: |
| 
|
छानच सम्पादक.. आता खरच उत्सुक्ता वाढली आहे.. :-) उत्सुक्तता नाही :-)
|
अरेऽऽऽ बीऽऽऽ, उत्सुक पासुन उत्सुकता....!
|
Chafa
| |
| Thursday, October 19, 2006 - 3:27 am: |
| 
|
बी, तरीही चुकलासच. 'उत्सुकता' असा शब्द आहे तो.
|
Giriraj
| |
| Thursday, October 19, 2006 - 5:10 am: |
| 
|
वा वा छानच जाहिरात चालू आहे! उत्कंठा की उत्कंठता अगदी वाढीस लागली आहे! काय हो संपासकमहोदय,यावेळेस MP3 घेतल्या आहेत म्हणे! खरं की काय! चाफ़ा,अरे जसे उपयुक्त पासून उपयुक्तता तसेच उत्सुक पासूस उत्सुक्तता! तुला बाबा काही कळतच नाही!
|
दिवाळी अन्कासाठी मी आत्ता एक कार्टुन कम विनोदी चित्र काढल हे पेन्शिलिन! अजुनही घेणार का? की इकडे तिकडे टाकू?
|
Giriraj
| |
| Thursday, October 19, 2006 - 9:33 am: |
| 
|
आता admin ने लिहिलेलही घेणार नाही म्हणे सम्पादक! त्यामुळे तू इकडे तिकडे आणि सर्विकडेही टाकू शकतो ही चित्रे! बाकी आजकाल V&C नाही का चालू तुझा?
|
अब्बे माह्या "कर्माचा" V&C झाला हे! आधि तो निस्तरुदे, मग जगाचा V&C बघिन! तर असुदे, मी चित्रकलेच्या बीबीवर टाकतो ते चित्र! 
|
Sampadak
| |
| Saturday, October 21, 2006 - 3:51 am: |
| 
|
उद्या दिनांक २१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होत आहे - हितगुज दिवाळी अंक २००६. ..पानमळ्यानं संपन्न असलेल्या माझ्या गावात येताना शेतात एक तरी मोर दिसायचाच. पण या सगळ्याहून ज्या ओढीनं मी गावात येत होते ते कापसासारखं मऊ मुलायम अंतरंग असलेल्या माझ्या आजीसाठी.. - गोधडी ( Rga ). "मला कुंभारकाम करायला लागून ३ वर्षे होत आली, पण अजूनही ते सगळे कालच सुरु केले आहे अशी झटापट सुरु असते.." "फिरत्या चाकावरती..." - कराडकर प्रसाद शिरगांवकरांची एकांकिका 'निरभ्र'. आणि खास दिवाळी स्पेशल 'संवाद' कोणाशी? ते अंकातच वाचा!
|
Bee
| |
| Saturday, October 21, 2006 - 3:03 pm: |
| 
|
अहो संपादक, करा की लवकर प्रकाशित अंक. आमची निजायची वेळ झाली आहे :-)
|
संपादक दिवाळी अंक प्रकाशित झाला का? कुठे आहे तो? मला तर कुठेच सापडत नाहीये मग कसा वाचायचा आम्ही
|
Asmaani
| |
| Saturday, October 21, 2006 - 3:59 pm: |
| 
|
कुठे आहे हो दिवाळी अंक? आला की २१ ऑक्टोबर!
|
Paragkan
| |
| Saturday, October 21, 2006 - 6:00 pm: |
| 
|
लोकांना ना दम कसा तो धरवत नाही. 
|
Shyamli
| |
| Saturday, October 21, 2006 - 6:51 pm: |
| 
|
धरला की दम २१ तारीख मावळायला आली आमची संपादक मंडळी आता उद्या बघायचा का अंक?
|
संपादकांनी US time प्रमाणे 21 st अस लिहिलय कि clear, वेळ आहे अजुन . 
|
Sampadak
| |
| Saturday, October 21, 2006 - 7:44 pm: |
| 
|
हितगुज दिवाळी अंक २००६ आज नरक चतुर्दशी च्या शुभ मुहूर्तावर आपला दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. सर्व स्वयंसेवकांचे आणि अन्कासाठी साहित्य पाठवून भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल मायबोलीकरांचे आभार! दिवाळी अंकासाठी लिंक - 'हितगुज दिवाळी अंक २००६' शुभ दीपावली!
|
Sampadak
| |
| Thursday, November 09, 2006 - 3:11 pm: |
| 
|
'हितगुज दिवाळी अंक २००६' यंदाचा दिवाळी अंक ( PDF Format मध्ये) खालील लिंकवर उपलब्ध आहे हितगुज दिवाळी अंक २००६ PDF
|
|
|