Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 17, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Mumbai » वर्षा विहार - २३ जुलै २००६ - कर्जत » Archive through June 17, 2006 « Previous Next »

Ajjuka
Sunday, June 11, 2006 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ह्या चोउकोनांचे कहितरी करा रे..
copy paste केललं देवनागरी दिसतच नाहीये. पीक्या येणारे का देशात आणि ववि ला? मग मी नक्कीच प्रयत्न करीन.
नाहीतर as usual शेवटच्या मिनिटापर्यंत काही सांगू शकत नाही.


Paragkan
Monday, June 12, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazahi shewat chya xanaparyant nakki naahi .. deshaat yena (jevha kevhaa yein tevha)
'vavi' laa maatra nakki yenaar naahiye :-)

Vinaydesai
Monday, June 12, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीक्या, आता तुला देवनागरीत लिही रे, असं सांगायची वेळ यावी..
कुठे आहेस कसा आहेस?


Gharuanna
Monday, June 12, 2006 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मायबोलीकराना नमस्कार. बडी कामातून वेळ काढून काही गोष्टी डोकयात आहेत
नीलशी रविवरी बोलण झाल आहे २३ जुनला मुम्बईचा
GTG करायचा विचार चालू आहे.,
यावेळी बसची गरज नाहीये उलट ट्रेनने सर्वाना सोयीचे पडेल


Maudee
Tuesday, June 13, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२३ ज़ुन?? हे काय नविनच?
हे post वेगळ्या GTG चं आहे का?


Kmayuresh2002
Tuesday, June 13, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

varShaavihaara 2006

रिमझिमती शीळ खुणेची वार्‍यावर विहरत आली
धरतीच्या उरात हुरहुर, विरहाची तगमग सरली
रोखून ठेवलेले ते काहूर नभात उमटले
मेघांच्या डोळ्यांतुनही मोत्यांचे थेंब निसटले
दशदिशांस भेटीचे हे संदेश सरींनी नेले
हिरमुसल्या चराचराने पांघरले हिरवे शेले
भिजणार खरोखर सार्‍या हृदयांची सुकली माती
गंधाळुन जातील फ़िरूनी,जुळतील नव्याने नाती
ह्या भेटीसाठी आता हर एक आमंत्रित झाला
वर्षा विहार आला...... वर्षा विहार आला.


मंडळी, आता थोडाच धीर धरा.. लवकरच आम्ही ववि 2006 संदर्भातले डीटेल्स देऊ.

Ninavi
Tuesday, June 13, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, कविता मस्त आहे ही. कुणाची आहे? मयुरेश, तू लिहीलीस?

Kmayuresh2002
Wednesday, June 14, 2006 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही गं निनावी,माझी नाही ती. एका मित्राची आहे.

Sonchafa
Thursday, June 15, 2006 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोध शोध शोधल्यावर AMBA चा बी बी मिळाला..श्वास टाकला! सवय गेली आहे पार मायबोली वर फ़िरायची इथे सहजी नेट वर यायला जमत नसल्याने.. पण बरं झाले शोधला ते आजच.. मी येणार कर्जतला. नऊ महीने झालेत इथे येऊन.. बटाटा वड्याचे नाव काढणे पण शक्य नाही इथे. :-( अजून पंधरा दिवस थांबायची ही तयारी नाहीये माझी.. हे सगळे वाचल्यावर आत्ताच घरी परतावसे वाटतय

Sayonara
Thursday, June 15, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनचाफा, हल्ली पार्ल्यात नसतेस वाटतं? बाहेर आहेस कां?

Dineshvs
Thursday, June 15, 2006 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, खरेच येणार आहेस का ? सगळा जुना ग्रुप जमतोय म्हणायचा.

Sonchafa
Friday, June 16, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो सायो, फ़्रांसमध्ये आहे मी सध्या
हो दिनेश, मी येत्येय महीना अखेरीस.. तेवीस जुलैला जमणार म्हटल्यावर म्हणूनच आनंद झाला मला..:-) नाहीतर जून मध्ये होऊनही जायचे पुणे
GTG..

Kmayuresh2002
Friday, June 16, 2006 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी....:-) गेली तीन वर्षे चालत आलेल्या परंपरेस अनुसरून या वर्षीही वर्षाविहाराचा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरले आहे. प्रत्येक मायबोलीकर या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतो. या निमित्ताने इतर मायबोलीकरांना भेटण्याची,त्यांच्याशी प्रत्यक्ष हितगुज साधायची संधी मिळत असते. रिमझिम पावसाचा सुखद शिडकावा अंगावर घेत सांस्कृतिक
कार्यक्रमांचा आस्वाद घेता येतो.
आपल्या आनंदी क्षणांच्या गाठोड्यात अजुन एका आनंदी दिवसाची भर पडते..
दरवर्षी वविला येणार्‍या मायबोलीकरांची संख्या वाढतच आहे. यावर्षीही असाच किंबहुना याहीपेक्षा जास्त प्रतिसाद मायबोलीकर देतील अशी आशा आहे..:-)


व वि २००६ विषयीची सविस्तर माहिती आणि काही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:

तारीख: २३ जुलै २००६

वेळ: ९ am तो ६ pm

स्थळ: डॉ. मोदीज रिसॉर्ट,कर्जत



काही ठळक मुद्दे ( imp points ):

१) नावनोंदणी:- व विसाठी नाव नोंदवायचे असल्यास
varshaa_vihaar@yahoo.com या मेल आयडीवर मेल करून तुम्ही आपले नाव नोंदवु शकता. आपली उपस्थिती कळविण्याची अंतिम तारिख १० जुलै आहे. नावनोंदणीसाठीच्या मेल मध्ये पुढील गोष्टींची माहीती दिलेली असणे गरजेचे आहे

१. नाव
२. मायबोली आयडी (अर्थातच खरा:-))
३. संपर्काचा नंबर
(भ्रमणध्वनी क्रमांक असेल तर उत्तम)
४. कोणत्या शहरातुन येणार?
(पुणे / मुंबई इत्यादी)
५. नेहमी वापरत असलेला इमेल आयडी
६. एकुण किती व्यक्ती येणार
(प्रौढ / मुले... मुले असल्यास त्यांचे वय चार वर्षांखाली असेल तर तसे नमुद करावे)
७. वर्गणी कशी भरणार? online की प्रत्यक्ष भेटुन ? (या संदर्भातले डीटेल्स खाली पहावयास मिळतील)
८. प्रत्यक्ष भेटुन वर्गणी देणार असाल तर कुठल्या तारखेला?(ठरलेल्या तारखांची
अधिक माहिती खाली पहावयास मिळेल)

टिप:- १. नावनोंदणीची अंतिम तारीख १० जुलै आहे. (रिसॉर्ट आणि बस बुकींगच्या दृष्टीने ही तारीख ठरविण्यात आली आहे.)
२. मायबोलीकरांना सपत्नीक किंवा सपतीक आणि मुलांसह येता येईल.( मायबोलीकरांची संख्या, व वि साठी मिळालेल्या जागेची मर्यादा,बसच्या बैठक व्यवस्थेची मर्यादा लक्षात घेऊन हे ठरविण्यात आले आहे)
३) बससंदर्भातली सविस्तर माहिती (निघण्याची वेळ, बसचा नं आणि वर्णन, पिक अप स्पॉट्स इत्यादी..) नंतर कळविण्यात येईल.


२) वर्गणी:- या वर्षीच्या व विसाठी पुढीलप्रमाणे वर्गणी गोळा करण्यात येईल....

रिसॉर्ट प्रवेश फ़ी:- ३०० rs
(चार वर्षांखालील लहान मुलांसाठी २०० rs )


बसची वर्गणी:- १५० rs (ही रक्कम अंदाजे असुन मायबोलीकरांची एक ठराविक उपस्थिती प्रमाण धरून ठरवण्यात आली आहे. अंतीम उपस्थिती जी असेल त्यानुसार यात कमीजास्त बदल होऊ शकतो. )

जादा वर्गणी:- २५ rs (ही वर्गणी व विला सादर करण्यात येणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आहे.)

अश्याप्रकारे एकुण प्रत्येकी ४७५ rs वर्गणी भरायची आहे

टिप:- १. वर्गणीची वरील रक्कम ही केवळ पुणेकरांसाठीची असुन मुंबईकरांनी ३००+२५=३२५ rs वर्गणी द्यायची आहे. त्यांची यायची जायची वर्गणी मुंबईचे संयोजक ठरवतील.
२. ज्यांना बसने न येता स्वतंत्रपणे तिथे यायचे आहे त्यांनी बसची १५० rs वर्गणी भरू नये. त्यांच्यासाठी वर्गणीची एकुण रक्कम ३२५ rs राहील.
३. रिसॉर्टच्या प्रवेश फ़ीमध्ये आपल्याला ब्रेकफ़ास्ट, जेवण आणि दुपारचा चहा ह्या गोष्टी अंतर्भुत आहेत.
त्याशिवाय आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शेड आणि इतर
सामुग्री आहे. शिवाय पोहायचे असल्यास पोहण्याचा तलावही आहे.



३) वर्गणी कशी भरायची?:- वर्गणी दोन मार्गांनी भरता येईल..
एक online किंवा दोन प्रत्यक्ष संयोजकांना भेटुन...

१. ऑनलाईन वर्गणी:-ज्यांना प्रत्यक्ष येऊन वर्गणी भरणे शक्य नाही त्यांना ऑनलाईन वर्गणी भरता येईल.

जर कोणाला online पैसे transfer करायचे असतील तर कृपया
पुढील गोष्टी कराव्यात:
आधी नावनोंदणीसाठी जी मेल तुम्ही varshaa_vihaar@yahoo.com ह्या id वर कराल त्यात दिलेल्या format मध्ये तसे mention करा ( format मध्ये तो option दिलेला आहे.वर पहा.) तुम्हाला पैसे transfer करण्यासाठीचा ICICI account number मेलद्वारे कळवण्यात येईल.

online transaction केले की १ transaction id येतो, हा प्रत्येक transaction चा unique id आहे, त्यामुळे हा id note करावा...

त्या खेरीज transaction remarks मध्ये add करायच्या महितीचा format पुढीलप्रमाणे:

Va.Vi.-"first name" ( maayboli id )

पैसे transfer करून मग varshaa_vihaar@yahoo.com ह्या id वर मेल करावी... ह्या मैलमध्ये unique transaction id देखील communicate करावा. ICICI account check करून
confirmation चा reply देण्यात येईल

जर ऑनलाईन वर्गणी संदर्भात कोणाला काही शंका वा
प्रश्ण असतील तर कृपया सुशांत (सुश्या-मोबाईल नं: 09881254320 )शी संपर्क करावा.


२. प्रत्यक्ष वर्गणी:- ज्यांना संयोजकांना प्रत्यक्ष भेटुन वर्गणी
द्यायची असेल त्यांनी ९ जुलै किंवा १५जुलै रोजी संयोजकांकडे ती द्यावी.. त्या दिवशी भेटायची वेळ आणि ठिकाण आम्ही लवकरच सांगु.


टिप्:-
१. लक्षात ठेवा नावनोंदणीची अंतिम तारीख १० जुलै असुन पैसे भरायची अंतिम तारीख १५ जुलै आहे.
२. मुंबईकरांनी त्यांची वर्गणी मुंबईचे संयोजक घारूअण्णा किंवा इंद्रधनुष्य यांच्याकडे द्यायची असुन यासंदर्भातली सविस्तर माहिती ते देतील.
३. नावनोंदणीसाठीचा mail id मात्र पुणेकर,मुंबईकर आणि इतर सर्व करांसाठी सारखाच आहे:-)

varshaa_vihaar@yahoo.com





Limbutimbu
Friday, June 16, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरेश, वरली आख्खीच्या आख्खी पोस्ट "*****WATCH THIS SPACE FOR MORE*****" अस वाक्य जिथे लिहिल हे वर पहिल्या पोस्ट मधे, त्याच्या वर मॉड्सना सान्गुन टाकुन घे की! म्हणजे यापुढे कितीही प्रतिक्रिया आल्या तरी बीबी उघडल्या उघडल्या करण्ट अपडेट्स मिळत रहातील आणि अन्य प्रतिक्रियान्मधे महत्वाची रुपरेषेची पोस्ट शोधत बसावे लागणार नाही!
दुसर अस की कृपया प्रत्येक दिनान्काच्या मागे पुढे वार लिहु शकाल का? दर वेळी कॅलेन्डर बघण अवघड जात! :-)
बॅन्क अकाउन्ट वगैरे बाबी म्हणजे यावेळचा वर्षाविहार अधिकाधिक प्रोफेशनल (व्यावसायिक उत्कृष्ट दर्जा या अर्थाने) पद्धतीने आयोजित होत आहे असे म्हणावे लागेल! आयडिया सुन्दर! ठिकाणही अचुक! :-)
यन्दाच्या चौथ्या वर्षाविहाराला हार्दीक शुभेच्छा!
:-)

Kmayuresh2002
Friday, June 16, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या तुझ्या योग्य सूचनेबद्दल धन्यवाद रे:-)
मॉड,कृपया माझ्या वरील दोन्ही पोस्ट्सच्या( 5.29pm,5.54pm ) लिंक्स अनुक्रमे ववि २००६:माहिती आणि ववि २००६:संपर्क या मथळ्यां खाली "****WATCH THIS SPACE FOR MORE****" हे वाक्य काढुन त्या जागी देता येईल का? म्हणजे आमच्या आणि इतर मायबोलीकरांच्या दृष्टीने ते सोयीचे होईल.


Moderator_8
Friday, June 16, 2006 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Done

Limbutimbu
Saturday, June 17, 2006 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड, धन्यवाद!
थोडा वेळ हे म्हणल तर अजुन एक सुचना करु का?
काय हे ना की होत काय अशा जीटीजीना की कुणाकुणाला वाटत की याचा फोन नम्बर घ्यावा, त्याचा इमेल आयडी घ्यावा, अन हळुन एकमेकाला विचारतात, दुसरा सान्गु लागतो अन मग सान्गितलेला नम्बर किन्वा इमेल लिहुन घ्याय्ला कागदाच्या चिटोर्‍याची शोधाशोध खिसे अन पर्सा उलट्यापालट्या करित सुरु होते! बर कधी कागुद सापडतो तर पेनच नसत.. अन अस करता करता विचारणार्‍याचा अन सान्गणार्‍याचा उत्साह मावळुन जातो! बर दोनीबी गावल तर खाली धरायला पॅड बिड नसत अन मग कागदाला भोक पाडीत कसतरी गिचमिड लिहुन घेतल जात! :-)
तर माझ काय म्हणण हे की समजा या वरल्या माहीतीबरोबरच "ऑप्शनल" म्हणुन पण सर्क्युलेशन साठी जन्मतारीख, फोन नम्बर, इमेल आयडी अशी माहिती घ्यायची अन त्याची एक एफ़ोर पेपर मधे बसेल अशी यादी करुन त्याच्या झेरॉक्स काढुन वविला आलेल्या समद्याना द्यायच्या! :-) अन झेरॉक्स चा खर्च बसच्या किन्वा इतर खर्चात वळता करुन घ्यायचा किन्वा जागेवरच एकेक रुपया वसुल करायचा! :-)
अन समजा हे झेरॉक्स बिरॉक्स च झेन्गट करायच नसल तर वविच्या आधी दोन तीन दिवस समद्या येणार्‍याना एका डॉक फाइल मधे ही माहीती मेल करुन टाकायची, ज्याला प्रिन्ट घ्यायचा तो घेइल! :-)
बघा बुवा, कशी वाटतीहे आयडियेची कल्पना?
अन तुम्ही हे समद आधीच करत असाल तर मपली सुचाना मागे! :-)


Ash_ananya
Saturday, June 17, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Modi's Resort Photo
Modi's Resort

Ash_ananya
Saturday, June 17, 2006 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RESORT'S POOL

Modi's Resort Pool




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators