|
>>>>सर्व पुणेकर किमान एक तास डुलकी काढत होते ए पुनम.. एकदम खोटं.. बरेच जणं जागे होते गं.. बाकी ववि झकास झाला.. खुमासदार वृत्तांत येतीलच.. पण या वेळच्या वविचे एक वैशिष्ट्य नमुद करावेस वाटते ते म्हणजे नियोजीत तरीही निखळ आनंद लुटण्याजोगा विहार. अगदी लग्न समारंभासारखा.. आता लग्नाला कोणी 'अगदीच नियोजनबद्ध बाबा तुमचे लग्न.. हळदीची वेळ, मुहुर्ताची वेळ, पंगतीची वेळ, वरात.. सर्व आधीच ठरलेले.. लग्नात अगदी वर आणि वधु कोण ते सुद्धा आधीच ठरलेले..' असं म्हटलं तर कसं वाटेल..?? ज्या प्रमाणे लग्नात काही बाबी कोणत्या वेळी होणार हे आधीच ठरलेले असते.. एक सुसुत्रता असते.. तरीही त्या त्या ठरलेल्या वेळात मौजमजा करायला भरपुर वाव असतो.. अगदी तसेच.. याचा मुख्य फायदा असा झाला की जास्तीत जास्त वविकरांना वविच्या विविध कर्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेता आला. घारुअण्णा.. वरुन पावसाचे दाणेदार खडे कोसळत असताना स्विमिंग पुलमध्ये पोहण्याचा अनुभव अविस्मरणीय.. जणू चौफेर पाणी आणि मध्ये आपण पोहतोय असे वाटत होते.. पुणेकर मात्र इथे फिरकले नाहित हे मात्र कोडेच आहे.. कदाचित मुंबईकर जोपर्यंत डुंबत आहेत तोपर्यंत आपण जेवणार आडवा हात मारुन नंतर दुपारची एक पुणे फेमस डुलकी घ्यावी असा विचार त्यांनी केला असेल. खाना खजाना मात्र अगदी चविष्ट होता.. डॉ. मोदी रिसॉर्टवाल्यांची व्यवस्थाही खूपच छान होती.. सालाबादप्रमाणे याही वविला अनेक जुन्या - नविन मायबोलीकरांची नव्याने ओळख झाली.. आणि हो.. वविला मायबोलीचे टी शर्टसही मिळाले.. सुरेख दिसतात.. ते घालुन आम्हीही सुरेख दिसलो.. नेहमीप्रमाणे गमती जमती अनेक झाल्या.. हास्याचे फवारे उडले.. ते एक एक करुन बाहेर येतीलच.. ओलसर डोंगरावर हिरवे हिरवे रान कर्जतचा वडापाव छानच छान..
|
Psg
| |
| Monday, July 24, 2006 - 10:45 am: |
| 
|
इंद्रा मिल्याची विडंबने विसरलास?????? शो. ना. हो!! हे.क.ब??????? छान लिहिलास वृत्तांत! दीप
|
Badbadi
| |
| Monday, July 24, 2006 - 10:47 am: |
| 
|
अरे त्या नील आणि इन्द्र ची कोणी फोन करून चौकशी करा... नील तर एकदम "हात सोडेन पण हारणार नाही" अशा स्टाईल ने च खेळला.... आणि बिचारी सौ. इन्द्रा... गोफण आणि वेसण यात confuse झाली...
|
Neel_ved
| |
| Monday, July 24, 2006 - 11:07 am: |
| 
|
बडे, मी मजेत आहे गं.... पण गोफण आणि खड्डा...दोन्ही प्रकार जबरदस्त होते.... पुनम, कदाचित ती विडंबने तु गायलीस म्हणुन तो विसरला असेल
|
are re mi kharach khup misalo indra, dip, waakadyaa tumachi savistar varNane yeu dyaat bas madhun gelelyaa lokaani, lokal madhun aalelyaa lokaani tyaanche anubhav lihaa mhanje na aalelyaa lokaanaa tohi waachun anubhavas milel waakadyaa kaal kharach lonaavaLaa parisaraat khup jordaar paaus hotaa kaal mi office kaama nimitta mi khaMDaalyaa madhech hoto. pha di chyaa maage basalele limbu tar navate. kaaraN adhichyaa koNatyaa tari tipaNIt mi limbyaa phadi barobar dable seat jaa ase waachalyaache malaa athavate aahe.
|
Meenu
| |
| Monday, July 24, 2006 - 11:14 am: |
| 
|
इंद्रा मिल्याची विडंबने विसरलास?????? शो. ना. हो!! हे.क.ब??????? >> आणी माझं गाणं पण
|
Wakdya
| |
| Monday, July 24, 2006 - 11:25 am: |
| 
|
वर्षाविहार वृत्तांत भाग दोन - कर्जतला दाखल फदीची गाडी आता त्याचा भाऊ चालवित होता आणि त्याने तर डोक्याला बांधलेला कपडा देखिल काढुन टाकला होता. मला काळजी वाटत होती. घाटातल्या तीव्र उतारांवर तो सफाईने गाडी चालवित होता, त्याच्या मागे स्कृटीवरुन रहाणे मला अवघड जात होते. स्कुटी (पेप) वळणांवर तिरकी करुन चालवता येत नाही किंवा मला तरी चालविता येत नसावी. ओल्या निसरड्या रस्त्यावर वळताना घसरुन पडण्याची भिती वाटत होती. मधेच एक्स्प्रेस वे लागतो, त्यावरुन गाडी चालविण्याचे अप्रुप अनुभवित आम्ही खोपोली करता बाहेर पडलो नि एका ठिकाणी थांबलो, पावसाने थोडी उघडीप दिली होती तर समोरच्या डोंगरांचे धबधब्यांचे फोटो काढले. मजल दरमजल करीत थेट कर्जतच्या डॉक्टर मोडी रिसॉर्ट पाशी आलो तर गेटला कुलुप. मनात म्हणल आता आली का पंचाईत, आपण भलत्याच जागी तर आलो नाही ना? पाॅं पाॅं करीत हॉर्न वाजवल्यावर सिक्युरिटीने दरवाजा उघडला आणि आम्ही आत दाखल झालो, आत एक वयस्कर व्यक्तिमत्व उभे होते त्याच्याकडे पहिल्यांदा गाडी कुठे लावु अशी मराठीतुन विचारणा केली अर्थात आधी गाड्या आम्हाला सोईस्कर वाटलेल्या ठिकाणि उभ्या करुन मग विचारणा केली होती तेव्हा ते गृहस्थ गाड्या आहेत तिथेच राहुदेत अशा अर्थाचे हिंदीत बोलले. त्यांनी रुमचा नंबर विचारल्यावर त्यांना शेडमधे जो ग्रुप आहे त्यांच्याकडे आलो असे सांगितले. ववि चे त्यांच्या कडे काय नावाने रजिस्ट्रेशन झाल ते माहित नसल्याने अडचण होते की काय असे मला वाटले होते पण एकंदरीत आमच्या अवताराकडे बघुन खर तर उलटतपासणि होते की काय असे वाटत असतानाच त्यांनी दिशा दर्शन करुन रस्त्याने सरळ जायला सांगितले. माझे निरीक्षण म्हणजे तिथल्या रस्त्यांवर चारचाकी गाड्या पार्क करण्यासाठी खुणा आखलेल्या होत्या तसेच चारचाकी कोणत्या गाड्या कुठे उभ्या कराव्यात याच्या पाट्या होत्या. दुचाकीकरता मात्र तशी पाटी नव्हती, बहुतेक दुचाकीवरुन येणारे "पब्लिक", तेही स्कूटी पेपवरुन मोदि रिसॉर्टवाल्यांनी कल्पनेत धरले नसावे. अर्थात आम्हाला त्याचा त्रास काहीच झाला नाही. सिक्युरिटी गेटला कुलुप लावित असल्याचे पाहुन उलत सुरक्षेची खात्रीच पटली. अनावश्यक सामान डिकीत टाकुन रस्त्याने पुढे चालत परिसराचे निरीक्षण करीत निघालो. मयुरेशला फोन करुन तुम्ही नेमके कुठे अहात ते विचारले, तो जे सांगत होता ते मला कळत नव्हते, मी माझा पत्ता रुम नम्बरच्या पाट्यांच्या सहाय्याने त्याला सांगु पहात होतो पण एकिकडे चालु झालेल्या कार्यक्रमावर नजर ठेवणे आणि माझ्या बाळबोध प्रश्नांना उत्तरे देणे बहुतेक त्याला जड जात असावे माझी संदर्भहीन बडबड ऐकुन तो किती वैतागला असेल याची मी कल्पना करु शकतो पण तेवढ्यात फदी नि त्याचा भाऊ पुढे होवुन शेडकडे चालू पडले आणि मी त्यांच्या मागे मागे, बावळटासारखा इकडे तिकडे पहात. शेडजवळ पोहोचलो तर तिथे बरीच गर्दी होती आणि ओळखपरेडीचा कार्यक्रम चालू होता. आम्ही आमच्या पिशव्या हेल्मेट वगैरे ठेवले व नंतर मागिल बाजुस जावुन बसलो. तत्पुर्वी मयुरेश यांना आम्ही आल्याची कल्पना दिल्यावर त्यांनी नाष्टा हवा की कसे असे विचारले. एका क्षणार्धात ववि बीबी वरच्या पोस्ट्स्वरचे नियम आठवित आणि फदीशी नेत्रपल्लविने बोलुन खात्रीकरुन घेवुन मी मयुरेशना नम्र नकार दिला. (खरे तर त्यावेळेस तुफान भुक लागली होती. आदल्या दिवशी उशिरा घरी परतल्याने आदल्या दिवशीच्या दुपारच्या जेवण नामक सॅण्डविचेस प्रकारानंतर इथे पोचेस्तोवर एक कप चहा शिवाय पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता, आणि वविला वेळेवर पोहोचण्याच्या नादात घरी बाकिच्यांकरीता सगळा स्वयंपाक करुन ठेवुनही खावुन निघता आले नव्हते, होत अस कधि कधि) मला वाटते की मागे बसायला जातानाच बहुदा दिपस्तंभ यांनी पुढे होऊन शेकहॅण्ड केला. मी माझी ओळख पुन्हा नव्याने "वाकड्या" अशी करुन दिली, कारण अशा वेळेस काय बोलायचे असते ते न सुचल्याने मी नुसताच त त प प करीत रहातो. दीपस्तंभ यांची ओळख पत्नीशी करुन द्यावी तर तिला इकडे तिकडे बघु लागलो. माझे इकडे तिकडे बघणे पाहुन दिपस्तंभ यांना काय वाटले असेल? त्यांनी आणि मी, दोघांनी काढता पाय घेतला शेडचे निरीक्षण केले. वर बरेच फॅन लावले होते व ते सुरुही होते. आधिच थंडीत गारठुन आलेल्या मला अधिकच कुडकुडायला होत होते, त्यातच अधुन मधुन वाराही येत होता. फदी मात्र शर्ट सुकविण्यासाठी सरळ एका फॅनखाली जावुन बसला. मला त्याच्या थंडीच्या सहनशक्तीचे महद आश्चर्य वाटले कारण मला जराही थंडी सहन होत नाही. आणि बरोबर आणलेला स्वेटर मी डिकीतच ठेवला ही माझी चूक. तेव्हड्यात कोणतरी मला खुणावत होते की ऑळख करुन द्या. मी तसाच भिजलेल्या मांजराप्रमाणे कुडकुडत अंग चोरत पुढे झालो. पत्नी औत्सुक्याने बघत होती की आमचे "हे" आता काय नि कसे बोलतात. मला बाकी पब्लिकच टेंशन नव्हत पण थेट मागल्या खुर्चीत बसुन मान वर वर करुन बघणार्या माझ्या पत्नीचे दर्शन झाले आणि माझ्या तोंडातुन शब्द फुटेना. तशात मी थंडीने कुडकुडत असल्याने आणि "मी वाकड्या" अशी अवसानघातकी ओळख करुन देण्याचे जीवावर आलेले असताना माझ्या तोंडुन कसे तरी शब्द फुटले पण मी तिथे काय काय बोललो ते तिथुन पाठ फिरवल्याबरोबर मी विसरुन गेलो मधेच कुणीतरी माझ्या पुर्वीच्या स्कूटर वरील प्रवासाची आठवण केली तेव्हा यावेळेस मी स्कुटी घेवुन आलो आहे अशी "बहुमोल" माहिती त्यांना पुरवली. स्टेजवर बोलायला डेरिंग लागत हेच खर. नंतर विविध खेळ सुरू झाले, त्यातल्या शुक शुक वगैरे शब्दांच्या पहिल्याच खेळावेळेस आमची दांडी सपशेल गुल झाली कारण पत्निला वाटले की एकच शब्दाचे चार चार जणांचे गट करायचे, मला नेमके समजले होते पण मी माझा तीन नम्बरचा शब्द शुक शुक असे बोलत फिरू की मला कोणकोणते शब्द हवेत ते मागत फिरू? दुसर्या पर्यायाकरता मी शब्दफलकाकडे बघितले तर वैचारीक गोंधळामुळे माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकुन त्या बोर्डवरची लाल अक्षरे मला दिसेनाशी होवुन त्या जागी एकच एक लाल गोळा दिसू लागल्याने मी तो प्रयत्न तसाच सोडुन दिला. जिकडे तिकडे धावपळ अन आरडाओरडा सुरु होता, ज्यांना हा गेम नीटपणे समजला होता आणि जे व्यवस्थितपणे ओरडुन माणसे गोळा करु शकत होते अशांचे ग्रुप झटकिनी झाले. ज्यांना अजुनही आपले ठिकाण सापडत नव्हते ते ते "मला आपले म्हणा" करीत वेगवेगळ्या कोंडाळ्या मधुन फिरत होते. त्यातुनच मग आम्ही "आपले म्हणा" वाले चार जण जमलो, पाचवा मिळाला नाही, एक होता त्याला दुसर्या कोंडाळ्याने हायजॅक केला. मी पत्निला डिक्लियर करुन टाकले की आपण सपशेल हरलो आहोत. थोड्याच वेळात ती हातघाईची लढाई संपुषाट आली व आयोजकांनी चिठ्ठ्या तपासुन निर्णय जाहीर केला. आम्हाला बक्षिस मिळाले नाही तर माझी चिठ्ठी मी खिशात जपुन ठेवली. एक निरीक्षण सहभागी मायबोलीकरांचे, येवढ्या संख्येने चिठ्ठ्या वाटल्या गेल्यावरही खेळ संपल्यावर एकही चिठ्ठी इकडे तिकडे जमिनिवर लोळत पडताना दिसली नाही, हे भुषणास्पद नाही काय? वेगवेगळ्या गेम्स ची वर्णने येतिलच, मला खर तर अनुभवण्यात जी मजा वाटली ती सगळीच इथे सांगणे खुप कठीण आहे. बस्स आम्ही सगळे खेळ आवडीने आणि आनंदाने अनुभवले. शब्द ओळखा खेळात सहभागी टीमबरोबरच प्रेक्षकांचीही उत्कण्ठा शीगेला पोचायची आणि क्वचित टीममेंबर ऐवजी कळलेली म्हण किंवा शब्द तोंडुन उच्चारले जायचे येवढे भान हरपत होते. कित्येकवेळेस मला हावभाव कळायचे नाहीत किंवा काय शब्दाकरता काय हावभाव केला म्हणुन त्यांना कळले हे मी पत्निला विचारुन घ्यायचो. या सर्व प्रकारांचे नियोजन एक गोरे उंच ग्रुहस्थ करीत होते (मला त्यांची आयडी कळली नाही कारण आम्ही मुळात उशिरा पोहोचलो होतो) पण खरे तर मला कोण कोणत्या आयडीने आहे या पेक्षा तेथिल हजर कोण काय करामत करुन दाखवतो हे बघण्यात रस होता. आणि त्याबाबत जराही निराशा झाली नाही तसेच कंटाळवाणेही झाले नाही. या सकाळच्या सत्रात हे असे मोथे वर्तुळ करुन बसलेलो असताना माझ्यावर अगदी अनवस्था प्रसंग ओढवला. असाच बसलेलो असताना माझे लक्ष माझ्या पाॅण्टकडे गेले तर चेन उघडी झाली आहे असे दिसले. कोण बघितले नाही ना याचा अदमास घेत घेत मी चेन खाली वर करुन लावली व ही बातमी पत्निला दिली. पत्नी नाही की रडलीही नाही पण रागाने माझ्याकडे बघत "तरी मी तुला सांगत होते हॅंगरवरची पॅण्ट घाल म्हणुन, का नाही बदललीस? का कंटाळा केलास? आता भोग आपल्या कर्माची फळे" अशा अर्थाचे बोलु लागली. तिची उलटतपासणी सहन न होवुन केविलवाण्या नजरेने आणि हळु स्वरात तिला विचारले की "बाइग ते ठीक पण आता काय करु बोल! मी कसलेच कपडे बरोबर आणले नाहीत स्वेटरशिवाय" नंतर पुन्हा जेव्हा परत एकदा चेन उघडली गेली तेव्हा तिने सांगितलेला उपाय बसल्या जागी करुन खोचलेला शर्ट आपली हालचाल कुणाच्या लक्षात येणार नाही अशा बेताबेतान उपसुन बाहेर काढला आणि शर्टच्या त्या छट्राखाली उघडी पडलेली गबाळी अब्रु झाकुन ताकली. हे सर्व करताना, बोलताना आपला आवाज मोठ्याने निघणार नाही कुणाला ऐकु जाणार नाही याची कमालिची दक्षता घेत होतो व चेहरा प्रसंगोपात हसरा वगैरे ठेवत होतो. शेवटी वैतागुन मी सरळ उथलो स्टेजबाजुला ठेवलेल्या माझ्या बॅगेतुन फोल्डिंगची पक्कड काधुन खिशात घालु गेलो तो तडक टॉयलेटकडे! आत एक गृहस्थ त्यांच्या मुलाचे होण्याची वाट बघत सोबतीला थांबले होते, मी अंदाज बांधला कि हे काही वविला आलेले नसणार, मोदींचे दुसरेच कोणते तरी गिर्हाईक असणार. त्यांच्यासमोरच मी पक्कड काढुन उघडली, ते बिचारे हा माणुस आता पक्कडीने काय करतो असे सावध नजरेने बघत होते. मी शांतपणे शर्ट वर करुन चेनची क्लिप पक्कडीने आवळली व चेनला ठिकाणास लावले. त्या सद्गृहस्थांचा फक्त आ वासायचा बाकी राहिला होता. मग मी पुटपुटत त्यांना सांगितले की अहो माझ्याकडे अशा गोष्टी नेहेमीच असतात. पुन्हा एकदा शर्ट इन करुन कार्यक्रमाच्या जागी आलो नी काही झालेच नसल्याच्या अविर्भावात पण विजयी मुद्रेने पत्निकडे पाहुन स्थानापन्न झालो. सकाळचे सत्र आटोपल्यावर आयोजकांच्या सुचनेनुसार आम्ही फिरायला बाहेर पडलो पण तत्पुर्वी, पत्नी मला कपडे कुठे बदलु, बदलु की नको वगैरे स्त्रीसुलभ प्रश्न विचारुन भंडावुन सोडत होती. तेथिल आयोजकांपैकी मी फक्त मयुरेशला ओळखत असल्याने पण तो कामाच्या व्यापात असल्याने त्याला काही विचारुन अधिक अडचणित आणणे मला प्रशस्त वाटले नाही तेव्हा लेडिज टॉयलेट मधे सोय होते का ते बघ आणि शक्यतो टॉयलेट मधे वगैरे जावुन कपडे बदलु नकोस असा दुधारी सल्ला मी पत्निला दिला तेव्हा "मी बघते काय करायचे ते" असे फणकार्याने म्हणुन मान उडवित ती निघुन गेल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला. आयोजक सोडुन बाकी सर्व लोक बाहेर फिरायला गेले, मी पत्नीची वाट बघत तिथेच रेंगाळत होतो, थोड्या वेळाने ती आली व दोन छतया बरोबर घेवुन आम्ही रेनसुट न घालताच बाहेर पडलो तो बाकी लोक बरेच दुरवर टोकाकडे पोचले होते. क्रमश कदाचित हे लेखन व्यक्तिकेंद्रित किंवा आत्मकेंद्रीत वाटण्याची शक्यता आहे, नव्हे ते तसेच आहे. पण त्याला माझा नाईलाज आहे कारण हे लिहिताना मी घडला प्रसंग माझ्याच नजरेतुन आठवुन लिहितो आहे, तसेच अक्षर चुका बर्याच होत आहेत, कृपया सांभाळुन घ्या.
|
>>>>आणी माझं गाणं पण मीनू तू पण... काय करणार सगळेच जण असे भरधाव सुटले होते... तरी पण आठवले ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय. Psg sorry ... त्या गोफ़णीच्या पुढे काही आठवतच नाही... काहीचा उल्लेख राहिला असेल तर तो योगायोग समजावा... नील धन्स
|
Psg
| |
| Monday, July 24, 2006 - 11:45 am: |
| 
|
त्या गोफ़णीच्या पुढे काही आठवतच नाही समजू शकते मी! गोफ़णीनी वेसणच अशी घातली तुला की नंतर तू दिग्मूढच झालास!
|
Ami79
| |
| Monday, July 24, 2006 - 11:59 am: |
| 
|
नमस्कार, काल खुप धमाल आली. आयुष्यात एका अविस्मरणीय दिवसाची भर पडली.
|
च्या**** हे गोफण आणि वेसण प्रकरण आता पूढच्या वविपर्यन्त पुरणार का हा..
|
दिवाडकरची चटणी खूप उरली कारे नाही, कारण आम्ही वड्याच्या किमतीत बार्गेन केल तेव्हा एक्स्ट्रा वडे घ्या असे सान्गून नुस्तीच चटणी दिली बहूतेक पाव किलो ची चार पाकीट होती
|
Phdixit
| |
| Monday, July 24, 2006 - 12:17 pm: |
| 
|
वाकड्या मस्त वर्णन केले आहेस चालु दे तुझे, माझ्या बरोबर माझा मावस भाऊ सुशांत होता. >>>एका अविस्मरणीय दिवसाची भर पडली. मी तर आजच्जा दिवस सुद्धा विसरू शकणार नाही ववी च्या काहि आठवणी आहेत मला पण लिहायच्या पण त्या मी उद्या लिहीन
|
>>>>> ववी च्या काहि आठवणी आहेत मला पण लिहायच्या पण त्या मी उद्या लिहीन (अर्थात वाकड्याने लिहायच्या काही शिल्लक ठेवल्या तर) DDD
|
Hemantp
| |
| Monday, July 24, 2006 - 12:52 pm: |
| 
|
घारुअण्णा, मुंबईच वडे पुण्याच्या box मधे आले. आम्ही पुणे येईपर्यंत वडे खात होतो. :-)
|
हा माझा पहिलाच ववि, नवखेपणाची भावना फ़क्त थोडाच वेळ जाणवली. अनेक नविन मित्र बनले आणि मैत्रिणीसुध्दा. एका अविस्मरणीय अनुभवाबद्दल सर्व वविकरांना आणि विशेषत्: संयोजकांना मनापासुन धन्यवाद. मला सर्वात जास्त आवडलेला प्रकार म्हणजे नचिकेतचे गाणे म्हणत सर्वांभोवती फ़िरणे. धमाल विनोदि प्रकार १. निलचे महिलामंडळाला सोडुन आमच्याकडे धाव घेणे. काय रे बाबा नील ठिकठाक आहेस ना रे. २. शब्दशोध मधे उडालेला गोंधळ, ज्याने संयोजकाही क्षणभर गोंधळले की त्यांनी असा कोणता शब्द टाकला. वाकड्या अगदी मस्त चालु आहे. अमोल
|
Shyamli
| |
| Monday, July 24, 2006 - 3:04 pm: |
| 
|
धमाल................. सविस्तर लिहायला वेळ नाहीये खुप ईच्छा असुन पण येताना पुणेकरांबरोबर आणि जाताना मुंबई करांबरोबर अशि एकुणच सगळ्यंअशिच ओळ्ख झाली संयोजन समीतीचे सा सु चे अभिनन्दन आणि मुम्बैकरांचे पण आभार विनयजिंकडे लाडुचा डबा नाही मिळाला पण सविस्तर ब्रेक के बाद.............
|
Sonchafa
| |
| Monday, July 24, 2006 - 3:56 pm: |
| 
|
मायबोलीकर झाल्यापासून गेल्या वर्षीचे ववि सोडता मी तिसर्या वेळेस ववि त सहभागी झाले. खरच खूप मजा आली. नावनोंदणी करून खेळांचे आयोजन ह्या ववितच झालेल पाहिले. पहिलाच अनुभव असल्याने शब्दशोध जरी जमला नाही तरी सहभागी होऊन प्रेक्षकांचे मनोरंजन (!) करायची संधी मिळाली. आयोजकांनी खूप हुषारीने टीम्स निवडल्या ह्यात शंका नाही. इंद्र,जुई, मराठीमित्र आणि मी अश्या टीम न पडता जर आम्ही एक एक जण इतर टीममेंबर्स मध्ये गेलो असतो ना तर तर बहुदा विजेता प्रयत्न करून सुद्धा शोधता आला नसता. (अहो कोणत्या टीम ला भोपळाही फोडता आला नसता की हो!) खरं की नाही? Anyway! jokes apart.. संयोजक आणि सर्व मायबोलीकरांना मनापासून धन्यवाद! तुमच्यासोबत दिवस कसा अन कधी संपला तेच कळले नाही.. अजून थोडा वेळ असता तर? असा विचार करत अणि पुढच्या वविची वाट पहात मी काल घरी परतले हे मात्र खरं!
|
Arch
| |
| Monday, July 24, 2006 - 4:12 pm: |
| 
|
सगळे लिहित आहेत चांगले. पण जरा Menu सांगितल तर चटकदार होईल न वाचणार्यांना 
|
Meenu
| |
| Monday, July 24, 2006 - 4:43 pm: |
| 
|
सकाळी सकाळी ६.३० ते ६.४५ च्या दरम्यान किमया पाशी जमायचं ठरलं होतं. ही अतिशय कठिण वेळ मी just in time गाठली. समोरुन बस आणी ईकडुन गाडीवरुन मी, अतुल (माझा नवरा) आणी सिद्धार्थ (माझा मुलगा) एकाच वेळी पोचलो. सर्व जनांचा अंदाज बरोबर येऊन संयोजकांनी सांगीतलेल्या रंगाची बस न येता पांढर्या रंगाची बस त्यावर निळी अक्षरे आली. श्री राम व सुश्या हे संयोजक कोपर्यावरच्या पानवाल्याला त्यावेळी company देत होते. मयुरेश खर्या sincere संयोजका प्रमाणे कामात मग्न होता. मग रस्त्यात उभे राहुनच मी ज्या लोकांना ओळखत होत त्यांची अतुलला ओळख करुन दिली. बाकी लोकांनी आपण होऊनच ओळख दिली अतुलला आणी मलाही. तितक्यात आता बस मधे बसावे की अनुपस्थीत लोकांची वाट पहावी यावर थोडी चर्चा अर्थातच रस्त्याच्या मधे उभी राहुन सुरु झाली. श्यामली नी वेळेवर पोचता न येण्यासाठी काही खास प्रयत्न केले होते. (म्हणजे मयुरच्या घरी न राहता कुठल्या तरी लांब राहणार्या जवळच्या नातेवाईकांकडेच जाऊन राहीली.) ईतक्यात ती आली .. श्यामली नाही वर्षा आणी सर्व जण चर्चा थांबवुन तातडीने बसमधे चढले. बसमधे भरपुर जागा होती 35 seater bus that was i believe त्यामुळे अजिबात मारामारी न करता सर्व जण आनंदात स्थानापन्न झाले. ईतक्यात पुनम व मिल्या यांचे आगमन झाले. पुनमला मी पाहीले नव्हते पण दिमडुने नचीकेतला हाक मारल्यामुळे ही बाई पुनम हे लगेच कळाले (तशी मी हुषार हो लहानपणापासुनच .. ) मग आमचा एक मीनी भरतभेट प्रसंग घडला. मी अतुलला मिल्याची हाच तो महाभाग (रेशमियाला बदनाम करणारा) अशी तत्पर ओळख करुन दिली. त्याला पण mass mail मधुन ती लावणी आलेली असल्याने लगेच बत्ती पेटली. या सगळ्या गोंधळात कोणाच लक्ष नाही असं बघुन सुश्यानं अनघाच्या शेजारची जागा पटकावली. आणी मग शेवटपर्यंत तो त्या जागेला पाकिटाला ष्टांप चिकटावा तसा चिकटुन बसला. मग उरलेले लेट comers आले. आणी सुश्यानी पुनमच्या मदतीने हेजेरी घेतली. (उपस्थीती हं ! ) मग एकदाची बस सुरु झाली. मयुरनी अतिशय दुष्टपणे असं जाहीर केलं की आता बस कुठेही थांबणार नाही direct resort . मग मी आणी सुश्यानी त्याला चहा पिण्यासाठी थांबावं अशी विनंती अगदी केविलवाणा, बिचारा असा चेहरा करुन केली. मयुरनी चेहर्यावरचा दुष्ट भाव कायम ठेवुन त्याला ठामपणे नकार दिला. कोकरु ' संयोजक ' मोडमधुन बाहेर यायला तयारच नव्हतं. मग हिरमुसला चेहरा करुन आम्ही आपले ईतरांशी काहीबाही बोलायला लागलो. मधे मधे शांतता प्रस्थापीत झालेली राकुला अजिबात आवडलं नाही, आणी त्यानी गडावर तो, जो dialogue नेहमी मारतो, तो सवयीप्रमाणे तीथेही मारला " ईतना सन्नाटा क्यु है भाई ...?" मग सर्वांनी एकमेकांना एकदोनदा हाच प्रश्न विचारुन घेतला. तितक्यात अंताक्षरी खेळण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पुनमनी लगेच डावे विरुद्ध उजवे अशी फुट पाडायचा प्रयत्न केला. पण तिचा फुट पाडायचा प्रयत्न यशस्वी रीत्या हाणुन पाडुन पुढचे विरुद्ध मागचे अश्या team पडल्या .. पुढच्या team मधे बडी, दिमडु, राकु, दिप्याचा duplicate , मृदा वगैरे लोक आघाडीवर होते. तर मागच्या team ची आघाडी फ आणी श्यामली यांनी पिछाडिला बसुन सांभाळली. राहुलनी ( RP ) आवाजाला विश्रांती द्यायची असल्याने बेंजो वाजवुन ताल( ? ) द्यायला सुरुवात केली. खरं म्हणजे तो वाजवत असलेल्या तालातली गाणी आम्ही म्हणावी असा त्याचा आग्रह होता. मी लोकांना माझ्या आवाजातली गाणी ऐकायला लावुन त्यांना भो. आ. क. फ. ची वारंवार आठवण करुन दिली. मी सुचवलेली गाणी फ आणी श्यामली अनुल्लेखानी मारुन टाकुन स्वतःला आवडणारी गाणी म्हणत होते. फ श्र नी फर्माईश केलेली गाणी म्हणत होता. त्यासाठी तो अंताक्षरीचे सारे नियम धाब्यावर बसवुन गात होता. दिमडु स्वतः पुर्ण गाणी म्हणायची मात्र फचं गाण पुर्ण ऐकणं तीला सहन होत नव्हतं. एकंदरीतच अंताक्षरी छान रंगली ती खालील गाण्यांनी .. केशवा माधवा, लावणी सम्राद्नी दिमडुच्या लावण्या, खंडाळ्याच्या घाटात, येरे येरे पावसा, .. अचानक आमच्या गायनानी डोकं दुखायला लागल्याने असेल पण मयुरला पाझर फुटला आणी बस चहापानासाठी थांबवण्यात आली. प्रचंड प्रमाणात वारा आणी जोरात पाऊस होता. बसपासुन हॉटेलपर्यंत विना छत्री जाणं शक्य नव्हतं आणी छत्रीचा फारसा उपयोग नव्हता. पाऊस तिरका येत होता. परत बस मधे येताना माझी छत्री वारा आणी पाऊस यांच्या मुळे उलटी झाली. मग परत एकदा बस प्रवास सुरु झाला. थोड्याच वेळात मुंबईची मंडळी बसमधे चढणार असं कळल्यावर पुण्याच्या मंडळींनी त्यांना बसायला मिळावे म्हणुन उभं राहुन पुरेशा जागा रिकाम्या केल्या. कोणी बसायचा याचा मुंबई व पुणेवाले एकमेकांना मनापासुन आग्रह करु लागले. यात काही जागा रिकाम्याच राहील्या. अर्थातच बसमधे भरपुर कलकलाट चालु होता. या गोंधळात बस मोदि रिसॉर्ट मागे सोडुन पुढे गेली. मग सर्वांनी आरडाओरडा करुन ही माहीती दिल्यावरही बस पुढेच जात राहीली. मग वळायला योग्य जागा मिळाल्यावर बस वळवुन परत मोदी रिसॉर्ट कडे नेण्यात आली. आणी मंडळी रिसॉर्ट वर पोहोचली.
|
|
|