|
मॉड ८, मयुरेशच्या पोस्टमधील request नुसार कृपया संपूर्ण पोस्ट वरती न हलवता त्या संबंधित पोस्टच्या लिंक्स फ़क्त टाकता का? ह्या details व्यतिरिक्त बाकी महत्त्वाच्या details ची पोस्ट्सही येत राहतील अजून, जसं की बस डिटेल्स, रूट details वगैरे. तसेच मुंबईकरांच्या GTG चे ही पोस्ट आलेच आहे व तेदेखील सर्व मुंबईकरांना सहज सापडायला हवे. त्या सर्व पोस्ट्स तिथे add झाल्या तर तिथे हवी ती माहिती चटकन दिसणार नाही. कृपया मूळ मेसेज कायम ठेवून फ़क्त त्या पोस्टसच्या लिंक्स द्याव्यात ही विनंती. तसेच इंद्रधनुष्यच्या १७ जूनच्या पोस्टसाठी " ववि वर्गणीकरता मुंबई GTG " अशी लिंक देऊन मयुरेशने सांगितलेल्या बाकी दोन लिंक्स सोबत तिथे टाकावी.
|
सांस्कृतिक कार्यक्रमात काय programs आहेत ?
|
Wakdya
| |
| Tuesday, June 20, 2006 - 5:22 am: |
| 
|
निगडीहून मोटरसायकलने कर्जतला जाण्यासाठी कृपया कोणी रस्त्याची माहीती देवु शकेल का? मी रस्त्याने वडगावच्या पुढे कधी गेलो नाही आणि वविला रस्त्याने मोटरसायकलवरुन येण्याचा बेत करतो आहे
|
सांस्कृतिक कार्यक्रम : पोस्ट क्र. १ नमस्कार मंडळी, एणार एणार म्हणून आपण सगळे वाट पहात आहोत तो व. वि. चा दिवस आला की जवळ ! (मान काय डोलावताय हो म्हणून ? थांबा जरा ! पाच आठवडे आहेत अजून ! आम्हाला लोड देउ नका… तशी तयारी जय्यत चालू आहे म्हणा ! ) आम्हाला जाणीव आहे की आमच्याकडून फारसे काही गंभीर वाचायची तुम्हाला सवय नाही. ती उणीव आम्ही ‘विनोदी साहित्य’ मधे भरून काढू हो ! (सुरुवात कशी झकास झाली आहे तिथे बघितलत ना !). आणि हो, ‘सांस्कृतिक समिती’ वगैरे भारदस्त नावाने बिचकू नका हो.. ‘मराठी लघुकथेची लांबी वाढते आहे का ?’ किंवा ‘हापूस आंब्यावर आत्तापर्यंत झालेल्या कविता : एक (आम)रसग्रहण’ असे परिसंवाद आम्ही आयोजित नाही करणार आहोत ! सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे असतील काही गमतीचे खेळ आणि विविधगुणदर्शनाचे कार्यक्रम - म्हणजेच केवळ मनोरंजनात्मक ! हे पोस्ट आहे फक्त व. वि. च्या दिवशी आयोजित करत असलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रम/खेळ ह्यांची एक झलक.. शुध्द मराठीत आपण त्याला trailer किंवा teaser नाही का म्हणत ! कार्यक्रम सूची, क्रम व कालावधी : dumb charades (१ तास) : मूकपणे हालचाली करायच्या आणि त्यासुध्दा मराठीतून ! ह्या लोकप्रिय खेळाच वेगळच वेगळेपण असेलल version - मायबोलीसाठी ! खेळाचे नियम पुढील पोस्टमधे ! शब्दशोध – (what’s the good word !) (३०-४० मिनिटे) : खेळाचे नियम पुढील पोस्टसमधे व्यवस्थित सांगितले जातीलच. कुणाला मुंबई दूरदर्शन वरचा सबिरा मर्चंट संचालन करायची तो कार्यक्रम आठवतोय का ? नाही म्हणता ? हरकत नाही. खेळ सोप्पा आहे हो ! लोड घेऊ नका ! Mad - Ads (१ तास) : अर्थात जाहिरातबाजी ! थांबा घाई करु नका… आधी नीट बघा तर खर.. की आम्ही तुम्हाला जाहिरातबाजी करण्यासाठी कसली अवली उत्पादने देणार आहोत किंवा कशा नवीन अजब पध्दतीने जाहिरात करायची हे सांगणार आहोत ते ! मधेच केव्हातरी एक surprise item वैयक्तिक बहुविध कलागुणदर्शन (४५ मिनिटे) : ह्यात कवितांशिवाय काहीही ! मुख्यत: वैयक्तिक गुणदर्शन जसे की नाट्यछटा, अभिनय, नकला, नागनृत्य, डोक्यावर नऊ पराती ठेवून नाच, पॊलिथीन बॅगची २ मिनिटात तलवार बनवणे, एका हातावर चालणे वगैरे काहीही ! सर्वात शेवटी - कविता वाचन (१ तास): तुमच्या शीघ्र, अतिशीघ्र, हायकू, मुक्तछंद, शब्दरहित सगळ्या कविता ठेवा तयार… लक्षात ठेवा रसिकांची वावा आपल वानवा नसणार आहे ! (सूचना : ‘ड्रायवर टक्क जागा राहील’ ह्या उदात्त हेतूनेसुध्दा बसमधे राहिलेल्या कविता वाचून अथवा गाऊन दाखवू नयेत !) आता महत्वाचे (मग आत्तापर्यंत काय होते ? असो) : १. आम्हाला खात्री आहे की तुमच्यात दडलेल्या गुणांचं दर्शन देण्यासाठी, खेळांमधे सहभागी होण्यासाठी तुम्ही उत्साही मंडळी अगदी अधीर असाल ! (हो म्हणा हो आम्हाला बरं वाटेल) तशी इच्छा असणाऱ्यानी आम्हाला जरुर कळवा. कसे कळवायचे ? कुठल्या इमेलवर कळवायचे ? ते सांगूच लवकरच ! तोपर्यत संयोजक मंडळाच्या आयडीवर कृपया ह्यासंबधी इमेल करु नका. त्याना अजून बरीच कामे आहेत . २. तुम्ही तुमच्या entries पाठवल्यात की व. वि. च्याच दिवशी गट तयार करण्यात येतील ! ३. कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन करण्यामागे मुख्य दोन हेतू आहेत. अ) कार्यक्रमात विविधता आणणे. अहो, कितीही चांगले असले तरी ताटात डावीउजवीकडे आणि सगळ्या वाट्यात एकच एक पक्वान्न कसे चालेल ? नाही का ? ब) वेळेची थोडीशी शिस्त (लष्करी नाही हा) पाळून उपलब्ध वेळेचा सदुपयोग करणे. तेव्हा काही सद्विचारांचे व. वि. पर्यंत मनन करा पाहू : ‘शिस्तीने राष्ट्र मोठे होते’, ‘रांगेचा फायदा सर्वाना’, ‘दो या तीन बस !’ अर्थातच वेळ मिनिटागणिक पाळण्यापेक्षा कार्यक्रमाची रंगत टिकून राहील, वाढत जाईल ह्यालाच जास्त महत्व दिले जाईल. अतिविलंब किंवा विस्कळीतपणा टाळण्यासाठी फक्त वेळापत्रक ! सर्व कार्यक्रमांमधे, प्रत्यक्ष भाग घेउन आणि/किंवा उत्साही प्रेक्षक म्हणून सगळे भरभरून प्रतिसाद देतीलच ही खात्री आहे ! कळावे लोभ आहेच... पुढले पुढील पत्री ! (तिकीटविक्री चालू आहे) *** पोस्ट क्र. १ समाप्त ***
|
वाकड्या, तुला निगडीहून पुणे मुंबई जुन्या महामार्गाला येता येते का? येत असेल तर तो पकड आणि मुंबईकडे निघ. खोपोली ओलांडलेस की चौक म्हणून गाव लागेल. खोपोली ते चौक १० मिनीटात पोचशील. तिथे उजवीकडे वळ. इथे माथेरानकडे अशी पाटीपण आहे. १० १२ किमी गेल्यावर डावीकडे माथेरानकडे जाणार्या फ़ाट्याला वळ. त्याच रस्त्यावर ते रेसॉर्ट आहे. इथुन किती किमी ते मला माहीत नाही. डावी न घेता सरळ गेलास तर रेल्वे ओलांडून जाशील. म्हणजे चुकलास असे समज
|
Wakdya
| |
| Tuesday, June 20, 2006 - 10:30 am: |
| 
|
Savyasachi धन्यवाद, जुना पुणे मुंबई रस्ता निगडीवरुनच जातो त्यामुळे तो प्रश्न नाही खोपोली पर्यंत तसा रस्ता माहीत आहे तू नेमके खोपोलीपासुन पुढचे सांगितलेस ते बरे केलेस पुन्हा एकदा धन्यवाद
|
वाकड्या, मोटरसायकल फ़ार जुनी, खिळखिळी वगैरे नाही ना? नीट चेक कर. घरून निघताना पुरेसे पैसे घे. इतर गाड्यांशी शर्यत नको. ~D~D
|
wakdya, pavasat bike chi maja mhanun yet asashil tar thik ahe nahitar dhokadayak ani paus padalach bedam tar kathin kam hoil kiman 1.5 tas bike hakane. maitreyee wakdya swata:chich bike aan re baba !
|
Wakdya
| |
| Tuesday, June 20, 2006 - 11:58 am: |
| 
|
Maitreyee तुमच्या कळकळीयुक्त सुचनेबद्दल धन्यवाद. पण माफ करा, बहुतेक तुम्ही माझ्या १९९५ सालच्या स्कुटरवरुन केलेल्या प्रवासाचे वर्णन विसरला असाव्यात, मला वाटते की २००३ की २००४ च्या गणेशोत्सव स्पर्धेत ते केले आहे, ते जर आपल्या लक्षात असते तर वरील सुचना केली नसतित अर्थात चांगली सुचना केव्हाही चांगलीच असते त्यामुळे सुचनेबद्दल पुनःश्च धन्यवाद आणि एक नम्र विनंती की माझे ते बक्षिसपात्र प्रवासवर्णन पुन्हा एकदा जरुर जरुर वाचा. मग तुमची खात्री पटेल की माझ्या मनाजोगती तयारी पुर्ण झाल्याशिवाय मी कुठे जायला पाऊल उचलित नाही
|
Wakdya
| |
| Tuesday, June 20, 2006 - 12:04 pm: |
| 
|
....nahitar dhokadayak ani paus padalach bedam...wakdya swata:chich bike aan re baba ! Savyasachi आपल्या प्रामाणिक सुचनांबद्दल धन्यवाद. मी त्याचाही विचार करीन आणि जमल्यास किमान छप्पर तरी असलेल्या कोणत्या तरी गाडीची व्यवस्था होते का ते पाहीन 
|
Anilbhai
| |
| Tuesday, June 20, 2006 - 4:23 pm: |
| 
|
अरे त्या लिंबु ची जिप मिळते का बघ ~D
|
Storvi
| |
| Tuesday, June 20, 2006 - 8:26 pm: |
| 
|
जीप ढकल्ण्याची competetion आहे का? 
|
>>> अरे त्या लिंबु ची जिप मिळते का बघ >>>> जीप ढकल्ण्याची competetion आहे का? ववि मधे अस तुला म्हणायच हे का? DDD डिअर वाकड्याभाऊ, तू त्या भाईलोकान्च काय बी ऐकु नकोस! युएस मधे बसुन काड्या टाकताहेत! माझी जीप तुह्या कामाची नाय! खन्डाळा घाट उतरुन जाइल उताराला, पर परत येताना टो करुन आणावी लागल, चालेल का? तो सव्यसाची सान्गतो हे ते ऐक अन गुमान बस नी जा वविला! बसची सोय होती हे त तू काहुन नाही वापरीत? अबे ऐन पावसात टूव्हिलरवरुन जाताना कुठ काय गारपिट बिरपिट झालि म्हन्जे?? केव्हड्याला पडायच ते? अन तुला आता काय सान्गायच राव त्या खन्डाळा घाटात बेदम पावसात फुटादीडफुटावरच दिसत न्हाइ काही! बेदम पाऊस म्हन्जी बेदम झोडपुन काढणारा! गावला एखादा बन्द पडलेला ट्रक तर त्याच्या खाली नायतर कुठल्यातरी बोगद्यात कुडकुडत बसाव लागल! बघ बुवा अजुनही विचार कर! मस्तपैकी बस मधुन जा आरामात! अन वेळीच कळीव तस नायतर तुझी बस बी हुकायची अन ववी पण! (मागुन काही आवाज... शुभ बोल रे नार्या!)
|
Itsme
| |
| Wednesday, June 21, 2006 - 6:21 am: |
| 
|
मंडळी, खाली टिचकी मारा ..... /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=34&post=820688#POST820688
|
Hemantp
| |
| Wednesday, June 21, 2006 - 6:56 am: |
| 
|
खुलासा : आरती ने दिलेल्या लिंकवर मायबोली T Shirt विक्री ची माहीती आहे.
|
Neel_ved
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:11 am: |
| 
|
हाय आरती, कशी आहेस? खुप चांगली बातमी दिलिस... मी order place सुद्धा केली...
|
Phdixit
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:26 am: |
| 
|
गतवर्षीप्रमाणेच मी सुद्दा बाईक वरच येण्याचा विचार करतो आहे. संयोजक समिती मला हवी असलेली माहिती इथे मिळाली धन्यवाद सव्यासची.
|
Wakdya
| |
| Wednesday, June 21, 2006 - 8:25 am: |
| 
|
Limbutimbu तुमच्या रास्त सुचनांचा जरुर विचार करीन व गारपिटीबाबत काळजीही घेईन, धन्यवाद Phdixit आपणही जर नक्की बाईकवरुनच येणार असल्यास आपण एकत्र एकमेकांच्या सोबतीने जावु शकतो का? तसे असेल तर आपण मेल मधुन चर्चा करुन काही ठरवु शकू.
|
अरे अरे, माझ्या नावाची अशी चिरफ़ाड करू नका रे ते सव्यसाची असे आहे.
|
|
|