|
Arun
| |
| Monday, July 24, 2006 - 5:25 am: |
| 
|
सर्व प्रथम उत्तम संयोजनाबद्दल, व. वि. च्या संयोजकांचे (मुंबई आणि पुणे येथील) तसेच सांस्कृतिक समितीच्या संयोजकांचे हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे, केवल मायबोलीच्या ओढीखातर, office च्या ग्रुप बरोबर येऊनसुद्धा व. वि. च्या संयोजकांना मोलाची मदत करणार्या रा. ना चे पण खास अभिनंदन ............. सांस्कृतिक शिस्तपालन आणि TP हे परस्परविरोधी नसून एकमेकांना पूरकच आहेत याचं एक उत्तम उदाहरण होते असे मला वाटते. याचे सर्व श्रेय संयोजन समिती (मुंबई आणि पुणे)यांच्याकडे जाते. आणि अर्थातच त्यात मोलाची भर घातली गेली ती सांस्कृतिक समितीच्या संयोजकांकडून. ....... या वर्षीच्या संयोजनात मला आढळलेली काही वैशिष्ठ्ये .... १. संयोजकांनी साधारण २ महिन्यांपासून केलेली सुनियोजित पुर्वतयारी २. पुणे आणि मुंबईच्या संयोजकांचा उत्तम मेळ ३. व. वि चे पैसे भरण्यासाठी अवलंबिलेले विविध मार्ग. याच्यामुळे बर्याच जणांना पैसे भरणे सोयीचे झाले ४. व. वि च्या निमित्ताने मायबोलीचे t-shirts print करणे ५. कार्यक्रमाचे सुत्रबद्ध संचालन. त्याचबरोबर, संयोजकांकडून, सकाळी पुण्यात जमण्यापासून, ते रात्री परत येईपर्यंत सगळी चोख व्यवस्था केली गेली होती. त्यातच संध्याकाळी परतताना मिळालेल्या कर्जतच्या वडापावची चव तर काही औरच होती.
|
Hemantp
| |
| Monday, July 24, 2006 - 5:49 am: |
| 
|
संयोजकांचे अभिनंदन. त्याच बरोबर काही सभासदांनी उत्स्फ़ुर्तपणे आपले कलागुण सादर केले, त्यांचे ही कौतुक वाटले.
|
Deemdu
| |
| Monday, July 24, 2006 - 6:05 am: |
| 
|
संयोजकांचे अभिनंदन आणि आभार देखील.
|
खरच ववि संयोजक हे अभिनदनास पात्र आहेत. दोन्ही ठीकाणच्या संयोजकांनी समन्वय राखून हा छान सोहळा पार पाडला. माझा पहिलाच ववि! आता पुढील वर्षीच्या ववि ची आतुरतेने वाट पहातोय! एक सुंदर अनुभव घेऊ दिल्या बद्दल संयोजक समितिचे आभार
|
Himscool
| |
| Monday, July 24, 2006 - 6:47 am: |
| 
|
सर्व व.वि. संयोजकांचे (पुणे + मुंबई) तसेच सां. स. चे अत्युत्तम संयोजनाबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि एक अविस्मरणीय अनुभवाबद्दल आभार.
|
Neel_ved
| |
| Monday, July 24, 2006 - 6:47 am: |
| 
|
वविला धम्माऽऽऽऽऽऽऽऽऽल आली. याचे श्रेय मी सर्व उपस्थित मायबोलिकरांना देईन.... इतक्या मोठ्या प्रमाणावर मायबोली चा ववि पार पाडणे केवळ तुम्ही सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे शक्य झाले... कुठे ही कसलाही गोंधळ नाही... वाद नाही... मला खास करुन पुण्याच्या संयोजकांचे अभिनंदन करावेसे वाटते... ते यासाठी कि आम्ही मुंबईतल्या संयोजकांनी फक्त इथे पैसे गोळा करुन ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. सांस्कृतिक समितीनी तर खरी रंगत आणली... सर्वच खेळ धम्माल झाले... अप्रतिम. मला इथे मुंबईकर मायबोलिकरांना एक विनंती कराविशी वाटते कि पुढील वर्षी वविसाठी आपण बस करुया... थोडे पैसे जास्त जातात पण it's worth it. काल आपण दिवसभर खुप enjoy केलं. त्याचा शेवट कसा झाला हे तुम्ही पाहिलतच. इतक्या छान दिवसाचा शेवट असा व्हावा हे बरोबर नाही. परत जातानाही सर्वाना एकत्र जाता आले असते तर खुप बरे झाले असते...
|
Yogayog
| |
| Monday, July 24, 2006 - 7:33 am: |
| 
|
नीलचे म्हणने मलाही पटत आहे, खरोखर पुण्यातील संयोजकानी खरोखर सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले त्यामुळे v&v ला एक वेगळीच धम्माल आली. आणि हा पुढील वर्षी V&V साठि मुंबईकरानी बस करावी.
|
>>>> थोडे पैसे जास्त जातात पण it's worth it. काल आपण दिवसभर खुप enjoy केलं. त्याचा शेवट कसा झाला हे तुम्ही पाहिलतच. इतक्या छान दिवसाचा शेवट असा व्हावा हे बरोबर नाही. (दचकलेला चेहरा) बापरे! काय रे नील, अरे काय झाल काय? अर्धवट लिहु नको रे भो! केव्हडा घाबरलो ना मी! मला वाटल की तुम्हाला लोकलला धक्का मारुन चालु करावी लागली की काय! DDD
|
Neel_ved
| |
| Monday, July 24, 2006 - 8:08 am: |
| 
|
लिंबु भाव, अरे जास्त काही नाही. पण परतीची गाडी मुंबईहुन आली तीच भरुन. बसायला जागा नाही. गडबडीत अर्धे जण एका डब्यात अर्धे दुसर्या डब्यात. मग त्यांची शोधाशोध. मोजुन दोघातिघांना बसायला जागा मिळाली. महिला मंडळ महिलांच्या डब्यात गेले. नीट उभे रहायला जागा नाही, सामान ठेवायला जागा नाही, असा काहीसा प्रकार झाला. दिवसभर सगळे धम्माल करतात, संध्याकाळी परत जाताना मात्र थकव्याची जाणीव होते, आणी अशा वेळी जर परतीचा प्रवास नीट झाला नाही तर सर्व आनंदावर पाणि फिरते.
|
धीस इज सो सॅड यार! मी नजरेसमोर चित्र उभ करु शकतो हे! पण खर तर रविवारी गर्दी कशी काय? की रविवार म्हणुनच पर्यटकान्ची जास्त गर्दी? आज लोकसत्तात बातमी हे जवळपास दोन लाख पर्यटकान्नी लोणावळा परिसराला भेट दिली! नेक्स्ट टाइम पब्लिक ट्रान्स्पोर्टवर अवलम्बायच नाही अस ठरवुनच टाका राव! साल कधी तरी वर्षादोनवर्षातुन एखाद्या वेळेस जिवाचा ववि करण्यासाठी जायच अन असा त्रास का बर सहन करावा? थोडे जास्त पैसे जातिल पण समाधान तर नीट मिळेल! मला पहिल्यान्दा वाटल होत की लोकल रुटवर ववि हे तर सोईच पडेल!
|
Psg
| |
| Monday, July 24, 2006 - 8:20 am: |
| 
|
थकवा ना, हो! बस सुरू झाल्यानंतर सर्व पुणेकर किमान एक तास डुलकी काढत होते. मग थोडे फ़्रेश होऊन पुन्हा गप्पा सुरु झाल्या. अपवाद हिम्स्कूल आणि घारू! अखंड बडबड!!
|
Neel_ved
| |
| Monday, July 24, 2006 - 8:22 am: |
| 
|
अरे आम्हीही तोच विचार केला होता... सकाळी जाताना काहीच त्रास झाला नाही. पण संध्याकाळी नेरळ, माथेरान येथिल पर्यटक त्याच गाडीत बसुन कर्जतला आले मुंबईला जाण्यासाठी, त्यात कर्जत मधील पर्यटकांची भर पडली... पुनम... घारुअण्णा हे एक वेगळच रसायन आहे....
|
खेचा लेको अण्णाच बरे मिळतात मी ही जर डुल्क्या घेतल्या असत्या तर मग वाटेत नीट उतरता आले नसते गेलो असतोना पुण्यापर्यन्त
|
बाकी वविला मजा आली
|
Wakdya
| |
| Monday, July 24, 2006 - 9:00 am: |
| 
|
वर्षाविहार वृत्तांत भाग एक - घर ते कर्जत नावाप्रमाणेच कुठलेही काम सरळपणे धड होऊ नये असे माझ्याबाबतीत नेहेमीच घडत असल्याने यावर्षीही वविला मी जावु शकेन की नाही याबद्दल शंकित होतो. ववि ची तारीख खुप आधीपासुनच निश्चित करुन ठेवली होती तरी माझ्याबरोबर घरातले कोण कोण येवु शकेल, कुणाकुणाला न्याव की नाही हे निश्चित होत नव्हते. शिवाय ऐनवेळेस ऑफिसची महत्वाची कामे निघाल्यास वविला जाणे अशक्य झाले असते ते वेगळेच. पण कसेही करुन यावर्षी तरी वविला जायचेच हे मी मनाशी पक्के ठरविले होते आणि बरीच भवति अन भवती करीत शेवटी मी व पत्नी असे दोघेजण जाण्याचे निश्चित करुन त्याप्रमाणे आयोजकांकडे पैसे जमा केले. नेमके २३ च्या आधीचे तीन चार दिवस सलगपणे, ऑफिसच्या कामासंदर्भात माझी भटकंती सुरू झाली त्यामुळे वविला जाण्यासाठी आवश्यक गोष्टींची जुळवाजुळव करणे मला प्रत्यक्षरित्या शक्य झाले नाही. २२ ला मी मुमबै मधे असताना फदी यांचा फो मला आला तेव्हा मी त्याला नक्की काहीच सांगु शकत नव्हतो व माझे यायचे निश्चित सांगता येत नाही असेही म्हणु शकत नव्हतो तेव्हा त्यास पुण्यात पोचल्यावर फोन करीन किंवा उद्या सकाळी बोलु असे कळविले. २३ ला वविल अजायचे आहे याची कल्पना पत्निला आदी दिली होती. पण गाडी आणि पैसे यांची व्यवस्था माझी मीच करायची असल्याने ती तिकडे निश्चिंत होती. तेव्हा फदीचा फोन येवुन गेल्यावर मी तिला फोन करुन सांगितले की बाईग, आपल्याला उद्या जायच आहे ना तर मला एक मोटरसायकल मिळवुन दे, खंडाळा घाट परत चढायला माझी स्कुटर आणि तुझी स्कूटी उपयोगाची नाही. ती बर म्हणाली व मला पुन्हा फोन करुन तिच्या भावाची मोटरसायकल उपलब्ध आहे असे कळवले. त्या दिवशी रात्री उशिरा घरी पोचल्यामुले त्याची गाडी आणुन ठेवणे शक्य झाले नाही. माझ्या मुलीला २३ रोजीच शाळेच्या ट्रीपबरोबर लोहगड विसापुरला जायचे असल्याने २३ ला पहाटे चार वाजता उठुन सर्वांची तयारी करुन देऊन, सातच्या सुमारास तिला रेल्वे स्टेशनवर सोडुन मग मी मोटरसायकल आणायला हिच्या भावाकडे गेलो, गाडी काढली, बसुन किका मारायला सुरुवात केली तर मधेच गादी चालू होऊन बंद पडली. मी मेव्हण्याला विचारले की प्लगच्या कॅपमधे पाणी तर गेले नसेल? मी गाडीवरच होतो, त्याने खस्सदिशी प्लगची कॅप ओढुन काढली तर प्लग्वर असलेली एक फिरकी त्या कॅपमधे अडकुन बसली आहे असे लक्षात आले, आता फिरकीचे आटे गेल्यामुळे ती त्यावर पुन्हा बसतही नव्हती, माज्या दृष्टीने ती गादी बाद झाली होती. हे करताना माझा मोलाचा वेळ वाया गेला होता. आता आज काही वविला जाता येत नाही असा विचार मी मनात करु लागलो. नेहेमी "प्रतिकुल तेच घडेल" असे गृहित धरुन विचार व कृती करण्याची सवय असल्याने खरे तर माझ्याकडे पर्यायी व्यवस्था असणे अपेक्षित होते पण २३ च्या आधीचे तीनचार दिवस मला वेळच मिळाला नाही. परत घरी आलो, आधिच्या आठवड्यातील अथक परिश्रमांमुळे थकलेल्या मला उसनी गाडी मिळविण्यासाठी सकाळी सकाळी कुणाची दारे ठोठावण्याचा धीर नव्हता आणि तशी ऐनवेळची उसनवारी करणे माझ्या कोक्या स्वभावातही नाही. वेळेला ववीला जाणार नाही पण आत्ता सकाळी कुणाकडे फिरत बसणार नाही असे पत्निला सांगितले. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणुन आमच्या शेजार्यांची नविकोरी स्कुटी करता पत्निने त्यांच्याकडे विचारणा केली व ती गाडी मिळवली. मी ती लगेच ताभ्यात घेवुन तिच्यात पुर्ण टाकीभर पेट्रोल भरुन आणले तोवर साडेसात झाले होते. कोणत्याही क्षणी फदीचा फोन येइल या प्रतिक्षेत मी होतो, तेव्हा मीच फदीला फोन केला, तो अजुन पुण्यातुन निघायचा होता व अर्ध्या तासात म्हणजे आठ वाजेस्तोवर भक्तिशक्ती उद्याना जवळ पोचतो असे म्हणाला. कशिबशि मि माझी पिशवि भरली, पत्नीने तिचे आवरले व इंडियन टाइमचा आरोप व्हायला नको म्हणुन आम्ही वेळेत आठ वाजता भक्तिशक्तिपाशी पोचलो, तिथे जाताना वाटेत धाकटीला आज्जिकडे सोडणे, मेव्हण्याकडुन कॅमेरा घेणे, नंतर रोल व सेल विकत घेणे असे सगळे केले होते. आठ झाले सव्वा आठ झाले, माझा धीर सुटत चालला, एकतर मला फदी म्हणजे कोण तेच आठवत नव्हते, येणारा माणुस कसा असेल, मी ओळखेन की नाही वगैरे शंका कुशंका आणि त्यात पत्नीचे प्रश्न, अहो तुम्ही त्यांना नक्की काय सांगितले? त्यांना आपण दिसु का? त्यांना काही झाले तर नसेल?...... शेवटी बराच वेळ वाट बघितल्यावर, पुणे साईडकडुन येणार्या प्रत्येक मोटरसायकलस्वारास न्याहाळत असताना एकदाचे फदी व त्याचा भाऊ आले. आल्यावर मी माझे हेल्मेट काढुन माझा पुर्ण चेहरा त्याला दाखविला, पुर्वी मला वाटते की विनय देसाईंचे पुस्तक घेतले त्यावेळेस तो उपस्थित असावा. त्यांची जुजबी चौकशी करुन फदीच्या डोक्यावर हेल्मेट आहे याची खात्री करुन आणि माझी स्कुटी पन्नासच्या पुढे पळवता येत नाही तेव्हा मी पुढे रहातो तुम्ही मला फॉलो करा अस त्यांना सांगुन आम्ही निघालो. पाऊस रिमझिम पडतच होता. मी आरशातुन मागे लक्ष ठेवुन होतो, मागुन लांबवर एक मोटरसायकल येत होती, तोच फदी असेल अस वाटले, पुढे देहूगावच्या फाट्यापाशी पुन्हा थांबुन बघितले तर येत आहेत असे वाटले, देहू गाव पार करुन, कात्रज बायपासचा फाटा पार करुन पुढे आलो नी थांबायचा निर्णय घेतला कारण आता आरशात फकी नव्हता. तिथे बराच वेळ वाट बघितल्यावर ते आले, तो पर्यंत माझी आणि पत्निची चर्चा झाली होती की फदीच्या हेल्मेटला काच नाही (पत्नीनेच आठवण करुन दिली) त्यामुळे पावसाच्या थेंबांच्या चेहर्यावरील प्रहारानी त्याला गाडी वेगात चालविणे अशक्य होत असावे. प्रत्यक्षात फदी ने वेगळेच सांगितले, निघाल्या निघाल्या भक्तिशक्तीपाशीच त्यांना पोलिसाने अडवुन धरले होते. मला वेळेत ववि ला पोहोचण्याची घाई झालेली असल्याने मी पोलिसाबरोबर काय झाले, कितिक मधे तोड निघाली असले जिज्ञासायुक्त प्रश्न विचारीत न बसता माझ्या पत्निचे हेल्मेट त्याच्या डोक्यावर आग्रहाने चढविले व त्याचे हेल्मेट पत्नीला दिले आणि पुढे निघालो. आत्ता पर्यंतच्या अनुभवावरुन शहाणा होऊन आता त्यांना पुढे थेवले व मी मगुन त्यांना फॉलो करीत राहिलो. वाटेत वडगावला त्यांनी पेट्रोल भरुल घेतले. जसजसे लोणावळा जवळ येवु लागले तसतसा वार्याचा आणि पावसाचा जोर वाढता राहिला. माझे हेल्मेट बंद काचेचे पुर्ण असल्याने मला काचे आत वाफ धरुन धुक्यात गाडी चालविण्याचा अनुभव येत होता, ते धुके घालवायला काच वर केली तर रपारप फटकारे बसायचे व काच दोन्ही बाजुनी ओली व्यायची, मग हाताने काचेची आतली बाजु साफ करुन पुन्हा बसवली की पुन्हा तेच. पन्नास साठच्या स्पीडमधे पावसाच्या पाण्याचे ओघळ घालवुन टाकायला वायपर सारखे काही नसल्याने हातानेच काच साफ करीत रहावे लागे शिवाय बाजुने भन्नाट वेगात जाणार्या गाड्यांमुळे उडालेले चिखलाचे तुषार काचेवर बसुन काच मळकट होइ ते वेगळेच. फदी आधिच सातार्याहुन रात्री खुप उशिरा आला होता त्यामुळे आणि एकंदरीतच त्याच्या जर्किनने नीट साथ न दिल्याने त्याचा शर्ट भिजला होता, थंडी वाजत असल्याने आणि तसा तो शांत स्वभावाचा असल्याने गाडी सावकाश चालवित होता. मला माझ्या एका जुन्या ट्रीपची आठवण झाली ज्यात दुसर्या गाडीवरच्या स्लो जोडीदाराला आम्ही ओरडुन ओरडुन सांगत असु की अरे मुठ पीळ रे! मी शेवटी तसेच ओरडलो, पत्नीला संदर्भ माहित असल्याने ती खो खो हसु लागली तर गाडी हेलकावल्याने मी तिला हसु नको असे म्हणले. मी ओरडलेलो फदीला ऐकु जाणे शक्यच नव्हते त्यामुले त्याच्या अंगात वेगाच्या वीरश्रीचे वारे केव्हा संचारेल याची वाट आम्ही बघत होतो नि प्रत्यक्षात वेगात वहाणारे थंडगार वारे फदीची झोप उडवित होते. लोणावळ्या अलिकडे पावसाचा जोर येव्हडा वाढला की आमचा स्पीड कमि होउन तीस पर्यंत उतरला. पावसाच्या थेंबाचे फटके रेनसुट, शर्ट, बनियन यांचे चिलखत भेदुन आतल्या अंगाला टोचल्याप्रंआने बसत होते. माझ्या पत्नीने पायात चप्पल घातली होती व मोजे नव्हते तर पायावर पाण्याचे फटके बसल्यामुळे ती वैतागली होती पण एंजॉय करीत होती. ववि करता नुकताच घेतलेला माझा रेनसुत मागल्याच आठवड्यात चेनच्या बाजुने खाली आणि कॉलरकडे चिरफाळला होता व खालची ती भेग वारा आत घुसत असल्याने वाढत चालली असे निदर्शनास आल्यामुळे मी शहाणपणा करुन रेनसुटचा वरचा भाग शर्ट सारखा पॅन्टमधे खोचला होता. अर्थात अधे मधे असलेल्या फटी, बिळ आणि उघड्या चेनमधुन पाणी झिरपत थेट आतवर पोहोचले होते व त्याच्या थंडगाऽऽर स्पर्षाची जाणिव अस्वस्थ करीत होती. होता होता त्याही परिस्थितीत लोनावळा पार करुन आम्ही खंडाळ्याला पोहोचलो. चहा घेण्यासाठी सोईस्कर हॉटेल निवडण्याची जबाबदारी मी फदीवरच टाकली होती. त्याने खंडाळ्याच्या तळ्याजवळ एक टपरी हॉटेल शोधुन काढले, तिथे चहा प्यायलो. आम्ही सर्वच कुडकुडत होतो. फदी बिचारा आतुन पुर्णपणे भिजला होता. थोडावेळ त्याच्याशी गप्पा मारल्या, त्याच्या भावाशी ओळख करुन घेतली (माफ कर रे भावा, पण याक्षणी मला तुझे नावच आठवत नाही, केवळ चेहरा आठवतो आहे कारण नावाने हाक मारायची वेळच आली नाही आणि विस्मृतीबद्दल मी माझ्या घरी प्रसिद्ध आहे) ते काय काय करतात वगैरे जुजबी गोष्टी आणि आता पुढे कसे कसे जायचे या वर बोलुन पुढे निघालो. त्यांना पुन्हा एकदा चहा ऑफर करण्याची इच्छा वेळेत वविला पोचण्याच्या दबावापुढे मागे घेतली आणि निघालो. माफ करा पण वरील पोस्ट थोडी मोठीच झाल्याचे मला भासते आहे तसेच ती जरा जास्तच पाल्हाळिक किंवा अनावश्यक मजकुराची आहे असे वाटल्यास मला जरुर सुचित करा म्हणजे पुढील पोस्ट मधे सुधारणा करणे सोपे होइल आणि येवढे टाईपकरण्याचे श्रमही वाचतील. क्रुपया शुद्धलेखनाच्या चूका दुर्लक्षित कराव्यात, कारण हल्ली मला देवनागरी टाईप करण्याची सवय राहीलेली नाही!
|
Moodi
| |
| Monday, July 24, 2006 - 9:14 am: |
| 
|
वाकड्या चांगले लिहीलेत की. हा अनुभव पण तुम्हा दोघांच्या कायम स्मरणात राहील. फदी खरच शांतच आहे. पावसाचा अन पोलीसाचा त्रास सोडला तर बाईक / स्कुटीवर जाणे एवढे त्रासदायक वाटले नसेल. मजा केलीत. 
|
सुन्दर सकाळ ट्रेनची ग़डबड आणि एकोणिस जण कोणताही स्वार्थी हेतू मनात न ठेवता जमलेले वाट पाहात हो ते केवळ सगले जण भेटाण्याची कर्जतला घेतलेला चहा आणि त्या चहावाल्याचे कूतूहलानी वविचि यादी बघण मस्त आणि वेगळीच सुरवात कालच्या दिवसाची ठिकाण नुसते एकुन माहीती जुने आणि नवीन सन्योजक आणि स्पर्धक मुम्बैकर आणि पूणेकर सगळेच सारखेच उत्साही म्हणुनच बहुदा पाउसही छान आला स्वीमिन्ग पूलवर पावसत भीजतानची मज़ाही काही वेगळीच. वरून पावसाचे टोकदर बाण आणि सभोवती पूलचे थन्ड पाणी अब्का ववि खुब याद रखेन्गे मिलेन्गे अगली बर फिर मिलेन्गे लोग वही होन्गे माहोल वही होगा.. शयद.. लेकिन कल का आलम भूलाया ना जायेगा
|
Event Management म्हणजे काय??? याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे ववि २००६!!! वविच्या उत्सुकतेपोटी आदल्या रात्री काही केल्या डोळा लागेना... दादर, ठाणा करत ९.०० वाजता कर्जत गाठलं... सकाळचा वडापाव उरकेपर्यंत पुणेकरांची बस स्टेशनवर आली... दरवर्षीच्या सवईनुसार थोडे पुढे मागे करत मोदि रेसॉर्टवर पोहचलो. विनयजी खाजगी गाडीने कुटुंबासहित आधिच पोहचले होते आणि रा. णा. आदल्या दिवसापासुन ठाण मांडुन होता. रा. णा. च्या ओळखीचा खुप फ़ायदा झाला... धन्यवाद पुण्याच्या गाडीतुन दिपस्तंभ, डिम्डू, हिम्सकूल, मराठी मित्र, देवदत्त, अरुण, हेमंत, मृदा, राहुल फ़ाटक, राजकुमार, चिन्मय, फ़, श्रद्धा, बडबडी, श्यामली पिल्लांसोबत, मिल्या विडंबना सहीत, सुश्या कोणासहीत?, धृव जोडीने आणि मिनू सहकुटुंब उतरले... लिंबू गाडीला लटकलेलेच होते. मुंबईवरुन सृजनत्व, बॉम्बेविकिंग, उदय, सोनचाफ़ा, अमी, मनी, सुनिल, आनंदनेहा, आनंदमैत्री, योगायोग, ऍश अनन्या, जयसुर्या योगी०५०१८१, भ्रमर विहार, घारूअण्णा, नील जोडीने आणि असमादिक जोडीने आले होते (कृपया कोणाचा उल्लेख राहिला असेल तर आठवण करुन द्यावी) दिवाडकरच्या वड्यांनी जठराग्नी जागविला होता, त्यातच मोदिच्या बुफ़े (भुके असावे) नाष्ट्यावर सर्वांनीच यथेच्छ ताव मारला. मेन्यू टाका रे कुणितरी... साधारण १०.३०च्या सुमारास एका सभा मंडपात सगळे तृप्त आत्मे स्थानपन्न झाले आणि राहुलने कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुरू केले. थोड्याश्या दबक्या आवाजात ओळख परेड सुरु झाली आणि खर्या खोट्या ID ची चिरफ़ाड होऊ लागली. दिप्स चा SHE ID सर्वांच्या लक्षात राहिला. मधेच विरंगुळा म्हणुन राहुलने आपली ओळख देऊन टाकली. अश्या तर्हेने ववि मधला हा खडतर टप्पा पार पडल्यावर सर्व उपस्थितांना हायसे वाटले. आता वेळ होती सांस्कृतीक कार्यक्रमांची शुकशुक, झुकझुक, टुकटुक, भुकभुक, लुकलुक!!! जोड्या जुळवा बघता काय... एकच कल्लोळ... धमाल गेम होता विजेत्यांन्या Mentos वर सामाधान मानावे लागेल राहुन राहुन पुणेकरांना एक सुचना करावि असे वाटत होते. "वरील शब्दफ़लक गाडीच्या मागे लावाला असता तर जाता जाता मागच्या वाहन चालकाची फ़िरकी घेता आली असती. दुसरा अफ़लातून खेळ "ड्रम शराड".... मायबोलिवरील म्हणी आणि पुणेरी पाट्यांचे मथळे यावर आधारीत प्रश्णामुळे खेळात खुप वैविध्य आणि मजा अनुभवता आली. शो. ना. हो. गटात विनयजी, PSG अणि फ़ ऐ. ते न. गटात अस्मादिक, योगी आणि आनंद मैत्री जल्ल मेलं लक्षण गटात सोनचाफ़ा, जुई आणि धृव हे क. ब. गटात मराठी मित्र, नील आणि??? शो. ना. हो. आणि ऐ. ते न. गटात चुरशीचा सामना झाला आणि निर्णायक वेळत ऐ. ते न. गटाने बाजी मारली. त्यानंतर आनंदनेहाने गाण्यांच्या नकलांचा एकपात्री प्रयोग सादर करुन मायबोलीकरांना खदखदून हसवले. सोबतीला नील, दिप्स, bombayviking चे भरभरून प्रोत्साहन होतेच. १२च्या सुमाराला वर्षा विहारासाठी सर्वजण बाहेर पडले. दरम्यान अरूणने T-shirt वाटपाचे काम उरकले. मुंबईकरांनी रेसॉर्टवरील तरण तलावात डुंबण्यात समाधान मानले. नाहीतरी स्वच्छ क्लोरीनयुक्त पाण्यात डुंबणे मुंबईकरासाठी फ़ारच दुर्मीळ असते. भुके लंचवर आडवा हात मारल्यावर काहि मंडळी पेंगु लागली. वेळेचे गांभिर्य जाणून राहुलने एक पब्लिक गेम सुरु केला आणि सर्व मंडळींत उत्साह संचारला. भारी उत्साहाच्या भरात नीलने तृप्तीची साथ सोडल्याने नीलवर आणिबाणी ओढवली होती. विनय देसाईच्यां कथा कथनातील सदू आणि लेडी पोलीस... सहीच शब्द शोध या कार्क्रमात दोन जणांचे चार गट होते. झुम्मा गटात फ़ आणि नील विषामृत गटात मी आणि जुई डबरा ऐस पैस गटात मराठी मित्र आणि सोनचाफ़ा लगोरी मधे आनंदनेहा आणि आनंदमैत्री या खेळातही झुम्मा आणि लगोरी गटात चुरशीची लढत पहावयास मिळाली आणि शेवटी लगोरी गटाने बाजी मारली. सर्व विजेत्यांना मिल्या आणि राजकुमार यांच्या हस्ते पारितोषीक देऊन गौरवण्यात आले... फ़ोटो येतीलच... वाट बघा... पुढला एक तास उस्फ़ुर्त कलाकारांसाठी देण्यात आला. मनी, श्यामली, डिम्डू, मृदा, सृजनत्व, Bombayviking , नील आदिंनी गळे साफ़ करून घेतले. आनंदनेहाने गणेशोत्सवातील फ़िल्मी आरत्यांचा अप्रतीम नमुना सादर केला. ५.००च्या सुमरास चहापानाचा आणि ग्रुप फ़ोटोचा कार्यक्रम आटोपुन दिवाडकरकडे मोर्चा वळविला. दिवाडकरचे गरमा गरम वडे आणि वविच्या गोड गोड आठवणी घेऊन सगळे मार्गस्त झाले. वविच्या यशस्वि आयोजना निमित्त सर्व संयोजकांचे हार्दिक अभिनंदन
|
हेमन्त अजुन पूण्यातच आहे घरी जायला तर छानपैकी सुमो मिळाली सोमाटणे फाट्यापसून थोड चालाव लागल पण काही त्रास नाही आज निघेन पुण्यातून बाकी सर्व ठीक आहे
|
Neel_ved
| |
| Monday, July 24, 2006 - 10:10 am: |
| 
|
इंद्रा, मस्तच...पुन्हा तिथे गेल्यासारखे वाटले...... अरे योगायोगानी योगायोगला विसरलास....
|
|
|