Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 01, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » काव्यधारा » कविता » Archive through January 01, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Wednesday, December 28, 2005 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कैफ़ ....

पाय ठेवताच मी येइ मैफ़िलीस रंग
मी तुझ्या नशेमध्ये हा असा सदैव दंग

मद्यपी मला असे पाहुनी विचारिती
कोणती सुरा अशी झुलवतेच अंग अंग

काय सांगु दोस्तहो पाजली कशी तिने
ओठ चषक जाहले अन तश्यात लाल रंग

मैफ़ली हजार ह्या तुच्छ त्या नशेपुढे
एकटाच स्पर्श तो उठवितो किती तरंग

रात्र विझुनी चालली दीप शांत जाहले
फ़क्त जळत राहिले शम्मा अन तिचा पतंग

जिंकलो मुळी न मी जिंकली नव्हेच ती
कैफ़ लाभला खरा हारुनीच प्रीतजंग

वैभव !!!


Tejashiri
Wednesday, December 28, 2005 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमन

तूझी कवीता मन मोहून टाकणरी आहे.
अजून लीहित राहा, म्हणजे अजून प्रगल्भ होतील.


Maneenee
Wednesday, December 28, 2005 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उर्मिला,
तूला आणखी खूप लीहायचे आहे.
भट्टी जमली आहे.

मानीनी.


Sarang23
Wednesday, December 28, 2005 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहाटबावरी

हा असा गुन्हा- पुन्हा पुन्हा करुन टाकतो
रात्र धुंद... मंद गंध मंतरुन राहतो!

ये समीप घालवू नकोस वेळ चालली
मोगरा तुला फुला हळूच आज माळतो

चांदणीस मी बजावले नकोस येवु तू...
बोचते उपेक्षिण्यातलेच दुःख जाणतो!

चंद्रही कसा फ़ितूर जाहला प्रिये तुला
वाट पाहण्यातली सजा हसून पाहतो

सैल ही मिठी नको करूस... राहु दे तशी!
उष्ण श्वास झेलण्यास एक रात मागतो

पारिजातशी अबोल लाजरी सखी प्रिया
लाज लाजते खळीत... स्पर्श वेड लावतो

तू अशीच ये अशीच जा पहाटबावरी
हाय रात्र रात्र मी पुन्हा असाच जागतो!!!

सारंग


Jo_s
Wednesday, December 28, 2005 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाषा

लेखी बोली चित्र मुकी
भाषा येओ कुठल्याही रुपे
कुणा कुणाला भावून जाई
तर कुणाच्या मनी खुपे

भाषा अगदी पाण्या सारखी
जिला स्वत:चा रंग नाही
देणार्‍याने दिलेला घेणार्‍याने घेतलेला
रंग सदा वहात राही

भाषा अगदी पाण्या सारखी
सात्विक अन जिवनदाई
उगाच कुणी दुष्ट त्यात
मनचे विष कालवत राही

भाषा अगदी पाण्या सारखी
बरेचजण वापरतात
उगाच आपली आहे म्हणून
इथे तिथे सांडत असतात

भाषा अगदी पाण्या सारखी
निर्मळ अन प्रवाही
जिथे जिथे जीवन आहे
तिथे तिथे वहात राही

कुणी म्हणेल भाषेला
पाण्या इतक महत्व नाही
तरी शेवटी तिच्या शिवाय
पाणी मागता येत नाही

सुधीर


Vaibhav_joshi
Wednesday, December 28, 2005 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


उर्मिला ... माझं तुमच्या मैत्रिणींना अनुमोदन आहे ... लिहीत रहा
सारंग .... पहाटबावरी ..... ह्म्म्म !!!!
सुधीर ... concept मस्त आहे.




Ramachandrac
Wednesday, December 28, 2005 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, धन्यवाद,पहाटबावरी सुरेख, उत्क्रुष्ठ, आणखी येउदेत.

Milya
Wednesday, December 28, 2005 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग : पहाट्बावरी मस्तच

सुधीर कल्पना छान आहे...


Devdattag
Wednesday, December 28, 2005 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, वैभव, सारंग,सुमन.. सुरेख

पाडगावकर आणि संदीप खरे ह्यांची क्षमा मागून


नजर

नजर म्हणजे नजर म्हणजे नजर असते
प्रत्येकाची स्वत:ची अशी एक ट्रेजर असते

प्रत्येक नजरेच स्वत्:च असं वागण असतं
नजरेसाठी नजरेच सतत काही मागण असतं
ती दुसर्‍यांना जोखणारी एक मेजर असते
नजर म्हणजे नजर म्हणजे नजर असते

विश्वासाच्या पडद्याआडची नजर कधी धुसर असते
अविश्वासाच्या तिढ्यामूळे नात्याचाही विसर असते
नजर प्रत्येकाच्या पापपुण्याचे एक लेजर असते
नजर म्हणजे नजर म्हणजे नजर असते

नजर पहिल्या बाकावरची एखाद्याची ड्रिम असते
कधी शेवटच्या बेंचवरची एक नाठाळ स्किम असते
परिक्षेत पास होण्यासाठी एक जॉइन्ट व्हेंचर असते
नजर म्हणजे नजर म्हणजे नजर असते

नजर सावजाला फ़ासणारे एक गाजर असते
कधी ती सावधानतेचा एक गज़र असते
कधी अनामिक भिती कधी गोड प्लेजर असते
नजर म्हणजे नजर म्हणजे नजर असते

कधी फ़ाटका शर्ट कधी शानदार ब्लेझर असते
कधी फ़ूटपाथ तर कधी
Land क्रुजर असते
कधी दाहक संताप कधी झिरो डिग्री टेंप्रेचर असते
नजर म्हणजे नजर म्हणजे नजर असते



Sarang23
Wednesday, December 28, 2005 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, रामचंद्र, मिल्या, देवदत्त धन्यवाद.
सुधीर छान विषय...!
पमा... खर सांगु? तू यापेक्षाही छान लिहीतेस.
देवदत्त, पाडगावकरांना फोनवर ऐकवु कारे? सहीच!!
वैभव, माफ कर. एक दाद राहुन गेली
खंत ही मात्रा वृत्तातील एक सुंदर गझल आहे!!! त्यात प्रत्येक ओळीत २८ मात्रा येतात! आणि यती पण भंग पावत नाही! nicely consistant!

Chinnu
Wednesday, December 28, 2005 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहाटबावरी छान आहे सारंग!

Pama
Wednesday, December 28, 2005 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सारंग, देवदत्त.. छान आहेत रे सगळ्यांच्या कविता..
सारंग, अगदी बरोबर बोललास सध्या जरा गाडी रुळावरून घसरलीय, म्हणून बघ ना किती दिवस काहीच लिहिल नव्हत. जरा अभ्यासात busy होते त्यामुळे मला वाटत out of focus झालेय.


Tusharvjoshi
Wednesday, December 28, 2005 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभव,
कैफ छान!

देवदत्त,
छान विनोद!


Sarang23
Thursday, December 29, 2005 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु, पमा धन्यवाद. पमा चिंतन होवु दे. घाई नको. Take your time.


Sarang23
Thursday, December 29, 2005 - 1:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवानी किंवा धारावाही गझल चा एक प्रकार... ज्याला गजल- मुसलसल असही म्हणतात

तू असा सोडुन गेला
डाव हा मोडुन गेला

रंगला माझ्यात तेंव्हा
संग का सोडुन गेला?

गुंफले नात्यात नाते
बंध का तोडुन गेला?

कोरले श्वासांतुनी जे
नाव का खोडुन गेला?

दूर जाताना अबोला
बोलका जोडुन गेला!


सारंग


Vaibhav_joshi
Thursday, December 29, 2005 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज्या सारंगा ... राज्या सारंगा ... गज़ल वाचून ... आले भरून ... चल वाचू दे पुन्हा !!! सुंदर मांडणी

Urmila
Thursday, December 29, 2005 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्रभागेच्या कानी

चंद्रभागेच्या कानी
विठुरायाचा गजर पडला
सत्वर ती सान्गण्या, मेघास निघाली
विठुरायाचे येतील आता वारकरी

म्हणे भाउराया चल झडकरी
मला न फ़ुरसद जाते मी,
वा-यास सान्ग तू येई लवकरी
विठुरायाचे येतील आता वारकरी

विठु म्हणे रुखमाईसी
लवकर आता तयार होसी
नसे वेळ ही रुसण्याची
विठुरायाचे येतील आता वारकरी

रखुमाई ही लगबग उठली
शृन्गार करुनी शालू नेसली
नथही सुन्दर तिने घातली
विठु सन्गे उभी राहिली

उभयताना त्या पाहुनी
आनन्दाने वारकरी
विठुरायाचा गजर करी
जय जय पान्डुरंग हरी
जय जय पान्डुरंग हरी

सुमन


Devdattag
Thursday, December 29, 2005 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks sarang, tushar.

सारंग.. गजल आवडली


Sarang23
Thursday, December 29, 2005 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, देवदत्त धन्यवाद रे...

Giriraj
Thursday, December 29, 2005 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिचं येणं

मनाच्या तळ्यांतले तरंग अनुभवत,
मी शांत राहण्याचा प्रयत्न करतो..
मध्येच बसून बघतो;
असे तरी शांत होतिल म्हणून..
पण अधिकच ढवळून काढत तळापासून
उठतच राहतात लाटा…

मध्येच काही शब्दपक्षी येतात
आणि वाटतं तू आलीस..
पण कलकलाट करत उडून जातात तेही.
तू येत नाही ते नाहीसच.

तसंही तुझं येणं माझ्या हातात नाहीच
म्हणून मी चरफ़डत राहतो
आणि तुझ्यावर रागावण्याचे
नवनवे प्रयोग आठवत राहतो.

कधीतरी तू येतेस अचानकपणे
तेही आपल्याच तालात
माझ्या तळ्यांतला एक तरंगही न हलवता
…..अगदी अलगद.

मग सारे काही विसरून जातो मी
आणि एकच उद्गार उमटतो मनातून
. . . . . वाह!

गिरीराज

Champak
Thursday, December 29, 2005 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wah wah wah wah :-)

Mi_varsha_rutu
Thursday, December 29, 2005 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

girya , tula aamachi "bhayandarchi khaaDi " dili ja.

are pan aata motha problem hoil re.
TALYAtalya tarangaamuLe evadh visarayalaa hot, mag
"khaaDi" baghun tuz kaay hoil re???

(ek bhaa. pra.)

Dineshvs
Thursday, December 29, 2005 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती मोठे ईंजेक्शन घेऊन आली तर काय होईल रे बाळा ?

Chinnu
Thursday, December 29, 2005 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, खुप सुंदर कविता. छान वाटल वाचुन! वर्षा, दिनेश :-)

Sarang23
Thursday, December 29, 2005 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

welcome back Giri! ही हळुवार उलगडत जाणारी कविता आहे, तरी म्हटल फोनवर ऐकताना वेगळी का वाटली ते.
आणि हो, लवकर बरा हो...


Tusharvjoshi
Friday, December 30, 2005 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी,
अलगद कविता आहे रे!
तुषार


Devdattag
Friday, December 30, 2005 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी.. तिचं येणं.. दाद देण्याजोगं..
सृजनत्वातला आनंद..वाह


Priyasathi
Saturday, December 31, 2005 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Priyasathi
Saturday, December 31, 2005 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Ramachandrac
Saturday, December 31, 2005 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रियासाठी, दोन्ही कविता खुप छान आहेत, पण तुम्ही त्या चुकिच्या BB वर दिल्या आहेत. गुलमोहर वरती फक्त स्व:ताहा लिहलेले साहित्य अपेक्षीत आहे.

Priyasathi
Saturday, December 31, 2005 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या माझ्या स्वत्:च्याच कविता आहेत.
माझे नाव गुरुराज गर्दे आहे. मोबाईल नं ९२२५५२२९८८.


Ramachandrac
Saturday, December 31, 2005 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry गुरुराज, तुमच्या युजरनेम मुळे थोडेसे confuse झालो होतो, कविता खुपच छान आहेत, अजुन येउद्यात.

Sarang23
Saturday, December 31, 2005 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Vaibhav_joshi
Sunday, January 01, 2006 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिराज आणि गुरुराज .... मस्तच ...

Pendhya
Sunday, January 01, 2006 - 9:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिर्‍या,ऊर्मिला,गुरुराज, छान जमल्यात कविता.
सारंग पहाटबावरी.... मस्त.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators