Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 16, 2005

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » काव्यधारा » कविता » Archive through December 16, 2005 « Previous Next »

Vaibhav_joshi
Friday, December 09, 2005 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो प्रार्थनेत खूप शक्ती असते अस ऐकलय .. ही कविता एक निमित्त आहे तुम्हा सगळ्यांना विनंती करण्यासाठी ... एका कविमनाच्या छोट्या फ़ुलास आज शक्य त्या सर्व सदिच्छांची गरज आहे .. ह्या कवितेला feedback नको. तेवढा एक क्षण फ़क्त त्या फ़ुलासाठी ... please?

अकाली ...

असे कितीसे फ़ुलणे झाले त्या निष्पाप फ़ुलाचे
नयन पाकळ्या मिटण्या आले ऋतू कोण देशीचे

वेल हंबरे " अशी कशी ही अवचित ताटातूट "
खिन्न बगीचा ऋतूस विनवी " देशील का रे सूट "
पाऊस लपवित ऋतू म्हणे " आम्ही गुलाम फ़क्त हुकुमाचे "
" त्या " देशीचा निरोप आला फ़ूल हवे ह्या बगीच्याचे
दवबिंदूंचे अश्रू होवुन डोळे झरले सुमनाचे
असे कितीसे फ़ुलणे झाले त्या निष्पाप फ़ुलाचे

पुरे जाहला खेळ तुझा निर्व्याज फ़ुलांशी असा
तुझे दोष तुजला ना दिसती, सर्वसाक्षी तू कसा ?
तुला ना कळे स्वप्न निरागस कोमल त्यांच्या अंतरीचे
उगाच म्हणतो " फ़ुलांस " आम्ही फ़ूल तुझ्या त्या अंगणीचे
फ़ुलण्याआधी नेण्या आले दूत तुझ्या त्या देशीचे
थांबव रे! फ़ुलणे ना झाले त्या निष्पाप फ़ुलाचे


Pkarandikar50
Friday, December 09, 2005 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.. प्रतिक्रिया नकोत म्हणालास, पण रहावले नाही. फारच टचिन्ग. सन्दीप खरेची एक कविता आठवली. 'कितिक हळवे, कितिक सुन्दर'. एक क्षण एकदाच काय दररोज सुद्धा अनेकदा प्रार्थना करेन मी. मझ्या प्रार्थनेत किती बळ असेल त्याचा विचार न करता.
बापू

Pkarandikar50
Friday, December 09, 2005 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंडीत भीमसेन जोशीन्चे वय आता ८५+ आहे. गेल्या वर्षभरामधे ४ मोठ्या शस्त्रक्रिया झाल्यात. घरातल्या घरात जेमतेम त्यान्ना व्हीलचेअरवरून कोणी फिरवले तर फिरू शकतात. बोलणेही अगदी कमी आणि अस्पष्ट. अलीकडेच त्यान्ना कर्नाटक भूषण पुरस्कार मिळाला. त्यासाठी कर्नाटक राज्याचे मन्त्री आले होते. कार्यक्रम त्यान्च्या घरीच झाला. पंडीतजीन्च्या अवस्थेस उद्देशून मन्त्री महोदयान्नी एका इन्ग्रजी कवितेच्या ओळीन्चा उल्लेख केला. कितीतरी वेळ तो प्रसन्ग आणि त्या ओळी मला आठवत राहिल्या. त्यान्चा मी केलेला स्वैर अनुवाद पाठवला आहे. त्याची पार्श्वभूमी मी लिहली नव्हती. वैभवची कविता वाचल्यानन्तर वाटले की थोडी पार्श्वभूमीहि सान्गावी.
बापू.


Ninavi
Friday, December 09, 2005 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, प्रार्थना केल्यावर प्रतिक्रिया दिली तर चालेल ना? असं विचारणार होते, पण खरं सांगू, आता शब्दच उरले नाहियेत त्यासाठी.

बापू, छान आहे कविता. आणि पार्श्वभूमी कळल्यावर अजूनच भावली.
काही लोकं अजरामर आहेत असं आपण उगाचच धरून चालत असतो नाही?

बाकी तुम्ही प्रतिमा छानच वापरता. वेधलीस भैरवी, गाभारा नीरवाने भरला, बंध विसकटुनी बहरलेली बंदिश, लयीत विलय...


Pkarandikar50
Friday, December 09, 2005 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, धन्यवाद.
वेधणे याचा मूळ अर्थ 'कवटाळणे' असा होतो. मला तोच अर्थ अभिप्रेत आहे. असो.
जरा आणि मरण कुणाला चुकले आहे? काहीन्चे व्रुधत्व सुन्दर असते, तर काहीन्चे मरण, काहीन्चे दोन्ही. 'सुन्दर मी होणार' या कवितेचा अर्थही मग लोभसवाणा वाटू लागतो..
पण तरीहि, 'सुन्दर' होण्याला काही वय असावे, उचित वेळ असावी, नाहीतर मग पाप आणि पुण्याचे विचार मनात आल्यावाचून रहात नाहीत.
बापू


Pama
Saturday, December 10, 2005 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्पे, धृव, देवदत्त.. छान आहेत..
बापू, भवानुवाद छान जमलाय.
वैभव, फार हळव केलस बघ. त्या फुलासाठी माझ्या देवघरात रोज एक प्रार्थना.


Lampan
Sunday, December 11, 2005 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

baapU kivata kuzo Aaho ?

Warda
Sunday, December 11, 2005 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maahor

Baa] tsaa kQaIca
naahI AQyaat maQyaat
samajauna saaro kahI
]Baa eka kÜpáyaat

Aa[ maaJaI saaMgau tulaa
maÜz\yaa AanaMdanao rhato
pNa malaahI tuJaI mhNauna
pdÜpdI ihNavato

jaunaI maOi~Na hI baihNa
saaqa dusaáyaalaa doto
saÜbatIlaa navara Asata
Aamha ksaonausao phato

maaJao Abbaajaana maa~
kmaalaca maÜzI
Aata Balao icaMtItat
puvaI- kaLjaIca navhtI²²

varda



Vaibhav_joshi
Monday, December 12, 2005 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदास ...

संगत सुरेची होती रंगत पुरेशी होती
जोडीस आसवांची लज्जत अनोखी होती

तुजलाच आठविण्या शुद्धीत राहिलेलो
तुजलाच आठवुनी विसरून भान गेलो

रिचवुन टाकले मी सारेच ते हलाहल
उरली तरी उरात सुनसान एक मैफ़ल

मदिरेत ना सखे मी प्रेमात बाद झालो
केवळ तुझ्यामुळे मी बरबाद आज झालो

दोस्तांपुढे मी माझ्या दुःखास मांडलेले
चषकात त्यांचियाही अश्रूच सांडलेले

सारेच प्यायलेले , सारेच पोळलेले
सारेच एकवार बिलगून , टाळलेले

वदले मला ते " दोस्ता! होवु नको उदास
प्रत्येक " पारो " साठी असतोच " देवदास " "

वैभव!!!


Mmkarpe
Monday, December 12, 2005 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या शेतकर्‍यांच्या प्रश्न ऐरनिवर आला असताना त्याच्या हृदयाला लागनारी............

कळ...

हाडाकाडांच पाणी करुन
पिकं काढितो
दिवाळं निघाल्यागत
माह्या सर्वस्वाला मीच
बाजारात लिलावाला मांडितो

ऊत्पादनखर्च न ईचारताच
भाव ठरिवला जातो
आडत्याला पट्टी मागाया गेलेव...
वरुन त्योच... फिरल्याले
'इस रुपये' मागतो

काही महाभाग म्हनत्यात
शेती करण सोडुन का देत नाय
त्यान्ला कसं हो कळणार...
ह्या काळ्या आईची माया
स्वस्थ बसु देत नाय...


Moodi
Monday, December 12, 2005 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा कर्पे ये हुई ना बात. छान अन मनाला भिडणारी कविता केलीत बघा.

Pama
Monday, December 12, 2005 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्पे, छान आहे, शेवटcया दोने ओळी अवडल्या.

वैभव, देवदास सहीच.. तशीच काहीशी आहे ही माझी... नाव काही सुचत नाही म्हणून बिननावाची..


आज मला बघून तिने जेव्हा डोळे पुसले
तेव्हा म्हटल या आधी केले नव्हतेस असले,

रोज मांडते ती नव्याने इश्काचा बाजार
करून जातो मी खुषीने तोट्याचा व्यवहार

आज या मैफिलीत ती दिसते का उदासीन
तिच्या पायर्‍या चढलो, त्यात काय राहिले नवीन

सावरताना तिने मला ही शपथ घातली होती
'कुणाची न मी, तुला ना कुठे भेटली होती'

'माझ्या दारी ऐकू येतील तुला फक्त विराण्या'
त्या शब्दांना कवटाळून जगतो मी दिवाणा

तुझ्या वचनानी सखे मी अजून बद्ध आहे,
तुला विसरण्याची पण मला कुठे शुद्ध आहे.







Ninavi
Monday, December 12, 2005 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्पे, खरं सांगू, हे असं वाचलं की आमच्या प्रेमाबिमावरच्या गुलगुलीत कविता फाडून फेकून द्याव्याश्या वाटतात. ही खरी आंतड्याची कळ. आम्ही लिहीतो ते भरल्या पोटी. त्याला याची सर कशी येणार!

Chinnu
Monday, December 12, 2005 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ार सुंदर कर्पे.. अगदि मनाला भिडणारी कविता. वरदा, तुमची कविता पण आवडली.
वैभव, प्रत्तेक पारो साठी देवदास, वा वा..


Kmayuresh2002
Monday, December 12, 2005 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करपे,निनावीशी एकदम सहमत..भरल्या पोटी सगळं सुचत. तुमची कविता मनाला असंख्य वेदना देऊन गेली..

Sarang23
Monday, December 12, 2005 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्पे केवळ अप्रतीम विषय. शेवटच्या दोन ओळी सुरेख. काळ्या आईची माया... क्या बात है.
वैभव, पमा छान...


Sarang23
Tuesday, December 13, 2005 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकरुप

मी छेडिल्या आहेत तारा
सोबती आहेच वारा
होवु दे बेधुंद आता
बासुरीचा तो शहारा

गोपिका ही संगती या
रास करतो श्रीहरी
याकडे आहे यमुना
त्याकडे तू पैलतिरी

रंगल्या गोपिका आणि
रंग सांजे आला निळा
मीरा पाही वाट तेथे
भाव भरला सावळा

शामला ती अंगकांती
निरखितो आहे तुका
श्रीहरी हासे परंतु
ज्ञानोबा झाला मुका

तुझ्या दर्शने भारले
भक्त वैकुंठ पावले
शब्द झाले अम्रुताचे
गीते मराठी भावले

आज पाहे वाट मी ही
भक्ती माझी जावो फळा
भेट तुझी आता घडो
उमलो शब्दांचा मळा

सुर आहे सोबतीला
ताल हा आता धरा
लयबद्ध होते गीत अन
रास ही आता करा

अहाहा! हा योग आहे
दुग्ध आणि शर्करा
सोबती आलीच राधा
गोपिका त्या सुंदरा

येवुनी जा रे सख्या तु
वाट मी पाहे खरी
भासतेच आहे मजला
सारे काही स्वप्नापरी

छेडिल्या आहेत तारा
मी ही आहे तेथेच का?
बासुरी वाजे परंतु
सोबती तो तुच का?

संभ्रमी आहेच का मी?
'तुच माझा सावळा'
आज पाहे वाट' राधा'
येवुनी जा राऊळा


सारंग


Pkarandikar50
Tuesday, December 13, 2005 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाउस काळ
---------
आतून बाहेरून तीच आन्ग
तडकलया फुटक्या काचेवाणी

दिवसभर भणाणतया,
कढत वार, येड्यापायी.
खुशाल तिच्या,
जात अन्गचटीला.

चिन्ध्या मातकट धडूताच्या,
जराशी खालवर व्हत्यात,
त्यान्नाबी न्हाय सुधरत,
मान वर काढाया.

आभाळच पालवायच
विसरलया जणू
तिच्या तरी थानाला
पान्हा कुठन फुटायल?

अधून मधून कवा तरी,
निसटतो घामाचा एक ओघळ.
जाग्यावरच वाळून जातो,
माघारी त्याच्या, एक उसासा.

बापू करन्दिकर

Mmkarpe
Wednesday, December 14, 2005 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, पमा, चिन्नु, निनावि, मयुरेश,सारंग धन्यवाद........
सारंग' एकरुप' छान आहे.


Mmkarpe
Wednesday, December 14, 2005 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


चाकोरी...
डोळ्यावर झापडं बांधुन
नांगराला जुपलेल्या बैलासारखा
चालत राहीलो मैलोन मैल
चाकोरितच... या बांधापासुन त्या बांधापर्यंत
हंगाम आले नी गेले रूतु बदलले
ओढे नद्या ओहोळ खळाळले
धरती नव्या नवलाईने नटली
फळा फुलांनी किनार चढवली
सुर्याने इंद्रधनुषी रंग भरले
चंद्रानेही चांदणे शिंपिले
पक्षी गाऊन गाऊन थकले
अरेरे! मी काहीच का नाही पाहिले?
चालत राहिलो मी आपल्याच धुंदित
घरापासुन ओफिसपर्यंत... चाकोरितच..
संसाराचा वंगन नसलेला गाडा ओढित
अन आपल्याच आकांक्षांचे मुडदे पाडित
तारुण्य आल, सरलं. नकळतच वाहवलं
मागे वळुन पाहताना उगिचच वाटलं
अरे! आपण तर जगलोच नाही कधी
अन पुन्हा जगुया म्हटलं तर...
जगण्याची उमेदच उरली नाही.


Champak
Wednesday, December 14, 2005 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्पे, अगदी च सही रे भो!



Pama
Wednesday, December 14, 2005 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, बापू, कर्पे.. छान आहेत सगळ्या कविता.

Chinnu
Wednesday, December 14, 2005 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्पे, नोकरदाराच दुखणे अगदी बरोबर पकडलत. छान आहे कविता.

Kmayuresh2002
Wednesday, December 14, 2005 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्पे,एकदम वास्तववादी कविता रे मित्रा:-)


Sarang23
Wednesday, December 14, 2005 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, कर्पे धन्यवाद.
कर्पे छान आहे कविता. सही चालु आहे.


Devdattag
Thursday, December 15, 2005 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो मस्तच चालु आहे. चालू द्या.



आपलं बुवा अस आहे

पक्षी उडतात, उडु देत
वारा वाहतो, वाहु देत
सुर्य मावळतो, मावळू देत
आपलं बुवा अस आहे

यंत्रांची घरघर
पानांची सळसळ
तळ्यातल पाणि
अंगाच घाम पुसू देत
आपलं बुवा अस आहे

सुंदर प्राणि
सुंदर आकाश
सुंदर निसर्ग
पोटाचि खळगी भरु देत
आपलं बुवा अस आहे

सुर्य माथ्यावर
हातात पिशवी
प्रत्येक रांग
पुढचा मेला मरू देत
आपलं बुवा अस आहे





Champak
Thursday, December 15, 2005 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपलं बुवा अस आहे
सही रे!

ह्या च नावाची एक एकांकिका आहे! तिचे लेखक कोण?



Pama
Thursday, December 15, 2005 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त छानच, एकदम परफेक्ट पकडलस शब्दात.

Chinnu
Thursday, December 15, 2005 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त, पाडगावकरांचाच भास झाला मला. छान आहे कविता.

Pkarandikar50
Friday, December 16, 2005 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिमा
------

एक भावली,खुळावलेली
पाहे आरशात ताणताणूनी

तशी मिचकावली तीचीच सावली
आतल्या आरशाला लवन्डलेली

शोध ग बये, उचक उचक
तिथेच तर तसबीर छान टान्गलेली

अन्तर्‍गोल, बहिर्‍वक्र, अष्टावर्‍क भुयार
चाचपड की त्या अन्धार्‍या भिन्तीला

भिन्ग तीच्या कपाळीचे फुटके
सावलीचे अधान्तरीच हेलकावे

सान्गीतले होते कुणी तुला
त्या लबाड आरशात डोकवायला?

बापू


Vaibhav_joshi
Friday, December 16, 2005 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्मनुष्य ...

जनावरे थांबलेली माणसांच्या आडोश्याला
माणसांच्या देशी धास्ती माणसाची माणसाला

चालताना पहायचे मागेपुढे आजूबाजू
कोण जाणे कपड्याआड दडलासे कुणी डाकू
चौकामध्ये कुणाचे हे नवे बेवारशी प्रेत
त्याच्या जागी दिसू लागे देह आपलाच थेट
रस्त्यावर खोळंबता भिती वाटे सावलीला
सरावेना मन कसे स्फ़ोटकांच्या चाहूलीला

अजूनही मामाच्याच गावी जाते आगगाडी
अनोळखी मामा गाडीत सहजच ओळख काढी
छोट्या छोट्या खेळण्यांनी तान्हुल्याला खेळवितो
खरी बंदूक काढुनिया आईबापा लोळवितो
कश्यासाठी काय चाले कळेना त्या तान्हुल्याला
दूध मागे पुन्हा पुन्हा हलवूनी माऊलीला

आपुल्याच घरामध्ये वावरण्याची झाली खोटी
नराधम पाहती ना लहान असो किंवा मोठी
अचानक पडतसे तिच्या अब्रूवर घाला
आपुलाच कुणी कसा असा अमानुष झाला
पावित्र्याचा धागा दोन क्षणांमध्ये तुटलेला
मानलेला बंधू तिने मागच्या पौर्णिमेला त्याला

षंढागत बसायचे ! करायचे नाही काही
आपुल्याला सर्वाशी ह्या देणेघेणे नसे काही
एकदेखील माणूस नाही माणसांच्या जत्रेमध्ये
निर्मनुष्य आहे देश जरी लोकसंख्या वाढे

वैभव!!!


Mmkarpe
Friday, December 16, 2005 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद.... मित्रांनो
देवदत्त, बापु एकदम मस्त! चालु द्या.


Champak
Friday, December 16, 2005 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव..... एकदम खास. Touching!

Pkarandikar50
Friday, December 16, 2005 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,
फारच छान. अतिशय आवडली.
बापू

Devdattag
Friday, December 16, 2005 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्र हो..
बापू, आवडली प्रतिमा..
वैभव, दर्द हैं..






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators