Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
वर्षा विहार - २३ जुलै २००६ - कर्ज...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Mumbai » वर्षा विहार - २३ जुलै २००६ - कर्जत « Previous Next »

नमस्कार मंडळी....:-) गेली तीन वर्षे चालत आलेल्या परंपरेस अनुसरून या वर्षीही वर्षाविहाराचा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरले आहे. प्रत्येक मायबोलीकर या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतो. या निमित्ताने इतर मायबोलीकरांना भेटण्याची,त्यांच्याशी प्रत्यक्ष हितगुज साधायची संधी मिळत असते. रिमझिम पावसाचा सुखद शिडकावा अंगावर घेत सांस्कृतिक
कार्यक्रमांचा आस्वाद घेता येतो.
आपल्या आनंदी क्षणांच्या गाठोड्यात अजुन एका आनंदी दिवसाची भर पडते..
दरवर्षी वविला येणार्‍या मायबोलीकरांची संख्या वाढतच आहे. यावर्षीही असाच किंबहुना याहीपेक्षा जास्त प्रतिसाद मायबोलीकर देतील अशी आशा आहे..:-)


व वि २००६ विषयीची सविस्तर माहिती आणि काही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:

तारीख: २३ जुलै २००६

वेळ: ९ am तो ६ pm

स्थळ: डॉ. मोदीज रिसॉर्ट,कर्जत



काही ठळक मुद्दे ( imp points ):

१) नावनोंदणी:- व विसाठी नाव नोंदवायचे असल्यास varshaa_vihaar@yahoo.com या मेल आयडीवर मेल करून तुम्ही आपले नाव नोंदवु शकता. आपली उपस्थिती कळविण्याची अंतिम तारिख १० जुलै आहे. नावनोंदणीसाठीच्या मेल मध्ये पुढील गोष्टींची माहीती दिलेली असणे गरजेचे आहे

१. नाव
२. मायबोली आयडी (अर्थातच खरा:-))
३. संपर्काचा नंबर
(भ्रमणध्वनी क्रमांक असेल तर उत्तम)
४. कोणत्या शहरातुन येणार?
(पुणे / मुंबई इत्यादी)
५. नेहमी वापरत असलेला इमेल आयडी
६. एकुण किती व्यक्ती येणार
(प्रौढ / मुले... मुले असल्यास त्यांचे वय चार वर्षांखाली असेल तर तसे नमुद करावे)
७. वर्गणी कशी भरणार? online की प्रत्यक्ष भेटुन ? (या संदर्भातले डीटेल्स खाली पहावयास मिळतील)
८. प्रत्यक्ष भेटुन वर्गणी देणार असाल तर कुठल्या तारखेला?(ठरलेल्या तारखांची
अधिक माहिती खाली पहावयास मिळेल)

टिप:- १. नावनोंदणीची अंतिम तारीख १० जुलै आहे. (रिसॉर्ट आणि बस बुकींगच्या दृष्टीने ही तारीख ठरविण्यात आली आहे.)
२. मायबोलीकरांना सपत्नीक किंवा सपतीक आणि मुलांसह येता येईल.( मायबोलीकरांची संख्या, व वि साठी मिळालेल्या जागेची मर्यादा,बसच्या बैठक व्यवस्थेची मर्यादा लक्षात घेऊन हे ठरविण्यात आले आहे)
३) बससंदर्भातली सविस्तर माहिती (निघण्याची वेळ, बसचा नं आणि वर्णन, पिक अप स्पॉट्स इत्यादी..) नंतर कळविण्यात येईल.



२) वर्गणी:- या वर्षीच्या व विसाठी पुढीलप्रमाणे वर्गणी गोळा करण्यात येईल....

रिसॉर्ट प्रवेश फ़ी:- ३०० rs
(चार वर्षांखालील लहान मुलांसाठी २०० rs )


बसची वर्गणी:- १५० rs (ही रक्कम अंदाजे असुन मायबोलीकरांची एक ठराविक उपस्थिती प्रमाण धरून ठरवण्यात आली आहे. अंतीम उपस्थिती जी असेल त्यानुसार यात कमीजास्त बदल होऊ शकतो. )

जादा वर्गणी:- २५ rs (ही वर्गणी व विला सादर करण्यात येणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आहे.)

अश्याप्रकारे एकुण प्रत्येकी ४७५ rs वर्गणी भरायची आहे

टिप:- १. वर्गणीची वरील रक्कम ही केवळ पुणेकरांसाठीची असुन मुंबईकरांनी ३००+२५=३२५ rs वर्गणी द्यायची आहे. त्यांची यायची जायची वर्गणी मुंबईचे संयोजक ठरवतील.
२. ज्यांना बसने न येता स्वतंत्रपणे तिथे यायचे आहे त्यांनी बसची १५० rs वर्गणी भरू नये. त्यांच्यासाठी वर्गणीची एकुण रक्कम ३२५ rs राहील.
३. रिसॉर्टच्या प्रवेश फ़ीमध्ये आपल्याला ब्रेकफ़ास्ट, जेवण आणि दुपारचा चहा ह्या गोष्टी अंतर्भुत आहेत.
त्याशिवाय आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शेड आणि इतर
सामुग्री आहे. शिवाय पोहायचे असल्यास पोहण्याचा तलावही आहे.



३) वर्गणी कशी भरायची?:- वर्गणी दोन मार्गांनी भरता येईल..
एक online किंवा दोन प्रत्यक्ष संयोजकांना भेटुन...

१. ऑनलाईन वर्गणी:-ज्यांना प्रत्यक्ष येऊन वर्गणी भरणे शक्य नाही त्यांना ऑनलाईन वर्गणी भरता येईल.

जर कोणाला online पैसे transfer करायचे असतील तर कृपया
पुढील गोष्टी कराव्यात:
आधी नावनोंदणीसाठी जी मेल तुम्ही varshaa_vihaar@yahoo.com ह्या id वर कराल त्यात दिलेल्या format मध्ये तसे mention करा ( format मध्ये तो option दिलेला आहे.वर पहा.) तुम्हाला पैसे transfer करण्यासाठीचा ICICI account number मेलद्वारे कळवण्यात येईल.

online transaction केले की १ transaction id येतो, हा प्रत्येक transaction चा unique id आहे, त्यामुळे हा id note करावा...

त्या खेरीज transaction remarks मध्ये add करायच्या महितीचा format पुढीलप्रमाणे:

Va.Vi.-"first name" ( maayboli id )

पैसे transfer करून मग varshaa_vihaar@yahoo.com ह्या id वर मेल करावी... ह्या मैलमध्ये unique transaction id देखील communicate करावा. ICICI account check करून
confirmation चा reply देण्यात येईल

जर ऑनलाईन वर्गणी संदर्भात कोणाला काही शंका वा
प्रश्ण असतील तर कृपया सुशांत (सुश्या-मोबाईल नं: 09881254320 )शी संपर्क करावा.


२. प्रत्यक्ष वर्गणी:- ज्यांना संयोजकांना प्रत्यक्ष भेटुन वर्गणी
द्यायची असेल त्यांनी ९ जुलै किंवा १५जुलै रोजी संयोजकांकडे ती द्यावी.. त्या दिवशी भेटायची वेळ आणि ठिकाण आम्ही लवकरच सांगु.


टिप्:-
१. लक्षात ठेवा नावनोंदणीची अंतिम तारीख १० जुलै असुन पैसे भरायची अंतिम तारीख १५ जुलै आहे.
२. मुंबईकरांनी त्यांची वर्गणी मुंबईचे संयोजक घारूअण्णा किंवा इंद्रधनुष्य यांच्याकडे द्यायची असुन यासंदर्भातली सविस्तर माहिती ते देतील.
३. नावनोंदणीसाठीचा mail id मात्र पुणेकर,मुंबईकर आणि इतर सर्व करांसाठी सारखाच आहे:-)

varshaa_vihaar@yahoo.com

  Thread Posts Last Post
Archive through June 09, 200620 06-09-06  8:27 am
Archive through June 17, 200619 06-17-06  7:10 am
Archive through June 21, 200619 06-21-06  1:34 pm
Archive through July 09, 200619 07-10-06  3:25 am
Archive through July 20, 200617 07-21-06  3:54 am
Archive through July 24, 200620 07-24-06  5:15 am
Archive through July 24, 200620 07-24-06  10:10 am
Archive through July 24, 200620 07-24-06  4:43 pm
Archive through July 25, 200620 07-25-06  8:53 am
Archive through July 25, 200620 07-25-06  3:22 pm
Archive through July 26, 200620 07-26-06  9:53 am
Archive through July 28, 200620 07-28-06  12:18 pm
Archive through August 04, 200620 08-04-06  6:50 am
Archive through August 09, 200620 08-09-06  12:32 pm

Chinnu
Wednesday, August 09, 2006 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या टु ग़ुड रे!

Meenu
Thursday, August 10, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मी वाचलच नवत आत्ता वाचलं मस्त रे मिल्या

Rajkumar
Friday, August 11, 2006 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच रे मिल्या.. .. ..

Milya
Friday, August 11, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी ... ...

Manishalimaye
Friday, August 11, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तशी नविनच आहे पण ही सगळ्यांची वर्णनं वाचून "आता पुढचं कुठे आणि काय ही उत्सुकता वाटते आहे कोणी सांगाल का मला?

Kmayuresh2002
Saturday, August 12, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता पुढचं कुठे आणि काय ही उत्सुकता वाटते आहे कोणी सांगाल का मला?... मनिषा,आता पुढचं पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात:-)

Manishalimaye
Saturday, August 12, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरेश
मी फ़क्त पावसाळी सहलीबद्दल बोलत नाही. आणखीही बरेच काही असू शकेल की. किंवा होऊ शकेल की. विचार करुन बघा.
मनिषा


Deepstambh
Saturday, August 12, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या

अरेरे.. मनिषा वविला आली असती तर अजुन एक गाणे ऐकायला मिळाले असते.. असो...

आपण मायबोलीकरांचा गाण्यांचा प्रोग्राम ठेवायचा का? वाद्यवृंदासहीत?? एखाद्या नाट्यगृहात?? धमाल येईल..

त्याला फक्त 'आयुष्यभर बोलु काहीही..' असं नाव नका देऊया.. :-)


Admin
Saturday, August 12, 2006 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व. वि संयोजक तुम्हाला ईमेल पाठवली आहे ती कृपया पहा.

Manishalimaye
Saturday, August 12, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपस्तंभ
मनिषा आली असती तर म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला? हे इतके वाचल्यावर मी तिथेच होते की काय [ इतके लाइव्ह वर्णन आहे हे ] असा दाट संशय येऊ लागलाय मला. ख़ूपच छान आहे. आता पुन्हा कधी?
मनिषा


Vinaydesai
Thursday, August 17, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज घरी परतल्यावर इकडे नजर टाकली... वाचायला भरपूर वेळ लागेल हे लक्षात आल्याने वाचणं टाळलं...
:-)

Prajaktad
Tuesday, August 22, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!व.वि. च वर्णन खासच! जोरदार मजा केलि तर हितगुजकरांनी..



Vinaydesai
Tuesday, August 22, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्याबद्दल आगावु धन्यवाद..

मिल्या, आगावु धन्यवाद दिल्यामुळे सुटलास, नाहीतर तुझं काही खरं नव्हतं..
चला म्हणजे व. वि. मस्त झालं...
श्यामली कुठे गेली?


Shyamli
Saturday, September 02, 2006 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळेच वृत्तांत छान....

मिल्या ह ह पु वा
नेहमीप्रमाणेच....
प्रत्येक गावात मला तुझ्या आरतीची आठवण येत होती.....

विनय, कालच परत आले...




Bombayviking
Wednesday, December 13, 2006 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मायबोलीकरांना माझ्या लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण....


Wedding Invitation



Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators