Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 21, 2005

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » काव्यधारा » कविता » Archive through December 21, 2005 « Previous Next »

Devdattag
Friday, December 16, 2005 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दगडांच्या गावात
सगळीकडे दगडच दगड

कधी शेंदरी रंगवलेले
कधी शेणाने सारवलेले
कधी पाटीचे, कधी पाट्याचे

दगडांच्या गावात
सगळीकडे दगडच दगड

कधी ओझ्याने दबलेले
कधी पाण्याने झिजलेले
कधी वाटेचे, कधी वाट्याचे

दगडांच्या गावात
सगळीकडे दगडच दगड

कधी डोंगराच्या माथ्यावरचे
कधी ओढ्याच्या पाण्याखालचे
कधी शिवाचे, कधी शवाचे

दगडांच्या गावात..


Mani_mau1
Friday, December 16, 2005 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maaJyaa ka^mPyauTr Dosk Ta^pvar maI Kup Cana kivata zovalyaa Aahot.kivata sauMdr Aahot.malaa marazItuna yaoqao ilahayalaa Kup vaoL laagaola.tr kÜNaI saaMgaola ka kI Dayaro@T Dosk Ta^pva$na ksao yaoqao pÜsT k$ to.malaa tumha savaa-MXaI %yaa XaoAr krayacyaa Aahot.

Pkarandikar50
Friday, December 16, 2005 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त,
'दगड' आवडली.
बापू

Ameyadeshpande
Friday, December 16, 2005 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेस्क्टॉप वर आहेत म्हणजे? इमेजेस आहेत का? अपलोड का करत नाही पण मग?

Ameyadeshpande
Friday, December 16, 2005 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी टिळकांवरचं दुर्दम्य वाचलेलं आणि त्यानंतर कधीतरी पौर्णिमेच्या रात्री बसमधून प्रवास करत होतो तेव्हा बस नदीवरून जात होती आणि नदीचं पात्र एकदम चमचमत होतं. त्या वेळी आलेल्या मनातल्या काही ओळी...



Sarang23
Friday, December 16, 2005 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू छान आहे कविता. वैभव सुरेखच. देवदत्त दगड छान.

Ninavi
Saturday, December 17, 2005 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा अमेय! छानच कल्पना!

Ameyadeshpande
Saturday, December 17, 2005 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद निनावी...
तुमच्या मागच्या मृत्यूवरच्या कविता वाचल्या...त्यात माझी अजून एक...




Urmila
Sunday, December 18, 2005 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



नाते ना ते' राहिले

स्वत:मध्ये मी गुर्फ़टून राहिले
दु:खासी मी दूर ठेविले
आनंदाने जगत राहिले
लक्ष्मी मी जवळ बाळगून होते
मुक्तपणे मी उधळून टाकिले
पुढील विचार मुळीच ना केले
मुलाबाळात रमून गेले
वृद्धाप काळी मज समजले
घरटे अपुले ते सोडून गेले
कधी भेटण्या फिरून न आले
नाते ना ते' राहिले
मी हे काय केले?

सुमन


Pkarandikar50
Sunday, December 18, 2005 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारन्ग, धन्यवाद.
अमेय, नदी खूप आवडली.
बापू

Pkarandikar50
Sunday, December 18, 2005 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(१) सावली कशी
_______

रन्ग तिचा साजरा, गोजीरा
मोर माथ्यावर बान्धला तुरा

गन्ध तिचा गहिरा, गहिरा
दवबिन्दून्चा नवा फुलोरा

नाद तिचा टपोरा, टपोरा
रानवारा मस्त उधळे चुरा

लय तिची लाजरी, बुजरी
लपाछपीतली कोर रुपेरी

मी तर हा असा . . . . . .
मग मझी सावली अशी कशी?

बापू करन्दिकर

(२) चान्दण्यातली सावली
------------------
सवयीने टेकवले, रेखले, आखीव ठिपके
धवल षटकोनी निगरगट्ट सीमान्मधले
ठोकरून मदनरन्गान्चे उन्मत्त फवारे, झुपके
चुकार फटकारे जड पायान्नी रोज पुसले.

कढत उन्हाची ठोकळ जड बेडी जखडते
सावली निर्दय माझी सातजन्मान्चे वैर धरते
दिवेलागणी हलका पाझर पापण्यान्ना अनावर
कण्ठाची दाटी फोडून वक्षी ओसण्डतो गहिवर.

आस वेडी, टिपूर रात्री पूर्व दिशेने मुसमुसते
लख्ख चान्दण्यात सय सावली उगा भिरभिरते
व्रुन्देच्या पायाखाली मिणमिण पणतीचा फास
धुन्द पुनवेचा ध्यास, त्याचसाठी तीचा अट्टाहास.

बापू करन्दिकर

(टीप: ह्या कवितेला एक सन्दर्भ आहे, पुराणातल्या सती व्रुन्देच्या गोष्टीचा आणि तुळशीच्या लग्नाचा.. एका विवाहितेला सदोदित विवाहबाह्य प्रेमाची ओढ आणि आठवण छळते, त्या प्रेमाचे रूपक म्हणजे चान्दण्यातली सावली.)


Pkarandikar50
Sunday, December 18, 2005 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi All
R U interested in starting a 'Pune Chapter' of Maayboli? If yes, pls e-mail me your ideas & suggestions
pkarandikar50@gmail.com
Bapu.

Sarang23
Sunday, December 18, 2005 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू, दोनही सावल्या छान आहेत. पुणे साठी
इथे टिचकी मारा.
अमेय दुसर्‍या कवितेतील शेवटची ओळ छान आहे.

Amitpen
Sunday, December 18, 2005 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू, 'पुणे चॅप्टर' म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?... आपल्याकडे आधीच पुण्याचे बरेच बीबी आहेत की!!!!

Vaibhav_joshi
Monday, December 19, 2005 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोगरा ...................

एक रात ... चांदण्यात ... अन मिठीत ... मोगरा
एक लुब्ध * ... पारिजात ... अन मिठीत ... मोगरा

शब्दगंध ... स्पर्शगंध ... लुटुनी चालला मरंद ...
श्वास तेवतात मंद ...
अन मिठीत ... मोगरा

गात्र गात्र चेतवित ... चालली पुढेच रात ...
धुंदफ़ुंद पारिजात ...
अन मिठीत ... मोगरा

दोन श्वास श्रांत क्लांत ... एकरूप आपसांत ...
तृप्त तृप्त पारिजात ...
अन मिठीत ... मोगरा

शुक्रचांदणी नभात ... प्राचीवर अस्त रात ...
तांबडेही उंबरयात ..
पण ...
पण मिठीत ... मोगरा ...

वैभव!!!

* हा शब्द एका प्रिय व्यक्तीने सुचविला आहे मी ह्या ठिकाणी " वेडा " पारिजात असा शब्द वापरला होता आणि लय बिघडत होती


Vaibhav_joshi
Monday, December 19, 2005 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त ... दगड सुरेख ...
अमेय ... दोन्ही कल्पना मस्त ... आणखी पोस्ट कर ...
बापू ... तुमच्या कल्पना नेहेमीच वेगवेगळ्या असतात सारंग म्हणतो त्याप्रमाणे दोन्ही सावल्या सुरेख.
उर्मिला ... आणखी येवु दे ...
आज सारंग कुठे गेला ? सारंग गझल टाक ना एखादी ...


Sarang23
Monday, December 19, 2005 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, आयला अस काहीतरी लिहायच आणि उगाच दुसर्‍याला गझल टाकायला लावायची.
वृत्त सोडल तर... म्हणजे पी के च्या भाषेत सांगायच तर तंत्र सोडल तर मंत्र जबरदस्त आहे. खुप छान रे.
तिथे विडंबन वर एक गझल टाकली आहे बघ रे. ती मुळ गझल स्वर्गीय श्री सुरेश भट यांची कलाकृती आहे. मात्रा वृत्तात असुनही गझलची नजाकत महान आहे.


Sarang23
Monday, December 19, 2005 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका प्रिय व्यक्तीने सुचवला आहे म्हणुन त्यात बदल कर अस मी मुळीच म्हणत नाही, पण धुंद सुद्धा छान बसेल तिथे.
सगळे पारिजातावर लुब्ध होतील पण पारिजात कोणावर कसा लुब्ध होईल? तो नेहमीच आपल्याच धुंदीत असेल. खर ना.


Devdattag
Monday, December 19, 2005 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय.. बापू.. सहि जमल्यात कविता
वैभव.. मोगरा दरवळतोय



Urmila
Monday, December 19, 2005 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहर

गुलमोहोराच्या झाडाची, लाल पिवळी फुले बहरून आली
माथ्यावर ऊन तळपे तरीही ती हसत होती
वाटसरू येती थकुनी, तुझ्याकडे पाहूनी आनंदित होती
दु:ख आपुले सारे, ते विसरुनी जाती
पक्षी किलबिलती अवतीभवती
तू तयाना दूर न लोटी
हसत जगावे, दुसर्‍यास आनंदी करावे
गुलमोहोरा, हेच तुझे रूप खरे

सुमन


Ameyadeshpande
Monday, December 19, 2005 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव हा मार्गशीर्षातला मोगरा जरा जास्तच धुन्द करणारा आहे!!! अगदी प्रत्येक पाकळी!

खाली मी अनुभवलेली एक अप्रतीम संध्याकाळ...




Mmkarpe
Monday, December 19, 2005 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो मस्त चाललय.....
मायबोलिच्या सावलित गुलमोहर आणि मोगर्‍याला बहर आलाय.


Mmkarpe
Monday, December 19, 2005 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशा कितीतरी कळ्या उमलण्याआधिच छाटल्या जात आहेत.त्या कळीसाठी...

कळी.....

ही कळी...
तुझ्या दारी उमलणार
हसणार, खेळणार
प्रेमाचा मुक्त वर्षाव करत
घराला माया लावणार.

ही कळी...
तुझ्या छायेत फुलणार
जाता येता तुला सुखविणार
एक दिवस दुसर्‍या घरी
जाता जाता तुला रडविणार.

ही कळी...
दोन घरांना जोडणार
मंद सुगंधाने मने मोहविणार
जगात कुठेही असो
चित्त तुझ्याकडेच लागलेले असणार

काळ बदलतोय
रुढिही बदलतिल
याची देतो तुला खात्री
उमलण्याआधी गर्भातच ह्या कळीला
नको लावू रे तु कात्री





Nilyakulkarni
Monday, December 19, 2005 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा...मोगरा मस्त जमलाय..... दरवळतोय....लुब्ध पारिजात.... अहाहा.....
अमेय.... नदी...मृत्यु दोन्ही कविता छान आहेत


Paragkan
Monday, December 19, 2005 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, ' मोगरा ' खासच रे.

मी मात्र शेवट ' तरिहि मिठीत मोगरा ' असा केला असता.
:-)

Mani_mau1
Monday, December 19, 2005 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

To Amey Deshpande
How to upload the images from desktop?I know how to attach the file to mail but I don't know how to post them in MAAYBOLI? I save some excellent poems on desktop.I want to post them here,will you pls tell me.

Ameyadeshpande
Monday, December 19, 2005 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

To Mani_mau1
There is a button "Upload Attachment" beside the "Post Message" button which I suppose you use for posting a msg. Click on the "Upload Attachment" button where you would be able to select a file from your local machine. It will come as a tag named "popattach" in the textarea you use to post msg. and when you post the msg. the attachment will also be uploaded along with it.
Let me know if you still find this difficult...

Ameyadeshpande
Monday, December 19, 2005 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेतल्या विन्टर मधला एकटेपणा... अश्या ह्या एकटेपणात समोरचं झाडही आपलसं वाटू लागतं...

Dedicated to all those who are away from there homeland...

अपर्ण झाड -


Urmila
Monday, December 19, 2005 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माह्या बुढा भल्ला बेकार, रस्त्याने चालते ईकडे तिकडे पायते
मी मन्तो सरळ चालायले काय जाते
येनारा जानारायाले हटकत रायते

तो म्हनते, तू बायकोले काऊन मारते
हा म्हनते, तूले काय करावं लागते
माहाबुढा भल्ला बेकार

का रे शिरप्या तू दारू पिऊन का चालते
तुले त दिसत नाही, मले कसा पायते
माहाबुढा भल्ला बेकार

पहले मी पियो,तवा माही बुढी
काडी घेऊन धावे
मी पुढे ती मागे,असी राजा गावभर
आमची शिवाशिवी चाले
माहाबुढा कसा बेकार
सगळ्या गावभर मलाच बदनाम करत रायते

सुमन


Pkarandikar50
Monday, December 19, 2005 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उर्मिला,
अहिराणी कविता मस्त वाटली. वेगळा महक'.

अमितपेन,
मायबोलीचे पुणे चप्टर याविषयी थोडी अधिक माहिती हवी असल्यास मला प्लिज इ-मेल पाठव. ह्या साइट वर काहीतरी प्रॉब्लेम आलेला दिसतोय.

बापू





Ninavi
Tuesday, December 20, 2005 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, झाड खासच. नक्कीच ते बोलत असणार तुझ्याशी...आकारातून. अरे, पण एकटं वाटायला काय झालं? पुन्हा असं वाटलं तर लगेच इथे यायचं मायबोलीवर... काय?

Pama
Tuesday, December 20, 2005 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उर्मिला, छानच. अशा प्रादेशिक भाषेतील कविता फार दुर्मिळ असतात वाचायला. लिहित रहा.
वैभव, मोगरा मस्तच!
अमेय, सगळ्या आवडल्या कविता.


Ninavi
Tuesday, December 20, 2005 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वार्धक्य...


माध्यान्हीचा सूर्य आता अस्ताचलास झुकतो
कोणताही सूर माझा जोगियाच आळवतो

नव्या पालवीचे आता मस्तकास ओझे होते
वसंतात कानावरी शिशिराची चाहुल येते
धुंद मोगर्‍याचा माझ्या हाती देवचाफा होतो
कोणताही सूर माझा जोगियाच आळवतो

परवापर्यंत होत्या ओल्या जखमा सगळ्या
पापणीतुनी गालांवर आठवणींच्या पागोळ्या
आज निरभ्र आकाशी इंद्रधनुष्य पाहतो
कोणताही सूर माझा जोगियाच आळवतो

पंचेंद्रिये तृप्त झाली, नाही उरला विकार
सौंदर्याला सात्विकतेचा आज होतो साक्षात्कार
अंगणात मावळतीच्या पक्षी एकला हिंडतो
कोणताही सूर माझा जोगियाच आळवतो

- निनावी


Ameyadeshpande
Tuesday, December 20, 2005 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच सगळ्यान्चं वार्धक्यं असं असतं?
उगवता सुर्य ही येतानाच कधी कधी सात्विकतेची पहाट घेऊन येतो...


Sarang23
Wednesday, December 21, 2005 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मित्र वैभव, तुझ्या ईर्शादला मान देवुन एक गझल

अजूनही!

बावळ्यांचाच हा बाजार आहे!
एकटा मी इथे लाचार आहे!

का असा हाससी वेड्यापरी तू?
लाघवी हास शिष्ठाचार आहे!

पूस त्या पापण्या पाणावलेल्या
काळ हा पाहुणा- जाणार आहे...!

वाकतो आदराने चालताना!
मानला भार मी आभार आहे!

लादता शेवटी का सत्य खोटे?
'बावळ्यांचा तुला आधार आहे!'

सारंग





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators