|
Pendhya
| |
| Sunday, January 01, 2006 - 9:12 pm: |
| 
|
तुशार, गड कुणाचा.... आवडली. सोनेगावचा कुसुमाग्रज कट्टा, अजुन सुरु आहे का? तुझ्या कवितांचा ओघ, कमी करु नकोस.
|
धन्यवाद पेंद्या, तुझ्या प्रश्नाचे उत्तर नागपूर बीबी वर दिले आहे रे
|
Milya
| |
| Monday, January 02, 2006 - 1:56 am: |
| 
|
गिर्या : जबरी रे. मस्तच गुरुराज छान कविता अजुन येउंद्यात
|
संजय इन्गळे ह्यान्च्या ३४;अंगारबीजं आणि दोलनवेला' ह्या कवितासंग्रहातली ही कविता... सावित्री सावित्री, अजूनही तुझ्या हाती पूजेचेच पात्र आहे बये, तुला माहीत नाही इथल्या वटवृक्षान्मध्ये पुरुषत्व केवळ नाममात्र आहे. सावित्री, तू अशी काळाच्या कसोटीवर कितीदा घासून निघशील अन कितीदा प्रतिमेच्या नावाखाली तावून निघशील सावित्री, इथला कोणताच पारंपरिक वटवृक्ष आता सत्य'वान राहिला नाही तुझ्या जन्मोजन्मीच्या इच्छेला आता मान राहिला नाही. सावित्री, कधी रुपकंवर, कधी रिन्कू तर कधी मनोरमा बनून सान्ग कोणता असा दिवस आहे ज्या दिवशी तू जळत नाहीस सावित्री, तुझं सरणावर जाणं अजूनही टळत नाही. सावित्री सतयुग गेलं अन अजूनही तू गाफील आहेस आता तर सत्यवानच यमाच्या टोळीत सामील आहे. आता अग्निपरिक्षेच्या प्रोग्राम'ला राम रावणाला नेत असतो अन वस्त्रहरणाच्या सर्व स्कीम' दुर्योधनाला कृष्णच देत असतो. सावित्री, म्हणून आता तुझ्या हाती विचारान्च अस्त्र पहायचं आहे. एकदा तुझ्याही हाती दुर्योधनाचं मला वस्त्र पहायचं आहे.
|
Milya
| |
| Tuesday, January 03, 2006 - 6:20 am: |
| 
|
सुमती : छान कविता. मस्तच
|
वाह वा ! फ़ारच सुंदर
|
आणि ही दुसरी कविता.... आज अडे उम्बरठा असे काय तुला झाले काल अवखळ वारा तुझ्या पावलात चाले तुझे वारियाचे पाय जरी स्थिरावले बाई असे काय तुला झाले, मन स्थिरावत नाही गडे कालचीच ती, तू आज बदलली कशी... काय कोवळा अंकुर तुझ्या वाढतोय कुशी
|
Devdattag
| |
| Tuesday, January 03, 2006 - 6:40 am: |
| 
|
''सावित्री' अप्रतिम कविता सुमति
|
अहो थांबा ... अजून एकातूनच सावरलो नाही ... सुरेख
|
|
|