|
Ninavi
| |
| Wednesday, December 21, 2005 - 1:18 pm: |
| 
|
गमवू नकोस वाया ही रात चांदण्याची होवून जाऊ दे ती बरसात चांदण्याची... खुडलास सोनचाफा हलकेच ज्या क्षणी तू झाली फुलावयाला सुरुवात चांदण्याची अधिरे तरंग दोन बुडले परस्परांत जळी एकरूप बिंबे दोघांत चांदण्याची सारेच घाव माझे, शल्ये तुझ्या मनींची झाली निवांत त्यांना रुजवात चांदण्याची राखेत भावनांच्या कित्येक चंद्र पुरले ही काहिलीच होती विरहात चांदण्याची कोणास ज्ञात केव्हा तू भेटशील फिरुनी ही आज ठेव आहे हातात चांदण्याची रे आज रात्र आहे बेधुंद व्हावयाची फेसाळते सुरा ही प्याल्यात चांदण्याची मी नेसणार आज तव स्पर्श भर्जरी अन ही माळणार पुष्पे केसांत चांदण्याची कसली अबोल वचने ओठांस देती ओठ सार्याच बोलण्याला बघ साक्ष चांदण्याची तव बाहुपाशी होवो माझे सुरेल गाणे आजन्म अन रहावी ही साथ चांदण्याची - निनावी
|
निनावी.. चांदणे अतीशय सुरेख, अप्रतीम.
|
Indira
| |
| Wednesday, December 21, 2005 - 1:42 pm: |
| 
|
निनावी, खुपच छान कविता
|
Mmkarpe
| |
| Wednesday, December 21, 2005 - 1:53 pm: |
| 
|
सारंग, निनावि खुप छान आहेत कविता.
|
Chinnu
| |
| Wednesday, December 21, 2005 - 2:23 pm: |
| 
|
माळणार पुष्पे चांदण्यांची.. वाह व्वा निनावी. सारंग गझल छान आहे.
|
Sarang23
| |
| Wednesday, December 21, 2005 - 11:03 pm: |
| 
|
निनावी, कविता छान आहे. चिन्नु, कर्पे धन्यवाद. कर्पे ती गझल आहे.
|
Sarang23
| |
| Thursday, December 22, 2005 - 2:04 am: |
| 
|
वैभव, आणखी एक घे. या गझलच आणखी एक सौंदर्यस्थान म्हणजे शेराच्या पहिल्या ओळीतील दोन भाग कुठल्याही क्रमाने म्हटले तरी त्या गझलच्या वृत्तात बदल होत नाही! फलाणा सांगणारा ही शहाणा! ऐकणारा ही शहाणा! मुर्ख मी आला मला ना टाळण्याचा ही बहाणा... साचले काहूर आहे, जावयाचे दूर आहे का उगा डोळ्यात पाणी, चेहरा कंटाळवाणा... सांजवेळ दूर दाटे, पेरले रस्त्यात काटे चालतो मी: लांब रस्ता, चोरल्या माझ्या वहाणा घेतले मागून जे ते, देत गेली का नको ते शेवटी मी तू दिलेला, गात गेलो हा तराणा! टाकले मी सर्व येथे, या इथे जे भेट ते पाहुनी का तू म्हणाली- 'कोण हा केवीलवाणा?' मी दिले सर्वस्व वेडे, एकदा तू थांब थोडे सांग ना की कोण मी हा? ओळखीचा की फलाणा! नेवुनी दे खातरी ने, वार झाला ज्या सुरीने! हास सारंगा जरीही घाव हा ताजातवाणा!!! सारंग
|
अलीकडे वृधत्व आणि मृत्यु या विषयावरच्या काही कविता आल्या. तसे जरा अप्रिय विषय पण मला वटते की कविन्च्या दृष्टीने अत्यन्त जिव्हाळ्याचे हे विषय आहेत किम्वा असले पाहीजेत). माझ्या तरी मनात हे विषय आणि विचार नेहमीच घुटमळतात. (१) पक्षीराज काजळलेली जडशीळ चन्द्रकोर काळपट बुजले, उडाले, गोन्दण कधीचे धुरकट अर्ध्या डोन्गरावर पेन्गलेले घुबड बोद्डक्या माथ्यावर कोडगे पत्थर उचकटल्या गन्जीवर पडीक वरा पड खाऊन निवान्त फापटपसारा. सुळक्यावरती ओसाड, मख्ख जर्जरा मोती जडल्या डोळ्यान्चा शुष्क पहारा जळला सुम्भ करडा, केव्हाच की हो तुमचा काजळ्या चिकट लोम्बल्या अधान्तरी पीळाच्या वाट पहा, ये ईलही कोणी, तुमचीसुद्धा शिकार करायला, होउशी तडमडत. बापू
|
(२) ढेकळे तसे कारण नव्हते, काही फारसे घडलेले झाले असेल वय, म्हणून काय त्या बुजुर्ग झाडाने एकाएकी लोळण अशी भुइसपाट घ्यावी? परिसराच्या पत्त्याची जुनी जाणती खूण उडावी? नजरेस नव्हती पडली कधी यापूर्वी भल्या थोरल्या त्या मुळान्ची दाटी हक्काने त्यान्ना बिलगलेल्या ढेकळान्ची माती एकाच गुन्त्यात मुळे, पाचोळा, ढेकळे सारी. भराभरा माणसे जमली, क्षणेक स्तब्ध चुकचुकली कामाला लागली, सरपणाची विल्हेवाट लागली निसटला सन्दर्भ, तिढे सुटले, ढेकळे मनी खन्तावली, जीव तोडला, गिळले आवण्ढे, अखेर तिथेच कलन्डली. परत नाही जुळला सान्धा, त्यान्चा मातीशी आ वासून उताणा पडलेल्या त्या खड्याशि बापू
|
Ninavi
| |
| Thursday, December 22, 2005 - 8:52 am: |
| 
|
धन्यवाद, दोस्त्स!! बापू, मला दुसरी कविता आवडली.
|
निनावी .... ह्या अश्या कवितांना दाद कशी द्यायची असते म्हणे ? म्हणजे तितके भरजरी शब्द कुठून आणायचे ? सारंग ... अप्रतिम रे. आणि मनापासून धन्यवाद फ़र्माइश ला मान दिल्याबद्धल ... . दोन्ही गझल मस्त आहेत. ... चार पाच दिवस नव्हतो म्हणून उशीर झाला वाचायला बापू ... निनावीशी सहमत आहे मी दुसरी आवडली ...
|
छत्री ........ एखाद्या चांगल्याश्या छत्रीमध्ये ... पावसापासून स्वत्:ला जपताना ... अंगोपांगी स्पर्श करीत - - आरपार घुसतो ... एखादा बेभान बेफ़ाम थेंब ... नाही म्हटल तरी ... शेवटी सुखावणाराच ठरतो ... देहाशी झालेला त्याचा संपर्क तरिही जपायचेच असते स्वतःला .. सचैल भिजण्यापासून ... घर सोडण्यापुर्वी रोज ... पहायचीच असते ... संयमाची छत्री तपासून ... वैभव
|
Raahul80
| |
| Thursday, December 22, 2005 - 2:48 pm: |
| 
|
वैभव चार दिवसांची कमी भरुन काढलीस
|
Mani_mau1
| |
| Thursday, December 22, 2005 - 7:16 pm: |
| 
|
To Amey Deshapande I already tried that upload attachment option.But it is giving me error that size is more than 50 kb.So it's not posting.What should I do? Pls tell me.I don't know how to reduce size.
|
Paragkan
| |
| Thursday, December 22, 2005 - 7:38 pm: |
| 
|
Vaibhav mani_mau: Try typing the poems here instead of uploading the images. I am sure it is not that hard to type if you use the "devnagari" button besides the msg box.
|
Mani_mau1
| |
| Thursday, December 22, 2005 - 7:39 pm: |
| 
|
जन्माला आला आहेस थोड जगून बघ जीवनात दु:ख खूप आहे थोड सोसून बघ डाव मांडण सोप असत थोड खेळून बघ घरट बांधण सोप असत थोडी मेहनत करून बघ यशाची चव चाखून बघ अपयश येत निरखून बघ जगण कठीण, मरण सोप असत दोन्हीतील वेदना झेलून बघ जीण मरण कोड असत जाताजाता सोडवून बघ.
|
Mani_mau1
| |
| Thursday, December 22, 2005 - 7:56 pm: |
| 
|
जीवनाच्या परीक्षेत कॉपी करायला चान्सच नाही कारण अगदी सेम पेपर असणारा दुसरा विद्यार्थीच नाही प्रत्येकाचा पेपर वेगळा प्रत्येकाचे उत्तर वेगळे पण एकच परीक्षक्(ग़ॉड्) येथे तपासत असतो पेपर सगळे कुणाला मिळते डिस्टिंक्शन तर कुणाला फ़र्स्टक्लास कुणी मिळवी गोल्ड मेडल तर कुणी नुसताच पास क्लास पण फ़ेल झाल्यावर मात्र येथे एटीकेटी मिळत नाही कारण पुन्हा परीक्षा देण्याची येथे सोयच नाही.
|
Mani_mau1
| |
| Thursday, December 22, 2005 - 8:13 pm: |
| 
|
कुणाच्या इतक्याही जवळ जाऊ नये की आपल्याला त्याची सवय व्हावी तडकलेच जर ह्रदय कधी जोडताना असह्य यातना व्हावी डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये की पानांना ते नाव जड व्हावे एक दिवस अचानक त्या नावाचे डायरीत येणे बंद व्हावे कुणाची इतकीही ओढ नसावी की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी त्याची वाट बघता बघता आपलीच वाट दिशाहीन व्हावी कुणाला इतकाही माझा म्हणू नये की त्याचे मी पण' आपण विसरून जावे त्या सभ्रमातून त्याने आपल्याला ठेच देऊन जागे करावे पण पण कुणाच्या इतक्याही दूर जावू नये की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे दूर दूर आवाज दिला तरी आपले शब्द जागीच घुमावे.
|
वैभवा छत्री मस्तच रे.. सारंग,गझल्स सुरेख रे निनावी,सहीच गं बापू,निनावी आणि वैभवशी सहमत..दुसरी कविता जास्त भावली मनाला मनीमाऊ,गुड स्टार्ट.. कीप ईट अप
|
Ninavi
| |
| Thursday, December 22, 2005 - 9:42 pm: |
| 
|
मयुरेश, धन्यवाद. बाकी ते वाक्यावाक्याला तुझं स्माईल मस्त आहे हां! वैभव,कविता(नेहेमीप्रमाणेच) मस्तच. (पण नवीन छत्री घ्यायला झालेली दिसत्ये! ) दोघांनी ही घ्या रे!
|
निनवि, वैभव, मयुरेश, धन्यवाद. वैभवची छत्रि' छन आहे आणि मनिमाउच्या कविताही चान्गल्या येउ लागल्या आहेत
|
Milya
| |
| Friday, December 23, 2005 - 2:28 am: |
| 
|
निनावि, वैभव मनिमाउ मस्तच कविता अप्रतिम
|
Sarang23
| |
| Friday, December 23, 2005 - 3:20 am: |
| 
|
मनी माऊ कविता छान आहेत पण परत BB चुकला. त्या कवी माहीत नाही या सदरात जायला हव्या. किंवा किमान संकलित अस कविता संपल्यावर तरी लिहायचस. वैभव छत्री घे बापू, जन पळभर म्हणतील ची आठवण झाली.
|
Daksha
| |
| Friday, December 23, 2005 - 3:25 am: |
| 
|
ninavi chandane apratim! tav bahupashi................kya bat hai!vaibhav 'chatri' zakas!mani mau tumchya kavitahi uttam!
|
धन्यवाद दोस्तांनो .... प्रियांका ... दूर दूर आवाज .... शेवटच्या दोन ओळी मस्तच !!!
|
खंत ........ वाट होती निसरडी अन पाय थोडे बहकलेले तोल सांभाळीत जीवन मोह टाळित चाललेले लाघवी स्वप्नेही आली , थांबली , परतून गेली चाहुलीने , सत्य सात्विक , दक्ष होते जाहलेले स्पर्शिता काही ऋतूंनी पालवी फ़ुटली जरि - - बोचले , माझे मला का , मोहरूनी वागलेले पाहिले माझ्या मना मी संयमाशी झुंजताना ऐहिकाचे चोचले त्याला छळाया लागलेले वाटले झोकून द्यावे ! भरभरूनी श्वास घ्यावा बिलगुनी मृत्यूस तेव्हा श्वास होते थांबलेले वैभव !!!
|
निनावी, किती तरल आहे कविता.... छान आहे, मला फार आवडली. वैभव, नेहमीप्रमाणेच अप्रतिम..... शेवतच्या ओळी तर सुरेखच आहेत....... 'बिलगुन मृत्यूस तेंव्हा श्वास होते थांबलेले'....... सही!!
|
Devdattag
| |
| Friday, December 23, 2005 - 7:10 am: |
| 
|
निनावि, सारंग, वैभव, बापु मस्त आहेत.. कविता. सारंग गज़ल फ़ार सुंदर
|
वैभव, पुन्हा मरणाचाच विषय पण खन्त' खूप आवडली. Bअपु.
|
बापू ... तुमची खंत दूर करून टाकतो ... बास ! मृत्यू वगैरे नकोच आज ... लै बिल झालं ...
|
एल्गार ... संकटांनो या भिडाया प्राण हाती घेवुनी हृदय हळवे सज्ज आहे वज्र अवघे होवुनी शमविण्याला रुधिरतृष्णा वार होवू दे खुशाल सांजहळवी ज्योत नाही पेटती आहे मशाल सद्गती द्याया तमाला जाळुनी वा उजळुनी हृदय हळवे सज्ज आहे वज्र अवघे होवुनी अश्व चिंतांचे अता हे उधळणे विसरून गेले निश्चयाची मांड ठोकून मी तयांना सिद्ध केले युद्ध नशिबाशी , प्रणाचा पांचजन्य फ़ुंकुनी हृदय हळवे सज्ज आहे वज्र अवघे होवुनी भूमी नाही सोडणे झाल्याविना कर्तव्यपूर्ती मी मनाला माय मानुन वंदितो ही पूज्य धरती घेतला आशिष आहे " येशी विजयी होवुनी " हृदय हळवे सज्ज आहे वज्र अवघे होवुनी या इथुनी जायचे आले तसे आता फ़िरुनी कात टाकुन थांबलो मी भयपिशाच्चा मारुनी बाहू लागती फ़ुरफ़ुराया संकटांना पाहुनी हृदय हळवे सज्ज आहे वज्र अवघे होवुनी वैभव !!!
|
Ninavi
| |
| Friday, December 23, 2005 - 7:57 am: |
| 
|
वैभव, खंत अप्रतिम!! एल्गार पण झकासच. प्रियान्का, सॉरी हां, जरा स्पष्ट बोलते. पण हा बीबी स्वतःच्या रचनांसाठी आहे. इतर कवितांसाठी अन्यत्र जागा आहेत.
|
Urmila
| |
| Friday, December 23, 2005 - 11:19 am: |
| 
|
आकाश निळे, धरती ही निळी रोज भासते नवी नवी १|| निळ्याच फ़ुलाच्या माळा बघुनी गोड हासतो कृष्ण ही निळा २| | सागर निळा, लहरीमागून लहरी उठती त्याही मजला निळ्या भासती ३| | डोन्गर निळे नाचू लागले मोरही निळे नाचू लागले ४| | अगाध देवा तुझी ही लिला नमस्कारास्तव हात जोडीला ५| | मन मोरही तो आनंदाने नाचू लागला ६| | suman
|
Ninavi
| |
| Friday, December 23, 2005 - 11:25 am: |
| 
|
खुळेपणा खरेच आता कळून चुकले कुणीच नाही इथे कुणाचा जन्मांतरिच्या शपथा, तरिही नाही भरवसा दुज्या क्षणाचा नाती रक्ताचीही टपली घोट त्याच रक्ताचा घेण्या जुनाच आहे उभाच दावा सुईच्या अग्रावरिल कणाचा जे जे जोडावे नाते ते घेऊन येते नवीन ओझे रोज नवा मी दगड ठेवला मनावरी या मणामणाचा एक चेहरा पहावयाला किती मुखवटे शोधित गेलो! सगळ्यांना अन मंत्र पाठ तो त्याग आणखी समर्पणाचा!! नको उत्तरे, निदान माझे सवाल घ्या ऐकुनी, म्हणालो त्यांच्या लेखी नवा पुरावा जुन्याच माझ्या खुळेपणाचा - निनावी
|
एक दोन दिवसात भरपूर काही आलेलं दिसतंय! वैभव एल्गार जोरातच आहे! थोडसं खंताशीच निगडीत काटे -

|
|
|