काही काही आठवणी अश्या उमटलेल्या मनावर जणू पुस्तकातील खुणा आवडत्या पानावर... वैभव
|
आजकालचं पाया पडणं ही पद्धत म्हणावी घरंदाज की नंतर ओढण्यासाठी आधी घेतलेला अंदाज? वैभव...
|
ही रोज ठळक लाल शून्याने दिवसाची सुरुवात कश्यासाठी कालच्या परिक्शेत नापास हे आम्हाला सान्गण्यासाठी? वैभव...
|
कधीतरी आवाज देशीलच मी येतो की नाही बघायला तेवढं एक कारण पुरे आहे मला तोपर्यंत जगायला वैभव...
|
सखे अश्याने हे अंतर मिटणं अशक्य 'हो' म्हणतानाही ईश्श्य' अन नाही'म्हणतानाही ईश्श्य'? वैभव...
|
आता आपल्या मीलनाचं स्वप्न मोडणार नाही एकदाच स्वप्नात ये पुन्हा.. डोळे उघडणार नाही वैभव...
|
प्रेम होतं जिव्हाळा होता वाटलं सगळं लाभलं पण शेवटी तुझ्या नावासमोर नाव वेगळं लागलं वैभव...
|
तुला नसेल म्हणायचं तर हो' म्हणू नकोस पण न बोलता निघून जा निदान नाही' म्हणू नकोस वैभव..
|
त्या दिवशी पत्ते खेळताना तू एक पान चुम्बिलेलं अन डाव मोडतोय की जमतोय म्हणून माझं हृदय थाम्बलेलं वैभव...
|
आयुष्याची दोरी म्हणजे गळफ़ासंच खरंतर एकीकडे जीवन एकीकडे मृत्यु ओढत असतात निरंतर वैभव...
|
तुझ्या माझ्या प्रेमाचाही अजब प्रकार आहे एकमेकाना गृहित न धरताही पूर्ण अधिकार आहे.. वैभव...
|
असं बिलकूल नाहिये की माझं तुझ्यावर प्रेम नाहिये पण बोलुन दाखवावं कसं तुझ्या होकाराचा नेम नाहिये वैभव...
|
डोळ्यान्ची भाषा इतकी जागली प्रेमाला नजर भिडता भिडताच नजर लागली प्रेमाला... वैभव...
|
सागरकिनारी मी अन निसटत्या रेतीचा सागर आत बाहेर सर्वत्र उधाणत्या लाटान्चा जागर वैभव...
|
कधीकाळी जुळली होती तुझी माझी प्राक्तने आता रेषा साखळदंड अन जीवघेणी बंधने.. वैभव...
|
होती काही स्वप्ने होता भावनान्चा खेळ वेड्या नि शहाण्या मनाचा जमला नाही मेळ.. वैभव...
|
इथे करायचे इथेच फ़ेडायचे साधा सोप्पा व्यवहार आहे उधार काहीच नाही इथे सगळा रोखीचा कारभार आहे वैभव...
|
तुझी निघण्याची वेळ झालेली सान्गण्याआधी जाणवते खोटं खोटं हसताना जेव्हा नजर खरंच पाणावते... वैभव...
|
हे केवळ माझ्या मनाचं तुझ्या मनात चाललेलं स्पंदन की दोन जीवानी एकमेकाना कायमचं घातलेलं बंधन? वैभव...
|
थोडंथोडकं नाही अवघं आयुष्य वेचलंय तुझ्या'साठी' हे असंच हरलेल्या खान्द्यावर आयुष्य खेचलंय तुझ्या'पाठी' वैभव...
|
Nalini
| |
| Monday, November 28, 2005 - 8:16 am: |
| 
|
वैभव, सही!!! कुठे गायबला होतास? आणि हो जरा दमान नाहितर वरती लाल रंगाची पाटी लागेल " पाच मिनिटांच्या ब्रेकनंतर "
|
Ninavi
| |
| Monday, November 28, 2005 - 9:32 am: |
| 
|
वैभव, किती दिवसांनी आणि काय रे हा झपाटा सगळा बॅकलॉग भरून झालेला दिसतोय आता आम्ही कस लिहायच पुढे (अरे, ही विरामचिन्ह का उमटत नाहियेत
|
Nalini
| |
| Monday, November 28, 2005 - 9:52 am: |
| 
|
निनावि, विरामचिन्ह हे शेवटच्या शब्दाला लागुन लगेच लिहावे लागते, मग उमटेल बघ.
|
Ninavi
| |
| Monday, November 28, 2005 - 10:02 am: |
| 
|
धन्यवाद, नलिनी!! ... ... 
|
Pama
| |
| Monday, November 28, 2005 - 10:44 am: |
| 
|
काय रे वैभव, इतक्या दिवसानी आणि नुसता ओतओतस चारोळ्या. सगळ्याच छान आहेत, पण जरा दमानी. आम्हाला दम लागेल ना वाचून!! मॉड, आज परत सगळे चौकोन का दिसतायत?
|
vaOBavaÊ sava- caarÜL\yaa AavaDlyaa.
|
वैभव...कुठे गायब झाला होतास ... आणि हे काय .... एवढे सर्व ...एकदम.....सहीच.... वाचायला अन साठवायला ही वेळ दे थोडासा......
|
धन्यवाद दोस्त्स... लिहू या ना सगळे मिळून.. मागच्या महिन्याच्या पोस्ट्स बघा किती आहेत, त्याच्यापुढे जायचं नाही का?
|
Pama
| |
| Monday, November 28, 2005 - 1:41 pm: |
| 
|
आयुष्याच सचित साठवलय तुझ्यासाठी प्रेमाचे क्षण काही उरलेत माझ्या गाठी अनुस्वार का दिसत नाही??
|
किती दिवस असे अश्रु गाळनार आत थोड सावरायला हवं ..... जे देणार आहेत साथ त्यांच्यासाठी आता थोडं जगायला हवं .......
|
का खरेच मी तुझ्या विश्वात समाविष्ट नाही? वारादेखील आजकाल तुझा संदेश देत नाही वैभव...
|
Ninavi
| |
| Monday, November 28, 2005 - 3:37 pm: |
| 
|
हाय पमा, निल्य, वैभव नको ठेवू दूर प्याला थोड चांदण आहे त्यात नको बदलू कूस, ती बघ अजून आर्जव करत्ये रात
|
कसा अचानक निखळला दुवा तुझ्या माझ्यातला एक क्षण हरवुनी गेला अवचित गवसल्या भाग्यातला वैभव...
|
धुन्द मदहोश रात चान्दणेही भारणारे आम्ही मुळी ना करंटे ह्या प्याल्यास दूर सारणारे वैभव!!!
|
डोळ्यात अपार लज्जा ओठ रक्तिम रंगलेले साकीला पाहण्यानेच मन वेडे झिन्गलेले वैभव!!!
|