Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 30, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव पूर्वतयारी » हितगुज गणेशोत्सव २००६ पूर्वतयारी » Archive through July 30, 2006 « Previous Next »

Yogibear
Wednesday, July 26, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maitreyee, Asami: कथानक माहितिचे असावे ह्याचा अर्थ असा घ्यावा की 'हेरा फेरी' घेतले तर त्यातली मुख्या पात्रे (बाबूराव, श्याम, राजू) व मुळ कथा (तिघेही दरिद्री असतात पण झटपट श्रिमंत होण्याची धडपड असते) तीच रहाते म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर कथा कितिही भरकटली तरी मुळ कथानक आणि पात्रे तीच असल्याने सर्वांना enjoy करता येते....

अर्थात संयोजकांना नियंत्रण ठेवावेच लागते...


Deepanjali
Wednesday, July 26, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I second असामी ,MT.
जरी योगी म्हणतो तशी पात्रे ओळखीची घेतली तरी त्यांना घेउन हवा तितका गोंधळ घालता येतोच कि !
अर्जुनाला व्हिलन बनवता येते तर दुर्योधनाला नायक बनवता येते , किंवा अनेक नवीन पात्रांनाही हवे तिथे घुसडता येते !
एखादी बिपाशा द्रौपदीची दासी म्हणून अणता येते अणि मग तिची राजमहालातली affairs पण दाखवणीही STY मधे शक्य आहे !
त्यामुळे कुठूनाही वाचले तरी पात्रे ओळखीची रहातीलच किंवा link लागेलच असे काही नाही !
So, सुरवातीपासून थोडा तरी track ठेवणे हवेच !
:-)cbdg

Yogibear
Wednesday, July 26, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी: मी फ़क़्त एक प्रस्ताव ठेवलेला त्यामुळे ते जर शक्य नसेल तर उगाच त्यावर V&C नको इथे.... बाकी STY चे संयोजन करणारे ह्या गोष्टीची खबरदारी घेतिलच म्हणा...

Lalu
Wednesday, July 26, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol, यावर एक उपाय आहे. DJ ने गोष्टीची सुरुवात आणि शेवटच फक्त लिहायचा. मधे काही लिहायचे नाही! ~D

बाकी चंपक मागच्या वर्षी मुलाखत देतो म्हणाला होता, तसा कार्यक्रम ठरला तर. मला वाटतं या सगळ्या 'डॉ' झालेल्या मायबोलीकरान्ची मुलाखत घ्यावी 'संवाद गणपती पेशल' मधे. ;). रार, परागकण आणि चन्पक नी एकमेकांची मुलाखत घेतली तर अजून छान. पण या सगळ्या 'डॉ' ना वेळ असेल तरच!


Deepanjali
Wednesday, July 26, 2006 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lalu
मुलाखतीची idea चांगली आहे .
अजुन एक म्हणजे Mods नी Mods च्या मुलाखती घ्यायच्या .
योगी ,
अरे V&C कोण करतय , गोंधळ कसा होतो ती examples देतायेत सगळे .
:-)

Maitreyee
Wednesday, July 26, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mods नी mods चीच मुलाखत, म्हणजे वाचायला पण mods च उरतील फ़क्त

Storvi
Wednesday, July 26, 2006 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>mods नी mods चीच मुलाखत,>> mod कळीत निघणार ही कल्पना :-)

Kandapohe
Thursday, July 27, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mod कळीत निघणार >>>

mods नी mods चीच मुलाखत,>>
नको, मुलाखतीत मॉडीफीकेशन नको! :-)

Anilbhai
Thursday, July 27, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण म्हणतो मुलाखतीला चला.
mod डेन पण walk णार नाही
:-)

Maitreyee
Thursday, July 27, 2006 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे लोकहो, सूचना, आयडिया देताय ते चांगलेच आहे पण प्रत्यक्ष संयोजक समितीमधे काम करायला तयारी आहे की नाही कुणाची?:-)
असेल तर कळवा लवकर!


Chafa
Thursday, July 27, 2006 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी घेऊ का मॉडसची मुलाखत? :-O
असो, पण काही मदत लागली तर जरुर कळवा. मला आवडेल.


Storvi
Thursday, July 27, 2006 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>असो, पण काही मदत लागली तर जरुर कळवा. मला आवडेल>>अरे पण मदत करशील की नाही ते सांगायचं शिताफ़ीने टाळलस.. :-O

Badbadi
Friday, July 28, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, मेल चेक कर.. आणि री दे

Bee
Friday, July 28, 2006 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठल्याही पुस्तकातील मला आवडलेले परिच्छेद असा एक विषय मी सुचवितो आहे. बघा आवडत असेल तर..

मैत्रेयी, काय काय कामे असतात हे जर माहिती पडले तर वेळ देता येईल का आणि हे काम जमू शकेल का ह्यावरुन ठरवता येईल..


Mahaguru
Friday, July 28, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संयोजक समिती कडुन एक पण पोस्ट नाही आले अजुन? त्यांना संपर्क साधायचा असेल कुणाला इमेल करायचा?

Maitreyee
Friday, July 28, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

badbadi, Deemdu तुम्हाला reply दिला आहे.
बी, इथेच सुरुवातीला एक लिन्क दिली आहे तिथे पहा काय काम असते कसे केले जाते सर्व लिहिले आहे.
महागुरू, लवकरच संयोजक मंडळाची घोषणा होईल. सध्या Mods पैकी कुणालाही email करायला हरकत नाही.


Rachana_barve
Friday, July 28, 2006 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण सांगा काही मदत लागली तर..

Gharuanna
Saturday, July 29, 2006 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड्स, वा यावर्षी च्या कार्यक्रमात गणेशोत्सवाच्या लोकमन्याच्या मूळ उद्देशा विष्ययी एखादा कार्यक्रम घेत येइल का
मलाही सर्व कार्यक्रमात भाग घ्यायला आवडेल
नाव कुठे नोन्दवावे लागेल?



Gharuanna
Saturday, July 29, 2006 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेशोत्सव आजचा आणि लोकमान्यान्चा,
गणेशोत्सव सार्वजनिक उत्सवान्चा राजा
रूप गणेशचे रूप राष्ट्रभक्ती चे
असे काही विषय चलतील का


Upas
Sunday, July 30, 2006 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही असं वाटतं की बाकी सगळ्या करमुणीकीच्या कार्यक्रमांबरोबर थोडासा हिस्सा लोकमान्यांसाठी ठेवावाच.. शिवाय गेल्या आठवड्यात त्यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी करण्यात आली.. एखादी निबंध स्पर्धा किंवा पोवाडा लिहीणे असे ठेवायला जमल्यास उत्तम.. कैक वर्षात उत्तम पोवाडे ऐकायला मिळाले नाहीत हे ही खरे! :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators