|
LT, paragraph टाकत जा रे लिहिताना! डोळे फिरले! ~D
|
डियर वाकड्या, यचयच अन लालुची सुचना तुला हे रे भो मला नाही! म्या मोप पॅरेग्राफ टाकले हैती! हवे, याबारीला पण हुकलीस की ग! DDD
|
जी लोकं वर्षा विहाराला आली होती त्यांनी तो भरपूर enjoy केलेला आहे. त्यांनी लिहिलेले वृत्तांतही इथे आले आहेत आणि अजूनही येतील. हे 'खरे' वृत्तांत लिहिले जात असताना कृपया काल्पनिक वृत्तांत इथे लिहून या बीबीची मजा घालवू नये ही विनंती. काल्पनिक लिहितानाही आपण किती जागा व्यापत आहोत, याकडेही लक्षं देता आले तर बरे होईल. आणि इथे यापुढे 'खरे' वृत्तांत अजून कोणीही लिहिले नाहीत, तरीही जे जाऊन आलेत त्यांना माहित आहे तिकडे काय घडले ते. पुन्हा वृत्तांत स्वरूपात ते आले नाही तरी हरकत नाही. सूज्ञास अधिक सांगणे न लगे!
|
ओक्के ववि सन्योजक! सुचना एकदम मान्य! इथुन पुढे नाय लिवणार! मॉड्स, कृपया माझ्या वरील पोस्ट्स डिलिट कराल का? तुम्हाला त्रास देतो हे पर हिथ नकोत त्या पोस्ट्स 
|
Wakdya
| |
| Saturday, July 29, 2006 - 6:29 am: |
| 
|
Moodi, Waatasaru, Phdixit, Marathimitra,Mangeshwagh, Himscool, Jo_s, Deepstambh, BadabaDi, Milya, Kandapohe, Mepunekar, Shyamli, Hemantp, Soultrip, Maitreyee, Lalu, Yog आपणां सर्वांचे अभिप्रायाबद्दल धन्यवाद लालु आपल्या सुचनेप्रमाणे पुढिल वेळेस लिहिताना जरुर सुधारणा करीन. सुचनेबद्दल आभार. LT तुम्ही सुचना मानली आहेत हे चांगले झाले. परत एकदा, वविच्या आयोजकांचे व सहभागी मायबोलीकरांचे अभिनंदन करुन मी रजा घेतो
|
Milya
| |
| Thursday, August 03, 2006 - 9:38 am: |
| 
|
वर्षाविहार वृत्तांत .... वाचाल तर वाचाल ... भाग द्वितीय मी सामान खाली उतरवले आणि 'मेरे हाथ मैं तेरा बॅग हैं, सारी मुश्कीले मेरे साथ हैं' असे म्हणत चरफ़डतच (मनतल्या मनात बर का) नाश्ट्याची सोय होती तेथे गेलो.. तोवर 'सु'पत्नी आनि 'सु'पुत्र ह्यांनी माझ्यासाठी थांबायचे काही एक कष्ट न घेता शांतपणे खाण्यास (हादडण्यास) सुरुवात केली होती. म्हणले आधी जरा 'बाथरुमला' जाउन यावे म्हणून 'बाथरूम' शोधू लागलो.. माझी शोधक नजर पाहुन एकाला जरा माझी कीव आली आणि त्याने एका दरवाजाकडे बोट दाखवले... तो दरवाजा उघडणार तोच त्या दरवाज्याला असलेल्या glass slit मधुन आत बायकांचा घोळकाच दिसला एकदम... ते बघुन मी दचकलो पण तेवढ्यात त्याच संयोजकाने खुलासा केला की अरे ते bathroom common आहे म्हणुन.. मग आतल्या बायका बाहेर यायची वाट पहात बसलो.. ५-१० मिनिटे झाली तरी बायकांचा टीपी ( ह्यालाच बायकांच्या भाषेत make-up म्हणतात म्हणे) चालुच... एवढ्यात माझ्यामागुन एक गृहस्थ चक्क दार उघडुन तसेच आत गेले... वाटले आता हे बहुतेक सणकुन मार खाणार पण तेव्हा लक्षात आले की अरे की हे दार फ़क्त common आहे आणि आत दोन वेगवेगळी bathrooms आहेत... ती अचाट रचना पाहुन मी चाटच पडलो आणि डॉक. मोदी आणि त्यांचा architect ह्यांचे पाय धरावेसे ( आणि धरुन ओढावेसे) मला वाटु लागले. एवढी अफ़लातुन idea त्यांनी patent नक्की केली पाहिजे असेही वाटुन गेले.. ती अद्भुत रचना पाहुन मला अचानक असाम्याचे लग्न आठवले... तिथेही बाथरूम मध्ये 'येथे वहाने लावु नयेत' अशी पाटी लावुन मला बुचकळ्यात पाडले होते.... डॉ. मोदींचे डोके असाम्यासारखेच 'तिरकस' चालते हे पाहुन गंम्मत वाटली (जाउंदे फ़ार पाल्हाळ झाले.. पण लोक व.वि ला न येताही इतके लिहितात तर जाउन आलेल्यांनी कमितकमी एवढे लिहायलाच पाहिजे ना....) नाष्टा बाकी झकास होता.. (नाष्ट्याला काय होते वगैरे फ़ुटकळ details बाकीच्या वृत्तांतात आहेतच तेव्हा # द्विरुक्ती टाळतो. पण मिनु संयोजक नसुनही जातीने सगळीकडे लक्ष का देत आहे हे कळत नव्हते.. पण दीपने मला हा संयोजकांचाच एक 'गनिमी कावा' आहे असे सांगितले तेव्हा कळले... काय होते की मागच्या व.वि ला लोकांनी एका id मागे एक असा कित्येक plates नाष्टा हाणला होता. त्यामुळे संयोजकांना नाष्टा मिळालाच नाही म्हणुन संयोजकांनी ह्यावेळी युक्ती केली... जरा कुणी परत नाष्टा घ्यायला उठला की मिनु हळुच त्याच्याजवळ जाउन भुक लागलीय का, मग पुलाव खाणार का? असे विचारत होती.. सांगा कुणाची काय बिशाद होती भुक लागलीय म्हणायची? नाष्टा जरा पटापटच आटोपुन मायबोलीकरांना जी शेड देण्यात आली होती तडक तिकडे गेलो... बाकीची लोक जमण्यापूर्वी स.सा + स.मा ह्यांना त्यांची काही 'गुप्तसत्रे' आटोपायची असल्याने घाई करणे भागच होते...कुठल्यातरी दिव्य शक्तीने ( का व्यक्तीने) आपले पण कौतुक करावे असे आम्हालाही वाटत होतेच की. आधीच उशिर झाला होता.. त्यामुळे स. सा ने अगदी सेकंदाच्या काट्यावर शिस्तिने बसवलेला सांस्कृतिक कार्यक्रम काटेकोर पणे कसा पाळता येईल ह्याविषयी थोडा # काथ्याकुट केला. शेवटी ओळखपरेड थोडी गुंडाळायची असे ठरले. आधीच्या योजनेप्रमाणे प्रत्येकाने स्वताची ओळख करुन द्यायची व मग बाकिच्यांनी त्याचे duplicate ids ओळखायचे असे ठरले होते... त्याऐवजी प्रत्येकानेच स्वत:विषयी एखादे वाक्य खोटे सांगायचे आणि बाकिच्यांनी ते ओळखायचे असे ठरले...(आधीच्या तोंडओळख खेळाची कुणकुण काही जणांना आधीच लागली होती वाटते कारण ते अगदी तोंडओळख संपत संपता उगवले.. म्हणजे लोकांनी वाकड्यात शिरायला नको आणि त्यांचे duplicate ids ओळखायला नको)... हळुहळु लोक पोटांवर हात फ़िरवत एक एक करुन जमु लागले.. इकडे एखाद्या योद्ध्याच्या अंगात कशी युद्धभूमीवर गेल्यावर # वीरश्री संचारते तशी फ़ाटक अण्णांच्या अंगात 'शिस्त' संचारली होती. एकदम परीट्घडीचा लालभडक T Shirt , गोरापान चेहरा, उंच बांधा, एका हातात माईक, खणखणीत आवाज अश्या एकदम संघ, दक्ष आवेषात ते उभे होते.. (नशीब खाली शाखेची अर्धी चड्डी घातली नव्हती).. अहो शिस्त एवढी त्यांच्या अंगात भिनली होती की ते चेहर्यावर सुरुकुती सुद्धा (वयापरत्वे आलेल्या) पडु देत नव्हते मग सुरुकती हालायची भितीच नाही.. 'सदैव सैनिका पुढेच जायचे' ह्या चालीतच (गाण्याची चाल ह्या अर्थी) ते पुढे-मागे (हो अगदी मागे सुद्धा) होत होते सगळे स्थानापन्न झाले आणि तोंडओळख सुरु झाली. आपल्याविषयी एक वाक्य खोटे सांगायचेय या नियमाच्या फ़ायदा घेउन मायबोलीकरांनी यथेच्छ खोटे ( officially ) बोलुन घेतले... मग कोण एकदम साहित्यिक झाले तर कुणाला आपल्याला बायको फ़ार आवडते असा साक्षात्कार झाला. कोणाला हिमेश फ़ार आवडु लागला तर कुणी एकदम गोड गळ्याचे गायक झाले. मीही प्रसिध्द गणितज्ञ आणि टिळकांचे गुरु केरुनाना छत्रे माझे सख्खे पणजोबा अशी लोणकढी ठोकुन दिली...(केरुनाना माझे पणजोबा नाहीत म्हणुन बरे नाहीतर माझी गणीतातली गती पाहुन त्यांची मती कुंठित झाली असती आणि त्यांना तिकडे स्वर्गात 'धरणीमाते, मला पोटात घे' असा टाहो फ़ोडावा लागला असता). माझ्या वंशावळीत कोणाला (अगदी सुपत्नीलाही..... तसेही सासरचे काहीही निघाले की ती आपोआपच नाक मुरडतेच पण तो. भा. वे.) काडीमात्रही उत्सुकता नसल्याने मी खरे बोलतोय का खोटे हे शोधण्याच्या कुणीच फ़ंदात पडले नाही तोंडओळख झाल्यावर गट पाडणे हा खेळ होता. सुदैवाने मायबोलीकरांनी येथे आपल्या गटबाजीचे प्रदर्शन केले नाही. लुकलुक, झुकझुक, शुकशुक, भुकभुक आणि टुकटुक अशी नावे असलेल्या चिठ्ठ्या सगळ्यांना वाटण्यात आल्या. ही सर्व नावे एकदा आणि एकदाच असतील असे गट करायचे होते.. त्याप्रमाणे खेळ सुरु होताच तिथे एकच दंगा उठला.. कुणी झुकझुक करतोय तर कुणी शुकशुक करुन एकमेकांचे लक्ष वेधुन घेत होते.. कुणी नुकताच breakfast होउन सुद्धा भुकभुक असे ओरडायला लागले तेव्हा मोदी resort वाली लोकं मात्र कोण हे बकासुर म्हणुन त्यांच्याकडे पहायला लागले... ही नावे आम्हाला कशी सुचली ह्याची पण एक गम्मत आहे.. [झाले का ह्याचे पाल्हाळ परत सुरु...] असेच एकदा स.सा. सदस्यांनी आमच्या नेहमीच्या ठिकाणी जमायचे ठरवले होते.. त्याप्रमाणे तिथे गेलो तर कुमार रा. कु. आधीच तिथे येउन आमची वाट बघत (तो बघत तिसरेच काही होता हा. भा. वे.) होता.. रस्त्याने जाताना एखादी सुंदर कन्यका दिसली की हळुच शुकशुक शुकशुक असे करत होता^... आणि सगळ्या कन्यका त्याला टुकटुक करुन निघुन जात होत्या.. ते विहंगम दृश्य पाहुन आम्हाला हे शब्द स्फुरले असो... मायबोलीकर खूपच # चाणाक्ष निघाले. त्यांना गटबाजीची सवयच असल्याने त्यांनी पटापट गट पाडले आणि खेळ ५-१० मिनिटात संपला सुद्धा. पहिल्या तीन गटांना बक्षीस म्हणून गोळ्या वाटण्यात आल्या... त्यातुन स. सा. ने गटबाजी करणे हे बालीशतेचे लक्षण आहे असा # उदबोधकपर संदेश सर्वांपर्यंत पोहचवला.^^ त्यानंतर Dumb Charades हा खेळ होता.. शो. ना. हो. (शोभत नाही हो), ज. मे. लं (जळलं मेलं लक्षण), ऐ. ते न. (ऐकावे ते नवलच) आणि हे. क. ब. (हे कधी बदलणार) असे चार गट (पुन्हा गट) होते. शो. ना. हो. गटात असलेली आमचि सुपत्नी शांतपणे बसुन गटाचे नाव सार्थ करत होती.. हे.क. ब गटातील सर्व सदस्य हे खाउन पिउन सुखी (शुद्ध मराठीत पोट सुटलेले) असे असल्याने हे कधीच बदलणार नाही ह्याची सर्वांनाच खात्री पटली पहिला round म्हणींचा होता... हा round सर्वांना खुपच सोपा गेला कारण प्रत्येक म्हण ही मायबोलीवरील कुठल्या ना कुठल्या बीबीला किंवा id ला आपोआप लागु होत होती... जसे की 'स्वत:चे ठेवावे झाकुन आणि दुसर्याचे पहावे वाकुन' ही म्हण ऐकुन सर्वांनाच 'लंबुटांगु' आणि 'हवेतली भटकभवानी' ह्या ids ची आठवण आल्याखेरीज राहिली नाही. तर 'सुंठेवाचुन खोकला गेला' ह्या म्हणीमुळे काही न आलेल्या मायबोलीकरांच्या आठवणी ताज्या झाल्या... इथे कोण जिंकले कोण हारले असल्या फ़ुटकळ तपशिलात उगाचच शिरत नाही.. हा कार्यक्रम सुरु असतानाच तिकडे श्यामलीने 'बकलावा' नावाची मिठाई सर्वांमध्ये वाटुन टाकली पण 'हाजिर तो वजिर' न्यायाने ती संयोजकांपर्यंत पोचलीच नाही तेव्हा क्षणभर तिला बुकलावे की काय असे सर्वच संयोजकांना वाटुन गेले... पण इतर खाणार्यांच्या तोंडावरचे 'भीक नको पण कुत्रा आवर' हे भाव पाहुन आपण थोडक्यात वाचलो ह्याचा सर्व स. मा सदस्यांना फ़ार आनंद झाला. ह्या 'बकलावा'चे दोन (की तीन) मोठ्ठे फ़ायदे मात्र झाले. पहिला म्हणजे श्यामली कडे परत कुणी एका अक्षरानेही chocolates ची मागणी केली नाही.. दुसरे म्हणजे विनयदेसाई बरोबर 'निनावी' [आले का परत निनावीचे लाडु?... का उगाच 'वडाचे (वडाचे का वड्याचे एक पुन्हा सी प्रश्ण) तेल वांग्यावर' काढत आहेस? माहीतीय मला लाडु जमत नाहीत ते] चे लाडु घेउन येणार होते ही गोष्टही सर्वजण विसरले. (का विनयजींनी ते वाटेतच खाउन टाकले? .... त्यांचे तोंड जरा सुजल्यासारखे दिसत होते खरे) नंतर आनंदनेहाने नकलांचा जबरदस्त कार्यक्रम सादर करुन सर्वांचीच वाहवा मिळवली.. मग वर्षाविहारासाठी सर्वजण घोळक्याने बाहेर पडले तर काहीजण हळुच दोन दोन जणांचे गट करुन बाहेर पडले.. योगायोगाची गोष्ट अशी की हे सर्वच दोन दोन जणांचे गट एक मुलगा आणि एक मुलगी असेच बनले होते... त्यातला एक गट तर मोदी resort मध्ये फ़ार गर्दी असल्याने हवापालट म्हणुन चक्क बाहेरच 'फ़िरायला' गेला अशी माहितीही नंतर त्यांच्या पाळतीवर असलेल्या अरुण आजोबांनी दिली. नाष्ट्याच्यावेळी तिथल्या 'बाथरूम' चा भितीदायक अनुभव घेतल्याने ह्यावेळी मी शेडजवळच्या बाथरुम मध्ये जाणे पसंत केले.. तिथे गेलो तर तिथे एक मायबोलीवरचेच गृहस्थ (मला त्यांचे नाव माहीत नाही) चक्क हातात पक्कड घेउन काहीतरी करत होते. एक क्षण मला वाटले की 'Hanes' च्या जाहिरातीचे shooting सुरु आहे काय? पण खरा प्रकार कळल्यावर मी तिथुन हळुच काढता पाय घेतला वर्षाविहाराचे फ़ारसे वर्णन करत बसत नाही (विहाराला शालजोडी नेणे शक्य नसल्याने).. एरवी फ़क्त घामानेच आंघोळ करणार्या मुंबईकरांनी मात्र एवढे पाणी प्रथमच पाहिल्याने त्यात मनोसोक्त डुंबुन घेतले. आणि तिथले एक तळे पाहुन बडी 'पाषाण लेक.. पाषाण लेक' असे ओरडत तिकडे धावत सुटली जेवणानंतर सर्वजण परत शेड मध्ये जमा झाले. सांस्कृतिक शिस्तीच्या पाच तासांपेकी अजुन अडीच तास बाकी होते. मुंबईकरांना वर्षभराची आंघोळ एकदमच करायची असल्याने त्यांना यायला थोडा उशीर झाला. तेवढ्यावेळात भरपेट जेवण झालेले मायबोलीकर पेंगले तर काय करायचे ह्या विचाराने फ़ाटक अण्णांना भर पावसात घाम फ़ुटला. मग त्यांनी कुणाला गाणे म्हणायला सांग, कुठे विनोद सांग, कुठे उगाच घोषणा दे असले अमानवीय प्रकार सुरु केले. त्यात भर म्हणुन की काय बिचार्या मायबोलीकरांना सारखे खुर्चीवर बसा, हा आता छोटे कोंडाळे करा, आता जरा लांब लांब सरका असले व्यायाम प्रकार करायला लावुन वीट आणला. ^^^ निदान त्यांनी अरुण आजोबा आणि मिनु आज्जींच्या वयाचा तरी विचार करायचा पण 'कोण आहे रे तिकडे?' असे आदेश द्यायची सवय असलेल्या फ़ाटकण्णांना ते कुठले कळायला? असो शेवटी उरलेले मुंबईकर आले आणि मंडळींनी सुटकेचा निश्वास ('श्वास' नव्हे. ) टाकला की आता तरी जरा बसायला मिळेल पण कसचे काय? स. सा ने अजुन एक पळापळीचा खेळ लगेच सुरु केला.. आणि कधी ११, कधी ७ तर कधी ९ असे आकडे उच्चारुन सर्वांच्या नाकी नऊ आणले... तिथे काम करणार्या मोदी resort च्या कर्मचार्यांना मात्र ह्या सभ्य दिसणार्या लोकांनी एकदम 'आकडे लावायला' सुरुवात केली की काय अशी शंका वाटु लागली. ह्या खेळात नीलने जे ह्या त्रिभुवनात कुणाही नवर्याला करणे शक्य नाही अशी गोष्ट करुन सर्व नवरोबांची वाहवा (मनातल्या मनातच बर का?) मिळविली... (नंतर आतल्या गोटातुन असे कळले की सौ नीलच्या सांगण्यावरुनच त्याने असे केले. ती खुप दमली असल्याने तिला खेळातुन बाहेर पडायचे होते) ह्यानंतर विनयदेसाई गोष्ट सांगायला उभे राहिले.. तेव्हा बहुतेक हे आता 'घरदेसाई' ह्या आपल्या नविन पुस्तकातील घरी बनवलेली एखादी पाककृती सांगणार की काय अशी अजुन एक कुशंका मनाला चाटुन गेली पण त्यांनी lady police ही विनोदी असुनही 'हसवणारी' कथा सादर करुन मला चकित केले ह्यानंतर शब्दशोध हा खेळ सुरु झाला. ह्यात झिम्मा, विषामृत, डबडा ऐसपैस आणि लगोरी असे गट होते.. खरे तर आधी आम्ही विट्टीदांडु असा गट झिम्मा च्या ऐवजी घेतला होता पण अचानक असे लक्षात आले की फ़क्त बायकांचा असा एकही खेळ ह्यात नाही. तेव्हा उगाच तिथेच 'हे कधी बदलणार'? म्हणुन V&C सुरु व्हायला नको म्हणुन मग आम्ही आईनवेळी गटाचे नाव बदलले आणि # समयसुचकता दाखवुन एक मोठ्ठा आणीबाणीचा प्रसंग टाळला. शब्दशोध हा तसा प्रचलित खेळ नसल्याने बहुतेक सगळ्या गटांनी सुरुवातीला गटांगळ्या खाल्या. इतक्या की गटांगळी हा शब्द पण त्यांना जमला नाही.. (मायबोलीवर त्यांना घरंगळणे हाच शब्द जिकडे तिकडे दिसत असल्याने त्यांना दोष देण्यात अर्थ नव्हता). विषामृत गटातील एक मुलगीने (नाव आठवत नाही) तर बैलांच्या नाकात घालतात ती गोफण असा जावईसुनबाई शोध लावुन सर्वांना चकित केले. [ एवढे काही नावे ठेवायला नकोय म्हणते मी... होते असे कधी कधी (बाई)माणसाचे confusion . तुम्ही काय असे कमी दिवे पाजळलेत का? एकदा माझे पप्पा 'उस्ताद आमिर खां' काय मस्त गायले असे म्हणल्यावर तू कुठले गाणे 'आती क्या खंडाला का?' असा प्रश्ण विचारुन त्यांना बेशुद्ध पाडले नव्हतेस का? आणि driving test देताना आठ काढायला सांगितल्यावर मराठीतला आठ काढुन त्या पोलीस ऑफ़िसरला तोंडात आठ बोटे घालायला भाग पाडले होतेस ते?].. शब्दशोध मध्ये सुध्धा झिम्मा आणि लगोरी मध्ये चुरशीचा सामना झाला पण ऐनवेळी 'भिकबाळी' शब्दासाठी योग्य क्लू न दिल्याने (मुंबईकर भिडुला भिकारी अर्थाचा एखादा क्लू दिला असता तर त्याची ट्युब लवकर पेटली असती ना.. आजकालचा afterall most prospecting business आहे तो) झिमा गटाला हार पत्करावी लागली आणि लगोरी गटाचा आनंद 'द्विगुणित' झाला एव्हाना शिस्तपालनाचे सर्व पाच तास संपलेले असल्याने स. सा ने हुश्श केले आणि उगाच कुणी शिस्तीला नावे ठेवु नये म्हणुन शेवटचा एक तास उस्फ़ुर्त कलाकरांना मोठ्ठ्या मनाने बहाल केला. त्या संधीचा फ़ायदा घेउन अनेक जणांनी स्वत:चे गळे आणि लोकांचे कान साफ़ करुन घेतले... शेवटी अरुण आजोबा आपली चारोळ्यांची चाळीस पानी वही बाहेर काढणार असा रागरंग बघुन संयोजकांनी चहाची वेळ झाली आहे तेव्हा हा कार्यक्रम इथेच संपत आहे असे जाहीर केले आणि वेळ निभावुन नेली.. हो ना श्रीखंड खाल्यावर कारल्याची भाजी खा असे सांगितले तर कसे वाटेल? पण चतुर संयोजकांनी असला प्रसंग टाळला... इतक्या वेळ टिपी, दंगा करायला अजिबात वेळ मिळाला नसल्याने मायबोलीकरांच्या गप्पांना तोंड फ़ुटले आणि एक एक करत सर्वजण चहा प्यायला मार्गस्थ झाले. आणि मीही परत एकदा हमालाचे कर्तव्य बजावु लागलो क्रमश: ... हत्ती गेला आणि शेपुट राहिले तळटिपा : * - ( कंसातिल वाक्ये ही मनातल्या मनात म्हणलेली आहेत) ** - [ ही बायकोने उघडपणे म्हणलेली वाक्ये आहेत] ... तसेही आमची बायको मनातल्या मनात म्हणायच्या भानगडीत पडत नाही सगळे काही माझ्या तोंडावरच म्हणते. आमचे धाडस होत नसल्याने आमचे बरेचसे मनातले मनातच रहाते # - पुढच्या वर्षीच्या शब्दशोधसाठी शब्द ^ - तसा रा. कु. एक साधा सरळ सज्जन मुलगा आहे ^^ - स. सा. चे दोन सदस्यांना आपापल्या सुपुत्रांसाठी शाळेचा शोध घेण्याचा अगदी ताजा अनुभव असल्याने 'हसत खेळत शिक्षण' (म्हणजे पोरे हसणार, खेळणार आणि आई-बापांनी शिकायचे) अगदी # अंगवळणी पडले आहे ^^^ - आणि वीट हातात नसुन सुद्धा वीट येणे कशाला म्हणतात हे मायबोलीकरांना शिकवले.. पुन्हा एकदा हसत खेळत शिक्षण... ह्याबद्दल 'फाटक अण्णांना ज्ञानपीठ द्यावे काय? असा v&c उघडायला हरकत नाही
|
Kandapohe
| |
| Thursday, August 03, 2006 - 10:03 am: |
| 
|
मिल्या सही लिहीले आहेस रे! 
|
Himscool
| |
| Thursday, August 03, 2006 - 10:18 am: |
| 
|
सही रे मिल्या.. ..
|
Psg
| |
| Thursday, August 03, 2006 - 10:33 am: |
| 
|
मिल्या, फ़ुल टू ह ह पु वा! झकास!
|
Arun
| |
| Thursday, August 03, 2006 - 11:02 am: |
| 
|
मिल्या : मस्तच लिहिलं आहेस रे ...........
|
Moodi
| |
| Thursday, August 03, 2006 - 11:23 am: |
| 
|
मिल्या चौफेर नजर असते हं तुझी. आता जयविजय उर्फ वाकड्या यांना कळेल की बाथरुम मध्ये भेटलेला तूच. 
|
मिल्या अशक्य लिहिलयस रे
|
Maitreyee
| |
| Thursday, August 03, 2006 - 12:07 pm: |
| 
|
मिल्या. सहीच
|
Chinnu
| |
| Thursday, August 03, 2006 - 1:25 pm: |
| 
|
मिल्या एकदम झक्कास रे!
|
Kiran
| |
| Friday, August 04, 2006 - 3:04 am: |
| 
|
vahavva!! maja aa gaya
|
Wakdya
| |
| Friday, August 04, 2006 - 3:35 am: |
| 
|
Milya तुम्ही सुंदर वर्णन केले आहे, काही उपमा व दाखले कळले नाहीत पण अधिक विचार केल्यावर कळु शकतील असे वाटते. मुडी, टॉयलेट मधे भेटलेले गृहस्थ वेगळे होते, बहुतेक "मिस्टर मिनू" असावेत असा अंदाज आहे. मधेच कोणतरी येवुन गेल्याचे पुसटसे आठवते पण माझे लक्ष झीप दुरुस्त करण्यात होते. कदाचित ते मिल्या असावेत. दुसरे असे की माझ्या पाळतीवर कुणाला नेमले नसावे, आणि नेमले असल्यास श्रीयुत मिल्या यांना नक्कीच नाही कारण रेकारांती कोब्रांची युती झाली तर काय अशी शंका असावी. शिवाय टोयलेटच्या आतपर्यंत प्रत्यक्ष पाळत ठेवण्याइतके श्री मिल्या नक्कीच अरसिक नाहीत. तरीही ते आले असल्यास ते त्यांच्याच कामाकरतीता येवुन गेले असावेत. येवुन जावुन धबधब्याकडे कुणाची पाळत ठेवली असेल पण आम्ही गेलो तो भाग तसा अवघड असल्याने या पाळतीचाही उपयोग झाला नसावा. असो. सगळीच गंमत होती. जेवणाच्या हॉलमधिल सामायिक दरवाजाच्या त्या सुविधेमुळे माझी देखिल अडचण झाली व धबधब्याकडे डोंगरात उतरताना आधाराकरता चिखलमातीत, खडकांवर टेकवलेले हात तसेच न धुता केवळ पुसुन जेवायला बसायला लागले. एरवीची वेळ असती तर डॉक्टर मोदी यांना सामोरे पाचारण करुन झाडा झडती घेतली असती. परत घरी पोहोचेस्तोवर माझ्या डोक्यात अनेकांपैकी एक किडा असाही वळवळत होता की तिथे इतक्या कॅमेर्यांनी फोटो काढणे व शुटींग चालू होते की त्यात उघडे पोस्ट ऑफिस तर चित्रीत झाले नसेल ना? आणि या शंकेचे निरसन सौ ला विचारुनही करता येणे शक्य नव्हते. पण मला दाट संशय तेव्हाही होता की माझ्या डाव्या हाताकडील खुर्च्यांवर लांबवर बसेलेले अनेक लहानथोर बंधुभगिनी मधेच फिदी फिदी का बरे हसत होते? असो, होत असही कधी कधी.
|
Maj
| |
| Friday, August 04, 2006 - 4:42 am: |
| 
|
milya: ultimate re. HHPV

|
मिल्या वृत्तांत सही रे एकदम हहपुवा....
|
Jyotip
| |
| Friday, August 04, 2006 - 6:08 am: |
| 
|
मिल्या वृत्तांत जबरी... ..... ... 
|
Meenu
| |
| Friday, August 04, 2006 - 6:50 am: |
| 
|
वाकड्या बरोबर अतुल (मिस्टर मिनु) होता तिकडे वाट पहात सिद्धार्थसाठी ..
|
|
|