Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 24, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Mumbai » वर्षा विहार - २३ जुलै २००६ - कर्जत » Archive through July 24, 2006 « Previous Next »

Waatasaru
Friday, July 21, 2006 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की काय हे..
वरती सावाकर भवन असे व्यवस्थित लिहिले आहे ना मग
उगाच आपले


Naatyaa
Friday, July 21, 2006 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती सावाकर भवन असे व्यवस्थित लिहिले आहे ना मग >> अरे ते पुण्यात होते तेव्हा सावरकर स्वत: जिवंत होते.. त्यामुळे त्यांना कुठले सावरकर भवन माहित असतंय.. ~D

Limbutimbu
Friday, July 21, 2006 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"वरच्या पोस्ट्स म्हणजे सर्व लिम्ब्याचे कारस्थान" अशी बोम्ब कुणी मारायच्या आधी पळा बघु इथुन! DDD

Phdixit
Saturday, July 22, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Jo_s
Sunday, July 23, 2006 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वविकर्यांनो आलात उनाडून? चला आता रिपोर्ट टायपा भराभरा. (हे पुण्यातल्यां साठी : जितके अधीक शब्द तितके अधीक पुंण्य लागेल हो.)

Dineshvs
Sunday, July 23, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्यक्ष घोड्याच्या तोंडातुन ऐकल्याप्रमाणे, खुप मजा आली तिथे. वेळेचे गणित जमवु न शकल्याने, मी जाऊ शकलो नाही, त्याबद्दल खरेच वाईट वाटतेय. पण खरेच जमवु शकलो नाही.
वृतांताची मी पण आतुरतेने वाट बघतोय.


Vavi_sanyojak
Sunday, July 23, 2006 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, वर्षा विहार २००६ अत्यंत उत्साहात पार पडला!!!
तुम्हा सर्वांच्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद... वृत्तांत लवकरच पोस्टण्यात येईल


Prady
Monday, July 24, 2006 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववि ला नक्कीच धमाल आली असणार. व्रुत्तांता बरोबर फोटो असतील तर ते पण टाका

Limbutimbu
Monday, July 24, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> प्रत्यक्ष घोड्याच्या तोंडातुन ऐकल्याप्रमाणे, (विचारग्रस्त चेहरा)
कोण रे तो? तुला घोडा म्हणायच हे की रेडा?
तर मन्डळी, पुढले काही दिवस V&C वर अलिखित बन्दी! ववि च्या पोस्ट्स्च्या ट्रॅफिकमुळे V&C अनुल्लेखित!
चला मन्डळी, वृत्तान्त येवुद्यात लौकर लौकर! (उगा भाव खावु नका)


Wakdya
Monday, July 24, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सळसळत्या उत्साहात, नियोजनबद्धरित्या काल २३ जुलै रोजी कर्जत येथिल मोदी रिसॉर्टमधे ववि पार पडला. मी, माझी पत्नी, फदी आणि त्याचा भाऊ (नाव आठवत नाही) असे गाड्यांवरुन उशिरा पोचलो ऑळखपरेडीचा कार्यक्रम संपत आलेला असल्याने आलेल्या व्यक्तींचा तितकासा परिचय होऊ शकला नाही. मात्र श्री दीपस्तम्भ यांनी पुढे होवुन शेकहॅण्ड करुन स्वागत केले. श्री मयुरेश यांना आम्ही आल्याची खबर देवुन पुढे काही काळ एका कार्यक्रमाचा आनंद लुटला त्यानंतर फिरायला बाहेर पडलो आम्ही काही मोजकी साताठ लोक तारेच्या कुंपणा खालुन सरपटत पलिकडे जाऊन एक धबधबा शोधला व निम्या डोंगरात असलेल्या धबधब्या पर्यंत गेलो. आमच्यातला एकजण निम्या वाटेतुन परत गेला. मला त्याचेही नाव आठवत नाही. धबधब्याकडे जाणार्‍यात मी, माझी पत्नी, फदी, त्याचा भाऊ, धृव व एक मुलगी (नाव माहित नाही)आणि मराठी मित्र (हेच नाव ना नक्की?) असे होतो. परत आल्यावर जेवण उरकले व पुढिल कार्यक्रमाचा आनंद लुटला. माझ्याबरोबर स्कुटी ही गाडी असल्याने परत खंडाळा घाट ती कितपत चढेल याची शंका असल्याने आम्ही लौकर म्हणजे साडेतीनच्या सुमारास श्री मयुरेश यांना सांगुन परत निघालो ते सहा वाजता सुखरुपपणे घरी पोहोचलो.
वविच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन आणि असे ठिकाण निवडुन आम्हाला "वर्षा विहाराचा" निखळ अनुभव घेण्याची संधी दिल्याबद्दल आभारही.
सांगण्यासारखे बरेच आहे, जसा वेळ मिळेल तसे लिहिन
धन्यवाद


Kandapohe
Monday, July 24, 2006 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वृतांतात मला (व अनेक मायबोलीकरांना.) उत्सुकता असलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली तर मजा येइल.

१. वर्षा आली होती का?
२. किती लोक्स होते?
३. कार्यक्रम कसे झाले?
४. व्हेन्यु कसा होता?
५. खानपानाची सोय कशी होती? मेन्यु काय होता?
६. गमतीदार घटना घडल्या का? घडल्यास कोणत्या?
७. चेष्टेचे गिर्‍हाईक कोण होते?
८. मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर असे वाद झाले का?
९. V&C झाले का?
१०. एकूणच वर्षाविहार मधील लोकप्रिय, कलाकार व सर्वात जास्त गर्दीखेचक आयडी कुठला होता?

चला थांबावे. वृतांतलेखक धक्के मारत आहेत.


Arch
Monday, July 24, 2006 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मुख्य राहिल न, KP ? काही जमल का?

Limbutimbu
Monday, July 24, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> ६. गमतीदार घटना घडल्या का? घडल्यास कोणत्या?
>>>>> ७. चेष्टेचे गिर्‍हाईक कोण होते?
>>>>> ८. मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर असे वाद झाले का?
>>>>> ९. V&C झाले का?
कान्द्या, आताच हाती आलेल्या बातमी नुसार आयोजकान्नी राबवलेल्या कडक "सान्स्कृतिक शिस्तीमुळे" अशा गोष्टीन्ना आळा बसला होता. :-)
("सान्स्कृतिक शिस्त" हा शब्द उधारीचा! त्यामुळ त्याची जबाबदारि माझी नाही! विनोदनिर्मिती झाली असल्यास केवळ विनोदाची जबाबदारी माझी) ddd

वाकड्याऽऽ, स्कुऽऽऽटीऽऽऽऽऽ? (दचकलेला चेहरा) :-(


Ninavi
Monday, July 24, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे लिंब्या तू नव्हतासच का? ( मग बरोबर आहे v&c नाही झालं ते.)

मंडळी सविस्तर वृतांत लिहा लवकर

Mruda
Monday, July 24, 2006 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रभात व वि च्या संयोजकांचं आणि सां. स. च.. उत्तम संयोजना बद्दल अभिनंदन..!
व. वि. ला मी पहिल्यांदाच गेले होते. माझ्यासाठी तो एक छान अनुभव ठरला..



Limbutimbu
Monday, July 24, 2006 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. वर्षा आली होती का? हो, वर्षा नावाच्या दोन मुली, वर्षा नावाचा पाऊस असे आले होते
२. किती लोक्स होते? चारपाच वेळा मोजदाद करुनही एक आकडा मिळत नसल्याने रिकन्सलेशन करुन सरासरी आकडा काढावा की काय यावर खलबत सुरु हेत, थोडा धीर धरा! शिवाय रिसॉर्टच्या बीलावरचा आकडा चुकुन कमी पडला अस काहीन्च मत हे!
३. कार्यक्रम कसे झाले? सुपर्ब
४. व्हेन्यु कसा होता? हिरवाकन्च, हिरवागाऽऽर
५. खानपानाची सोय कशी होती? मेन्यु काय होता? झकाऽऽस! आत्ता मेन्यु सान्गुन पुन्हा तोन्डाला पाणी का सोडवुन घ्यावे? मेन्यु ऐकुन जाणारेस का पुन्हा थित?
६. गमतीदार घटना घडल्या का? घडल्यास कोणत्या? याचे उत्तर वर दिल हे
७. चेष्टेचे गिर्‍हाईक कोण होते? याचे उत्तर वर दिल हे
८. मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर असे वाद झाले का? याचे उत्तर वर दिल हे
९. V&C झाले का? याचे उत्तर वर दिल हे
१०. एकूणच वर्षाविहार मधील लोकप्रिय, कलाकार व सर्वात जास्त गर्दीखेचक आयडी कुठला होता? हा विषय V&C चा असल्याने हा प्रश्ण V&C वर विचारावा
(वि. सु.: वरील निवेदन व उत्तरे अनधिकृत असुन विनोदनिर्मितीकरता व वृत्तान्त टायपुन येइस्तोवरचा वेळ घालविण्याकरता हेत याची नोन्द घ्यावी!)


Meenu
Monday, July 24, 2006 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववी संयोजकाअंचे उत्तम संयोजनाबद्दल अभीनंदन. मी प्रथमच ववीला गेले होते. बरोबर नवरा व मुलगा यांनाही घेऊन गेले होते. एकंदरीतच त्यांनाही ववी अतिशय आवडलं. ओळख नाही म्हणुन कंटाळा आला वगैरे असं अजिबात झालं नाही.

सकळी बस मधे बसल्यापासुन ते संध्याकाळी बसमधुन उतरेपर्यंत क्षणभरही कंटाळवाणं वाटलं नाही मला वाटतं यातच ववीच यश सामावलेलं आहे.

साधारणपणे पन्नास च्या आसपास लोक होते. लहान मुलही दहाएक असतील.

कार्यक्रम अतिशय सुंदर आणी नियोजनबद्ध होते. यात शब्द ओळखा, गट जमवा, dumba sheras असे खेळ होते. तसेच कथाकथन, गाणी आणी ईतर काही individual performance होते. मिल्याची विडंबने (पुनमनी गायलेली) सर्वात जास्त आवडली.


Samu
Monday, July 24, 2006 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍएक उत्तम कार्यक्रम आनि उत्तम नियोजन

Psg
Monday, July 24, 2006 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही झाला व वि २००६. :-) या वेळी नियोजन करून, समित्या करून आणि कामं वाटून घेऊन सर्व कार्यक्रमाची आखणी केली होती. उत्तम नियोजन असले, की कार्यक्रमही उत्तम होतो याचं उदाहरण म्हणजे कालचा वर्षा विहार!! स्पॉट अप्रतीम आहे, भरपूर पाऊस होता, गारवा आहे सगळीकडे, धबधबे आहेत आणि first class जेवण!! पुण्यातही बहुदा इतके छान जेवण मिळायचे नाही!! खास माईक ची सोय केली होती, त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना मजा आणि clarity आली. नंतर 'घसा साफ़' करतानाही त्याचा उपयोग झाला :-) बाकी 'अधिकृत वृत्तांत'- केपी च्या guidelines वर लवकरच!
आपापले छोटे groups घेऊन आपण नेहेमीच बाहेर जातो. पण मोठ्या group नी बाहेर जाणे, सर्वांनी मिळुन सर्व कार्यक्रमाची मजा लूटणे हे feeling च वेगळं असतं! जे आले नाहीत, येऊ शकले नाहीत, त्यांनी खचितच काहीतरी मिसलं आहे असं मी म्हणीन. :-)


Sushya
Monday, July 24, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांनी कालचा व वि मिसला त्यांच्यासाठी आणि जे आले होते त्यांना पुन्हा आठवण होईल असा वृत्तांत लवकरच येईल, पण पूनमने म्हटल्याप्रमाणे व वि छानच झाला!!!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators