Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 28, 2005

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » काव्यधारा » कविता » Archive through December 28, 2005 « Previous Next »

Kmayuresh2002
Friday, December 23, 2005 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,खंत अप्रतिम..शब्दरचना सुरेखच.. एल्गारसुध्दा छान रे..
निनावी,किती हा खुळेपणा गं :-) :-) :-) :-)
अमेय,काटे काट्यांप्रमाणे मनाला टोचुन गेली रे


Nilyakulkarni
Friday, December 23, 2005 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.. छत्री. खंत एल्गार...एकदम सहीच
निनावि खुळेपना छान आहे भावला मनाला
अमेय काटे उत्तमच


Pkarandikar50
Saturday, December 24, 2005 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनाविचा खुळेपणा आणि अमेयचे काटे, दोन्ही कविता छान आहेत. त्यान्च्याशी विरोधाभास साधल्यासारखी वैभवची एल्गार आहे. सान्ज हळवी ज्योत, प्राणान्चा पान्चजन्य वगैरे छान चमकदार शब्दप्रयोग त्यामुळे लक्षात रहायाजोगी कविता झाली आहे.बापू

Bgovekar
Saturday, December 24, 2005 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनीमाउ ' कुणाच्या इतक्याही' हि तुझी रचना आहे का? मला ही खुप पुर्वी मेलमधुन आली होती अन त्याचवेळी मनास इतकी भावली होती.. म्हटल कोण असेल या कवितेचा निर्माता? ही कविता तुझीच आहे तर खरच सुंदर काव्य!

Pkarandikar50
Saturday, December 24, 2005 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रकृती आणि पुरूष ह्यान्ना आपण आदितत्वे मानतो. प्रकृतीने पुरुषाला विचारलेल्या प्रष्नान्ची ही कविता आहे...

प्रकृतिमान

लक्ष लक्ष आकाशगन्गा
स्त्रवणार्‍या बीजाण्डकोषी
झान्जरगूढ वेदनेची कळ
ती एइकलीस का?

थरथरणार्‍या आकान्तस्पर्शी
उमलत्या दवकळीच्या देठी
एवलेसे तर्पण अक्षयी
तू वाहिलेस का?

चैत्रान्कुरभाळी आर्तावल्या
सृजनगर्द आर्जवी सम्पुटी
अन्तरिक्षाचा खोल प्रतिध्वनि
तू भरलास का?
बापू.


Paragkan
Saturday, December 24, 2005 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह!

Vaibhav_joshi
Sunday, December 25, 2005 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांच्या माहितीसाठी .... प्रियंकाने पोस्ट केलेल्या कविता सारंग ने लिहिलेल्या आहेत बहुधा मेल्स वर forward होत होत आल्या आहेत. सारंग .... दोन्ही कविता मस्त ... पुढच्या वेळी जरा झडझडून बोलाल तर बरं होइल

Vaibhav_joshi
Sunday, December 25, 2005 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॅन्ताक्लॉज .....

शेवटी गाठलाच त्याला मध्यरात्री
म्हटलं " बघू रे तुझी झोळी ...
तीच ती खेळणी अन तीच गोळी ?
हे रे काय ?
अरे हे तर आम्ही ढिगांनी आणून टाकतो .....
तुझं वेगळेपण ते काय ? "

म्हणाला " फ़क्त स्वकीयांसाठी करतोस ....
इतरांचं काय ?
अन ते ही कदाचित चाललं असतं ....
जर तू केलेलं असं ...
बोलून दाखवलं नसतं ...

अरे, निरपेक्ष वृत्तीने " सर्वांना " आनंद देणं -
- हा एकच महत्त्वाचा क्लॉज असतो .
तेवढा पाळला की ...
प्रत्येकजण ...
खरंच सॅन्ताक्लॉज असतो .... "

वैभव !!!


Kmayuresh2002
Sunday, December 25, 2005 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,छान रे..
मेरी ख्रिसमस रे..:-)


Kandapohe
Sunday, December 25, 2005 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव हल्ली मला निरपेक्ष पणे दाद पण देता येत नाही. कारण शब्दच कमी पडतात. पुढच्या वेळी सांताकडून शब्दांची गिफ़्ट मागीतली पाहीजे. :-)

Sarang23
Sunday, December 25, 2005 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन दिवसांत बरच पाणी वाहुन गेल आहे. प्रथम धन्यवाद मित्रांनो. वैभव आभारी आहे. पुढच्या वेळी नक्कीच झडझडुन बोलेल.
निनावी एकदम सही कविता...
वैभव, सांताक्लॉज एक नम्बर...
बापु, हे प्रश्न तुम्हाला पडले होते का हो? जबरी कविता आहे बापु.


Ninavi
Monday, December 26, 2005 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा, वैभव!!!! too good !!!

Tusharvjoshi
Monday, December 26, 2005 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभव,

सांताक्लौज ही एक वृत्ती आहे, हे दर्शवणारी कविता आवडली

तुषार जोशी, नागपूर


Pama
Monday, December 26, 2005 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२-३ दिवस इथे आली नाही तर बरच काही वाचायच राहून गेल.
सारंग छानच आहेत.
निनावी, सगळ्याच मस्त आहेत, खुळेपणा खूप आवडली.
वैभव, आता काय लिहिणार तुला!! सान्ताक्लॉज फारच सुरेख!


Dineshvs
Monday, December 26, 2005 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, मुद्दाम तुझे नाव बघुन ईथे आलो. खुप छान लिहिले आहेस.
यमकांची बंधने पाळुनहि ईतके सुंदर लिहिता येणे अवघड आहे.


Paragkan
Monday, December 26, 2005 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह शेवट खासच रे वैभव!

TJ , तुम्ही का लेखणी ठेवलीत?


Ninavi
Monday, December 26, 2005 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दोस्त्स!
दिनेशदा, का उगा गरीबाला लाजवताय!!!


Tusharvjoshi
Monday, December 26, 2005 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गड कोणाचा?

मी दोर कापला आता
मज लढणे अथवा मरणे
मी लढतांना जर तगलो
मानाचे होईल जगणे

मी दोर कापला आता
ही अर्धी झाली जीत
गड असतो नेहमी त्याचा
जो मरणा नाही भीत

तुषार जोशी, नागपूर


Ninavi
Monday, December 26, 2005 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! तुषार, सहीच!!!!

Kmayuresh2002
Monday, December 26, 2005 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार,सही रे भिडु.. दोनच कडवी का पण?

Lampan
Tuesday, December 27, 2005 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tuYaar.. Ja@kasa ro ²²²

Kshipra
Tuesday, December 27, 2005 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav, shevaTachaa clause aavaDalaa :-)

Urmila
Tuesday, December 27, 2005 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन मोहून टाकी आज मना

मन मोहून टाकी आज मना
मेघ दाटले वारा सुटला
पाऊस धारा बरसू लागल्या
लहान पोरे नावा करीती
टाळ्या वाजवून हास्य फ़ुलविती
मन मोहून टाकी आज मना||१||
पानाफ़ूलावर थेम्ब दाटले
पाने हिरवी दिसू लागली
धरणीमाता न्हाऊन निघाली
मन मोहून टाकी आज मन||२||
अंगावरती गार वारे
शहारून उठले मनही माझे
मेघ दाटले काळोख पसरला
कडाडून वीज चमके
मन मोहून टाकी आज मना||३||
पक्षी सारे बसून होते
फ़डफ़ड करिती पंखही सारे
गोड गाणी गात फ़िरती
मन मोहून टकी आज मना ४||


suman

Milya
Tuesday, December 27, 2005 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव तुषार छानच कविता...

Vaibhav_joshi
Tuesday, December 27, 2005 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्यवाद दोस्तांनो ...
तुषार ... मस्तच रे !!!
बापू ... प्रामाणिकपणे सांगतो प्रकृतीमान माझ्या प्रकृतीला झेपली नाही कधी भेटेन तेव्हा समजून घ्यायला आवडेल


Vaibhav_joshi
Tuesday, December 27, 2005 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झोपडे ....

कोणी ना आले फ़िरोनी भेटण्या
झोपडे तेथेच आहे थांबले
पांढरी वस्त्रे नि रेबॅन घालुनी
धूळ उडवीत खादीधारी चालले

हेच का जे पायी पायी येवुनी
दीन होवुन काल मजला भेटले
आणली होती जराशी भीक अन
ते भिकारयासारखे मज वाटले

जिंकता खुर्ची निघाले खर्च ही
ढीग नोटांचे जमाया लागले
बाटली अन बारबालां संगती
टेरी हलवित, नोट उडवित नाचले

माझिया पोरांस नाही भाकरी
हे तिथे मासे तळाया लागले
ढेकरा झाल्या हजारो देवुनी
पॉलिटिक्स आता सुचाया लागले

घाण ही ह्यांना दिसाया लागली
झोपडे त्यांना सलाया लागले
शहर हे टाकूच आता बदलूनी
स्वप्नी सिंगापूर येवु लागले

पलटले तितक्यात फ़ासे कुणीतरी
" सीट " ह्यांचे डळमळाया लागले
हादरे धडकीने पोकळ बंगली
झोपडे मग आठवाया लागले

आज ते आले फ़िरोनी भेटण्या
अन्न आणि वस्त्र थोडे आणले
आणली उष्टावलेली बाटली
झोपडे सपशेल आहे गंडले

वैभव !!!


Sarang23
Tuesday, December 27, 2005 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमन, अगदी खर सांगतो... कविता छान आहे. मधे थोडी गडबड होते पण एकुण खरच छान आहे. थोड्या फार शब्दांची फेरफार केलीस तर सुंदर लय येईल कवितेला. जमल्यास एखाद वृत्त ही. हा आग्रह नाही पण अस लयबद्ध लिहीण हिच खरी प्रतिभा आहे अस मी मानतो, नाहीतर मुक्तछंद न कळणारे कित्येक जण मला कित्येक कवि सम्मेलनात भेटले आणि स्वतःच ललीत चक्क कवितेच्या ठेक्यात म्हणुन गेले.
एकाने तर चक्क कहरच केला. माझ्याच प्रकाशित कथेतला उतारा कविता म्हणुन ऐकवला!
खरी दाद ही त्रुटी दाखवणारीही असावी... अस मी तरी मानतो.
प्रतिभा म्हणजे अखंड चिंतनाचा कलासक्त(कलानिष्ठ नाही!) आवाज. त्याला रियाज हा लागणारच!
कृपया गैर अर्थ लावु नये.


Sarang23
Tuesday, December 27, 2005 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, विषयाची निवड परत एकदा सुरेख. मांडणी बद्दल काही बोलत नाही. कविता जबरी आहे!

Pama
Tuesday, December 27, 2005 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता..

घेऊन बसले होते आज
कवितेचे बीज ओले,
चार चुकार शब्द कुठूनशे,
तरंगत आले,
मी त्यांना कविता होण्याच्या
मोहात नाही पाडले.
तरंगत जाऊ दिले..
लाटालाटांवरून, पाण्यापाण्यावरुन, कणाकणावरून....
अथांग सागरात
पसरत जाऊ दिले, दूरवर
नजरेआड होईपर्यंत,
क्षितिजापार जाईपर्यत.
त्यांच्या आर्जवाला
मुळीच दाद दिली नाही,
त्यांची हाक सुद्धा,
माझ्या कानी आली नाही.
वरखाली होताना,
त्यांची शकले झाली,
किती पट किती कोटी..
मला मुळीच मोजायची नव्हती..
दिसेनासे झाले तेव्हा,
पाय मागे वळवले
कागद तसेच कोरे घेऊन,
उद्या पुन्हा येईन म्हणून,
सागराला निरोप देऊन,
पुन्हा चार शब्द जेव्हा
तावून सुलाखून घडतील,
आणि पुन्हा उद्याच्या कवितेसाठी,
प्राणपणाने लढतील.


Chinnu
Tuesday, December 27, 2005 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लढवय्ये शब्द तुझे पमा, अशेच लढुन जिंकु देत. :-) छान आहे कविता.

Kmayuresh2002
Tuesday, December 27, 2005 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,झोपडे मस्तच रे..:-)
पमा,एकदम लढवय्यी कविता आहे:-)



Nilyakulkarni
Tuesday, December 27, 2005 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव पमा सारन्ग सर्वच कविता खुपच छान आहेत
सांताक्लोज कडुन खरचच नविन नविन शब्द च घ्यायला हवेत या कवितांना दाद द्यायला
नविन वर्षाकडे आताच बुकिन्ग करुन ठेवतो
दोस्तांनो
keep it up ....

Pama
Tuesday, December 27, 2005 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युगपुरूष..

तुम्ही असालही अर्जुन, दुर्योधन,
मला म्हणालही' पितामह',
पण अणकुचीदार शय्येवर,
मला टोचणारच शूल,
बोथट झाल्या कर्तव्यांना,
चढलीय आंधळी झूल.

सुखासीनतेत लोळणार्‍या मला,
तुम्ही म्हणताय' श्रद्धास्थान',
मी मात्र भरल्या पोटी,
मागतोय निष्ठेची भीक,
शकुनीच्या दर्शनासही,
लागतेय भाविकांची रीघ.

ध्येयामागे पळताना,
खेळतो मयसभेत मी द्यूत,
रोजच भरवतोय मी,
माझ्याच तत्वांचा उरूस,
आणि तुम्ही मात्र मला,
ठरवताय' युगपुरूष'.



Mmkarpe
Wednesday, December 28, 2005 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव झोपडे खासच..
पमा... दोन्ही कविता आवडल्या


Vaibhav_joshi
Wednesday, December 28, 2005 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्तस ..... पमा " कविता " ही कविता एक छान कविता आहे




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators