Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 28, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Mumbai » वर्षा विहार - २३ जुलै २००६ - कर्जत » Archive through July 28, 2006 « Previous Next »

Yogi050181
Wednesday, July 26, 2006 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PSG .. तो शब्दांकृत करता येणार नाही.. ह. ह. पु. वा. असा प्रकार होता.. BTW हे स्विमिंग ओढ्यावरच्या प्रसंगाबद्दल आहे.. :-) एखादे puppy पाण्यात कसे पोहते त्याची नक्कल होती :-)

Neel_ved
Wednesday, July 26, 2006 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg अगं तु तर तिथेच होतीस ना? तुला ही माहीती नाही?

Bhramar_vihar
Wednesday, July 26, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही psg गेल्यावर त्याच सादरीकरण झालं.. अगदी शेवटी. आनंद पापे, तुस्सी ग्रेट हो!

Psg
Wednesday, July 26, 2006 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो का? :-) अरेरे मिसले मी. त्याने म्हणलेल्या 'आरत्या' पण मस्त होत्या.. तुम्च्यापैकी कोणीतरी 'काकानी' माझ्या लेकाच्या अंगावर पाणी उडवलं, त्यामुळे त्याची घाबरगुंडी झाली आणि आम्हाला निघावे लागले लगेच :-)

Deepstambh
Wednesday, July 26, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो अगदी सही होता आनंदचा पप्पी शो * कृपया भलता सलता अर्थ काढु नये.. * आणि 'लेडीज स्त्रिया' नव्हत्या म्हणुनच तो ते करु शकला.. :-)

अगदी ह. ह. पाण्यात वा. लागली.. आनंद अगदी सही क्षेत्रात आहे.. त्याने दी ग्रेट इंडीयन कॉमेडी शो मध्ये भाग घ्यायला हवा.. :-)


Jayvijay
Wednesday, July 26, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> वाकड्या (अरे तु तुझी ID बदलुन घे रे),
Hemantp बघा बर, ही नविन आयडी कशी वाटते? ठीक आहे ना?

Maitreyee
Wednesday, July 26, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे छे! 'वाकड्या', 'लिम्बूटिम्बू' या आयडीना कसे एक 'क्यारेक्टर' आहे! ते अशा सरळसोट नावामधे कसे येईल :-)

Hemantp
Wednesday, July 26, 2006 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयविजय, पुनर्जन्मासाठी अभीनंदन... प्रोफाईल मधे लिहिलेस हे बरे केलेस.


Jayvijay
Wednesday, July 26, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> छे छे! 'वाकड्या', 'लिम्बूटिम्बू' या आयडीना कसे एक 'क्यारेक्टर' आहे!
Maitreyee छे हो, तसही 'लिंबुटिंबु', 'झक्की', 'हवाहवाई' इत्यादीक 'क्यारेक्टरांच्या' रांगेत उभ रहायची आमची कुठली हो शामत? तुमच आपल काहीतरीच हां.

Maitreyee
Wednesday, July 26, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTWपुणे कर्जत पुणे प्रवास स्कूटीवरून यशस्वी(ते माझी आठवण ठेवल्यामुळे!) पूर्ण केल्याबद्दल अभिनन्दन:-)

Lalu
Wednesday, July 26, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धमाल केलेली दिसते. हे सगळे वाचायला बरेच दिवस लागतील, पण एकूण अंदाज आला. :-)
वाकड्या, paragraph टाकत जा रे लिहिताना! डोळे फिरले! ~D


Ami79
Thursday, July 27, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रुप वर फोटो खुपच कमी आले आहेत. जरा लवकर फोटो टाका

Yog
Thursday, July 27, 2006 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wakadya,
भन्नाट रे बाबा.. एकन्दरीतच तू घराबाहेर पडलास (प्रवासाला) की बरच काही घडत अन त्यातून व.वि. म्हणजे सोने पे सुहागा.. :-)

Limbutimbu
Friday, July 28, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववि वृत्तान्त (अर्थात लिम्ब्याच्या दिवसाउजेडी स्वप्नातला)
बराच काळ कोणच हिथ लिवत नाही म्हणल्या वर म्हणल की मैदान मोकळ हे तर हात साफ करुन घ्यावा!
तर २३ जुलै रोजी श्रीवर्धनचे क्रिष्णमहाराज आपल्या रथात बसुन असेच मौजे महाडच्या दौर्‍यावर निघाले होते. कृष्ण महाराजांची कामाबद्दलची आत्मियता येवढी की निष्काम कर्मभावनेचा जगाला उअपदेश करुन झाल्यावर त्याच प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ते स्वतःही २३ रोजीचा ववि टाळुन वैश्विक कामानिमित्त महाडच्या दौर्‍यावर आकाशगामी रथाने चालले होते.
पण का कोण जाणे, दोन दिवसावर आलेली अवस, षष्ठातला चन्द्र वगैरे बाबी विचारात न घेतल्यामुळे निघतानाच त्यान्च्या रथाचे सारथ्य करणारा कोणतरी दुसराच निघाला तेव्हा "कुठाय तो (नेहेमीचा) ड्रायव्हर" अशी कलीयुगातली एकवीसाव्या शतकाला साजेशी विचारणा श्रीकृषानी केली तेव्हा त्यान्ना उत्तर मिळाले की त्यान्चे नेहेमीचे ड्रायव्हर अर्थात सारथी, आगामी दिवली अवसेच्या पूर्वतयारीत आणी आराधनेत व्यस्त हेत व त्यान्चे काल रात्री लागलेले ध्यान अजुन पूर्ण उतरले नाही, तेव्हा बदली ड्रायव्हर वर काम साम्भाळुन घ्यावे असे अमात्यान्नी सुचवले, कृष्ण महाराज उद्गारले, मी घेतोच साम्भाळुन, पण या सारथ्याला म्हणाव, नुकताच माया सन्कृतीच्या देशातुन मयासुराकडुन बनवुन आणलेला हा इस्पेशल रथ हे, तो नीट पणे साम्भाळुन ने.
श्रीकृष्ण रथात स्थानापन्न झाले, सोबत दास दासी, सख्या अर्थात सेक्रेटरी होत्या, रथ जोवर रस्त्यावरुन धावे तोवर त्यास चाके असत व जसे तो उड्डाण्ण करी, ती चाके रथाच्या पोटात घेतली जावुन मागे धुम्रकाण्डी सोडत तो रथ मार्गक्रमण करु लागे. रथ निघाला, बहुदा या सारथ्याने देखिल दिवली अवसेची आराधना थोड्याफार प्रमाणात केली असावी कारण त्याचे डोळे अर्धोन्मिलित होते.
इकडे कृष्ण महाराज निश्चिन्त होवुन आपल्या दास दासीन्ना व शख्यान्ना विश्वाचे कोडे उलगडुन सान्गु लागले व सख्या ते कळफलकावर उतरवुन घेवु लागल्या. मधेच वैचारीक अतिश्रमाअने कृष्णमहाराजास थोडी ग्लानी आली तेव्हा सोबतच्या सख्या त्यान्जवर चवरी ढाळु लागल्या तर काही त्यान्चे पाय चुरू लागल्या. हवेत कसा नुकताच पडलेल्या पावसामुळे मातीचा गन्ध दाटला होता. मनातल्या मनात कृष्ण महाराज केव्हाच महाडला पोचले होते.
थोड्याच वेळात महाडच्या आसमनात भरुन रहाणारा तो उग्र रासायनीक दर्प कृष्णाच्या नाकपुड्यान्ना जाणवल्याने नाकपुडी थरथरवीत त्यान्ना जाग आलि. अवकाशातुन खाली बघतात तो काय?
कुठेच काही ओळखीचे दिसेना. कृष्ण महाराजानी सेवकास आज्ञा केली की जा सारथ्यास विचारुन ये की आपण नक्की कोणत्या प्रान्तावरुन चाललो हे! सेवक जावुन विचारुन आला व म्हणाला
सारथ्याने क्षमा मागितलि हे महाराज, आपण साडे एकोणचाळीस अन्श उत्तरेकडे वाट चुकल्याने महाड ऐवजी मौजे कर्जत येथे पोचत आहोत, येथे रथ उतरविण्यास सुयोग्य जागा निवडण्यासाठी रथ अवकाशात घिरट्या घालतो आहे.
श्रीकृष्णाने कपाळावर हात मारुन घेतला व हे मागिल युगातील अवतारात अर्जुनाकरता केलेल्या सारथ्याचे कर्मफल असावे अशी मनाची समजुत घालुन घेतली. तेव्हड्यात सारथ्यास खाली एक सुरचित वनश्री युक्त प्रदेश दिसला जिथुन निरनिराळ्या पदार्थान्चे मसालेदार खमन्ग सुवास वर येत होते. त्या वासान्च्या अनुरोधाने सारथ्याने रथ उतरवयास सुरुवात केली तेव्हा त्यांस मोदि रिसॉर्ट नामक एक नामपट्टीका दिसली.
वाट चुकली हे मागिल जन्मीच्या अर्जुनाला केलेल्या सारथ्याचे कर्मफळ जरी असेल तरी समोरील महालातुन येत असलेले अन्नपदार्थान्चे घमघमाट हे कशाचे कर्मफल असावे याचा विचार करीत श्रीकृष्णानी सारथ्यास आज्ञा केली की रथ नारिकेल फलाच्या झाडावर शेन्ड्यावर उतरवुन दास दासिन्सह तिथेच विहार करावा जोवर आम्ही परत येत नाही. जी हुजुर असे म्हणुन सारथ्याने रथ अलगद नारिकेल फलाच्या उन्च गगनचुम्बी वृक्षावर अलगद उतरविला. अन्गावरील शेला सावरीत, कमरेस गुन्डाळलेल्या पिताम्बराचा कासोटा सोटुन एक पाय गुढग्यात वाकवुन एक हात मागे नेवुन व एक हात फुढुन असे करीत पुन्हा एकदा कासोटा घट्ट बसवुन कृष्ण महाराज आपला सुक्ष्म देह धारण करुन त्वरेने त्या महाला कडे निघाले तेव्हा त्यान्च्या हातात एका बोटावर सुदर्शन चक्र गरगरा फिरत होते व त्या चक्राला भिन्गरी समजुन लिम्बु लटकले होते व मजेत गिरक्या घेत होते!
क्रमशं (अर्थात मूड लागलायास)
:-)

Soultrip
Friday, July 28, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे लिंबु! ... लवकर येऊ दे पुढील भाग!

Himscool
Friday, July 28, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बुभाव लवकर पूर्न करा ही किसनाची सफर...

Yogi050181
Friday, July 28, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रमशं (अर्थात मूड लागलायास) >> म्हनजी हात बराच मोठा हाय की.. साफ करायला लई येळ लागेल.. टायपुन टाका पुढची श्री क्रिष्ण गाथा म्हनजी चावी-फळा पण साफ व्हईल.. छान लिवलस :-)

Limbutimbu
Friday, July 28, 2006 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववि वृत्तान्त (अर्थात लिम्ब्याच्या दिवसाउजेडी स्वप्नातला)
महालात शिरल्यावर कृष्णभगवानाना आत अजुन एक महाल दिसला तिकडे ते उडत उडत कुणाच्या नजरेस न पडता जावू लागले असता मधेच कशाला तरी अडखळले, तेव्हा सुदर्शन चक्राला लटकलेल्या लिम्ब्याने कृष्णाच्या कानात सान्गितले की हे कृष्णा, हिर्‍या पेक्षा रत्नापेक्षा जास्त पारदर्शक अशा काचेचा हा दरवाजा हे व ही निर्मिती मानवाची हे! कृष्ण म्हणला, हे शक्यच नाही, बहुतेक पुर्वी पान्डवान्साठी मयासुराने निर्मिलेल्या महालाचे मन्त्रज्ञान मानवान्नी कचाप्रमाणे चोरले असावे. ही बातमी मयासुराला कळविण्याचे ठरवुन कृष्ण आपल्या अतिन्द्रिय शक्तीन्चा वापर करीत दरवाजातून आरपार गेले. लिम्बू त्यान्च्या सुदर्शन चक्रावर असल्याने जरी त्यास त्या शक्ती प्राप्त नसल्या तरी तेही गाड्यामागुन नळ्याची यात्रा तसे काचेपार झाले.
आत जिकडे तिकडे मेज व काही उन्च पाय असलेले चौरन्ग ठेवलेले होते ज्यावर बसुन काही मानव प्राणी समोरील मेजावर ठेवलेल्या थाळीत अन्नपदार्थ छोट्या लाम्बट डावेने व छोट्या त्रिशुळान्च्या सहाय्याने ग्रहण करीत होते. काही जण आपापल्या हातात त्या पान्ढर्‍या थाळ्या घेवुन जवळच्याच मेजावर ठेवलेल्या घमेल्यातील अन्नपदार्थ थाळित काढुन घेत होते, त्यासाठी साधुबैराग्यान्कडे असतो तशा चिमट्यासारखा पण लहान चिमटा वापरत होते. कृष्णदेव ते दृष्य पाहुन आणि तेथिल अन्नपदार्थान्च्या वासाने अतिप्रसन्न झाले
मधेच त्यान्चे लक्ष छताकडे गेले तो काय! तेथे नेहेमीच्या हन्डी झुम्बरे अशा सरावातील गोष्टी न दिसता प्रखर तेजाने झळकणारे काही तरी बर्‍याच सन्ख्येने होते ते बघितल्यावर श्रीकृष्णाच्या पोटात गोळाच आला व ते तडक एका तेजोमय वस्तु पाशी जावुन विचारते झाले की हे सुर्य देवा, हे सृष्टीच्या प्रकाशदात्या अरुणा, काय रे ही काय तुझी गत की तू तुझ्या