Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 03, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज दिवाळी अंक » दिवाळी अंक पूर्वतयारी » दिवाळी अंक २००६ पूर्वतयारी » Archive through October 03, 2006 « Previous Next »

Sampadak
Friday, September 15, 2006 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक विनंती - कृपया आपले साहित्य पाठवताना ते युनिकोड न वापरता, फक्त \dev अथवा \dev2 टॅग वापरुन लिहीलेले असावे. हे दोन्ही टॅग्ज लिप्यंतराचे काम एकसारखेच करतात. त्यामुळे शुद्धीकरणाचे काम सोपे होईल व अंकातले सर्व साहित्य एकाच घाटाच्या लिपीत राहील.

सहकार्याबद्दल धन्यवाद.


Sampadak
Friday, September 15, 2006 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg , वर दिलेल्या लिन्क वर साहित्य पोस्ट करायचे आहे. स्पर्धेसाठी असेल तर पोस्ट करताना नाव, पत्ता द्यावा. शक्यतो मेल करु नका. audio, video, image असेल तर मेल केल्यास चालेल. हे मटेरिअल जर स्पर्धेसाठी असेल तर मेल मध्ये नाव, पत्ता लिहावा.

Upas
Monday, September 18, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उशीर झाला ईथे यायला त्याबद्दल sorry , आपल्या दिवाळी अंकासाठी पडेल ते काम करायची माझी तयारी आहे..

Bee
Friday, September 22, 2006 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक, दिवाळी अंकाची लिंक वर दिसेल अशी का नाही ठेवत? म्हणजे डाव्या किंवा उजव्या बाजूला जर अंक इथे पोष्ट करा असे जर केले तर ती नेहमी येताजाता दिसेल.

Manuswini
Monday, September 25, 2006 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक,
मला 'मायबोलि आणी मी' ह्याच्यात भाग घ्यायचा आहे.

मला बक्षीसाचा 'मोह' नाही. तशी मी 'निर्मोही' च आहे.
पण seriously, I am keen to write something in good marathee and discover if I can write or would love to share my feelings about maayboli

मला भाग घेण्यात interest नाही कारण आमचे लिखाण एवढे योग्य असेल की नाहे हि खात्री कमी आहे. पण अनुभव share करण्याची इच्छा जबरदस्त आहे.
ती वंचीत होवु नये म्हणुन दोन प्रश्ण,

१) भाग न घेता लिखाण पाठवता येणे शक्य आहे का वरील topic वर?
२) नाव माझे खरे आहे त्यामुळे नाव न देण्याची चिंता नाहे पण इथे मला खुप छान छन मित्र, लिखाण वाचायला मिळाले त्याचा अनुभव लिहिण्यासाठी पत्ता कशाला द्यावा? ही बळजबरी आहे असे मला वाटते.

please कळवा मी तसे लिहीन.
इथे बरेच जण आपले अनुभव लिहु इच्छीत असतील पण ही अट अमान्य आहे.



Admin
Monday, September 25, 2006 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1)भाग न घेता लिखाण पाठवता येणे शक्य आहे का वरील topic वर?
होय. जरूर पाठवा. आलेला प्रत्येक मजकूर इथेच प्रसिद्ध होईल. दिवाळी अंकात फक्त पहिल्या दोन क्रमांकाना प्रसिद्धी मिळेल.
2) पत्ता देण्याची तीन कारणे: अ) बक्षीस कुठे पाठवायचं ब) एका व्यक्तिला एकदाच भाग घेता यावा. नाहीतर एक व्यक्ती ४-५ वेगवेगळ्या नावाने भाग घेऊ शकेल आणि बक्षिस मिळाल्यावर फक्त त्यातले एक नाव जाहीर करू शकेल. क) ही खरंच सगळ्यांसाठी स्पर्धा आहे. केवळ ४-५ व्यक्ति १०-१२ व्यक्तिमत्व वापरून मायबोलीचे गुणगान करीत आहे असे दिसू नये म्हणून.

यावर काही उपाय असतील तर जरूर सुचवा. उदा. फक्त मला ( Hitguj Admin )थेट वेगळी email पाठवून पत्ता पाठवता येईल आणि माझा पत्ता जाहीर करू नका असे सांगता येईल. ती ईमेल फक्त मी एकटाच वाचतो.तसेही जाहीर करताना आम्ही फक्त झुमरीतल्लैयाहून अमुक तमुक किंवा लाडसावंगी जि. औरंगाबादहून नानूकाका देशमाने, इतकेच जाहीर करणार आहोत. पण गावाचेही नाव जाहीर करायचे नसले तर तसे तुम्ही सांगू शकता.

मायबोलीने सभासदांच्या खाजगी माहीतीला नेहमीच गोपनीय मानले आहेत. ती इतर कुणालाही कुठल्याही कारणासाठी दाखवली जात नाही आणि कुठल्याही व्यापारी कारणासाठी त्या नाव पत्त्याचा वापर केला जाणार नाही. प्रायोजकानी बक्षीसाची रक्कम आगावू देउ केली आहे आणि त्याना कुणाचाही नाव पत्ता माहीती करण्यात रस नाही हे त्यानी स्पष्ट केले आहे.

आणि वर म्हटल्याप्रमाणे स्पर्धेत अजिबात भाग न घेता नुसतेच लिखाण पाठवता येईल आणि ते आम्ही जरूर प्रसिद्ध करू. मात्र त्या लिखाणालाही शब्दांचे किंवा वेळेचे बंधन राहील.


Manuswini
Tuesday, September 26, 2006 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin ,
एक शंका,तुम्हाला वाटत नाही काही लोक खोटा पत्ता देवू शकतात.
for instance मी माझ्या मैत्रिणीचा पत्ता देवू शकते.

माझ्या खर्‍या पत्त्यावर एक लिखाण, दुसरे friend च्या पत्त्यावर.

disclaimer note: मी असे म्हणत नाही की people out here can go to that extend of fraudgery, so please no "offense" but this is one possibility

I am sorry in advance if I have offended indirectly anywhere
मी एका विनोदी विषयावर 'माझे फुकटे सल्ले' लिहायचे म्हणतेय,
मझा इथे भेटलेला छान मित्र मला देवनागरीकरण करून देण्याची अपेक्षा आहे.

आणी दुसरे लिखाण personal exp on maayboli .


Admin
Tuesday, September 26, 2006 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही म्हणता तसे होऊ शकते पण दुसरी प्रवेशिका योग्य ठरली तर बक्षिस मैत्रिणीच्या नावाने तिलाच मिळेल. अधिकृत रित्या तुम्हाला मिळणार नाही तिचे नाव प्रसिद्ध होईल. मग तुम्ही स्वत्: भाग घेतला होता का नाही याला काहीच अर्थ रहात नाही.
आमची अशी आशा आहे की तुम्हाला (म्हणजे मायबोलीकराना) मायबोलीकडून काहितरी थोडंसं का होईना, चांगलं मिळालेलं आहे. ते बक्षिसापेक्षाही महत्वाचं असावं. त्या पुण्याईची आठवण ठेवून कोणी उगिचच टोकाला जाऊन या गोष्टीचा दुरुपयोग करतील असे मला तरी वाटत नाही.



एका व्यक्तिकडून एकच प्रवेशिका अपेक्षित आहे. तुम्ही कुठलीतरी एकच निवडा आणि हवी तर दुसरी दिवाळी अंकासाठी साहित्य म्हणुन पाठवा.

Manuswini
Tuesday, September 26, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin
तुम्ही उत्तर दिले त्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही म्हणता ते बरोबर मायबोलि ह्या site ने मला तरी नक्कीच खुप छान अनुभव दिले.

तेव्हा positive राहूनच हे सध्य होवू शकते.



Moodi
Tuesday, September 26, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोली दिपावली अंक आणि लेखक लेखिकांना अनेक शुभेच्छा. येऊ द्या आता तुमच्या दर्जेदार कल्पना.

Sampadak
Tuesday, September 26, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हो, वर ऍडमिन नी सांगितल्याप्रमाणे स्पर्धे साठी एकच प्रवेशिका अपेक्षित असली तरी दिवाळी अंकासाठी ती अट नाही! तिथे एकच व्यक्ती ललित, कथा कादंबरी, कविता, व्यन्गचित्र सगळेकाही पाठवू शकते:-)


Mjwatharkar
Wednesday, September 27, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महोदय तुम्ही छायाचित्रे असा स्पर्धेचा विषय सांगितला आहे म्हणजे छायाचित्रे पाठवायची आहेत का छायाचित्रांचे वर्णन पाटवायचे आहे तरी खुलासा करावा ही विनंती.

Sampadak
Wednesday, September 27, 2006 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मी आणि मायबोली" हा स्पर्धेचा विषय आहे. त्या अंतर्गत छायचित्रे चालतील.

चालू आहे ना लेखणी? कॉम्प्युटर? कॅमेरा? पेन्सील? ब्रश? ....आणि कल्पनाशक्ती? १५ च दिवस राहिले. आधी तयारी दिवाळी अंकाची, मग दिवाळीची. :-)

१२ ऑक्टोबर २००६

ही साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख आहे.

धन्यवाद!


Admin
Wednesday, September 27, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छायाचित्रे. तुम्ही आणि मायबोली असे दाखवणारी किंवा निगडित असणारी छायाचित्रे. पण त्याबरोबर वर्णनही चालेल.
अगदी सोप्यात सोपे उदाहरण म्हणजे तुमचे किंवा तुमच्या कुटुंबियांचे मायबोलीचा T-shirt घालून काढलेले छायाचित्र. किंवा मायबोलीकरांनी एकत्र मिळून केलेल्या उपक्रमाचे किंवा कार्यक्रमाचे छायाचित्र. किंवा अगदी वेगळ्या ठिकाणी अनपेक्षितरित्या भेटलेल्या मायबोलीकराचे छायाचित्र.


Rajeshad
Sunday, October 01, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बरहा सॉफ़्टवेअर वापरुन एक कथा पाठवली आहे ती युनीकोड मधे आहे. त्याचे मायबोलीकरण करण्याचा सोपा मार्ग काय? का अपवाद खपवाल या वेळेस? धन्यवाद!

Lykomara
Monday, October 02, 2006 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीने दहा वर्शे पूर्ण केल्या बद्दल मायबोली
चे हार्दीक शुभेक्षा
लक्ष्मीनारायणराव कोमारा


Paankaj
Monday, October 02, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Can I type in shivaji elsewhere and then paste it here?
I am not from computer field so queri

Madracer1
Tuesday, October 03, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा. सम्पादक मी कथा स्पर्धएत सहभाग घेऊ इचिछ्त आहे.

1krishna
Tuesday, October 03, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i want zakaas vidanban geet, charolya, jokes, vinodi kavita,........ Can anybody help me to send to my email id? thanks

krislic03@yahoo.com

Ramialahabade
Tuesday, October 03, 2006 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलि साइत वर आल कि खुप आपलस वातत मी पान पाथवेन
कविता
धन्यवाद
रामी





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators