|
Bee
| |
| Thursday, September 14, 2006 - 6:11 am: |
| 
|
आशिष, विषयांच्या नावाची पार वाट लावली आहेस रे तू :-) दीपान्जलीचे मत मला पटले.
|
Limbutimbu
| |
| Thursday, September 14, 2006 - 6:12 am: |
| 
|
नाही DJ .... प्राईज वाया न जाता त्याचा प्रायोजक व (अशा नाव पत्ता न देणार्या) विजेत्याच्या सम्मतीने मायबोलीकरीता विनियोग करता येइल! खरीखुरी "प्रत्यक्ष" व्यक्तीरेखा घेवुन यायला मायबोलीची अधिकृत जीटीजी असतातच की! आणि त्यामुळेच, इलेक्ट्रॉनिक मिडियामधिल या माध्यमात ज्या व्यक्तिस आपली ओळख लपवायचीच असेल व टोपण नाव अर्थात "आयडीने" सहभागी व्हायचे असेल तर त्यासही मुभा असायला हवी! वरील अट केवळ रोख रक्कमेचा पुरस्कार या वर्षी प्रथमच ठेवल्यामुळे उपजली असावी! मात्र त्यातुन मार्ग काढता येइल! (रोख पुरस्काराच्या कल्पनेचे व तिच्या प्रायोजकान्चे अभिनन्दन आणि आभार आणि कौतुकही) जर "हवा_हवाई" आधीच्या दिवाळी अन्काच्या सम्पादक मण्डळात असु शकते तर माझ्यासारख्या "आयडीला" नाव व पत्याच्या अटीमुळे स्पर्धेपासुन वन्चित (शोषित आणि वन्चित मधला केवळ वन्चित बर का) ठेवले जाणे योग्य हे का? आपण नियमात लवचिकता निर्माण करु शकतो! बाकी सम्पादक लिहितिलच यावर. 
|
Ajjuka
| |
| Thursday, September 14, 2006 - 8:25 am: |
| 
|
मला कधी नव्हे ते एल्ट्याचे पटले.. मी खर्या ओळखीचा नेहमीच आग्रह धरते आणि मी कोण, कुठली इत्यादी आता मायबोलीवर जाहीर आहे तरीही हवाहवाई ह्या आयडीचा खरेखोटेपणा संशयास्पद असतानाअही जर त्या आयडीला संपादक मंडळात स्थान मिळते तर ह्या स्पर्धेसाठी पत्त्याची अट अजिबात योग्य नाही. पत्त्याची अट तशीही योग्य नाहीच. जो जिंकेल तो कळवेलच की तोती त्याचं बक्षिस कसं आणि कुठे collect करणार आहे ते. त्या त्या आयडीशी निगडीत इमेल पत्त्यावरून संपर्क साधला म्हणजे झालं.
|
Bee
| |
| Thursday, September 14, 2006 - 8:44 am: |
| 
|
ई-दिवाळी अंकासाठी सम्पादकांच्या पत्त्याची काही गरज आहे का? इथे रोख रक्कम बक्षिस म्हणून पाठविणार आहे त्यासाठी पत्त्याची गरज भासते आहे. जर मी Cee , Dee अशा आणखी दोन नविन IDes घेऊन ३ कथा पाठविल्यात तर स्पर्धेसाठी ही गोष्ट हितजनक नाही. पण जशा fake IDes तयार करता येतात तसे विविध पत्तेही तयार करता येतात. बघू या इथे brain storming नंतर काय निर्णय घेण्यात येतो तो.
|
Zakki
| |
| Thursday, September 14, 2006 - 12:06 pm: |
| 
|
हा ID's चा गोंधळ नको, म्हणूनच मी काही लिहीत नाही, नाहीतर सगळ्या स्पर्धेत मलाच पहिले बक्षिस मिळाले असते. आता जरा पुढल्या पिढीला संधि द्यावी हेहि एक कारण आहेच!
|
Robeenhood
| |
| Thursday, September 14, 2006 - 3:02 pm: |
| 
|
कमाल आहे बोवाजी आपली मते काय तंतोतंत जुळतात नाही? मला नेमके हेच म्हणायचे होते.तेवढे ते बरीक तुम्हालाच पहिले बक्षीस मिळाले असते त्याच्याशी मी सहमत नाही हं. मी असल्यावर तुम्हाला कसे मिळेल? आता पुढच्या पिढीला संधी वगैरे म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची वगैरे आलंच.... (कोण ते? ए गप रे म्हण बरोबर आहे आम्बट द्राक्षाची म्हण इथे लागू पडत नाही..)
|
Asami
| |
| Thursday, September 14, 2006 - 6:03 pm: |
| 
|
अमका म्हणाला कि मला माझा पत्त द्यायचा नाही आहे पण माझ्या वतीने तमका prize गोळा करयला तयार आहे किंवा तमक्याच्या पत्त्यावर पाठवा. तर ?
|
Arch
| |
| Thursday, September 14, 2006 - 6:03 pm: |
| 
|
१. जर स्पर्धात भाग घ्यायचा नसेल तर साहित्य पाठवता येईल का? २. पहिल्या प्रश्णाचे उत्तर जर " हो " असेल तर त्या साहित्यालापण नाव पत्याची जरुरत आहे का?
|
Yogibear
| |
| Thursday, September 14, 2006 - 6:12 pm: |
| 
|
मायबोली वरिल संपादक मंडळाला नाव पत्ता देण्यास इतका विरोध का? आणि जर तेव्हढा विश्वास नसेल तर मग स्पर्धेत बक्षिस मिळवण्याचा अट्टहास तरी का!!!
|
Sampadak
| |
| Thursday, September 14, 2006 - 7:00 pm: |
| 
|
"मायबोली आणि मी" स्पर्धा - या स्पर्धेसाठी नाव आणि पत्ता देणे गरजेचे आहे याची काही कारणे - - बक्षिसाची रक्कम विजेत्यांना पोहोचवणे. - एका व्यक्तीला एकदाच भाग घेता येईल हा नियम आहे त्याची अंमलबजावणी सोपी होईल. -मायबोली ही virtual community आहे आणि आपण एक मोठ्या समाजाच भाग आहोत ज्या समाजात हे सगळे नवीन आहे. त्यमुळे आपली "collective" credibilty ही तेवढीच महत्वाची आहे. हे सर्व जितके आपल्यासाठी आहे तितकेच बाहेरच्या जगासाठीही आहे. काही मोजक्या व्यक्ती वेगवेगळ्या IDs नी मायबोलीचे गुणगान गात आहेत असे चित्र दिसू नये. मायबोलीचे मेम्बर असण्याकरिता, किंवा संपादक मंडळावर असण्याकरता खरे नाव व पत्ता याची गरज नाही हे बरोबर आहे, पण इथला प्रत्येक उपक्रम त्याच policy च्या आधारे व्हावा हे योग्य वाटत नाही. नाहीतर अशा स्पर्धा मायबोलीवर घेणे हे अवघड होऊन बसेल. तरीही यातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न संपादक मंडळाने केला आहे. हाच सर्वात चांगला मार्ग असेलच असे नाही. भविष्यात अशा प्रकारच्या स्पर्धांसाठी अजून चांगला मार्ग निघू शकेल. यातूनही खोटे नाव, दुसर्याचा पत्ता देणे असे प्रकार होऊ शकतील. पण काही गोष्टी या चांगुलपणावर विश्वास ठेवून करायच्या असतात. आपण समजून घ्याल अशी आशा आहे. संपादक मंडळ त्या निर्णयात बदल करणार नाही पण काही गोष्टी स्पष्ट करु इच्छिते - - स्पर्धेत मायबोली ID , नाव आणि पत्ता असलेल्या एन्ट्रीचीच पारितोषिकासाठी दखल घेतली जाईल. - नाव आणि पत्ता हा साहित्यासोबतच पाठवायचा आहे. - बक्षिसपात्र साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध केले जाईल तेव्हा त्यावर फक्त विजेत्यांचे मायबोलीवरचे ID आणि profile मधे नाव उपलब्ध असल्यास, किंवा नाव देण्यास स्पर्धकाची संमती असल्यास ते असेल. - ज्याना नाव, पत्ता न देता साहित्य पाठवायचे आहे त्यांनी जरुर पाठवावे. त्यातील काही उल्लेखनीय entries असतील तर त्याचा उल्लेख दिवाळी अंकात करता येऊ शकेल. ते साहित्य स्पर्धेतल्या इतर entries बरोबर नन्तर वेगळ्या बीबीवर पोस्ट केले जाईल. सर्व मायबोलीकरांनी सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. -संपादक मंडळ.
|
Sampadak
| |
| Thursday, September 14, 2006 - 7:07 pm: |
| 
|
या स्पर्धा हा दिवाळी अंकाचा एक भाग झाला. बाकी साहित्य दरवर्षीप्रमाणे पाठवता येईल. त्यासाठी स्पर्धेचे नियम लागू नाहीत.
|
Bee
| |
| Friday, September 15, 2006 - 2:00 am: |
| 
|
सम्पादक, खूपच छान उत्तर दिलतं तुम्ही..
|
Ajjuka
| |
| Friday, September 15, 2006 - 5:53 am: |
| 
|
ठीक आहे नाव पत्त्याचा आग्रह धरा तुम्ही पण मग यापुढे प्रत्येक ठिकाणी तोच नियम असायला हवा. खरी ओळख जाहीर किंवा किमानपक्षी fellow संपादक मंडळी, समिती सदस्य, नेमस्तक इत्यादींना तरी आपल्याबरोबर कोण काम करत नक्की हे माहित हवच.
|
Viveki
| |
| Friday, September 15, 2006 - 7:44 am: |
| 
|
मायबोलीच्या क्रेडिबिलिटीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे म्हणजे मोडरेटर, संपादख़, स्पर्धा संयोजक, परिक्षक या सर्वांचे आयडी खरे असले पाहिजेत, नाव व पत्ते खरे दिलेले असले पाहिजेत. नाहीतर सगळीच निवडप्रक्रिया वगैरे संशयाच्या भोवर्यात सापडेल. येवढेच नव्हे तर संप्दक मंडळात असलेले असे निनावी सदस्य स्पर्धकांच्या मिळालेल्या माहितीचा दुरूपयोग करतील तर ती जबाबदारी कोणावर ? उदाहरणार्थ hh ने तर अनेकदा असा खोडसाळपणा केला आहे. आठवा अंकूरची कूरकुर किंवा तिने दिनेशचे केलेले विडंबन. तेंव्हा अशा व्यक्तीम्कडे आपली खरी माहिती कशि उघड करणार ? स्पर्धकांचे काय ते संपादक मंडल ठरवेल ते ठीक आहे. पण संपादक मंडळात वा परिक्षक म्हणून केवळ खरी खरी खात्री केलेली माणासए असावीत.
|
Psg
| |
| Friday, September 15, 2006 - 8:12 am: |
| 
|
मला mail format संबंधी सांगायचं होतं. संपादक तुम्ही mail format तयार केले आहेत का.. स्पर्धांसाठी साहित्य पाठवताना एका स्पेसिफ़िक फ़ॉर्म मधे पाठवायचा.. यात subject line काय असावी, कोणता font वापरायचा, तसेच नाव, पत्ता हा मेल मधे लिहायचा की साहित्याच्या खाली, इत्यादी.. तसेच स्पर्धेसाठी साहित्य नसेल, तर format कसा असावा.. ही उदाहरणं आहेत. याने sorting करायला मदत होईल असे वाटते. (आम्ही व वि साठी यंदा तसे केले होते आणि निश्चितच उपयोग झाला). बाकी तुम्ही ठरवाल तसे. एक observation - या वर्षी HH नाहिये संपादक मंडळात
|
अज्जुका, कधि नव्हे ते माझे थोडेफार तरी पटल्याबद्दल तुला थॅन्क्यू! माझ्या मते: १. नाव पत्याचा आग्रह जर प्रायोजकान्नीच धरला असेल तर तो मान्यच करायला हवा २. केवळ रोख बक्षिस ठेवळ किन्वा बक्षिसात रोखता आली म्हणुन बक्षिस कुणाला द्याव असा प्रश्ण खर तर पडू नये ३. तरीही एकदा नियम केल्या नन्तर ते बदलण्याच्या मी विरोधी हे ४. सम्पादक मण्डळातच काय, मजकुराबाबत कुठेच नाव व पत्याची सक्ती असु नये ५. नाव व पत्याची सक्ती प्रत्य्क्ष जीटीजी करीता केली तर समजु शकते किन्वा तिथे ती हविच ६. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील हे एक वेगळे विश्व हे ते मान्य करुन येथिल "आयडीज" ना स्वतन्त्र व्यक्तिमत्व वा टोपणनावाप्रमाणे भासमान चेहरा असु शकतो हे मान्य व्हावयास हवे व त्या भासमान चेहर्यामागच्या व्यक्तीला विनाकारण उघडे पाडायचा प्रयत्न होवु नये. टोपणनावात अर्थाप्रमाणे "व्यक्तिमत्व" निर्माण करण्याचे प्रकार केवळ याच माध्यमात होतात असे नाही तर पुर्वीही कित्येक नामवन्त कवि लेखकान्नी टोपणनावाने लेखन केल हे! प्रसिद्धी परान्गमुखता वा सुरक्षिततेकरीता किन्वा अन्य कारणाने हा प्रकार केला जात असेल पण जोवर त्याचा कुणाला त्रास नाही तो वर मुद्दामहून "आयडीच्या माग दडलय काय" हे बघायला वाकून वाकून जावच कशाला? DDD ७. जर आयडीच्या आवरणाची, त्यातुन निश्पन्न होणार्या विविध भन्नाट अर्थान्ची, भासमान प्रतिमेची उपयुक्तताच नसेल तर मुळात हीच काय किन्वा याहू वगैरे साईट्स नी ही सोयच का ठेवली? डिजीटल सिग्नेचरला जस व्हेरीफिकेशन करतात तस अगदी रेशनकार्ड पासपोर्ट फोटो आयडेन्टी वगैरे बघुन केवळ रियल नावानेच आयडी बनवायला परवानगी द्यायची होती ना! एनीवे, सम्पादक मण्डळ, आपल्या निर्णयाचा योग्य तो आदर राखुन मी नाव पत्ता देणार नसलो तरी "स्पर्धे" करीता काही ना काही मटेरियल आता तर नक्कीच पाठविन! वि. सु.: हवाहवाई या आयडीच नाव केवळ उदाहरणादाखल घेतल, तिच्या सम्पादकपदी असण्याबद्दल मला कसलाही आक्षेप नाही, कारणे वर दिलेलीच हेत!
|
Bee
| |
| Friday, September 15, 2006 - 9:33 am: |
| 
|
जी व्यक्ती स्पर्धा जिंकेल तिच्याचकडून फ़क्त निकाल लागल्यानंतर पत्ता मागवून घ्यायचा आणि तो पत्ता फ़क्त श्रीयुत ADMIN ह्यांच्याकडेच पाठवायचा. सुरवातीला स्पर्धकांनी आपले साहित्य फ़क्त इथे पोष्ट करायचे. असे जर केले तर कुणाच्या मनात संकोच राहणार नाही. दिवाळी अंक इथे अनेकदा सादर झालेले आहेत. स्पर्धा देखील यशस्वीरित्या घेतल्या आहेत. तेंव्हा त्या संबंधी व्यक्तींबद्दल इथे विचार करायची गरज नाही असे माझे मत आहे.
|
>>>> मायबोली वरिल संपादक मंडळाला नाव पत्ता देण्यास इतका विरोध का? आणि जर तेव्हढा विश्वास नसेल तर मग स्पर्धेत बक्षिस मिळवण्याचा अट्टहास तरी का!!! योगी, तू सुद्धा ना? हा प्रश्ण आॅडमिन किन्वा सम्पादक मण्डळावरील विश्वासाचा नाही, तर तत्वाचा हे! म्हणुन आग्रह! बाकी मी स्पर्धेत भाग घेतो ते कसल्याही बक्षिसाच्या अपेक्षेने नाहीच! "दर वेळेस जिन्कण्याचा अट्टाहास, अशी गरज नाही की बक्षिसाच्या इच्छेनेच केला जातो" (व्वाऽऽ, क्या कोट जमेला है)
|
संपादक मंडळात कोण कोण आहे.. आणि.. साहित्य इथेच टाय्पायचे का?.. फ़ारच बाळबोध प्रश्न विचारलेत का मी ..!!!
|
Sampadak
| |
| Friday, September 15, 2006 - 12:45 pm: |
| 
|
Lopamudraa, ह्या पानाच्या सर्वात वर असलेला मेसेज वाच. आणि संपादक आयडी वर क्लिक केले की संपादक मंडळात कोण कोण आहेत ते कळेल.
|
|
|