हितगुजकरानो, गणेशोत्सवाला अवघा महिना बाकी आहे. तेव्हा यंदाच्या हितगुज गणेशोत्सवाबद्दल आपापल्या कल्पना, सूचना इत्यादि इथे लिहा. गणेशोत्सवाच्या संयोजनात ज्यांना सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी तसं इथे किंवा Mods ना email करुन कळवा. धन्यवाद!
|
गणेशोत्सवाचे व्यवस्थापन कसे होते याची माहिती इथे पहा .
|
गणपती बाप्पा मोरया!! नेमस्तक, माझी गणेशोत्सव मंडळाच्या संयोजक मंडाळात सहभागी होण्याची ईच्छा आहे.
|
Maitreyee
| |
| Saturday, July 22, 2006 - 11:24 am: |
| 
|
KP तुला email केली आहे ती पहा..
|
स्पर्धां साठी , ' आत्मवृत्त लेखन स्पर्धा ' कोणाचे / कशाचे आत्मवृत्त लिहायचे ते judges नी किंवा समितीने ठरवावे .
|
>>>>> कोणाचे / कशाचे आत्मवृत्त लिहायचे ते judges नी किंवा समितीने ठरवावे . दुसर्याच आत्मवृत्त आपण कस लिहायच? की शाळेत जस निबन्ध लिहायला सान्गायचे की कन्डक्टर, बस, झाड, पक्षी अशा कशाचे ही आत्मवृत्त लिहायला सान्गायचे, ते अपेक्षित हे? 
|
लिम्बुतिम्बु तु खरच लिम्बुतिम्बु आहेस का रे?
|
>>>> लिम्बुतिम्बु तु खरच लिम्बुतिम्बु आहेस का रे? बोंबला, हा काय प्रश्ण झाला? अग सगळेच विशिष्ठ परिस्थितीत लिम्बुटिम्बु असतात, नव्हे नव्हे, तसे बनायलाही लागते. सगळ्यांच्यात एक बारकुस्से खोडकर लिम्बु दडलेले असते, ते खोडकर असले, मिश्कील असले तरी तसे घाबरटही असते. उपलब्ध परिस्थितीत कणाकणाने आनंद शोधणारे, दुष्कर परिस्थितीत "टाईम प्लीज" किन्वा "टॅम्प्लीज" म्हणत पुन्हा प्रयत्नपुर्वक झटण्यासाठी दोन पावले मागे हटणारे प्रत्येक व्यक्तिमत्वात लिम्बुटिम्बु असतो. तसाच मीही हे! 
|
DJ चांगली कल्पना आहे. इडली ऑर्कीड आणि मी हीट झाल्यापासून सध्या व्यावसायिक आत्मचरित्र लिहायचे पेव फुटले आहे.(जसे पूर्वी आहे मनोहर तरी नन्तर तमाम लेखकांच्या बायकांनी लेखणी सरसावली होती. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे त्या त्या नोकरी व्यवसायातील वेगवेगळे अनुभव वाचायला गम्मत वाटते. तर आपापल्या नोकरी व्यवसायाशी संबन्धीत लिहायची स्पर्धा ठेवता येईल. म्हणजे आत्मवृत्त असले तरी फार personal details नसले तरी चालते.
|
Soultrip
| |
| Wednesday, July 26, 2006 - 6:07 am: |
| 
|
ए.भा.प्र: हितगुजचा गणपती कोठे बसवितात पुण्यात? कि, तो e-Ganapati असतो?
|
Bee
| |
| Wednesday, July 26, 2006 - 6:27 am: |
| 
|
सोल, इतर भागातही बसतो गणपती.. फ़क्त पुण्यातच नाही काही असो.. इथे ई-गणपतीच असतो दरवर्षी. रोज पूजा अर्चा आणि आरत्या होत्यात. शिवाय सांस्कृतीक कार्यक्रमही होतात. तेंव्हा आपल्या सारख्या भक्तजनांनी ह्या सोहळ्याचा लाभ घ्यावा. डीजे, छान कल्पना आहे खरचं. माझी एक कल्पना अशी आहे की माझे अनुभव मध्ये न आलेले विषय निवडायचे आणि त्यावर काहीतरी खुसखुशीत लिहायला सांगायचे. पण हे सर्व लेखन जर इथेच झाले तर दिवाळी अंकावर त्याचा परिणाम व्हायला नको तेंव्हा स्पर्धात्मक कार्यक्रम ठेवलेत तर बरे होईल.
|
सोलट्रीप हितगुजचा गणपती प्रत्येक हितगुजकराच्या मनात वसतो. (लय भारी वाक्य आहे नं?) तर तो e-ganapati असतो. आणि त्या निमित्ताने हितगुजवर सर्व हितगुजकरांना भाग घेता येईल अशा स्पर्धा कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. या आधीचे हितगुज गणेश उत्सव (HGU) इथे बघायला मिळतील.
|
आत्मवृत्त कशाचेही असू शकते ! एखाद्या जिवीत किंवा मृत व्यक्तीचे किंवा निर्जिव वस्तूचेही ! जसे : मुंबई च्या लोकल ट्रेन चे एखाद्या सम्रुद्राचे खड्ड्यात अडकलेल्या पाच वर्षाच्या प्रिन्स चे ! किंवा अगदी ओसामा बिन लादेन चे ! जो subject दिला आहे ती व्यक्ती किंवा वस्तू तुम्ही आहात हे समजून तुमचे मनोगत लिहिणे म्हणजे आत्मवृत्त .
|
चान्गला विषय हे ग दीपान्जली मागल्या बारीला कवितेवरुन चित्र होती, त्या आधी चित्रावरुन जोडनावे, चारोळी अस कायतरी होत, या बारीला कथेवरुन चित्र अस करता यील का? एक दोनच कथा ठेवायच्या म्हणजे गर्दी होणार नाही, चारोळ्यांकरता पाचसहा चित्रे ठीक होती, कथेकरता एक दोनच पुरेत अस वाटत
|
Soultrip
| |
| Wednesday, July 26, 2006 - 8:39 am: |
| 
|
तर तो e-ganapati असतो.>>>>> खरे-खुरे (आणि च-क-ट-फु!) मोदक खाण्याचा एक chance मुकला
|
अस कस होईल सोल... ई-मोदक पाठवतील ना मंडळं!
|
Yogibear
| |
| Wednesday, July 26, 2006 - 1:18 pm: |
| 
|
एक विनंती: नेहेमी प्रमाणे 'STY' असेलच अशी आशा आहे पण 'कथानक' किंवा theme अशी असावी की ती जास्तित जास्त मंडळींच्या माहितितली असावी म्हणजे मधुन कुठुनही वाचण्यास सुरुवात केली तरी कथानकाची link सहज लागेल...! e.g.: १. महाभारत २. रामायण ३. नल दमयंती ४. रंग दे बसंटी (चित्रपटाची कथा) ५. हेर फेरी (चित्रपटाची कथा) वगैरे....
|
Moodi
| |
| Wednesday, July 26, 2006 - 1:35 pm: |
| 
|
योगीला पूर्ण अनुमोदन. कारण आमच्यासारख्या वाचकांना कथा वाचतांना संदर्भ लागले पाहिजेत. खूप पात्रे आली की आधी काय चाललय याचा पत्ताच लागत नाही. गुलमोहरमधली STY खूप छान होती, पण मला वाटत संदर्भ न लागल्याने तिथे लिहीणार्या मायबोलीकरांचा पण उत्साह कमी झाला( वेळेचे कारण असेल पण खरच प्रथमला किती बायका अन त्याची किती रुपे हा गोंधळ तिथे जास्त वाटला) पाहिजे तर कथेत मधुन मधुन आपल्याला आवडतील अन त्या प्रसंगाला साजेशी असतील अशी गाणी( अंताक्षरीवर २ ओळीत लिहीतो तशी) लिहीली तरी चालेल.
|
Asami
| |
| Wednesday, July 26, 2006 - 2:32 pm: |
| 
|
STY ची खरी मजा हा गोंधळच तर असतो ना पण ? YB theme माहितीची असावी म्हणजे नक्की काय कळले नाही मला. सुरूवातीचे post सोडले तर उरलेल्या गोष्टींवर control फ़ारसा नसतोच ना ? त्यामूळे मधे वाचणार्याला link लागणे तसेही कठीन असते. मूळात तशिही संगती कमीच लागते कि रे. STY मधे झालेली गोष्ट rewrite होत नसते, त्यामूळे अगदी माहितीची theme घेतली तरी ती कुठे जाइल ते ठरवणे निव्वल अशक्य आहे. संयोजक मधे गाडी थोडिग्फ़ार रूळावर आणु शकतात पण thats it . मला वाटते ह्याच विषयावर shrini आणी कोणाचे तरी बोलणे नाट्य STY मधे झाले होते.
|
Maitreyee
| |
| Wednesday, July 26, 2006 - 2:32 pm: |
| 
|
STY चे असएच असते!! कुठलीही कथा घ्या, लिहिणारे ती अशी फ़िरवतात की कुठूनही वाचायला घ्या, संदर्भ लागत नाहीच आणि ती कथा खरं तर वाचणार्यांपेक्षा लिहिणारेच Njoy करतात!
|