Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 14, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज दिवाळी अंक » दिवाळी अंक पूर्वतयारी » दिवाळी अंक २००६ पूर्वतयारी » Archive through September 14, 2006 « Previous Next »

Zakki
Tuesday, September 12, 2006 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे लिहू का, काय? नक्कीच लिही. आता तू अनेऽक पारितिषिके मिळवणारा लेखक आहेस. तुझ्या नावाने मायबोलीच्या दिवाळी अंकाची जाहिरात करता येईल - 'लिंबूटिंबू यांचे साहित्य वाचा!' अशी!

Moodi
Tuesday, September 12, 2006 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या खालचे पर्याय बघ.

१) शाळा किंवा कॉलेज जीवनातील किस्से लिही.

२) आसपासच्या वातावरणातुन काय काय शिकलास ते लिही.

३) किंवा मग एखादी विनोदी नाटुकली लिही.


Limbutimbu
Tuesday, September 12, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> तुझ्या नावाने मायबोलीच्या दिवाळी अंकाची जाहिरात करता येईल - 'लिंबूटिंबू यांचे साहित्य वाचा!' अशी!
अहो झक्की, येवढी काही वाईट पाळी आली नाही हे मायबोलीच्या दिवाळी अन्काची की माह्या नावान जाहिरात करायला!
उलट तस केल तर नविनच्या ऐवजी असलेले वाचक पण लाऽऽऽम्ब पळुन जातिल
दिवाळी अन्कात लिहायच म्हन्जे काय सोप्प हे का? की उठल, बदडला कीबोर्ड अन लिवल्या ह्या भल्याथोरल्या हातभर लाम्बलचक पाल्हाळीक स्वगतात्मक पोस्ट्स! येवढ सोप्प अस्त तर मग काय हव होत हो! :-) तरी पण आता तुम्ही म्हणताच आहात, तुमचा आग्रहच असेल तर लिहिन म्हणतो एखादी गोष्ट अन्कासाठी!
(मागुन अनेक आवाज्: काय पडल होत या झक्कीना? चान्गल बाजुला अडगळीत पडल होत हे लिम्बू, उगा धरुन म्होर आणुन घोड्यावर बशिवताहेत!
ओ तुमी आधी खली बसा ओऽऽ खाली बसा म्हण्तो ना!) DDD

ओक्के मुडी, प्रयत्न करीन! :-)
तीनपैकी एखाद्यावर तरी!


Chandya
Tuesday, September 12, 2006 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू, मूडी ने तुला नाटुकली लिहिण्याची सूचना केली आहे, नाटक नव्हे. यातला गर्भितार्थ कळला ना रे! म्हणजे थोडक्यात काय तर, तू त्यात तुझी ती trademark (लांबलचक) स्वगतं टाकू नकोस हा अलिखित सल्ला :-). btw तुझे गणेश चित्र स्पर्धेतील चित्र जबरी आहे रे. you are gifted.

Zakki
Tuesday, September 12, 2006 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर मग LT , तू एक चित्रकथा लिही! एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते म्हणतात (चिनी मकाव). तर तुझा लांबलचक स्वगत करण्याचाहि प्रयत्न साध्य होईल.

Sadhi_manas
Tuesday, September 12, 2006 - 10:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच लिंबूटिंम्बूने काढलेले गणपतीचे चित्र फ़ारच सुंदर आहे.

Sampadak
Wednesday, September 13, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हितगुज दिवाळी अंक २००६

नमस्कार मंडळी,

मायबोलीच्या दशकपूर्ती निमित्त यंदाच्या दिवाळी अंकासाठी काही स्पर्धा जाहीर करत आहोत. आपल्याकडून भरपूर प्रतिसाद मिळेल अशी आशा. स्पर्धांची माहिती खालीलप्रमाणे -

"मी आणि मायबोली"

स्पर्धा आली म्हणजे नियमही आलेत. ते असे -

१. तुमच्या स्वत:च्या मायबोलीवरच्या अनुभवाबद्दल कुठल्याही वाङमयप्रकारातून लिहिलेलं चालेल -

- कथा (हो, कथाच :-) )
- कविता
- लघुनिबंध - ललितलेख
- चारोळी
- गीत
- विनोद
- अनुभव कथन
- अभंग, पोवाडा

शब्दमर्यादा जास्तीत जास्त १००० शब्द. कमी चालतील

- श्रवणीय audio ,
- दृकश्रवणीय video
- तुमच्या अनुभवावर आधारीत मायबोलीची जाहिरात
- जिंगल, ऍनिमेशन

जास्तीत जास्त ७ मिनिटे मर्यादा. कमी चालेल

- छायाचित्र
- व्यंगचित्र

कुठलाही प्रकार असला तरी शक्य तेवढा तुमच्या खर्‍याखुर्‍या अनुभवाशी निगडीत असावा, काल्पनिक अनुभव नको.


२. सर्व मायबोलीकर, स्वयंसेवक, नेमस्तक यांच्यासाठी ही स्पर्धा खुली आहे. हितगुज ऍडमीन (आणि त्यांचे नातेवाईक) तसेच प्रायोजक (आणि त्यांचे नातेवाईक ) यात भाग घेऊ शकणार नाहीत.

३. पारितोषिक -
- प्रथम पारितोषिक रोख $50
- द्वितीय पारितोषिक रोख $25
(किंवा स्थानिक चलनात सममूल्य)

पहिल्या दोन प्रवेशिका दिवाळी अंकात प्रसिद्ध होतील आणि इतर सर्व मायबोली वर इतरत्र.

४. प्रत्येक व्यक्तिमत्वाला एकदाच भाग घेता येईल.
त्यासाठी खरं नाव पत्ता देणे आवश्यक आहे. साहित्य स्पर्धेसाठी आहे याचा स्पष्ट उल्लेख करावा.

५. सर्व प्रवेशिकांवर मायबोलीचा मालकीहक्क असेल. त्यामुळे भविष्यात पुस्तक किंवा CD रुपाने प्रसिद्ध करणे सोपे जाईल. पाठवलेली प्रवेशिका मायबोलीच्या लेखी संमतिशिवाय इतरत्र प्रसिध्द करता येणार नाही.

[**आपल्यातलेच एक मायबोलीकर संतोष किल्लेदार यांनी ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
ही स्पर्धा प्रसाद देशमुख (महागुरू) यांनी सुचवली त्याबद्दल त्यांचेही आभार.

**आपल्यातल्या कुणाला अशासारखे मायबोलिचे उपक्रम प्रायोजित करण्याची इच्छा असेल तर तर कृपया ऍडमीनशी संपर्क साधावा.]


कथा स्पर्धा

नियम -

१. स्पर्धा संपादक मंडळातील व्यक्ती सोडून सर्व मायबोलीकरांना खुली आहे.

२. कथा स्पर्धेसाठी एका user ला स्वलिखित एकच कथा पाठवता येईल. (स्पर्धेव्यतिरिक्त फक्त दिवाळी अंकासाठी वेगळ्या कथा पाठवता येतील. त्यासाठी इथले नियम लागू नाहीत.)

३. शब्दमर्यादा १००० शब्द.

४. पारितोषिक -
- प्रथम क्रमांक - 'रंगीबेरंगी' ची १ वर्षाची मेंबरशीप विनामूल्य आणि "परदेसाई" पुस्तकाची एक प्रत.
- द्वितीय क्रमांक - 'रंगीबेरंगी' ची १ वर्षाची मेंबरशीप विनामूल्य.

५. स्पर्धेसाठी कथा पाठवताना "मायबोली कथा स्पर्धा" असा स्पष्ट उल्लेख करावा.

६. पारितोषिक विजेत्या दोन कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध केल्या जातील. स्पर्धेतल्या बाकी कथा प्रसिद्ध करायच्या किंवा नाही हा निर्णय संपादक मंडळ घेईल.

या स्पर्धांबाबत काही प्रश्न असतील तर ते इथे किंवा संपादक मंडळाला ईमेल करुन विचारावेत.

स्पर्धेसाठी किंवा दिवाळी अंकासाठी इतर साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर, २००६ ही आहे.

धन्यवाद!

- संपादक मंडळ,
हितगुज दिवाळी अंक २००६.



Limbutimbu
Wednesday, September 13, 2006 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सम्पादक मण्डळ, जबरीऽऽऽ! :-)

चन्द्या, साधी माणस, थॅन्क्यू! :-)
झक्की, त्याचाही विचार करतो, बघु कस काय जमत ते! :-)


>>>> तू त्यात तुझी ती trademark (लांबलचक) स्वगतं टाकू नकोस हा अलिखित सल्ला
गेले दोन महिने स्वगत बन्दच केलित ना! :-) (ववि प्रकरणानन्तर मी फिरकत देखिल नाही, काय हे ना की दुधान तोन्ड पोळल की ताक देखिल फुन्कुन फुन्कुन प्याव लागत):-)
तुम्ही "नटसम्राट" बघितल हे का? त्यातल बेलवलकरान्च्या तोन्डच शेवटल फुटपाथवरच स्वगत ऐकलत? वाचलत? एखाद्याचा पिन्डच जर अशा स्वगतावर पोसला गेला असेल तर अशी व्यक्ती सन्वादात देखिल स्वगतच आणणार नाही का? आदतसे मजबूर, दुसरे काय?
:-)

Sampadak
Wednesday, September 13, 2006 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय लिहावं सुचत नाही? मग या वर्षीच्या दिवाळी अंकात लिहिण्यासाठी आम्ही अजून एक विषय सुचवत आहोत. ही स्पर्धा नाही. मायबोलीवर देशोदेशीची मराठी माणसं येतात. त्यांनी त्यांच्या देशातली संस्कृती आणि तिथला मराठी माणूस यावर लिहिलेले लेख मागवत आहोत.

"जावे त्यांच्या देशा"

या विभागामधे यातील निवडक लेख प्रसिद्ध केले जातील.

साहित्य पाठवण्यासाठी लिंक(या बीबीवर सुरवातीलाही दिली आहे.) -
दिवाळी अंक साहित्य

चला तर मग, करा सुरुवात! :-)

-संपादक मंडळ.


Sampadak
Wednesday, September 13, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळी अंकाच्या कामात मदत करण्याची तयारी दर्शवलेल्या सर्वांचे आभार. कामाच्या गरजेनुसार तुमच्याशी संपर्क साधण्यात येईल.
धन्यवाद!


Bee
Wednesday, September 13, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही तसेच वाटले..

सम्पादक, वरचा विषय एकदम छान आहे.


Hawa_hawai
Wednesday, September 13, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक मन्डळ : हितगुज messaging चा वापर करून तुम्हाला mail केली आहे.

Smi_dod
Wednesday, September 13, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माननीय संपादक मंडळ: मी पण मदत करायला तयार आहे. रेखाटन आणि सजावट या कामात मदत करू शकते.आणि हो चित्र(व्यंगचित्र सोडुन)स्पर्धा नाही का?

Raina
Wednesday, September 13, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक मंडळ- रामराम! काल मी लेखन पोस्ट केलं होतं- त्याची पोच मिळू शकेल का email द्वारा please . काय होतय की सद्यस्थितीत पोचलय की नाही, कळत नाहिये.

मस्त विषय सुचवलाय आपण लिहायला.


Ajjuka
Wednesday, September 13, 2006 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा.. मिलिंदा.. मी फक्त प्रयत्न करु शकते.. :-)

Sampadak
Wednesday, September 13, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जावे त्यांच्या देशा- अधिक माहिती:
१. शब्द मर्यादा किती?
: ह्याला शब्द मर्यादा नाही.

२. फोटो, मॅप्स चालतील का?
: विषयाशी संबंधित आणि पूरक असतील तर चालतील.

या विभागासाठी साहित्य पाठवतानाही तसा उल्लेख करावा.

साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख : १२ ऑक्टोबर, २००६.




Aschig
Wednesday, September 13, 2006 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक(च) कथा दोन्ही स्पर्धा, तसेच me आणी my बोली आणी जावे त्याच्या देशाकरता पाठवली तर चालेल का?

Sampadak
Thursday, September 14, 2006 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अधिक माहिती, शंकानिरसन इत्यादी....

"मी आणि मायबोली" ही त्यातल्या सर्व साहित्यप्रकारसाठी एकच स्पर्धा आहे. स्पर्धेतील २ बक्षिसे ही सर्व साहित्यप्रकारात मिळून आहेत. smi_dod, यामधे चित्रही चालेल.

आशिष, एकच कथा "मी आणि मायबोली" व "कथा स्पर्धा" या दोन स्पर्धाना पाठवू शकता. "जावे त्याच्या देशा" मधे लेख मागवले आहेत.

सर्वाना साहित्य मिळाल्याची पोच दिली जाईल. साहित्य शक्यतो \dev2 मधे पाठवावे.


Limbutimbu
Thursday, September 14, 2006 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सम्पादक महोदय, नाव व पत्याची सक्ती का बरे? जो नाव अन पत्ता देणार नाही त्याला नम्बर आला तरी रोख बक्षिस मिळणार नाही अशी ऑप्शन का नाही ठेवत?
तुमच्या नाव अन पत्याच्या सक्तीमुळ मी पहिल्या "मी आणि मायबोली" या स्पर्धेत भाग घेवु शकत नाही हे!
कृपया विचार व्हावा!


Deepanjali
Thursday, September 14, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे कसे LT....
याचा अर्थ duplicate ID किंवा पत्ता न देणार्‍या ID चा नंबर आला तर एक prize वाया जाणार नाही का ..
गणेश उत्सव स्पर्धा आहेत च कि बाकी सर्वांना खुल्या ..
अशी एखादी स्पर्धा हवीच जिथे खरी खुरी Indentity घेउन यावे लागेल . :-)
मला तरी संपादकांची ही अट एकदम बरोबर वाटते !
असो .. बाकी संपादक लिहितिलच यावर .





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators