Badbadi
| |
| Monday, July 31, 2006 - 10:42 am: |
| 
|
गणपतीच्या अनेक गोष्टी आहेत. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत प्रत्येक दिवसाची काहि दंतकथा पण असेल. त्या जर कोणाला माहित असतील तर इथे लिहू शकू. अर्थात याची स्पर्धा नसणार आहे.. पण जशा दर वेळी आरत्या असतात तसं कथा असतील. संयोजकांना याचा विचार करता येईल का?
|
Moodi
| |
| Monday, July 31, 2006 - 11:18 am: |
| 
|
योगी इथे V&C होणार नाही, मी फक्त सुचना केल्या. सुचना अन V&C मधला फरक माहीत आहे मला. हो लोकमान्यांचे जीवन पोवाडा किंवा ललित द्वारे वाचायला मिळावे. संयोजकांनी लो. टिळकांचा छोटा फोटो देखील त्या संबंधीत पानावर वरच्या बाजूला लावावा.
|
Lalu
| |
| Wednesday, August 02, 2006 - 4:06 pm: |
| 
|
Lol! माझ्याकडे विचारणा होते आहे म्हणून इथे लिहीते. मी यंदा संयोजक मंडळात नाही. (आणि Mod पण नाही ;)) त्यामुळे गणेशोत्सवा संदर्भात मला email पाठवू नका. मी मागे २ वर्ष गणेशोत्सवाचे काम केले होते, तो अनुभव लिहून ठेवला आहे, त्याची लिन्क इथे सुरवातीला दिली आहे एवढेच. * या खुलाशानंतर संयोजक मंडळात काम करायला लोकाना जास्त उत्साह येईल अशी आशा आहे. ~d
|
mods २००२, ०३ आणि ०४ साली केलेला पद्य STY आपण गेल्या वर्षी केला नव्हता. यंदा जरा नव्या रूपात तो परत करवा असं सुचवावंसं वाटतं. जर करायचा ठरला तर त्याच्या संयोजनाची जबाबदारी घ्यायची माझी तयारी आहे. शिवाय गद्य STY च्या संयोजनात काही मदत हवी असेल तर तीही करायची तयारी आहे
|
Sanyojak
| |
| Wednesday, August 02, 2006 - 8:14 pm: |
| 
|
नमस्कार! २००६ संयोजक समिती Asami,Prasad_shir, Naatya, Kandapohe, Badbadi, Deemdu, rimzim आणि त्यांच्या मदतीला हे मॉड्स : मिलिन्दा, मैत्रेयी, अनिलभाई, Svsameer कुणाला संयोजक समितीशी संपर्क करायचा असल्यास कोणत्याही संयोजकाला अथवा hg_sanyojak@yahoo.com इथे email करु शकता. तुमच्या सूचनांचे स्वागत आहे! लवकरच गणेशोत्सवाचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. प्रसाद, तुम्हालाही ईमेल पाठवत आहोत.
|
Ashwini
| |
| Thursday, August 03, 2006 - 1:52 am: |
| 
|
प्रसादला अनुमोदन. मी हीच सूचना करायला इकडे आले होते. मागच्यावेळेस (मला वाटतं २००५ मध्ये) एकदम मस्त झाला होता पद्य STY . मागच्या वर्षी miss केला.
|
Bee
| |
| Thursday, August 03, 2006 - 8:16 am: |
| 
|
अरे वा संयोजकांची नेमनूक पक्की झाली तर. सगळ्यांचे अभिनंदन! आता लवकर कार्यक्रमाची रुपरेषापण ठरवा. मला वाटते गेल्या वर्षीचे जुने कार्यक्रम ह्यावर्षी परत परत का करावेत? त्यापेक्षा काहीतरी नविन संकल्पना सुरू कराव्यात. आणखी एक सुचना, स्पर्धांचे निकाल लावण्यासाठी वेगळे परिक्षक घेता आले तर बघा. दरवर्षी नविन सभासद इथे येतात त्यांच्यापैकी जर कुणी चोख असेल तर त्यांनाही संधी द्यावी. आणि परिक्षकांच्या निर्णयावर मायबोलिकरांनी निकष कसे लावलेत? हे का ते का? असे प्रश्न विचारू नये. मात्र परिक्षकांची नावे जरूर उघडपणे सादर करावीत. मायबोलिवर जे वेगवेगळे गट्स आहेत जसे की सलोनीचे पंखे, पाककलेचे पंखे, हवाहवाईचे पंखे, आरोहीचे पंखे, चित्रकारांचे, छायाचित्रकारांचे पंखे तर अशा सगळ्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठेवावा. म्हणजे group मुलाखत ठेवावी. दहा दिवसांच्या १० मुलाखती. एका दिवसाला एकच ठेवावी आणि दुसर्या दिवशी ती मुलाखत बंद करावी.
|
Arch
| |
| Thursday, August 03, 2006 - 2:12 pm: |
| 
|
अशी एक स्पर्धा घेऊया का जिथे सगळ्यांनी बी ला multipart प्रश्ण विचारायचे आणि बीने दिलेल्या उत्तरावर प्रश्णाचा विजेता निवडायचा. बी, तुला चालेल का ही स्पर्धा?
|
Rimzim
| |
| Thursday, August 03, 2006 - 4:35 pm: |
| 
|
बी त्याच त्याच स्पर्धा असे काही नाही. तुल अथवा कोणा इतर मायबोलीकरांना काही नवीन कल्पना सुचत असतील तर ईथे लिहा ना तसे. संयोजक त्यावर विचार करतील.
|
Bee
| |
| Friday, August 04, 2006 - 2:05 am: |
| 
|
आर्च बिनधास्त चालेल. पण एक अट आहे. ऐरवी मला उत्तर देणार्यांनीच ह्यात स्पर्धेत भाग घ्यावा. बाकीच्यांनी त्यावर पार्ल्याच्या बीबीवर चर्चा करावी :-)
|
Seema_
| |
| Friday, August 04, 2006 - 5:12 am: |
| 
|
महाराष्ट्राची लोकधारा किंवा महाराष्ट्र दर्शन असा काही कार्यक्रम करता येईल का ? विस्मरणात चाललेल्या बर्याच चालीरितीवर लिहिता येईल . अगोदर विषय द्यावेत . जे कुणी लिहिणार आहेत त्यानी तस सांगाव म्हणजे माहिती रीपिट होणार नाही . पोवाड्यापासुन , रांगोळी पर्यंत बरच लिहिता येईल .
|
संयोजक तुमच्या ईमेलला उत्तर दिले आहे.
|
Himscool
| |
| Monday, August 21, 2006 - 6:56 am: |
| 
|
पुढच्या रविवारीच गणपती प्रतिष्ठापना आहे ना? सगळे इतके निवांत का आहेत? स्पर्धा जर असतील तर त्याची घोषणा कधी होणार? तयारी करायला वेळ मिळायला पाहिजे ना!
|
Bee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 4:05 am: |
| 
|
मला असे वाटते की इथे परदेशातली मंडळी भरपूर आहेत. प्रत्येकानी आपापल्या महाराष्ट्र मंडळातील गणेशोत्सवाचा वृत्तांत लिहिता तर एक वेगळेपणा येईल. संयोजक, असे करुन पाहता येईल असे वाटते..
|
Rimzim
| |
| Friday, August 25, 2006 - 2:29 am: |
| 
|
himscool, jara dhir dhara. shanaivari ratri paryant spardha suru hotil bahutek
|
Moodi
| |
| Friday, August 25, 2006 - 9:20 am: |
| 
|
अहो संयोजक परवा गणपती बसतायत. तुमच्या घोषणा, तयारी, सूचना कधी येणार? उद्या बरेचसे मायबोलीकर नसतीलच. रविवारी सुट्टी. लवकर लवकर सांगा. 
|
होनार होनार... समदं टाईमवर आनि एवस्थिशीर होनार... कार्यकर्ते मंडपाच्या मागे जमल्येले हेत आन समदी फिल्डींग लावन्याचं शिष्टिमाटिक शेटिंग करत हेत...
|
>>>> कार्यकर्ते मंडपाच्या मागे जमल्येले हेत आमच्या येळला आमी मन्डपाखाली जमायचो! DDD मन्डपामाग जागाच कुठ अस्ती? समद्या कार्यकर्त्यान्च्या गाडीघोड पार्क केलेली असत्यात नव्ह?
|
Sanyojak
| |
| Friday, August 25, 2006 - 12:39 pm: |
| 
|
ट्यंवSSSSSSSSS.. टुंSSSSSSSSS.. खर्रSS.. खस्स्स हल्लो हल्लो टेस्टिन्ग हल्लो.. ठक..ठक.. चालूय का? येतय का ऐकू? ऑ, तिकडे मागे, सगळ्यांना येताय ना ऐकू? बरं तर, संयोजक मंडळ आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्र मैत्रिणींनो, येणार येणार म्हणता गणपती बाप्पा यायची वेळ झालीच आहे! सालाबादप्रमाणे यंदाही आपण हितगुज गणेशोत्सव साजरा करणार आहोत!.. (तेच तेच बोलल्यासारखं वाटतय का? पण ते 'सालाबाद' आणि 'येणार येणार' चे वाक्य बोलले नाही तर फ़ाऊल धरतात ना ) तर या वर्षी उत्सवासाठी वर्गणी भरलेल्या सर्व सभासदांचे अभिनं - आभार आणि सहरष स्वागत! (तसं वर्गणी न दिलेल्यांचं पण आम्ही स्वागतच करतो म्हणा!) तर या वर्षीचे कारेक्रम लवकरच जाहीर होतील.. तारखेकडे लक्ष असू द्या.. (तारीख कसली आलिये, या बीबी कडे लक्ष असू द्यावा येवढं बोलून आम्ही दोन शब्द पुरे करतो, धन्यवाद!
|
Shonoo
| |
| Friday, August 25, 2006 - 1:11 pm: |
| 
|
लिम्बुटिम्बु तुम्ही तर अगदी झक्किंच्या काळातलं बोलताय! आता सगळे संयोजक आपापल्या गाडीत किंवा घोड्यांवर बसून एकमेकांशी SMS किंवा blackberry ने बोलत असतील. गाडी पार्क करून उतरून मन्डपापर्यंत जायचे फुकट कष्ट कशाला! :-) मंडपाची आरास झाली असेल तर त्यात दिवे असतीलच!
|
Zakki
| |
| Friday, August 25, 2006 - 10:14 pm: |
| 
|
'elephant God' च्या decoration साठी काय आणायचे? entertainment साठी सर्व प्रकारच्या wines, beer, scotch कोण आणणार? नि DJ कोण? नि Dance ला पंजाबी नि इंग्लिश songs कोण आणणार? ती मराठीतली elephant god ची नि Gods ची songs नकोत बाबा! Boring . (चोरून ऐकलेले mobile वरील conversation , नि चोरून पाहिलेले SMS .)
|