|
Wakdya
| |
| Tuesday, July 25, 2006 - 9:16 am: |
| 
|
अमोल, माझ्या लक्षात नाही ना रहात, मी विसरलो आत्ताच माझ्या हाती फोटो पडले आहेत, छान आले आहेत अरे आपण उगिचच घाबरत होतो, माझ्या फोटोत आयोजक मयुरेश हातात जर्कीन घेवुन ओहोळापाशी उभा दिसतो, बाकी पण बरेच जण पण मी ओळखत नाही मी माझ्यापुरता नियम केला होता की ववि मधे कोणाही व्यक्तींचे फोटो काढायचे नाहीत कारण परवानगी वगैरे बाबी नकोत. तरीही धबधब्याकडे आलेल्या तुम्हां व्यतिरिक्त दोन अन्य फोटोत इतर मंडळी आहेत. अर्थात मी ते फोटो मयुरेश यांचे कडे पाठवुन देण्याची व्यवस्था करतो पण, डोळ्यावर पट्ट्या मारुन काहि फोटो इथे टाकीन, वेळ लागेल. दीपस्तंभ, निवांत सावकाशीने वाचा. वरील पहिल्या सत्रादरम्यानच कधितरी राणा मला येवुन भेटुन ऑळख करवुन शेकहॅंण्ड करुन गेला. तसेच नील वेद यांनीही ऑळख करुन घेतली व शेकहॅण्ड केला, मी वरील वृत्तांतात लिहायचे विसरलो. तसेच मी शेवटपर्यंत ओहोळ ओलांडला नव्हता असे काही फोटोवरुन सिद्ध होत आहे, असो.
|
Wakdya
| |
| Tuesday, July 25, 2006 - 9:34 am: |
| 
|
या फोटोतील कुणालाही मी तरी ओळखु शकत नाही कारण मी सर्व चेहर्यांना स्टेन्सिल ग्लास इफेक्ट दिला आहे. त्यामुळे हा फोटो इथे या पद्धतीने टाकण्यास कुणाची हरकत नसावि असे वाटते, तरिही नको असल्यास आपण मॉड्स ना सांगुन डिलित करु
|
Wakdya
| |
| Tuesday, July 25, 2006 - 9:47 am: |
| 
|
सर्वजण पाठमोरे, त्यामुळे हा सहज टाकु शकलो. आपले आपण ओळखुन घ्या आणि धबधब्याचे दर्शनही घ्या मी सगळ्यात शेवटीच होतो हे याही फोटोवरुन सिद्ध होते हे असे फोटो टाकावे की नाही याचे कुणी जाणकार मार्गदर्शन करु शकेल काय?
|
अरे वाकड्या मी असेच फिरकी घेतली रे तुझी. तुमचा फोटो छान आलाना मग आता त्या निमित्ताने तरी तुम्हाला आठवण राहील. तुला मेल टाकतो, चेक कर. अमोल
|
Wakdya
| |
| Tuesday, July 25, 2006 - 9:51 am: |
| 
|
आणि हा एक शॉट मला बर्यापैकी मिळाला, याहुन चांगला फोटो फदीकडे व मित्राकडे असणार, मी उंचावर जाऊ शकलो नाही
|
Phdixit
| |
| Tuesday, July 25, 2006 - 9:57 am: |
| 
|
वाकड्या ह्या साईजमधले फोटो आहे तसे टाकायला हरकत नाही फक्त नावे खाली लिहु नकोस म्हणजे झाले
|
Badbadi
| |
| Tuesday, July 25, 2006 - 10:06 am: |
| 
|
वाकड्या, फोटो छान... फदि, तुझ्याकडचे फोटो मेल कर कि..
|
फदि तुझे फोटो कधी येतील. वाकड्या मेलला री दे. अमोल
|
Wakdya
| |
| Tuesday, July 25, 2006 - 10:23 am: |
| 
|
धबधब्यापासुन खालील परिसर जीआयएफ बनविण्याच्या नादात इमेज लहान होते पण खराबही दिसते ..
|
Phdixit
| |
| Tuesday, July 25, 2006 - 10:25 am: |
| 
|
वाकड्या आणी समस्त मित्र मंडळी अरे मी काढलेल्या फोटो बद्दल ह्या वेळेस मलाच खात्री नाहिये रे मी खुप मोजके असे फोटो काढले पण कॅमेरा सध्या पुण्याला आहे आणी मी सातार्यात आहे
|
Wakdya
| |
| Tuesday, July 25, 2006 - 10:32 am: |
| 
|
अरे मित्रा, गडबड नको रे करुस, माझा इंडिया टाईम्स चा मेलबॉक्स नीट चालत नाही, अजुन मेल मिळाली नाही धृव कोणत्या विभागात भेटेल? त्याचे फोटो त्याला पाठवायचे तर मला त्याचा इमेल आयडी हवा, त्याला निरोप द्याल का?
|
Milya
| |
| Tuesday, July 25, 2006 - 10:44 am: |
| 
|
अरे इकडे तर वृत्तातांचा पाउसच पडला आहे... एवढा पाउस व.वी ला पण नव्हता.... सर्वांचेच वृत्तांत मस्त आहेत... mods : वृतांतासाठी वेगळा बीबी उघडता येइल का?... तसेच इथे असलेले संयोजकांचे भ्रमणध्वनी आता काढुन टाकता येतील का? आता त्याची गरज नाही... उगाचच public bb वर नकोत nos.
|
Wakdya
| |
| Tuesday, July 25, 2006 - 11:45 am: |
| 
|
या डोंगरावर आम्हि गेलो होतो, खालच्या बाजुने पहिला धबधबा दिसतो त्याचा जवळुन काढलेला फोटो वर आधि दिला आहे, त्यावरच्या धबधब्या पर्यंत मी पोचु शकलो नाही, त्याचे जवळुन पोटो फदिकडुन अपेक्षित आहेत
|
Wakdya
| |
| Tuesday, July 25, 2006 - 12:19 pm: |
| 
|
ओढा जिथुन क्रॉस करीत होते त्याचे दुसरीकडुन दृष्य
|
मुंबई ते कर्जत वविचा प्रवास सकाळी दादरहून ०७.०३ची कर्जत लोकल होती... मी, जुई, मनी (परतीच टिकीट घेऊन) एकत्र स्टेशनवर दाखल झालो आमच्या आधी सृजनत्व, सोनचाफ़ा आणि ऍश अनन्या येऊन पोहचले होते. थोड्या वेळात अमी, योगी, भ्रमर येऊन थबकले. रविवार असुनही माथेरान, पळसदरीला जाणार्या ग्रुप्सची बरीच गर्दी होती, त्यामुळे ट्रेन मधे बसायला जागा मिळेल की नाही या धाकधुकीत रिकाम्या जागेत आक्रमण करून निदान ledies बायकांची बसण्याची व्यवस्था केली. जयसुर्या आणि सृजनत्व वाळीत टाकल्या सारखे का कोण जाणे दुर जाऊन बसले. घारूसोबत ठाण्यावरून, नील, तृप्ती, योगायोग, आनंद मैत्री, आनंदनेहा, उदय, सुनील आणि Bombayviking चढणार होते. घारूला फ़ोनवरून दुसर्या डब्यात बसल्याची कल्पना दिली. त्याप्रमाणे सर्व ठाणेकर भरकटलेल्या स्तीथीत आत घुसले. शेवटी कल्याण नंतर सगळ्यांना एकत्र बसायला जागा मिळाली. तेव्हढ्यात एक चिमुरडा Window Seat च्या ओढीने नील आणि Bombayviking ला डावलून थेट खिडकी जवळ पोहचला... या दोघांनी झालेल्या अपनाचा बदला म्हणून त्या चिमुरड्याला Limbutimbu ची उपमा दिली. जस जशी गर्दी कमी होत गेली तस तसे हास्यांचे फ़वारे उंच उंच उडू लागले. समोरच बसलेला एक ग्रुप जय जय महाराष्ट्र आळवत होता. थोडावेळ त्यांना साथ देण्याचा केविलवाणा पर्यत्न निष्फ़ळ ठरल्यावर आनंदने आणि निलने आपली Piknik Songs ची गाठोडी उघडली... आणि मग काय एका मागून एक अफ़लातुन गाणी बाहेर येऊ लागली. गाण्यांच्या गदारोळात कर्जत आले आणि भुकेले जीव शांत करण्यासाठी मी, घारू आणि उदय दिवाडकराकडे गेलो. गरमा गरम वडे खात असतानाच पुणेकरांची बस आली. प्रत्येक जण गरम चहा ढोसत गाडीत प्रवेशला. मुंबईकरांचे गाडीत आवभगत झाले. लाभाची पदे बळकावली गेली. बर्याच पुणेकर मित्रमैत्रिणींनी मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्हाला बसायला जागा देऊ केली. सर्व टाळकी चढल्याची खात्री करून मयुरेशने सफ़ेद गाडीला हिरवा कंदिल दिला. संध्याकाळी परतीच्या वेळी मात्र २ कि.मी. चा प्रवास असल्याने आम्ही उभ्यानेच कर्जत फ़ाट्यावर उतरलो. यावेळी श्यामली आणि घारूची अदलाबदल झाली. श्यामलीने हमालांची मित्रांची परिक्षा पहाण्यासाठी दोन जड बोचकी आणली होती. कसे बसे स्टेशन गाठले आणि दिप्सने हात मोकळे गेले. कर्जत लोकल यायला १ तासाचा अवधि शिल्लक होता. तोवर घारूने आणलेल्या दिवाडकरांच्या वडयावर सगळे तुटुन पडले. सकाळचा नाष्टा आणि दुपारच्या अप्रतीम? जेवणामुळे डजनभर वडे शिल्लक राहिले. नेरळ वरून भरून आलेल्या लोकल मधे जागा मिळविण्याच्या धडपडीत वड्यांकडे दुर्लक्ष झाले. मात्र नंतर कोणितरी तो खोका आत पोहोचवला. बरेच जण त्या खोक्याकडे संशयीत नजरेने पहात होते. म्हणून शिल्लक राहिलेले वडे पेपर मधे गुंडाळून नीलच्या बॅगेत सुखरूप ठेवले गेले. यावेळी सौ. नील सोडली तर सगळे महिला मंडळ Ledies डब्यात जाऊन खसखस पिकवित होतं. सगळ्याच डब्यांत पिकनिक ग्रुप असल्याने गाण्याचे आवाज येत होते. आम्ही मात्र बगळ्या सारखे एका पायावर तपश्चर्या करत गाणी गाण्यास सुरवात केली. Anand & Anand जोडीने त्यांच्या कॉलेज दिवसातील गाण्यांची मैफ़िल रंगवुन उपस्तीथांना उपकृत केले. त्या पासुन प्रेरणा घेत नील वेदही भरधाव सुटले... आणि बघता बघता सर्व डबा आमच्या मैफ़लीत तल्लीन झाला. सगळ्यांनीच गळे काढुन उत्तम साथ दिली हे विशेष श्यामली, Bombayviking , उदय, नील, तृप्ती, योगायोग, सुनील आणि दोन्ही आनंद ठाण्यात उतरले. उभ्याने प्रवास केल्याचा क्षीण सर्वांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. कभी अलविदा ना करना गाण्याने सगळ्यांनी निरोप घेतला. पुढे ९च्या सुमारास भ्रमर, योगी, सृजनत्व, सोनचाफ़ा, ऍश अनन्या, अमी दादरला पाय उतार होऊन पेश्चिमेकडच्या प्रवसाला गेले. ठाण्यात बाहेर काढलेले वडे दादर येईपर्यंत कोणा उतारूने लंपास केले होते...
|
>>>>> ठाण्यात बाहेर काढलेले वडे दादर येईपर्यंत कोणा उतारूने लंपास केले होते... अरेरे अरेरे! एखाद वडा आधीच खिडकी बाहेर शिम्पडला असतात तर ही वेळ आली नसती! DDD एनीवे, त्रास झाला तरी दन्गा करण काही सोडल नाही, की दन्गा हाच त्रासावरचा उपाय होता? 
|
Neel_ved
| |
| Tuesday, July 25, 2006 - 1:55 pm: |
| 
|
लिंबु भाव, अरे दंगा केला म्हणूनच ठाणा कधी आले हे ही कळले नाही..... पण खरोखर आनंदनेहानी यावर्षी ववि गाजवलं
|
Anilbhai
| |
| Tuesday, July 25, 2006 - 2:00 pm: |
| 
|
निदान ladies बायकांची बसण्याची व्यवस्था केली.>> जेन्ट्स बायका पण होत्या का? 
|
Samrya
| |
| Tuesday, July 25, 2006 - 2:59 pm: |
| 
|
naahi, ladies purush hote Anilbhai ;)
|
Anilbhai
| |
| Tuesday, July 25, 2006 - 3:22 pm: |
| 
|
समर्या, तुला कस कळल, तु होतास वाटत तिथे.. ~D 
|
|
|