Sonchafa
| |
| Monday, July 10, 2006 - 7:44 am: |
| 
|
बडबडी आणि मयुरेश,धन्यवाद. तुमचे ईमेल मिळाले. घारुअण्णा आणि नीलवेद ह्याम्च्याशी बोलणे झाले आहे. मी येईन वविला. पण ह्या चौकोनांचे आणि रेघांचे करा बाबा कोणीतरी काही.. बर्याच बीबी वर दिसत आहेत ते मला.
|
Badbadi
| |
| Monday, July 10, 2006 - 8:45 am: |
| 
|
सोनचाफा, मस्त च ग .. भेटूच मग २३ ला...
|
उठा मंडळी.. जागे व्हा.. अहो, आज व वि नावनोंदणीचा शेवटचा दिवस आहे.. नंतर करू म्हणुन बसाल तर व विला मुकाल.. तेव्हा लगेच वरच्या माहितीतील mail id वर mail करा आणि आपले नाव नोंदवा.. आता मर्यादित जागाच उपलब्ध आहेत तेव्हा त्वरा करा आणि हो फक्त व वि नावनोंदणीची मेल नव्हे तर त्याचबरोबर सगळ्यांना सांस्कृतीक कार्यक्रमातही भाग घ्यायचा आहे.. त्यांची सविस्तर माहिती तुम्ही वर वाचलीच असेल. तेव्हा त्यात दिलेल्या mail id वर मेल करा आणि विविध कार्यक्रमांतला आपला सहभाग कळवा.. तेव्हा वेळ घालवु नका.. आपली इपत्रपेटी उघडा आणी लागा email करायला
|
संयोजक मी विद्युत पत्र पाठविले आहे. कृपया पोच द्यावी.
|
Sonchafa
| |
| Monday, July 10, 2006 - 4:58 pm: |
| 
|
संयोजक, मलाही ईमेल ला पोच आली नाही त्यामुळे कळत नाही की मेल पोहोचली की नाही ते..
|
bvk ,सोनचाफ़ा, तुमच्या मेल्स मिळाल्या आहेत.. तुम्ही मुंबईचे संयोजक घारुअण्णा आणि नीलवेद यांच्या संपर्कात रहा.
|
विशेष सूचना ज्यांना व वि ला यायची इच्छा आहे पण ज्यांना आतापावेतो registration करणं जमलं नाहीये, त्यांच्यासाठी १५ जुलैला registration करायचा पर्याय आहे. त्यादिवशी ते बालगंधर्वला उपस्थित असणार्या संयोजकांना प्रत्यक्ष भेटून नावे व पैसे संयोजकांकडे देऊ शकतात. १५ जुलैनंतर कुठलेही registration स्वीकारले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
|
मंडळी, या वर्षीच्या व विसाठी तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आपले नावनोंदणीचे आणि पैसे जमा करण्याचे काम पूर्ण झाले आहे.. आता कोणतिही नविन नावनोंदणी केली जाणार नाही.. पुणेकरांसाठी व विच्या दिवशीचे बसचे आणि pick up points चे डीटेल्स आम्ही लवकरच देऊ.. भेटुयात तर मग मंडळी व विला.. धम्माल करायला
|
Wakdya
| |
| Monday, July 17, 2006 - 11:35 am: |
| 
|
येत्या शुक्रवारी व शनिवारी मी मुंबई मधे असल्याने २३ रोजी वविला कशाप्रकारे कुठुन कसे यावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाईकवरुन वविला जायचे बहुतेक रद्द झाल्यात जमा आहे. तसेच वविला वेळेत पोहोचता येइल किंवा कसे या बद्दल मला खात्री नाही. मात्र मी कसेही करुन वविच्या ठिकाणी परस्पर मुंबईहून किंवा जिथुन जमेल तिथुन पोहोचायचा प्रयत्न करीन
|
अरे रे माझे ह्या फलाका कडे लक्शच गेले नाही वाट चुकून सुद्धा येथे पोहोचलो नाही आधि पाहीले असते तर कदाचीत मी येउ शकलो असतो पण एका दुसर्या मीटीन्ग मधे त्या दिवशी जायcए ऑफिस ने संगितले आहे
|
मंडळी, रविवारच्या व विची रुपरेषा साधारण खालीलप्रमाणे राहील. ९.०० am - मोदीज रिसॉर्टला पोहोचणे ९.०० am ते १०.३० am - ब्रेकफ़ास्ट आणि मायबोलीकरांची ओळख १०.३० am ते १२ pm - सांस्कृतिक कार्यक्रम सत्र एक १२ pm ते २ pm - वर्षाविहार आणि जेवण २ pm ते ५.३० pm - सांस्कृतिक कार्यक्रम सत्र दोन ५.३० pm ते ६.०० pm - चहापान ६ pm - मायशहरी रवाना एक सूचना:- बससंदर्भातले सर्व डीटेल्स उद्या देण्यात येतील.
|
Zakki
| |
| Wednesday, July 19, 2006 - 7:10 pm: |
| 
|
एक भा. नि. प्र. या ववि चा एखादा live video कुणि इंटरनेटवर प्रसारित करू शकेल का? त्याबद्दल माहिती कळवावी. बघण्याची इच्छा आहे. शिवाय जमल्यास इंटर ऍक्टिव पण करणे जमले तर उत्तम, (नेट मीटींग सारखे!)
|
Zakki
| |
| Thursday, July 20, 2006 - 2:33 pm: |
| 
|
बालगंधर्वहुन बस बरोबर म्हणजे पुलापासून का नाटक गृहा पासून? शिवाय ते मी विचारलेले लाइव्ह प्रसारणाबद्दल काय केलेत? एव्हढे सगळे कॉम्प्युटर मधले तज्ञ, हे करायला काही कठिण नसावे तुम्हाला! आपल्या मायबोलीच्या मालकांना विचारा, त्यांची साईट वापरली तर चालेल का? तेव्हढीच प्रसिद्धि मिळेल! त्यातून interactive केलेत तर मजाच मजा!!
|
काय शिन्ची कटकट! काय टुमणे लावलय इन्टराॅक्टीव करा,इन्टराॅक्टीव करा म्हणून. सांगितलेय ना नाही म्हणून. कुठ्ठे न्यायची सोय नाही बाइ या कार्ट्याना... सतत भुण भुण अन मागे ओढायचे...
|
Zakki
| |
| Thursday, July 20, 2006 - 8:22 pm: |
| 
|
तुला काय त्रास त्याचा! तुला तर नाही करायला सांगत आहे! (जणू काही करता येणारच आहे तुला.) ज्यांना येते, त्यांना त्यात काय अवघड नाही! खरे तर काहीच अवघड नाही. अगदी तुला सुद्धा जमेल. पण आळस झटकून कुणि करेल तर ना! उगाच कुणाला फुकट काही का द्यायचे? ही वृत्ति!
|
अगदी तुला सुद्धा जमेल? म्हणजे? मला काय समजलात तुम्ही? एवढा ना करता आहे का मी अहो इन्टर ऍक्टीव्ह च काय इन्ट्रा ऍक्टीव्ह सुद्धा करून दाखवीन मी!! हा हा हा!!!
|
Arun
| |
| Friday, July 21, 2006 - 3:54 am: |
| 
|
झक्की काका : काल तुमची post वाचल्यानंतर मी आणि राजकुमार ने यावर जरा चर्चा केली, ते interactive चं काही जमेल असे वाटत नाहिये. पण व. वि. चे व्हीडीओ चित्रिकरण करून, CD तुमच्यापर्यंत पोचवण्याची वेवस्था करतो ..........
|