Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 26, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Mumbai » वर्षा विहार - २३ जुलै २००६ - कर्जत » Archive through July 26, 2006 « Previous Next »

Milya
Tuesday, July 25, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षाविहार वृत्तांत -- 'वाचाल तर वाचाल'

एप्रिल अखेर पहीला वळीव पडतोय न पडतोय तोवरच मायबोलीवर ववि विषयी चर्चेला हळुहळु तोंड फ़ुटु लागले. मे महिना आला आणि संयोजकांनी वविची तारीख जाहीर केली आणि ह्या चर्चेत रंग भरु लागले. ह्या व.वि. ला आपण काय काय करायचे?, कसे जायचे?, कोण कोण असतिल? बाहेरगावाहुन कोण कोण येणार? कोण कोण न आलेले बरे? अश्या चर्चा वेगवेगळ्या पारांवर (पक्षी बीबी) रंगु लागल्या

शेवटी येणार येणार म्हणून गाजत असलेला व.वि चा दिवस येउन उजाडला.. आदल्या रात्री झोप आली नाहीच... एकतर excitement ( excitement ला मराठीत काय म्हणतात बरे? पुढच्या शब्दशोध साठी उपयोगी पडेल) होती आणि थोडी धाकधुकही. धाकधुक अश्यासाठी की स. सा. (सांस्कृतिक समिती) चा सभासद असल्याने लोकांना स.सा ने योजिलेले कार्यक्रम कितपत आवडतील ह्याची आणि नाही आवडले तर घेतलेले कष्ट वाया जातील की काय ह्याचीही.. *(तसे काही फ़ार कष्ट घेतले नव्हते म्हणा पण काय करणार? software मध्ये आल्यापासुन काम करायची सवयच गेलीय ना!!!. तसे घरी बरेच करावे लागते.. पण ~ तो. भा. वे.) एकतर आदले दोन दिवस म्हणी आणि रस्त्यावरील सार्वजनिक वाक्ये आठवुन डोक्याच अगदी भुंगा (भुंगा का भुगा हो? एक सी, .... सी for शिंपल... प्रश्ण) झाला होता....

ह्या सार्वजनिक वाक्यांनी तर फ़ार वैताग आणला बुवा... रोज ऑफ़िसला जाताना मी गाडी चालवतोय समोर आणि बघतोय तिसरीकडेच.. कितीदातरी ह्या नादात मी red signal असुन जागीच शुंभासारखा उभा राहिलो आणि लोकांच्या शिव्या खाल्या...एकदा तर चक्क फ़ाटक-अण्णांनीच मला असे पाहिले आणि वैतागुन ' Driver कोन हाय?' असा प्रश्ण विचारला. बस वर काही लिहिलेले दिसले की कर पाठलाग, ट्रक वर काही दिसले की जा त्यच्यामागे असे करत करत सर्व पुण्यात मी किती हिंडलो असेन हे एक पुण्यातले खड्डेच जाणोत... एकदा असेच ऑफ़िसला जाताना एक रिक्शाच्या मागे काहितरी लिहिलेले दिसले आणि मी तिच्या मागे भरधाव गाडी सोडली. जायचे होते येरवड्याला आणि पोचलो हडपसर ला.. तिकडे आमचे अजुन एक ऑफ़िस आहे म्हणुन वेळ निभावली गेली एवढेच नाहीतर काही खरे नव्हते.. येरवड्याच्या ऑफ़िसमधुन उचलुन लोकांनी मला शेजारीच जेल मध्ये टाकले असते.. अहो चालतानाही तेच.. चालता चालता, आजुबाजुच्य भींती पाहता पाहता मी किती तरी जणांना धडकता धडकता वाचलोय..(त्यापेकी काही सुंदर अडथळ्यांना धडकण्यापासुन का वाचलो असा एक प्रश्णही पडला पण काय करणार दैव देते अन कर्म नेते दुसरे काय? आणि आमचे कुठले एवढे नशीब कि कुणी आम्हाला तुळशीबागेत stove आणायला पाठवेल?)... जाउंदे हे पाट्यापुराण आता बंद करतो नाहीतर DC मध्ये भाग घेतलेला कुणीतरी म्हणायचा काय उगाच नमनाला घडाभर तेल?

तर सांगायचा मुद्दा असा की अशी धाकधुक मनात बाळगतच रामप्रहारी उठून किमया गाठले तर काय.. सर्व मंडळी जमुन आमचीच वाट पहात होती. खरे तर तिथेच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली कारण सुरुवात नेहमीसारखी झाली नव्हती. बस पासुन आतिल मेंबरांपर्यम्त **[कोण ते मेंढरे म्हणतेय रे.. व.वि ला ना आलेल्यांपेकीच असणार नक्की कुणितरी.. जळलं मेले लक्षण] सगळे कसे वेळेवर हजर.. आम्हालाही उशिरा आल्याबद्दल संयोजक काही बोलले नाहीत (बोलुन सांगतील कोणाला... म्हणी आणि वाक्ये माझ्याकडे होती ना!!!).

बस चक्क वेळेवर सुटली आणि हळूहळू गप्पांना तोंड फ़ुटले... इकडे श्रीयुत अरुण आजोबांचा भावी-नवदांपत्यांना 'मौलिक मार्गदर्शन' करणे हा एककलमी कार्यक्रम सुरु होताच. आम्ही बाकीचेही त्यांना थोडाफ़ार हातभार लावत होतो. मग थोड्याच वेळात 'नेमेची येतो मग वर्षा विहार' च्या चालीवर अंत्याक्षरी सुरु झाली.. अंताक्षरीमध्ये दोन्ही बाजुनी लावणीसम्राज्ञी दिमडू ह्या एकट्याच गात होत्या.. अधुन मधुन आम्ही बाकीचे पण खेळतोय हा आभास व्हावा (१. आरसा आणि भूत का आठवतेय मला?) म्हणुन शेवटचे अक्षर काय आहे हे पण सांगत होत्या... फ मोठ्ठ्या हिरिरीने मध्येच गाण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा 'बोलवता धनी' कुणीतरी वेगळाच असल्याने त्याची दिमडूपुढे काहीएक मात्रा चालली नाही

आमचे driver साहेब गाडी इतकी हळुहळु चालवत होते ना की स्कूटीवरुन येणारे श्रीयुत वाकड्या महोदय पण आमच्या पुढे जातील की काय अशी शंका मला येऊ लागली.. पण नुकतेच 'अती घाई संकटात जाई', 'वेगाला आळा, दुर्घटना टाळा' अशी वाक्ये 'key-board' खालुन गेल्याने मी काही वाकडे बोलणे टाळले (मला तशीही वेडे-वाकडे लिहायची सवयच नाही.. माझे लिखाण कसे अगदी सरळ असते)

असो.. असेच गाता गाता गाडी कर्जत ठेसनात धडकली. तिथे चहा आणि वडे फ़स्त केलेल्या मुंबईकरांची गाठोडी गाडीत कोंबली आणि गाडीने about turn केले. (एकानेही पुणेकरांना विचारले नाही की तुमच्या साठी बांधुन घेउ का वडे म्हणून? कसले हे पुणेरी वागणे मुंबैकरांचे? शो. ना. हो. का तो 'जशास तसे' न्याय होता?)...((हे जे 'जशास तसे' वाले वाक्य आहे ना ते नंतर बायकोच्या सांगण्यावरुन घुसडले आहे.. उगाच मुंबईकरांशी पंगा कशाला घ्या? पुढच्याच आठवड्यात मुंबईला जायचे आहे)) आमच्या driver साहेबांनी आदल्या दिवशी आखाड आणि बुधवार दोन्ही एकत्रच साजरे केले होते वाटते कारण प्रत्येक चौकात ते रस्ता चुकत होते आणि U-Turn घेत होते. U-turn घ्यायला सुद्धा अगदी शोधुन शोधुन अरुंद जागा हुडकत होते.. एकदा तर त्यांनी U-Turn घेताना गाडी मागच्या डोंगराच्या इतकी जवळ नेली की आम्हा मागे बसलेल्यांच्या छातीत धडकीच भरली.. निसर्गाच्या कुशीत जायला लोक ट्रेक वगैरे करतात असे ऐकले होते पण आमचे driver साहेब असे बससकट आम्हाला निसर्गाच्या कुशीत नेतील असे वाटले नव्हते. बहुतेक driver साहेब 'मंडळाचे' सभासद असावेत..

शेवटचा U-Turn घेतला तिथेच एक म्हशीचा सांगाडा दिसला.. मोदी resort ला जेवलेल्यांचे असे हाल होतात की काय अशी अजुन एक कुशंका उगाचच मनात आली. त्या चुकचुकणार्या पालीला दूर हाकलेस्तोवर एकदाचे मोदी resort आले आणि आळोखे पिळोखे देत आम्ही पाय-उतार झालो.. एव्हाना दहा वाजत आले होते... स.मा. (संयोजक मंडळ) ने एवढ्यावेळेत पुणेकर वृत्तीला जागुन आम्हाला सकाळपासुन फ़क्त चहावरच बसवले होते... त्यातून स.सा. ने सांस्कृतिक शिस्तपालनाचा बडगा उगारुन लोकांना बस मध्ये काही दंगा, टीपी करुन दिला नव्हता त्यामुळे सगळ्यांनाच कधी एकदा स.सा. पासुन सुटका करुन घेतो असे झाले होते.. त्यामुळे बस मधुन उतरताच सगळे पटापट नाश्ट्याची सोय जिथे होती तिथे पळाले.. नचीलाही खूप भूक लागली असल्याने तो ही अगदी दुडूदुदू धावत आत गेला आणि मी हमालाचे कर्तव्य पार पाडू लागलो...

क्रमश:...........'शिस्तीचा बडगा सर्वांना'

तळटिपा :
* - ( कंसातिल वाक्ये ही मनातल्या मनात म्हणलेली आहेत)
** - [ ही बायकोने उघडपणे म्हणलेली वाक्ये आहेत] ... तसेही आमची बायको मनातल्या मनात म्हणायच्या भानगडीत पडत नाही सगळे काही माझ्या तोंडावरच म्हणते. आमचे धाडस होत नसल्याने आमचे बरेचसे मनातले मनातच रहाते

~ तो भाग वेगळा

१. भास शब्दासाठी शब्दशोध स्पर्धेत स्पर्धकाने वापरलेले क्लूज


Arun
Wednesday, July 26, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या : जबरी आहे रे .........

अरुण आजोबा !!!!!!! इथे ** टाकायला विसरलास की काय ??????? :-)


Kandapohe
Wednesday, July 26, 2006 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप, मीनू, वाकड्या, ईंद्रा, मिल्या सही लिहीत आहत.

ladies बायकांची बसण्याची व्यवस्था केली.>> जेन्ट्स बायका पण होत्या का? >>>
अनिलभाई, तुम्ही सुद्धा? तुम्ही पण माझा कीबोर्ड पळवलात?

ladies बायकांची >>
त्याचे काय आहे, त्याच्या (मागची) पार्श्वभुमी आपल्याला माहीत नाही ना. उगाच कशाला डोक्याला (Headache) करुन घ्यायचा. Arrangement ची व्यवस्था करताना स्टेशनवर एक काळा (ब्लॅक) बोर्ड पण दिसला असेल त्यांना... हुश्श सध्या तरी एवढेच शब्द आठवले.

Kmayuresh2002
Wednesday, July 26, 2006 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे मिल्या.. आगे बढो...:-)

Meenu
Wednesday, July 26, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या मस्त लिहीलस रे ....

Rajkumar
Wednesday, July 26, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप,मीनु,इंद्रा,वाकड्या सगळ्यांनीच वृत्तांत सही लिहीलेत..

मिल्याचाही जबरी.. सा.स. चा विजय असो..


Mepunekar
Wednesday, July 26, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Milya..sahi lihilayes!..
Mhashicha sangada baghun <<<.....HHPV
Wakdya tumche varnan vachun drushya dolyapudhe ubhe rahile...mastach..

Wakdya
Wednesday, July 26, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षाविहार वृत्तांत भाग चार - स्पर्धा आणि धमाल
धबधब्याकडुन येताना उशिर झाला असे वाटल्याने व नंतर नियमाप्रमाणे वेळेत न पोचल्यास जेवायला मिळणार नाही या भितीने आम्ही भराभर जाऊन हॉल मधे जेवण उरकुन घेतले होते, जेवण मिळाले नसते तर कर्जत चौक येथिल टपरीवर जाऊन काही खायचे व परत यायचे असेही चर्चेत ठरले होते, पण सुदैवाने तशी वेळ आली नाही.
या दरम्यानच कधीतरी राणा येवुन ऑळख करवु गेला होता, राणाशी खूप पुर्वी याहू वर बोललो होतो ते आठवले, तसेच नील वेदनेही ओळख करुन दिली. त्याच्या शी बोलायचा प्रामाणिक प्रयत्न मी केला पण का कुणास ठाऊक, मला धडपणे बोलता येत नव्हते, मधेच नीलने पाहिलेल्या माझ्या फेटावाल्या फोटोची आठवण काढली व माझ्या मस्तकाकडे पहात तो उद्गारला की अहो त्या फोटोत पाहीलेले तुम्हाला, आत्ता अगदीच वेगळे दिसता की हो. मी त्याच्यावर काय बोलावे याचा विचार करुन काहीतरी थातुरमातुर उत्तर देवु पहात होतो पण माझ्या मस्तकात एक उत्तर केव्हाच तयार झाले होते की बाबारे, माझा तो फेटा महाराष्ट्रियन होता, सरदारजी टाईप नव्हता की तुला फेटा उलगडल्यावर आत भरमसाठ वाढलेले किस दिसतील, असो.
पहिल्या सत्रात आनंद नावाच्या सद्गृहस्थांनी ये रे ये रे पावसा हे गाणे वेगवेगळे गायक कसे म्हणतील याची नक्कल करुन दाखवली व जोरदार हशा आणि टाळ्या वसुल केल्या.
आमच्या मागुन पोहोयला गेलेले मुंबैकर जेवणाच्या हॉल मधे आले तेव्हा आम्हि निघायच्या तयारीत होतो. जेवताना मला धृव, मुलगी आणि मराठी मित्र यांची सोबत मिळाली, सविता अर्थातच होती. फदी आणि सुशांत दुसरी कडे गेले. मी एकेक व्यक्ती न्यहाळित त्यांची कोणती आयडि असेल याचा निष्फळ अंदाज लावत होतो. जेवणा आधी हात धुतले नव्हते तरी जेवता जेवता बेसिनची ती खोली सगळ्यांकरता आहे याची खात्री करुन, तसेच ताट स्वतः उचलायचे असेल तर कुठे ठेवायचे, की कोण उचलुन नेणार याचे निरीक्षण करुन ठेवले होते त्यामुळे जेवण झाल्यावर मात्र हात धुतले.
असे मनसोक्त जेवण झाल्यावर खुर्च्यांवर येवुन बसलो तेव्हा मस्तपैकी ताणुन द्यावेसे वाटत होते पण मध्यभागी हातात माईक असलेल्या गोर्‍या गृहस्थांना ते बहुदा मंजुर नसल्याने त्यांनी सगळ्या खुर्च्या मागे सरकवायला सांगितल्या. मुम्बईकर अजुनही यायचे बाकी होते, तेव्हा जे आले त्यांच्या नावान चांगभल करुन झाल. दरम्यान मनि (बहुतेक) यांनी एक गाणे म्हणले.
यानंतर एक खेळ असा की सर्वांनी रिंगण करुन फिरायचे, सुत्रधार एक आकडा सांगणार तितके जणांनी आपले कोंडाळे करायचे, अर्थातच काही जण गळायचे. या खेळात खुप धमाल आली. अजाणता धृव, मित्र, सविता, मी, आणि टोयलेट मधे भेटलेले गृहस्थ आणि अजुन दोन तीन अशा आमचा एक कंपु तयार झाला व आम्ही पुकारलेल्या आकड्याप्रमाणे आपापले कोंडाळे निश्चित करु लागलो. या खेळातही "मला आपले म्हणा" करीत फिरणारे असत. मधेच एका वेळेस एका मोठ्या आकड्याकरीता बर्‍याचशा लेडीज आणि एकटा कोणतरी यांचे कोंडाळे जमले, आम्हि मोजके तीन चार जण तसेच राहिलो होतो व पलिकडे बहुतेक मुंबैकरांपकी काही जण शिल्लक होते तर त्यांच्यातल्या कोणीतरी जोरदारपणे ओर्‍अडुन लेडिज मधिल त्या एकाला हायजॅक केले व आम्हालाही त्या मोठ्या आकड्याच्या कंपुत समाविष्त केले. त्यामुळे जवळ जवळ दहा अकरा जणींचा ग्रुप बाहेर पडला.
एकुण झालेले ग्रुप, त्यावरुन एकुण संख्या कळत होती, पण त्यातुन किती गळावेत याकरीता सुत्रधार कोणकोणते आकडे सांगु शकेल याचे गणित दरवेळेस करायचा मी प्रयत्न करीत असे पण मुळातच माझे गणित कच्चे असल्याने एकाही आकड्याचा अंदाज मी बांधु शकलो नाही.
आणि एका वेळेस आमचे कोंडाळे जमलेले असताना "मला आपले म्हणा" वाला एकजण आमध्या कोंडाळ्यात येवुन घुसु लागला. त्याचा तो उत्साह, खेळात रमलेला त्याचा आनंदी चेहरा असे सगळे पाहुन त्याला तू या कोंडाळ्यात येवु शकत नाही असे सांगण्या ऐवजी, अंगभूत उत्साह आणि निरागसनेते खेळणार्‍या त्याला जागा मिळावी म्हणुन मी सरळ कोंडाळ्यातून बाहेर पडलो. ज्यांनी गंमत करायची त्यांनाच करुदे असा उद्देश होता. शिवाय, यावेळेस कोंडाळ्यात जागा मिळेल की नाही वगैरे बाबी माझे ब्लड प्रेशर वर खाली करण्यास पुरेशा असल्याने खेळलो तेव्हडे पुरे, आता जरा बसु हा स्वार्थही होता. मी बाहेर पडल्यावर थोड्याच वेळाने सविताही बाहेर पडली. उरलेल्या फेर्‍यातुन तीन जण विजेते घोषित करण्यात आले. त्यांची नावे मला आठवत / माहीत नाहीत.
सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होतात तोच त्या उंच गोर्‍या सुत्रधारांनी पुन्हा खुर्च्या जवळ जवळ आणायला सांगितल्या. सकाळी जसे म्हणी ओळखायचे होते तसे या वेळेस वेगवेगळ्या ठिकाणच्या सुचनावजा पाट्या ओळखायच्या होत्या. चार ग्रुप पडले, स्पर्धा चुरशीची होत होती व सकाळप्रमाणेच हावभावातुन कळविलेले शब्द व पाटी ओळखु आल्यावर टाळ्यांच्या गजरात आणि पाटीच्या विषयानुरुप हास्याच्या कल्लोळात एकेक पाटी निकालात निघत होती. फार क्वचित वेळेस पास मिळाल्यास प्रेस्क्षकांना संधि दिली जात होती. एकंदर धमाल होती.
यानंतरही अनेक खेळ होणार होते पण तोवर तीन वाजत आले होते तेव्हा फदी माझ्याबरोबर येणार नासल्याने, एकट्यानेच जायचे असल्याने साडेतीनच्या सुमारास आम्ही निघायचे ठरवले होते. त्याप्रमाणे मी दोन नंबर वगैरे बाबी उरकुन तयार झालो व मयुरेश यांना निघतो असे सांगुन परतीच्या प्रवासा करता बाहेर पडलो.
या स्पर्धां मधिल निरीक्षण म्हणजे त्या उंच गोर्‍या सुत्रधारांची एकुण कार्यक्रमावर मजबुत पकड होती. सहभागी लोकांकडुन काय करुन घेणे अपेक्षित आहे ते त्यांस पक्के माहीत होते व त्याबरहुकुम घडवुन आणित होते. त्या मागिल पडद्या मागची जबाबदारी अन्य आयोजक करीत होते जसे की चिठ्या तयार ठेवणे, त्या वाटणे, ग्रुप्स ना भन्नाट नावांचे नामफलक गळ्यात अडकवायला देणे, मधे मधेच गोळ्या वाटणे, विजेते घोषित करण्यास मोजदाद करणे, विजेत्यांना बक्षिसे देणे वगैरे अनेक कामे ते करीत होते. त्यांची नावे माहित नसल्याने कोणि नेमके काय केले ते सांगु शकत नाही.
कार्यक्रमात मधेच मला काहीतरी बारीक अक्षरातले वाच्यायची वेळ आली तेव्हा गळ्यापाशी शर्टात अडकविला नविन चष्मा चाचपला तर तो मघाच्या ट्रेक मधे कुठेतरी पडला असे लक्षात आले. अर्थातच ही बातमी सविताला देणे भागच होते. ती बोलली काहीच नाही पण तिने असा काही चेहरा केला की बस्स. मग मी म्हणले अग जाऊदेग, मला तशी गरज पडत नाही आणि घरी दुसरा आहे ना. तेवढ्यात तिने दुसरे तिसरे काही केले नाही तर तिच्या हातातली छत्री तपासुन तुझी छत्री कुठ आहे असे विचारल्यावर मला कळले की माझी नवि कोरी छत्री पण जागेवर म्हणजे मगाशी खेळ खेळताना कुठल्या तरी खुर्चीवर ठेवली होती ती नाहीये. मी हसत हसत सविताला म्हणालो की जावुदे ग आता कुठे शोधत बसु, अस होतच, येवढे लांबवर आपण मजा करीत नि मजा करायला आलो तर त्या खर्चात हाही खर्च मिलवुन टाकू. तिनेही तो विषय सोडुन दिला पण मला थोडच स्वस्थ बसवते? मी प्रत्येक रिकाम्या व सामान ठेवलेल्या खुर्च्या नजरेनेच तपासु लागलो. मधेच माझ्या शेजारच्या खुर्ची वर एक मोठी काळी बॅग दिसली, तर तिच्या खाली छत्री गेली नसेल ना म्हणुन बॅगेला स्पर्ष करुन उचलु लागलो तोच कोणतरी एकजण येवुन ती बॅग झटपटीने घेवुन जावु लागला, व मला वाइट वाटु नये म्हणुन "अहो खेळताना ही अशीच इकडे राहीली बरका" असे काही बाही सांगु लागला. मी बरे म्हणले, पण बहुरेक ती बॅग उरलेल्या टी शर्ट्स ची व अन्य बहुमोल सामानाची असावी जी तिच्या स्टेजमागिल जागेवर टेवलेली असावयास हवी होती. असो.
थोड्या वेळाने एक घारीगोरी व बारकिशी शेंडी असलेली व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीबरोबर आली तिच्या हातात माझी छत्री होती, ते कोणत्या खुर्चीवरुन उचलली त्या खुर्चीवर ती तात्पुरती नेलेली छत्री ठेवण्यास खुर्ची शोधू लागले तेव्हा सकाळचा माझ्या वाट्याला आलेला "शुक शुक" शब्द वापरुन त्यांच्या कडुन मी माझी छत्री ताब्यात घेतली.
मधेच एका गोल पसरट डब्यातुन काही एक पदार्थ वाटला गेला, बहुतेक सकाळच्या सत्रात, आमच्या समोर आल्यावर आम्ही तो घेवुन डबा पुढे डावीकडे पास केला तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या उजवीकडे मागे एकजणि बसल्यात त्यांना द्यायचे राहुन गेले आहे, तेव्हा मी तो डबा त्यांचे पुढे करताच त्यांनी सांगितले की तो पदार्थ त्यांनिच आणला आहे. कोणीतरी आधिच जाहिर केले असल्याने त्या म्हणजे श्यामली असे मला कळले.
सकाळच्या की दुपारच्या सत्रात, माझ्या पुढे उजवीकडे बसलेल्या एका तरुण युवतीला कोणतरी आज्जी असे म्हणत होते व ती आपण पणजीदेखिल आहोत असे सांगत होती ते ऐकुन व हितगुजवरील चर्चांचा संदर्भ आठवुन बहुतेक ती युवती म्हणजे मिनु असावी असा अंदाज बांधला. तिला आज्जी म्हणणारा कोण ते मात्र समजले नाही.
कार्यक्रम अर्धवट सोडुन जाणे जीवावर आले होते, पण निघणे भाग होते. दुसर्‍या दिवशी कोणत्याही परिस्थितित ऑफिसमधे हजर रहाणे अत्यावश्यक असल्याने व उशिरा निघाल्यास, रात्रीचा अंधार, पाऊस, स्कुटी बोरघाट चढेल की नाही, न चढल्यास काय, त्यामुळे उशिर झाल्यास व अतिश्रमामुळे दुसर्‍या दिवशी ऑफिसला जाता आले नाही तर काय, लोहगड विसापुरला सहलीला गेलेल्या मुलीचे काय, तिला आणायला स्टेशनवर कोण जाईल असे अनेक प्रश्न सामोरे असल्याने मला लौकर निघणे भाग होते. फदी खरे तर आमच्या बरोबरच परतणार होता कारण त्यालाही दुसर्‍या दिवशी सातार्‍यात हजर व्हायचे होते, पण बहुदा येताना बोरघाटात आम्ही थांबलो असताना स्कुटी परत एकेरी मार्गावरील तिकडुनचा चढ चढू शकेल की नाही हा विषय निघाल्यावर मी सरळ सरळ सांगुन टाकले होते की गाडी चढली नाही तर ढकलत न्यायची. कदाचित गाडी ढकलण्याच्या संभाव्य धोक्यापासुन वाचण्याकरता तर फदी ने माझ्याबरोबर येणे टाळले नसेल? असो. मी माझे काचेचे हेल्मेट त्याच्या कडेच ठेवले व त्याचे हेल्मेटही त्याच्याचकडे परत दिले, कारण जर ते उशिरा निघाल्यास मुम्बै किंवा पुणे कोठेही गेल्यास त्यांना त्याची आवश्यकता जास्त होती.
मयुरेशचा निरोप घेवुन बाहेर पडलो तेव्हा मनात एकुण कार्यक्रमाच्या सुखद आठवणी बरोबर घेऊनच.
क्रमशः


Giriraj
Wednesday, July 26, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या,दणकेबाज रे! पुढच्या भागाची वाट पहातोय!

मि येऊ न शकल्याचे वाईट्ट वाटतेय... पण काय करणार... 'नाविलाज को क्या विलाज'... (पुढच्या वर्षीसाठी ही म्हण लक्षात ठेव)
:-)



Limbutimbu
Wednesday, July 26, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> (पुढच्या वर्षीसाठी ही म्हण लक्षात ठेव)
काही नको ही म्हण, ती तुच जपत बस, आम्ही आपली लक्षात ठेवु, "चुकला गिर्‍या, डोन्गरात सापडणार" (चुकला फकीर, मशिदीत, तस) अन तो नेहेमीच चुकणार! DDD :-)

Shyamli
Wednesday, July 26, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाकड्या जी...
तो पदार्थ म्हणजे...
अरबी स्वीट "बकलावा" होते....
धन्यवाद आठ्वण ठेऊन लिहील्याबद्दल

बाकीचे सगळे विसरले वाट्त...


Soultrip
Wednesday, July 26, 2006 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'बकलावा' खाऊन विसरल्यालांना 'बुकलावं' वाटतंय नां? :-) Arabian mights चा हिसका दाखव त्यांना :-) Oops!Forgot to add 'दिवे घ्या':-)


Wakdya
Wednesday, July 26, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षाविहार वृत्तांत भाग पाच - परतीचा प्रवास
वविची शेड सोडणे जीवावर आले होते पण खाली माना घालुन विचारांच्या तंद्रीत आम्ही निघालो. स्कुटीपाशी पोचल्यावर शिल्लक पेट्रोलचा अंदाज घेवुन, अंगावर रेनसुट, हातमोजे, हेल्मेत वगैरे कवचकुंडले परिधान करुन आम्हि निघालो. बाहेर पडताना गेटवरच्या रखवालदाराने कोणत्या रुम मधले असे विचारले तेव्हा शेडमधिल ग्रुप असे सांगितले. आत येताना विचारले, बाहेर पडतानाही विचारले, तसेच जेवण घेताना बुफे काऊंटरवच्यानेही इंग्लिश मधे विचारले, बहुतेक माझा अवतार झालेला असावा. असो.
तिथुन बाहेर पडुन रस्त्याला लागलो. या वेळेस प्रथमच खड्डाविरहित रस्त्याने गाडी चालवायचा अनुभव घेतला होता. स्कुटीच्या मीटरवरुन एकुण अंतर ८० किलोमीटर होते. तसे पुने ते कर्जत फाटा हे अंतर ८२ व पुढे मोदि पर्यंत १७ अधिक २ असे १९ म्हणजे एकुण १०१ किलो मिटर अंतर पण आम्ही निगडी हुन असल्याने २२ किलोमीटर कमी होत होते. ठरल्याप्रमाणे बरोब्बर साडेतीनला मोदि रिसॉर्ट चे गेट ओलांडले व जमेल तितक्या वेगात गाडी चालवु लागलो. येताना पुढे फदी होता व त्याच्या गाडीवर लक्ष ठेवुन फॉलो करीत होतो, आता तो नसल्याने तसे चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते व एकट्या जोडीने बोरघाट सुखरुप पार पडेल की नाही याची काळजी होती. अर्थात एकट्याने बरेचदा प्रवास केला अस्लयाने व सोबत सविता असल्याने मी तसा निश्चिंतही होतो. होता होता आम्ही अशा एका स्पॉटपाशी पोचलो की तिथुन करजतला डोंगरातुन उतरलेली रेल्वे लाइन दिसली, मी थांबलो, त्या डोंगरा मागे अजुन एक उंच डोंगर दिसत होता व तो म्हणजे सोनगड. पुर्वी चेकपोस्ट म्हणुन या गडाचा वापर करीत, फारसा उंच नाही व तटबंदीही नाही केवळ तोफ ठेवण्याची जागा व दरवाजाचे अवशेष शिल्लक आहेत असे आठवले. हे मात्र आठवले कारण हा ट्रेक मी सन १९९२ की १९९३ मधे केला होता. त्याचे दोन फोटो काढले. नजरेला धुक्याच्या अर्धवट पडद्यात दिसणारा तो गड फोटोत मात्र अंधुक आला आहे. जुन्या आठवणिंना उजाळा देत पुढे निघालो व खोपोली पार केली. बोरघाटाच्या तोंडाशीच एक पाटी लावली होती की दरड कोसळल्यामुळे घाट बंद असुन वाहतुक खालापुर मार्गे वळविण्यात आली आहे. मी चक्रावलो. म्हणले की आता हे खालापुर कुथे शोधायचे? पण तेव्हड्यात वरील बाजुने एक जीप येताना दिसली तेव्हा त्या बोर्ड कडे दुर्लक्ष करुन, व मागे कधिंचा तरी तसाच राहिला असेल अशी मनाची समजुत घालित पुढे निघालो तर वाटेत दोरीने पिंपे इकमेकांना बांधुन रस्ता बंद केलेला दिसला. पण वरुन एक गाडी आल्याने एक बाजुची पिंपे हटवुन तिथल्या रखवालदाराने जागा करुन दिलि तेव्हा त्या फटीतुन आम्ही जाता जाता त्याला विचारले घात चालु आहे ना? तो म्हणाला तुम्ही जावा, चालु आहे. पुढे गेल्यावर या मागचे कोडे उलगडले. जवळपास शंभर ते दीडशे फूत लांब निम्मा रस्ताच पुर्णपणे खचलेला होता व आता त्या रस्त्याकरीता तीस चाळीस फुट खोलवरुन कॉंक्रीटचे बांधकाम चालु होते. आम्ही कडे ने गाडी काढली. आता खरा चढाचा रस्ता होता व तेथिल वळणांवर स्कुटीचा वेग मंदाऊन ३० पर्यंत उतरला. स्कुटीच्या इंजिनवर लोड येवु नये म्हणुन मी फुल थ्रोटल मारणे टाळत होतो. या घाटाच्या प्रत्येक वळणाशी काही एक स्मृती निगडीत आहेत, अगदी लहान वयात असताना पासुन आजवर केलेल्या या घाटातल्या प्रत्येक प्रवासाच्या स्मृती तेव्हा ताज्या झाल्या पण त्या कुणालाच सांगणे शक्य नव्हते. वाटेत एक बाह्य वळणाचा रस्ता हलक्या वाहनां करीता आहे. मी तिथे थोडा बावचळलो व तिकडुन जावे का या संभ्रमात असतानाच आठवले की तो रस्ता म्हणजे शिंग्रोबाच्या मंदिराकडुनच्या रस्त्याला पर्याय आहे व अधिकच चढाचा आहे. तेव्हा तो रस्ता टाळुन आम्ही शिंग्रोबा मंदिरा कडचा रस्ता पकडला. लहानपणापासुन दरवेळचे स्वप्न त्या मंदिरापाशी थांबण्याचे, ते आज पुरे होत होते. मध्यंतरीच्या काळात आधी वर्णन केलेला बाह्यवळण रस्त्या झाल्यावर या मंदीराचे दर्शन दुर्मिळ झाले होते. पण मना पासुन इच्छा किंवा प्रार्थना केल्यास गोष्ति कधिना कधी घडुन येतात असा अनुभव मला बरेचदा आला आहे. मंदीरा पाशी थांबुन सविताने आत जाऊन दर्शन घेतले पैसे अर्पण केले, एक फोटो काढला व निघालो. स्कुटीने त्या चढाच्या रस्त्यावरुन पिक अप घेतला. वाटेत वेगवेगळ्या ठिकाणी थांबत, फोटो काढीत, परिसर बघत आम्हि मजेत वर अमृतांजन पुला अलिकडे गाड्या दुरुस्ती साठी पोलिसांची एक जागा आहे तिथे येवुन थांबलो. तेथुन दिसणारी एक्स्प्रेस वे ची विहंगम दृष्ये कॅमेरात बंदिस्त करायचा प्रयत्न केला. तसेच मयुरेश यास फोन करुन आम्ही जवळपास घाट पुर्ण पार केला आहे असे कळविले. खरे तर तसे कळविणे बंधनकारक नव्हते आणि परतीच्या आमच्या प्रवासाची जबाबदारीही त्याजवर नव्हती पण त्यांना कुणाला काळजी लागुन रहायला नको म्हणुन कळवुन टाकले. तिथेच चहा घेऊन पुढे निघालो. खंडाल्यापाशी जुन्या रस्त्यावर बाहेर पडलो व पन्नस साठ या स्पीडने सलग गाडी चालवित घरी सहा वाजता सुखरुप पोहोचलो. दुपारचे जेवण खरच छान होते पण दमुन आल्याने व तसेही, जेवण जास्त गेले नाही त्यामुळे पुन्हा भुक लागली होती. तरीही वाटेत मनाजोगे वडापाव किंवा तत्सम न मिळाल्याने भक्तिशक्ती जवळ मस्तपैकी रगडा पॅटिस खावुन मगच घरी गेलो. बरोबर होत्या ववि च्या सुखद आठवणी.
ववि च्या आयोजकांचे अभिनंदन व आभारही.
मधेच प्रवासात मी पत्निला विचारले, काय ग? कसा वाटला हा ग्रुप? कशी होती लोक? एकुण कार्यक्रम आवडला का? चांगली होती लोक आणि कार्यक्रम आवडला हा तिचा अभिप्राय, मला तेवढा पुरेसा होता! कारण माझा पुरते, मी किती एंजॉय करतो त्या पेक्षा मी माझ्या बरोबर आणलेल्या पत्निला काय वाटले ते महत्वाचे होते. आणि त्याबाबतीत वविचे आयोजक (त्यांची नव्हे) तर माझी लाज राखण्यात यशस्वी झाले. त्याबद्दल त्यांचे पुन्हा आभार.
धन्यवाद


Hemantp
Wednesday, July 26, 2006 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाकड्या (अरे तु तुझी ID बदलुन घे रे), तुम्ही व.वि. मध्ये स्नेहसंमेलन आणि प्रवासात मनसोक्त भिजणे, दोन्ही एन्जोय केलेत.
छान लिहिले आहे.


Yogi050181
Wednesday, July 26, 2006 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व. वि. ला घेतले गेलेल्या खेळांमधले काही भाग..

सर्वात काॅमेडी भाग शब्दशोधमध्ये होता.. डबा ऐसपैस या गटातला मराठी मैत्री यास एक शब्द दिला होता "खण" म्हणुन.. त्याने सोनचाफाला पर्याय द्यायला सुर्वात केली.. १ ला पर्याय दिला "नारळ" नंतर २ रा पर्याय दिला "ओटी" पण सोनचाफेला सुचेना... audience मध्ये देखील कुजबुज सुरू झाली काय असेल तो शब्द.. नन्तर त्याने ३रा पर्याय दिला "खड्डा" नि सगळीकडे हशा पिकला.. बोलले मध्येच खड्डा कुठे आला.. सोनचाफेने गांगरुन शेवटी पास केले.. अशीच मजा खटखटे जोडीबद्दल झाली.. जुईने दिलेला शब्द बघुन पर्याय द्यायला सुरुवात केली.. १ला पर्याय "बैल" लगेच घरुअण्णा ओरडले नवर्‍याला बैल बोलतेस.. हा हा.. मग तीने २रा पर्याय दिला "नाक" झाले परत audienc मध्ये कुजबुज हा शब्द "वेसण" असेल.. इंद्रा एवढ्यात बुचकळ्यात पडला होता.. ३रा पर्याय दिला "वेसण" नि सगळेच कोड्यात पडले.. शेवटी इंद्रा पास म्हणाला.. पण जेव्हा तो शब्द डिक्लर झाला तोपर्यांत जुईला देखील आपन कुठेतरी गडबडलो याची जाणिव झाली.. तो शब्द होता "गोफण" नि सगळे हसत सुटले.. यांत आनंद जोडीने बाजी मारली..

अजुन एक गेम होता त्यात जो आकडा म्हटला जाइल तसा ग्रुप बनवायचा होता.. एकेक करत सगळे बाद झाले नि शेवटी चार जण उरले त्यात nil n nicky उरली होती.. ३ आकडा म्हणताच निलने अर्धांगीनीला सोडुन त्या दोनजणांना मिळाला नि देवाला वाचव म्हणुन हात जोडले..
अजुन एक रंगतदार गेम होता त्यात एकाने मुकाभिनय करायचा नि त्याच्या गटाने दिलेली मराठी म्हणी नि सार्वजनीक पाटी ऑल्खायची.. यात विनयांनी "कोल्ह्याला द्राक्षे आंबत" या म्हणीसाठी केलेला अभिनय नि PSG ने अचुकपणे ओळखलेली ती म्हण "लाजवाबच".. जल्ला आमच्या गटात म्हणींबाबतीत मीच एक ठोकळा होतो म्हणुन मी डांबर Dumber बनलो होतो.. अंतिम फेरीतील शेवटची पाटी योगीला दिली गेली "गप्पीमासा पाळा नि हिवताप टाळा" नि झाले योगीच्या डोक्याचे चक्र फिरले.. योगीने गप्प बसा म्हणुन सुचवले नि नंतर माश्यांच्या जलविहाराही नक्कल केली नि लगेच त्याचे विद्वान सहकारी इंद्रा नि आनंद मैत्रीने तल्लख बुद्धीने ति ओळ पकडली नि आमचा विजय सुकर झाला..

खेळांव्यतिरीक्त अजुन एक विनोदी क्षण म्हणजे कृत्रीम तलावात आनंदने सादर केलेला Puppy Show निलने तर तो शो कॅमेराबंद केला..




Hemantp
Wednesday, July 26, 2006 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी, अरे तो Puppy Show मस्तच होता.. त्याला आपण एकदा once more पण दिला...

अरे तरण तलाव वाले अजुन बाहेर पडले नाहीत का ? त्या चमुतील कोणीतरी लिहा ना इथे.


Wakdya
Wednesday, July 26, 2006 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> वाकड्या (अरे तु तुझी ID बदलुन घे रे), तुम्ही व.वि. मध्ये स्नेहसंमेलन आणि प्रवासात मनसोक्त भिजणे, दोन्ही एन्जोय केलेत.
हेमंत, त्याशिवाय, स्नेहसंमेलना व्यतिरीक्त धबधबाही व तिथवरचा ट्रेकही एंजॉय केला. कधी नव्हे ते या वेळेस मी खुपच सावध पवित्र्यात होतो त्यामुळे, अन्यथा, त्या एका फोटोत ओहोळा मागे जेवधे दिसतात त्या सगळ्यांना घेवुन धबधब्यावर गेलो असतो, पण समहाऊ, लिडिंग घेणे टाळले.
खरे तर मी तसे मराठी मित्र व फदीशी बोलल्याचे देखिल आठवते की बाकीच्यांना आणावे का
त्याचबरोबर मी फोटो बाबत स्वतःवर बंधन घालुन घेतले होते अन्यथा मी किमान तीन ते चार रोल्स उडवले असते व जवळपास प्रत्येकाला त्याच्या नैसर्गिक हालचालित कॅमेरात बंदिस्त केले असते. असो.
लेखनावरील अभिप्रायाबद्दल तुमचे आणि अन्य सर्वांचे आभार
एक लिहायचे राहुनच गेले, देहुरोडवरचा ओव्हरब्रीज पार केल्यावर कमी स्पीड मधे असताना पुढिल गाड्या थांबल्या म्हणुन आम्ही थांबलो तर मागुन एका M50 वाल्याने दारुच्या नशेत येवुन स्कुटीला जोरदार धडक दिली, पत्नी काही निमित्ताने बोलण्यासाठी पुढे झुकली होती व तिने कमरेत घट्ट धरले होते म्हणुनच केवळ पडली नाही, त्या दारुड्याशी पंगा न घेता पुढे निघुन जाणे आम्ही पत्करले कारण तसेही नंबर प्लेटवरील ओरखाड्या व्यतिरिक्त गाडीला काही झाले नव्हते.
जाताना व येताना, दोन्ही वेळेस मला मैत्रेयीची आठवण झाली.


Soultrip
Wednesday, July 26, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझ्या बरोबर आणलेल्या पत्निला काय वाटले >>>
... बरोबर न आणलेल्यांचं काय? :-) Take it lightly!
It is interesting to read such an honest & down-to-earth description! Yes, you should change your id now.


Psg
Wednesday, July 26, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणत्या puppy show बद्दल बोलत आहत तुम्ही?

Wakdya
Wednesday, July 26, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> बरोबर न आणलेल्यांचं काय? Take it lightly!
ही बरोबर न आणलेली धाकटी हे उद्योग करीत होती





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators