|
Sonchafa
| |
| Monday, July 24, 2006 - 4:59 pm: |
| 
|
आर्च, मेन्यु ना? हा घे... नाश्त्याला, ब्रेड्बटर, इडली, मेदुवडे, चटणी आणि सांबार. आणि गरमागरम चहा कॉफ़ी जेवणात लोणचे, पापड, बूंदी रायते,(बूंदी ला ईंग्रजीत काय म्हणतात गं दीमडू? ), पनीर कुर्मा, कोबीची भाजी, गोभी आलू, गरमागरम फ़ुलके, जीरा राईस आणि दाल.. आणि गरमागरम कुरकुरीत जिलब्या! संध्याकाळी निघताना चहा कॉफ़ी अनि बिस्किट्स जाता येता दोन्ही वेळेस बटाटेवडा झाला हे सांगायला नकोच! आणि हो घारुअण्णा, चटणी आमच्याकडेही दोन मोठ्या पुड्या भरून होती हो.. आणि मुंबईकरांकडेही भरपूर बटाटेवडे शिल्लक राहिले.. तो वड्यांचा भलामोठा खोका घेऊन जागेच्या शोधार्थ एकूण तीन डब्यात शिरायचा प्रयत्न केला की हो मी! आणि शेवटी धावत धावत लेडीज चा डबा कसाबसा गाठला. श्यामलीचे सामान पोहोचवायला उदय तिथे आलाच तेव्हा तो खोका मी दिला त्याच्या हाती पाठवून परत.. तोच जाणे काय झाले त्या वड्यांचे गर्दीत...
|
Arch
| |
| Monday, July 24, 2006 - 5:02 pm: |
| 
|
हं सोनचाफ़ा आता कस छान वाटल. मस्त Menu . बटाटवडे उरू शकतात? 
|
Dineshvs
| |
| Monday, July 24, 2006 - 5:35 pm: |
| 
|
रुपाली, तुझी मी आणि क्षिप्राने काल आठवण काढली. ठसका लागलाच असेल.
|
गेले ते दिन गेले उरले ते फ़क्त ठसके काही वड्यांचे काही पावांचे
|
नाश्त्याला, ब्रेड्बटर, इडली, मेदुवडे, चटणी आणि सांबार. आणि गरमागरम चहा कॉफ़ी >>>> रुपाली तुला उदीडवदे म्हणायचेयत का ?
|
फ , या वर्षीच्या बखरीची वाट पहात आहे रे !
|
Badbadi
| |
| Tuesday, July 25, 2006 - 3:26 am: |
| 
|
सचिन, अरे त्या सृजनत्व ला निदान आता तरी इथे यायला सांग
|
सर्वांचेच वृत्तांत सही.. इंद्रा,तुझ्या वृत्तांतात मला कुठेही स्थान नाही म्हणुन तुझा त्रिवार निषेध मीनु,अर्धवट का ठेवलायस वृत्तांत?पुढे लिही की..
|
Wakdya
| |
| Tuesday, July 25, 2006 - 4:55 am: |
| 
|
वर्षाविहार वृत्तांत भाग तीन - धबधब्यावर चढाई मगाशी टोयलेटमधे चेन दुरुस्त करताना जे गृहस्थ दिसले होते तेच वविच्या शेडमधेही दिसले व मला ओळखीचे हसुन दाखविले, तेव्हा त्यांना काय नि कशी ओळख दाखवावी या विचारात मी पडलो. कारण बहुतेक ते स्वतः मायबोलीचे सभासद नसुन पाहुणे असावेत अशी माझी समजुत होण्याचे कारणही तितकेच प्रबळ होते. मायबोलीची आयडी असणारी माणसे कशी बर्यापैकी "बनचुकी" भासतात आणि ते सद्गृहस्थ तर अगदीच सरळ भोळेभाबडे वाटत होते यावरुन मी अंदाज बांधला की ते नक्कीच मायबोलिकर नाहीत तर मग त्यांना तुमची आयडी काय हे विचारण्यात अर्थ नाही, पण हो, तुम्ही कोणत्या आयडीबरोबर आला अहात असेही विचारणे मला प्रशस्त वाटेना, या सगळ्या विचारांच्या घोळात बहुदा त्यांचे बरेचसे गैरसमज झाले असतील की एकतर समोरच्या प्राण्याला (म्हणजे मला) लाम्बचे दिसत नसावे, किंवा त्याला हसुन ओळख दाखवायची नसेल किंवा तो शिष्ठ असेल किंवा..... असे बरच काही वाटु शकल असेल. असो. त्यांच्याशी बोलण्याचा योग आला नाही. पत्नी आल्यावर आम्ही बाहेर पडलो तेव्हा लोक दुरवर पोचले होते, आम्ही त्यांना गाठले. डांबरी सडक संपुन एक पाऊलवाट पुढे गेली होती. समोर बर्यापैकी जागा होती व गवत उंच वाढले होते. सर्व परिसर हिरवा हिरवा दिसत होता, गवत दाट झाल्यावर पुढे गेलेली मंडळी थबकली तेव्हा आम्ही त्यांच्या पुढे जाऊन बघतो तो दोघे तिघे अजुन पुढे गेलेले दिसले. मला त्या वाढलेल्या गवतात पाऊल टाकायची भिती वाटत होती म्हणुन मी पत्निला पुढे केले नि तिच्या पावलावर पाऊल ठेवुन तिच्या मागुन चालु लागलो. पुढे एक ओहोळ होता, बर्यापैकी मोठा म्हणजे एका ढांगेत पार न करता येण्यासारखा आणि पाणीही खळाळत वहात होते. नेमका फदी व सुशांत तिथेच आलेले होते व मराठी मित्रही होता. ओहोळाचा अंदाज घेताना परतावे की काय असा विचार चालु असताना माझ्यातल्या वृध्त्वाकडे झुकु लागलेल्या बंडखोर मनाने उचल खाल्ली व किमान समोरच्या कुंपणापर्यंत तरी जाऊच असे ठरविले. सर्वप्रथम मराठी मित्राने (इथुन पुढे त्यास केवळ "मित्र" असे संबोधतो) एका उडीत तो ओहोळ पार केला, त्यामागोमाग फदी व सुशांत पलिकडे गेले. मी नुसताच आ वासुन बघत राहिलो होतो तेव्हा पुन्हा पत्नीच पुढे झाली, खर तर मीच तिला आधी तू जा मग मी मागुन येतो असे सांगितले. तोवर हे तिघे कुंपणाखाली एक फत शोधुन सरपटत पलिकडे गेलेले, त्यातला मित्र पत्निला हात द्यायला परत आला व तिला ओहोळाच्या पलिकडे घेतले. मग माझी पाळी. मला काही तो ओहोळ पार करायची धीर होत नव्हता. पॅण्ट भिजेल काय, पाय घसरुन पडलो तर आख्खाच्या आख्खा भिजेन काय, दगडावर आपटलो तर गुढगा फुटेल काय असे तमाम विचार मनात दाटुन येवुन उडी मारायचा निश्चय काही केल्या होत नव्हता आणि पलिकडे मित्र ताटकलत उभा होता. शिवटी वैतागुन पत्नी खेकसली "अहो अस काय करताय? याकी इकडे" एरवी ती मला अरे तुरे म्हणते, पण रागात असली की अहोजाहो करते! या की इकडे असे ऐकल्याबरोबर मात्र अंगात वीरश्री संचारल्या सारखे होवुन मी सरळ पाण्यात पाय घातला व पलिकडच्या मित्राच्या हाताचा आधार घेवुन उडी मारली. मग पत्नी मित्र असे तारेखालुन पलिकडे जावु लागले तेव्हा तार उचलुन दुसर्या तारेने वर घट्ट बांधुन टाकली. सहज मागे बघितले तर ओहोळापलिकडे धृव व एक मुलगी उभे होते. त्यांनाही इकडेच यायचे आहे असे समजल्यावरुन मित्राला पुन्हा तारेखालुन इकडे बोलावले. मी इच्छा असुनही धृवला मदतीचा हात पुढे करु शकत नव्हतो. जिथे माझ मलाच सुधरत नव्हत तिथे त्याला काय खेचुन घेणार? बिचारा मित्र परत आला नि त्याने धृवला अलिकडे घेतले, धृवने त्या मुलिला घेतले. मग आम्ही सर्वजण कुंपणा खा तार पाठित टोचु न देता सरपटत बाहेर पडलो. मागिल बाजुस वळुन पाहिले तो भलि मोठी रांग ओहोळाच्या पलिकडे होती, त्यांचा एक फोटो दुरुनच घेतला व पुढे निघालो. समोरील डोंगरावर जाण्या ऐवजी डावीकडे जावुन बघु काय ते असे ठरवुन (नेमके कोण ठरवत होते मला माहीत नाही, पण असे चर्चेत सर्वानुमते ठरत होते, इथे एकमताला वाव नव्हता) सर्व पुढे जाऊ लागलो बहुतेक धृव तारेखालुन यायचा बाकी होता तोवर आम्ही बरेच पुढे गेलो होतो. आम्ही ज्या दिशेला जात आहोत तिकडे या असे हाताने खुणावुन पुढे निघालो. ओहोळाच्या कडे कडेने कधी गुढगाभर उंच वाढलेल्या गवतातुन कधी चिखलातुन असे करीत करीत आम्हि पुढे जात राहिलो बहुतेक याच वेळेस सृजनत्व (की नक्की कोण? मी नाव विसरलो) येवुन मिळाला होता. थोडे पुढे गेल्यावर हिरव्यागार डोंगरातुन पडणार्या दोन धबधब्यांचे विहंगम दृष्य नजरेसमोर आले. खरे तर आमचा उद्देश नुसता भटकणे असा होता पण समोरील डोंगर आणि धबधबे बघुन सर्वांच्याच अंगात थोडे तरी वर चढुन जायची सुरसुरी आली आणि मग काय? मित्र फदी सुशांत सर्वांच्या पुढे निघाले, त्यांच्या मागोमाग पत्नि (इथुन पुढे मी तिचे नाव घेतो) सविता, मी ध्रुव व मुलगी असे होतो, स ने चालु होणार्या आयडीचा मालक (सृजनत्वच का?) देखिल मागोमाग होता. गप्पा मारीत बोलत बोलत आम्ही वर चढु लागलो. असे डोंगर चढताना गुरांच्या वाटा किंवा जंगलातुन जाताना डुक्कर वाटा शोधाव्यात. बरेच वर आलो तेव्हा स खालीच थांबलेला होता फदी, सुशांत आणि मित्र धबधब्याच्या अगदी जवळ गेले. धृव, मुलगी आणि सविता माझ्या पुढे गेले, नेहेमीप्रमानेच एका स्पॉटवर मी अडकलो. माझ्या छातीयेवढा उंच तिरका खडक काही केल्या मला पार करता येइना, पाया खाली रेट द्यायला जागा नव्हती तर हाताने जोर देऊन स्वतःला वर उचलुन घेण्यास तिरक्या खडकावर पकड मिळत नव्हती, सविताने सांगितले अरे गवतात पाय रेट आणि ये वर, पडत्या फळाची आज्ञा मानुन मी गवतात पाय रेटला तर काहीच आधार मिळेना आणि दुसरा पाय घसरु लागला तेव्हा मी सरळ त्या खडकाला मिठी मारली. स्वतःला मोकळे करुन घेतले आणि लक्षात आले की गवतात पाय घातल्या मुळे बुटाचे तळवे अधिकच निसरडे झाले आहेत. शेवटी ध्रुव मला मदतीचा हात द्यायला आला, ते सांगत होते की दुसरी कडुन ये, मी याच खडकापाषी हटुन बसलो होतो, माज्या द्रुष्टीने तिकडुन काय आणि इकडुन काय, सगळेच निसरडे होते आणि माझे पाय लटपटवण्याला सकारण होते. मी हात घेत नाही असे पाहुन ध्रुव बिचारा कंटाळुन परत गेला. सर्व वेळ सविताची कॉमेंट्री चालुच होती, तो ना अस्साच हे, तुम्ही नका लक्ष देवु, तो ऐकायचा नाही मुळीच वगैरे वगैरे... शेवटी तीच पुन्हा मागे आली मला हात द्यायला, मग मात्र मी स्वतःवरच चिडुन जोरात हाताने रेट देवुन खडकाशी जिवाभावाची गळाभेत घेत घेत वर चढलो. सविता ध्रुव मुलगी पुढे गेले, मागे वळुन बघितले तर स परत फिरत होता. म्हणले बोंबला, आता हा खाली जावुन सांगणार आपले नसते उपद्व्याप. बाकी कुणी बोलले की नाही, तो आपल्या साठी जेवण तयार ठेवायला सांगेल. आम्ही तोडे अजुन पुढे गेलो पण आता बास म्हणुन एके थिकाणी थांबलो. फदि सुशांत मित्र मात्र माकडासारखे सपासप चढुन वर गेले. त्यांना मस्ट शॉट्स मिळाले. मी परिसराचे फोटो काढले. मधेच जोरदार पावसाची सर आली. तेव्हा सविताकडुन प्लॅस्टिकची पिशवी घेवुन मी माझ्या खिशातले सर्व सामान त्यात कोंबले. थोड्या वेळाने परत निघालो. उतरताना निसरड्या वाटेवर बाकीचे जण जपुन पावले टाकीत एकमेकांच्या आधाराने उतरत होते. मला आधार घेणे मंजुर नसल्याने मी सरळ चढताना किंवा उतरतानाही चारी पायांचा बिनदिक्कत न लाजता वापर करीत होतो, अहो वय झाल की असच होनार ना? त्यात काय लाजायचे? उतरताना चक्क बसत हात टेकत, पॅण्ट मागे खराब होइल याची चिंता नकरता खाली उतरलो. पुन्हा मागे वळुन बघितले की आपण कुथवर गेलो होतो, थोडी उघदिप मिळाल्याने फोटो वगैरे काढणे झाले मग धृव ने माझ्या कॅमेर्यातुन आम्हा उभयतांचा फोटो काढला तेव्हा त्यास सांगितले की बाबारे, आमच्या लग्ना नंतर चौदा वर्षांनी प्रथमच असा जोडिने फोटो काढला जात आहे, आणि तो मान तुला मिळत आहे. आल्या वाटेने परत फिरु लागलो, भुकेने पोटात काहूर माजविले होते, मी माझी फर्स्ट एड व खाद्य असलेली पिशवी नेमकी शेडमधेच ठेवली, बरोबर आणली नाही याचा विशाद वाटत होता. ओहोळ पार करुन परत रस्त्याला येइस्तोवर दीड वाजुन गेला होता, मी मधे मधेच मागे वळुन धृव व मुलगी सुखरुप येत आहेत ना याची खात्री करुन घेत होतो. रस्त्यावर आल्यावर मित्र सकाळी नाष्ट्याला हजर असल्याने जेवणाचे ठिकाण माहीत होण्यात अडचण पडली नाही. स या व्यक्तीने परत जावुन आमच्या उपद्व्यापाची खबर दिली असल्याने तसेच असे जाण्यास परवानगी आवश्यक की कसे, आणि यावरुन बोंबाबोंब होणार नाहीना यावर मी शंका प्रगट करताच सर्वजणांनी एकमताने मला लिडर घोषित करुन टाकले व कुणी काही बोलले तर आम्ही तुला पुढे करणार असे सांगितले. यथावकाश जेवणाच्या हॉलकडे पोचलो, समोरुन आयोजक मयुरेश येत होता, त्याने विचारले "काय झाले का धबधब्यात फिरणे" मी काहीच बोललो नाही, फदि मित्र हो हो असे काहीतरी बोलले. जेवणाच्या हॉल मधे गेलो. माझे हात खरे तर चिखल मातीने बरबटले होते, भूक कडाडुन लागलि होती, हॉल मधे गेल्यावर निरीक्षण केले, काऊंटरच्या बाजुस एक काच लावलेला दरवाजा होता तिकडे बेसिन असेल असा अंदाज बांधुन मी तिकडे जाऊ लागलो तर आत बर्याच लेडिज असल्याने माझा असा गैरसमज झाली की ते केवळ लेडिज साठी आहे. सविता मागुन आली, मी तिला तिकडे पाठवले आणि हात न धुताच जेवायचा निश्चय करुन बुफे कडे वळलो, रोजची कॅण्टीन मधली शिस्त अंगात बाणलेली असल्याने त्या छोट्याश्या डीश मधेच पुन्हा उथावे लागु नये म्हणुन एकाच वेळेस सर्व पदार्थ नैवेद्या सारखे तर एक रोटी, डावभर भात असे सगळे वाढुन घेवुन जेवायला बसलो. सविताने पाण्याचा ग्लास आणुन दिला. जेवण उत्कृष्ट होते, चविचविने संपविले. एक मुलगा त्याच्या आई मागे "माझे बाबा कुठे आहेत, ए सांगना, माझे बाबा कुठे आहेत" असे खणखणीत आवाजात विचारित फिरत होता ते बघुन हसायला येत होते तर काऊंतर शेजारील टेबल वर बसलेला एक गोरा माणुस त्या मुलाला "तुझे बाबा पुण्याला गेले" असे सांगत होता. आश्चर्य म्हणजे "तुझे बाबा पुण्याला गेले" हे ऐकुनही तो मुलगा न ऐकल्यासारखे करुन (यालाच अनुल्लेख असेही म्हणता येइल का?) पुन्हा आपले एकच पालुपद, माझे बाबा.....! जेवण झाल्यावर मला खरे तर खुप झोप येत होती, होय, पुणेरी लोकांची वामकुक्षी, अगदी अनावर झोप येत होती, आदल्या दोन तीन रात्रींची सलग जागरणे आत्ता बाहेर निघत होती. पण तसेच परत शेडमधे पुढील कार्यक्रमासाठी आलो आणि सर्वात मागील खुर्च्यांवर स्थानापन्न झालो क्रमश
|
संयोजकांचा गनिमी कावा सध्या पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस (सो.) आणि गांजवे चौक वयोवृद्ध मित्र मंडळ यांच्यात चाललेल्या गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभुमीवर याही वर्षी ववि संयोजकांनी सुरक्षेच्या कारणास्तव एक गनिमी कावा खेळला. या खेळाची कल्पना सां. स. ने आधी वविच्या बीबीवर अजिबात दिली नव्हती हि एक उल्लेखनीय बाब आहे. मित्र पक्षाला खबर लागु नये यासाठी गेल्यावर्षी हिरवा रंग सांगुन आयत्यावेळी निळ्या रंगाचा वविरथ धाडला गेला होता. तर यावेळी वविरथाचा रंग निळा असेल असे चुकीचे खलिते धाडले गेले. त्यामुळे पांढर्या रंगाचा वविरथ समोर येऊनही अनेक वविकर युद्धविराम झाल्यासारखे नुसतेच टकमक पहात राहिले. एव्हढेच नव्हे तर यावेळी रथाचा क्रमांकही वेगळा असल्याची किमया घडली, त्यामुळे 'किमया प्युअर व्हेजज' वालेही बुचकळ्यात पडले. यावरुन पुढच्या वर्षी रथाचा रंग कोणता असेल यावरुन मोदीभाईंच्या गुजरातमध्ये जोरदार सट्टेबाजी सुरु झाली आहे.
|
वाकड्या की जयंत म्हणु असो (काहीही म्ह ण) अप्रतिम लिहतोस राव ....................... great
|
Dumb Charade चा मराठी उच्चार 'डम्ब शराड' असा काहिसा होईल..
|
वाकड्या काय राव तुमचा फ़ोटो मी काढला होता अमोल
|
wakadya mastch lihile aahes, barac welaa he tourist waale tharavalelyaa bas paathavat naahit saangataat eka aani bhalatich gaadi pathavun detaat mi hyaa goshtichaa ekadam waait anubhav ghetalela ahe, ithe lihit naahi waakadya yeudet lavakar pudhachaa bhaag photo waigaire koni kaadhale asatil tar te hi lavakar chitakavaa hyaa phalakawar
|
Himscool
| |
| Tuesday, July 25, 2006 - 6:32 am: |
| 
|
वाकड्या.. खूप छान वर्णन केले आहेत. तुमच्या बरोबर स पासून नाव असलेला आयडी समु हा होता..
|
Gondhali
| |
| Tuesday, July 25, 2006 - 6:46 am: |
| 
|
व. वि. मंडळी, पुण्यात असा वर्षा विहार आयोजित करता येईल का खुप मजा वाटेल. सोबतीला अस्सल पुणेकर असतीलच कोणाला interest असेल तर सांगा.
|
punyaat varshavihaar kalpanaa changali aahe paN tyaalaa khadyatalaa varshaavihaar ase naav dyaavese waatate. gondhali tumhi navhata gelat ka va vi laa ??
|
Jo_s
| |
| Tuesday, July 25, 2006 - 7:14 am: |
| 
|
वाकड्या मस्तच, न येताही चित्र उभे राहीले डोळ्यांसमोर.
|
गोंधळी, माझी केव्हाही तयारी आहे. अमोल
|
सोनचाफा, मिनु, अरुण, निल, घारुअण्णा, इंद्र, पुनम.. सर्वांचेच वृत्तांत छान.. वाकड्या यांचे अनुभव वाचावयास निवांत वेळ लागेल..
|
|
|