सप्ताश्वान्च्या रथातुन विश्वभ्रमण करण्या ऐवजी येथे एका जागी कैदेत पडला हेस? बोल बोल कुणी हे कृत्य केले ते मजला सान्ग मी त्याचा माझ्या सुदर्शन चक्राने नायनाट करतो.... त्या तेजोगोला कडुन काहीच उत्तर येत नाही असे पाहील्यावर श्रीकृष्ण अधिकच सम्भ्रमित झाले व बहुतेक त्या दुष्ट मानवान्नी प्रत्यक्ष सूर्यदेवास कामास लावताना त्यास बहिरेहि केले असावे अशी शन्का येवुन तो कृष्ण त्याचे सुदर्शन चक्र आता रागाने गतीने फिरवणार तोच, सुदर्शनचक्राला लटकलेला लिम्ब्या बेम्बीच्या देठापासुन कळवुळन ओरडला, थाऽऽम्ब थाऽऽम हे कृष्णा असा अविचार करु नकोस! तू सुदर्शन जोराने फिरवलेस तर मला त्याची गती सहन न होवुन मी भुमीवर कुठेतरी भिरकावला जाईन आणि तुजप्रती असलेल्या प्रेमामुळे मला तुझा हा जो सहवास घडत हे त्यात अडथळा निर्माण होइल, तेव्हा हे कृष्णा, नीट विचार करुनच कृती कर. कर्मफलाचा विचार तुला करण्याची गरज नसली, ते परमात्म्याच्या हातात असले तरी करत्या कृतीचा विचार करण्याचे बन्धन तुजवर हे हे तू विसरु नकोस!
क्षणभर श्रीकृष्ण लिम्ब्याच्या त्या उपदेशाने प्रथम चपापला, मग भारावुन जावुन बोलला, की हे पीतवर्णी, उत्साही, इतुकल्या लिम्बा, तुझ्या रन्गाप्रमाणे तू सावधानतेचा इशारा देण्याचे जे सुकृत्य केलेस त्यास तोड नाही, मला तू कर्मफलाच्या वैचारीक गोन्धळापासुन मुक्त केल हेस तेव्हा हे वत्सा बोल, मी तुला काय वर देवु? नम्र भावनेने, पण लटकलेला असल्याने दोन्ही हात सोडुन नमस्कार करता येत नसल्याने डाव्या हाताने लटकते राहुन उजव्या हाताने सन्घी प्रणाम करुन लिम्बू बोलते झाले की हे विश्वाच्या पालका, हे जगन्नाथा, तुझी लिला अगाध हे, मी पामर तुला काय सावध करणार, पण हे जगन्मित्रा, मला वर देतो हेच तर कृपया एक काम कर, मी अदृष्य रुपात राहू इच्छीतो, तर काही नर माझे मागे हात धुवुन लागलेत त्यान्ज पासुन माझे सन्रक्षणाची हमी तू घेशील काय? त्याकरता तुला एकच करावे लागेल की मजसन्निध तुला नित्य रहावे लागेल, किन्वा उलट बाजुने, तुझ्या सन्निध मला नित्य ठेवावे लागेल जेणे करुन पृथ्वीवरील काही पामर नर माझ्या अदृषतेचे कवच भेदु शकणार नाहीत. येवढी किरकोळ मागणी ऐकुन शिष्टाइमधे पारन्गत असलेल्या राजकारणी श्रीकृष्णास हसुच आले व तो त्वरेने तथास्तु असे उद्गारला. तिकडे आकाशातुन ब्रह्मदेवादीक देव गन्धर्व यान्नी मात्र आपल्या कपाळावर हात मारुन घेतला व इथुन पुढे कृष्णाच्या माथ्यावरील मोरपिसासोबत हे पिवळे पिवळे लिम्बूही नित्य बघायला लागणार या कल्पनेने त्यान्चा जीव वरखाली होवु लागला, पण या सन्कटातुन सुटण्याची ही योग्य वेळ नाही असे जाणुन घेवुन विश्वनिर्मात्या ब्रह्मदेवाने सबुरीचे धोरण अवलम्बिणे पसन्द केले. शेवटी लिम्बू ही देखिल त्याचिच एक निर्मिति होती.
इकडे कृष्णाच्या तथास्तु म्हणण्याने अत्यानन्दीत झालेला लिम्ब्या सुदर्शनचक्राला लटकुन गिरक्या घेत असतानाच कृष्णाच्या कानाजवळच कधीतरी रेडिओवर ऐकलेले गाणे "कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता" हे पद किन्चाळत आळवुन आळवुन म्हणत होता, व नुकतेच ज्याला आपण नित्य सानिध्य रहाण्याचे वचन दिले त्या लिम्ब्याचा तो प्रताप ऐकुन कानात बोटे घालायला आपल्या कोणत्या हाताचा वापर करावा या चिन्टेत कृष्ण पडला होता.
पण तेवढ्यात त्यास तेथिल पदार्थान्च्या वासामुळे भुकेची जाणिव होवुन व लिम्ब्याच्या या कानाजवळच्या किन्चाळण्यापासुन सुटका व्हावी म्हणुन त्याने लिम्ब्याजवळ प्रस्ताव ठेवला की हे लिम्ब्या, सुक्ष्म देह धारण केलेल्या आपण येथेल मानवी पदार्थान्ची चव चाखावी काय?
लिम्ब्या नेहेमी प्रमाणेच विचारात पडला! का रे कृष्णा? यातील कुणीच तुला नैवेद्य दाखविला नाही हे का? कुणीच जेवायच्या आधी तुझी आठवण काढली नाही का? असे असेल तर हे कृष्णा, हो सज्ज, उठव तुझ्या त्या रिद्धि सिद्धिन्ना, आणि येथिल तमाम अन्नपदार्थ गिळन्कृत करुन टाक, आणि मग बसुदे बोम्बलत येथिल नरान्ना, तुझी आठवण न काढता गिळायला सुरुवात करतात म्हन्जे काय?
बिचार्‍या कृष्णाला गेल्या युगात अर्जुनाला केलेला उचल तो धनुष्य हा उपदेश आठवला!
पण त्याचबरोबर मी कधिच हातात शस्त्र घेणार नाही असे दिलेले वचनही सोइस्करपणे आठवुन तो लिम्ब्याला म्हणाला, अरे कशाला ही हातापाही? प्रुथ्वीवरील या मानवान्प्रमाणे आपणही सर्वधर्मसमभावी बनले पाहीजे, अरे नसेल त्यास माझी आठवण झाली, किन्वा नसेल काढायची त्यान्ना माझी आठवण, पण त्याने काही बिघडते का? आपण स्वावलम्बी बनायला शिकले पाहीजे, हे बघ लिम्ब्या, एकतर मी नेहेमी उपदेशकाच्या, सल्लागाराच्या भुमिकेत असतो तेव्हा तुला जर माझे सानिध्य नित्य हवे असल्यास तुला माझा श्रोता बनावे लागेल! लिम्ब्या पुढे हो म्हणण्यावाचुन पर्याय नव्हता, सत्य द्वापात, त्रेता इत्यादीक युगातील राजकाणात मुरलेल्या श्रीकृष्नाने एका दगडात दोन पक्षी मारले, पक्षी, लिम्ब्याचे कानाजवळचे किन्चाळणे ऐकण्यातुन मुक्तता झाली आणि कलीयुगात एक हमखास हक्काचा श्रोता मिळाला!
तेव्हा ते दोघे सुक्ष्म देहरुपात पुढे होवुन आपापली थाळी उचलुन एकेक पदार्थ थाळित आणि वाडग्यात घेवु लागले.
क्रमशः

मॉड्स, ह्या पोस्ट्स कदाचित ललित वर ठीक असत्या, पण.... सद्ध्या इथे कोणीच लिहित नसल्याने वविचा हा काल्पनिक वृत्तान्त येथे राहु द्यावा व योग्य वेळेस योग्य ठिकाणि हलवावा ही नम्र विनन्ती! :-)
सौल, हिम्स, योगी, थोडक्या आवरत घेतो, पर ही पोस्ट जरा लाम्बली, आता झालच तर किस्नाला गेम मधुन, स्विमिन्ग टॅन्क मधुन, धबधब्यातुन वगैरे फिरवुन आणायचा तर लौकर लौकर आटपल पायजेल, हो की नाही?
:-)

Moodi
Friday, July 28, 2006 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या लिंब्या तुझा वविचा कल्पना विस्तारच एवढा भन्नाट आहे तर प्रत्यक्ष वविला हजर राहिला असतास तर काय केले असतेस रे?

कृष्णाचा रथसारथी कोण रे?
काटा चमचा अन सूरीसाठी मस्त उपमा वापरल्यास. छोटा त्रिशूळ वगैरे...

आता एक कल्पना चित्र पण काढ.


Limbutimbu
Friday, July 28, 2006 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववि वृत्तान्त (अर्थात लिम्ब्याच्या दिवसाउजेडी स्वप्नातला)
सर्वप्रथम एक गाड्याच्या चाकाप्रमाणे पण मधे भोक असलेला कडक लालसर लहान आकाराचा पदार्थ दिसला तो दोघान्नीही वाढुन घेतला, लिम्ब्या जात्याच चौकस असल्याने तो इतर मानवी नर काय कसे करतात याचे निरीक्षण त्याने आधीच करुन ठेवले असल्याने त्याच्या साठी गोष्टी बर्‍याचश्या सोप्या झाल्या होत्या, इकडे कृष्णास त्या पदार्थाच्या कडकपणाचे रहस्य उलगडत नसल्याने तो लिम्ब्याला विचारता झाला की हे लिम्ब्या, या मानवी बल्लवाचार्‍यान्नी हा पदार्थ कशापासुन कशाप्रकारे कोणत्या मन्त्रसिद्धीद्वारे तयार केला असावा? याचा वास तर खुपच खमन्ग येतो हे इतका की पेन्द्याची पोह्यान्ची पुरचुन्डी देखिल फिकी पडावी.
लिम्ब्या म्हणाला मी नाही सान्गणार ज्जा! मी सान्गितल तर तू श्रोता नाही का बनणार? आधि मला मगाचच्या वचनातुन मुक्त कर पक्षी मला तुझ्या सुदर्शन चक्राला लटकत तुझ्या स्तुतीचे गाणे म्हणता आले पाहीजे आणि वेळेला तुला सावधगिरीचे मित्रत्वाचे सल्लेही देता आले पाहीजेत, बोल आहे तयारी?
ज्ञानपिपासु कृष्णास त्याक्षणी तरी हो म्हणण्यावाचुन पर्याय नव्हता. त्याने परवानगी देताच लिम्बु उत्तरला, हे कृष्णा, द्वापारयुगापासुन कलीयुगात प्रवेश करेस्तोवर कुटने, भाजणे, शिजवणे, घुसळणे इत्यादीक पाकक्रियान्शिवाय कलीयुगातील मानव उर्ध्वपतन क्रिया, तळणे इत्यादिक क्रियातुन उत्साहवर्धक पेये व अन्नपदार्थ तयार करुन त्यान्चा स्वाद चाखू लागला. त्यातिलच हा एक टळलेला प्रकार हे! यास मानव प्राणि मेदु वडा किन्वा उडिदवडा असे म्हणतो. तो खाताना त्याजबरोबर साम्बार नामक डाळिन्ची आमटी व चटणी ही चविला घेतो.
कृष्ण प्रसन्न झाला व त्याने वाडगा भर साम्बार घेतले व दोन वडे नि चटणी आणि लहानगे डाव आणि तिशुळ घेवुन तो छपाराकडील मानवी सुर्याच्या बाजुला सोइस्कर जागा बघुन बसला. लिम्ब्याही त्याच्या मागोमाग पोचला.
लिम्ब्या? अरे हे मानव त्रिशुलाचा वापर असा का करतात बरे? हे भगवान शन्कराला कळले तर? तो किती क्रोधित होइल!
कृष्णा, त्याची चिन्ता तू करु नकोस, हे कलि युगातील मानवी प्राणि, ब्रह्मदेवानेच त्यान्ची बुद्धी अशी तिरकी केली हे की ते कोणत्याही प्रतिकाचा कुठेही कोणत्याही आकारात वापर करुन घेतात. सोय ही पहिल्यान्दा, बाकीचे नन्तर, तर त्यान्नी तिशुळाला हे काटेचमच्याचे रुप दिले आहे.
नाही नाही काटेवाडीच्या शरदचन्द्रान्चा आणि या काट्यान्चा काही सम्बन्ध नाही.
कृष्ण महाराज त्या लहानग्या डाव आणि त्रिशुळाने वड्याशी झगडुन त्याचे तुकडे तोडु लागले तो एक तुकडा लाम्बवर उडाला, ते पाहुन कृष्णाला लहानपणी यमुनेतिरी खेळलेल्या विट्टीदान्डु या खेळाची आठवण झाली. आणि गम्मत वाटुन त्यान्नी अजुन एक तुकडा तसाच लाम्बवर भिरकावला व वाट बघत बसले की हा लिम्ब्या तो तुकडा झेलायला पळेल. लिम्ब्या आपला तो वडा काटाचमच्याने तोडुन भराभर गिळण्यात मग्न होता. क्षणभर कृष्ण क्रोधित झाला पण मोठ्या तन्मयतेने इवल्या इवल्या हातानी इवले इवले तुकडे तोडुन तोन्डात कोम्बत असलेल्या त्या लहानग्या लिम्ब्यास पाहुन त्यान्चे मन उदारतेने मायेने अनुकम्पेने भरुन आले व क्षणापुर्वीच आलेल्या क्रोधाचा त्यास सन्ताप येवुन इथुन पुढे कधिही क्रोधित होणार नाही अशी परशुरामान्चे पिताश्री जमदघ्नी यान्चेप्रमाणे तो प्रतिज्ञा करणार तोच खाली उडालेल्या बर्‍याच गोन्ढळ गजबजाटाकडे त्यान्चे लक्ष वेधले गेले.
मगाच्या काचेच्या दरवाजातुन बराच मोठा मानवी प्राण्यान्चा घोळका आत प्रवेश करीत होता, एक मानव हातातल्या कागदावर नोन्द घेवुन एकेकाला आत सोडत होता, लगेच ते मानव प्राणी घाइ गर्दीने एकमेकान्शी हास्य विनोद करता करता पण तरीही थाळी उचलणे, वडा घेणे, साम्बार वाडग्यात घेणे, मेजाशेजारील चौरान्गावर जावुन बसणे व त्या त्रिशुळाचा वापर करीत खणे असे कार्यक्रम उरकत होते. त्यान्च्या अष्टावधानी कृतीतील कौशल्यापुढे क्षनभर मागिल युगातील त्याचा मित्र सव्यसाची हा देखिल फिका पडेल की काय अशी भिती त्यास वाटली आणि त्याने तडक सौदामिनीला आज्ञा देवुन विजान्चा कडकडात घडवुन आणला जो ऐकुन खणभर ते मानव जेव्हा विचलित झाल्याचे त्याने पाहीले तेव्हाच त्याने समाधानाचा निश्वास सोडला की अजुनही सव्यसाची अर्थात अर्जुनाला कोणीही तोडिस तोड नव्हत.
त्या मानवान्चे ते तसे खाणे पिणे हसणे खिदळणे अशी सर्व मौज पाहुन क्रिष्णाने लिम्ब्याकडे विचारणा केली की हे कोनत्या ग्रामातील गोप गोपी हेत?
लिम्ब्या कपाळावर हात मारुन घेत उद्गारला, हे अन्तर्यामी अन अन्तर्ज्ञानी कृष्णा, अरे कित्ती रे आळशी तू? हे सर्व जाणुन घ्यायला थोड तुझ ते अन्तर्ज्ञान की फ्यान का वापरीत नाहीस?
कृष्ण म्हणाला, हे मित्रा लिम्ब्या, अरे मी तुझ्या स्वर्वसामान्या ज्ञानाची परीक्षा गेत होतो! की तूला किमान माहिती तरी आहे की नाही?
लिम्ब्या म्हणाला, श्रीगणेशाच्या कृपेने कलियुगातील येचेस्सी पास झालो हे म्हाराज, तुम्ही विचारुन तर बघा!
बा कृष्णा, आता पुर्वी सारखी ग्राम राहीली नाहीत आणि जी हेत तिथे पुर्वीसारखी स्वच्छता गाडगेम्हाराज मोहिमेनन्तरही निर्माण झाली नाही तर तिकडे जाता येत नाही, हे सर्व गोप गोपी नसुन क्लर्क क्लर्की हेत!
क्लर्की हा शब्द ऐकताच कृष्णाच्या अन्गावर रोमान्च उभे राहीले वर तो लिम्ब्यास विचारता झाला की त्यात कोणी क्लर्की अर्थात कलीचा अवतार हे का?
चेहर्‍यावर महद गम्भीर भाव आणत लिम्ब्या उद्गारला, हे कृष्णा, कलीयुगात हे सर्वच मानव कलीचे अवतार हेत. तू या अवतारास प्रणाम कर, पण दुरूनच!
त्या सर्व गोपगोपिकारुपी भासलेल्या कलीअवतारांस प्रणाम करुन कृष्णाने वड्याच्या एक तुकड्याला त्रिशुळाने भोसकुन वर उचलुन त्यास साम्बारात डुबवुन बाहेर काढुन ग्रहण केला, व वर छोट्या डावेने साम्बार प्राशन केले तोच.....
तो ओय ओय असे ओर्‍अडुन विव्हळु लागला, लिम्ब्याला हा काय प्रकार ते सुरवातीस समजलेच नाही. जेव्हा कळले ते असे की गोकुळात दह्यादुधावर आणि चोरलेल्या लोण्याच्या खुराकावर पोसलेल्या कृष्णास कलीयुगातील हा जहाल मिरचीचा प्रकार माहीतच नव्हता, लिम्ब्याला आठवले की लहानपणी कुणाकडुन तरी ऐकले होते की सत्ययुगात मिरच्या देखिल गोद असायच्या!
सामोर्‍या आलेल्या गम्भिर परिस्थितिचा सामना करण्यासाठी लिम्ब्या पाणी शोधु लागला तर मेजावरील सर्व पात्रान्मधिल पाणी उष्टे असल्याने व कृष्ण म्हणजे शबरीची उष्टी बोरे खाऊ शकणारा राम नसल्याने, आणि त्या मानवप्राण्यान्नी शबरीसमान ते पाणी उष्टावले नसल्याने लिम्ब्या तत्काळ बाहेरील वहात्या झर्‍यावर पोचला व तेथुन त्याने एक छोटा डाव भरुन पाणी आणुन ते कृष्णाला पाजले. कृष्ण म्हणाला अरे वासुकीच्या विषाची देखिल मला धास्ती नव्हती येवढी या साम्बाराची बसली आहे... नको मला हे असले खाद्य. त्यापेक्षा स्वर्गातील अमृतच बरे! असे म्हणुन ते दोघेजण तेथुन बाहेर निघाले, खाली जमलेला गोप गोपीकान्चा थवाही रमत गमत बाहेर पडला होता, कृष्नाने त्यान्च्या मागे मागेच जायचे ठरवुन जावु लागला, लिम्ब्या नेहेमीप्रमाणे सुदर्शनचक्राला लटकुन गिरक्या घेत घेत कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहिण बन्धु चुलता...कृष्ण माझा सखा. हे पद आळवुन आळवुन म्हणत होता!

क्रमशः (बहुतेक उद्या)
:-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators