|
अगं पूनम.. मस्त चालू आहे... जरा पटापटा येऊ द्या...
|
Princess
| |
| Wednesday, March 07, 2007 - 11:20 am: |
| 
|
खरेतर दिल्ली आणि नैनीतालचे काम ४ दिवसात होइल हे राघवला आणि मंदारला माहिती होते. राघवने दहा दिवस मंदारला पुन्हा जगणे शिकण्यसाठी दिले होते. या दहा दिवसात मंदारने पहिल्यांदा मितालीच्या सोडुन जाण्याकडे त्रयस्थ पणे पाहिले. स्वत:च्या सुखादु:खाचा विचार केला. पुन्हा एकदा संसार मांडायचा की नाही हे अजुनही अनिश्चित होते. पण आनंदाने जगायचे हे ठरवुन मंदार परत आला. दोन यशस्वी डील्स आणि हसतमुखाने परतलेला मंदार पाहुन राघवलाही बरे वाटले. मंदारने ऑफिसच्या कामात स्वत:ला अगदी झोकुन दिले होते. आता घरी जाण्याची घाई नसायची आणि राघवशी आता त्याचे बरेच घनिष्ट संबंध झाले होते. राघवही निश्चिंतपणे मंदारवर बर्याच मोठ्या जबाबदार्या देत असे. आयुष्याला वैतागलेला मंदार आता मात्र एकदम खुष असायचा. काहीही विचार करायला वेळच कुठे होता त्याच्याकडे? एकदा असेच गप्पा करत असताना राघवने त्याच्या पुनर्विवाहाबदाल सुचवले. पण मंदारने त्याला स्पष्टच सांगितले "राघव, एकदा चुक झाली आता मला पुन्हा विषाची परिक्षा घ्यायची नाहीये. सध्या मी जे आयुष्य जगतोय त्यात मी खुप खुष आहे. and I must thank you for that. पण पुन्हा लग्न... नाही शक्य." राघवनेही मग तो विषय तिथेच थांबवला.
|
Princess
| |
| Wednesday, March 07, 2007 - 11:39 am: |
| 
|
"मंदार, माझ्या एका मित्राची मुलगी उद्यापासुन आपल्या ऑफिसमध्ये join होणार आहे. काही दिवस तू तिला training दे मग मी तिला independent assignments द्यायला सुरुवात करेन. but keep in mind - this is her first job त्यामुळे कामातले तिचे यश तुझ्या training वर अवलंबुन असेल. ok? मंदारने मान हलवुन होकार दिला खरा पण मनातुन त्याला राघवचा रागच आला. "एका फ्रेशरला काम शिकवायचे... झालेच म्हणजे माझ्या कामाची वाट लागणार उद्यापासुन." मंदार मनातल्या मनात बोलला. दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये येतानाच रिसेप्शनिस्टने त्याला संगितले ." excuse me Mr. Mandaar, someone is waiting for you there. " शांतपणे आपल्या जवळचे पुस्तक वाचत बसलेली एक तरुणी तिथे बसलेली होती. मंदार तिच्याजवळ येउन उभा राहताच तिने पुस्तक मिटले आणि उठुन उभे राहुन सांगितले " Sir, I am Minotee. राघवसरानी मला तुम्हाला भेटायला संगितले आहे. " मंदारने तिला त्याच्या मागे यायला सांगितले आणि तो केबिनकडे चालु लागला. "उफ्फ... how do I catch my beats " तो मनातल्या मनात पुटपुटला. त्याच्या मनात विचार आला...सगळ्या दु:खावर काळ हेच औषध असते. training सुरु झाले पण मिनोती कधी फार बोलत नसे. कामा व्यतिरिक्त इतर कशातही तिला interest नसायचा. काहीशी आत्ममग्न, विचारात हरवलेली मिनोती बघितली की त्याला वाटायचे काय तरी मुलगी आहे, आता कॉलेजमधुन बाहेर पडली असावी तरी कशाच्या विचारात हरवलेली असते कुणास ठाउक. अजुन दु:ख म्हनजे काय हे तरी कळते का हिला. आणि स्वताच्याच मनाशी हसत तो पुन्हा कामात हरवुन जायचा. "मंदार, training संपल्यावर मी मिनोतीला थोडे दिवस accounts section बघायला सांगनार आहे. तुझे काय मत आहे?" राघवने जेवताना मंदारला विचारले. "हं, राघव, मला वाटते ती माझ्याबरोबर मार्केटिंगचे काम चांगले शिकते आहे. तु तिला तिथेच ठेवले तर बरे." मंदारच्या या उत्तरावर राघव सुचक हसला आणि म्हणाला "फक्त हेच एक कारण आहे?" त्याच्या या प्र्श्नावर उत्तरादाखल मंदार फक्त हसला. पण त्यातुन जे उत्तर मिळायचे ते राघवला मिळाले. "तू म्हणत असशील तर मी बोलुन बघु का तिच्याशी?' राघवने आज मंदारला लग्नासाठी तयार करण्याचाअ चंगच बांधला होता. मंदार मात्र या अशा अनपेक्षित प्रश्नानी एकदम गोंधळुन गेला. "ठीक आहे पण मला विचार करायला थोडा वेळ दे. मग सांगतो" मंदार उत्तरला.
|
Princess
| |
| Wednesday, March 07, 2007 - 12:19 pm: |
| 
|
राघवने विचारण्या आधी सुद्धा मिनोती बद्दल त्याच्या मनात खुपदा विचार येत होता. खरे तर तिला पाहिल्या बरोबर त्याला तिच्या विषयी प्रेम वाटले होते. पण राहुन राहुन त्याच्या मनात एकच विचार यायचा. ती नुकतीच कॉलेजातुन बाहेर पडलेली मुलगी. आणि मी एक लग्न तुटलेला पुरुष... तिचा नकार जणु त्याने गृहीतच धरला होता. शेवटी पुन्हा एकदा त्या नकारावर शिक्का मोर्तब करुन तो झोपी गेला. दुसर्या दिवशी लंचला राघवने त्याला पुन्हा केबिनमध्ये बोलवले तेव्हा मिनोती साठी नकार द्यायचा असे ठरवुनच तो आत गेला. केबिनमध्ये राघव सोबत एक साधारण पन्नशीचे गृहस्थ बसलेले होते. मंदारला पाहुन राघवने त्याच्या नेहमीच्या खणखणीत आवाजात त्याला आत यायला सांगितले "ये मंदार ये. हे श्री रत्नपारखी. रत्नपारखी साहेब, हा मंदार. माझ्या लहान भावासारखा आहे." थोड्या बिजिनेसविषयी गप्पा झाल्यावर राघवनेच मंदारच्या लग्नाचा विषय काढला. "बघा रत्नपारखी साहेब, मंदार एक खुप चांगला मुलगा आहे. त्याची खात्री मी देतो. तुमची मुलगी मंदारला पसंत आहे. आता तुम्ही एकदा मिनोतीला विचारुन घ्या." मिनोतीचे नाव ऐकुन मंदार एकदम चकित झाला. राघवने हे प्रकरण एवढे seriously घेतले असेल असे वाटलेच नव्हते त्याला. "तुम्ही बोलत बसा." असे सांगुन राघव केबिनमधुन बाहेर पडला. "मंदार, राघवने तुला सांगितले नसेल पण माझी मुलगी मिनोती विधवा आहे. तिचा पहिला पति एका ऍक्सिडेंटमध्ये तिला सोडुन गेला. अजुन खुप काळ लोटला नाही त्याला जाउन. पण अवघी २४ वर्षांची विधवा मुलगी घरात बघुन माझा जीव तुटतो. तुम्हाला हे सांगणे माझे कर्तव्य आहे. तुम्ही विचार करा आणि मग होकार नकार कळवा. मिनोती विषयी तुम्हाला जाणुन घ्यायचे असेल तर तुम्ही तिच्याशी ऑफिसमध्ये किंवा बाहेर बोललात तरी माझी हरकत नाही. मंदारच्या पाठीवर हात थोपटुन ते जायला निघाले तेव्हा त्यांच्या पेक्षा अधिक ओझे मंदारच्या मनावर आले होते.
|
Princess
| |
| Wednesday, March 07, 2007 - 12:34 pm: |
| 
|
अभि गेल्या नंतर मिनोतीने बाहेरच्या जगाशी सगळा संपर्क तोडुन टाकला होता. जुने फोटो, अभिचे कपडे सगळे काही समोर घेउन कधी ढसाढसा रडायची तर कधी विचित्र भेसुर हसायची. संध्याकाळ झाली की खिडकीशी उभी राहुन "अजुन कसा नाही आला ?" असे काहीतरी पुटपुटत असे. आपल्या तरुण मुलीला कसे समजवावे हेच तिच्या बाबाना कळत नव्हते. एक दिवस मात्र कहरच झाला जेव्हा मिनु अभिला शोधायला रात्री २ वाजता घराबाहेर पडली. तिला कसेबसे समजावुन परत आणुन बाबानी झोपवले आणि रात्रभर तिच्या भविष्याचा विचार करत बसले. दुसर्या दिवशी मिनु उठली तेव्हा बाबानी तिला समजावले "बेटा, तुझी आइ गेल्यावर मी दुसरे लग्न केले नाही पण मी त्याचे समर्थन करणार नाही. आयुष्य एकट्याने जगणे खुप कठिण असते. माझ्या साठी तु होतीस पण तुझ्या हातात केवळ अभिच्या आठवणी आहेत." मिनोती नाराजी दर्शविण्यासाठी म्हणुन उठुन जाउ लागली तेव्हा बाबानी तिला थांबवले आणि सांगितले "ठिक आहे लग्न करु नकोस पण जगापासुन अशी तोडु नकोस स्वत:ला. मी आजच माझ्या एका मित्राशी बोलतो तुझ्या नौकरी बद्दल. तु काम सुरु कर, तुझे मन रमेल बेटा" मिनोतीने बाबांचे मन राखण्यासाठी नौकरीसाठी हो सांगितले आणि ती राघवच्या ऑफिसमध्ये दाखल झाली. नौकरी सुरु केल्यावर आयुष्यात एवढी स्थित्यंतरे येतील हे तिला स्वप्नातही खरे वाटले नसते. दोन दिवस विचार करुन मंदारने मिनोतीला होकार द्यायचे ठरवले. तत्पुर्वी मिनोतीची काय इच्छा आहे हे सुद्धा त्याला जाणुन घ्यायचे होते. ऑफिसला आल्यावर मंदारने मिनोतीला रिसेप्शन मध्येच गाठले आणि तिचे बाबा भेटुन गेल्याचे सांगितले. त्यांच्यात झालेले बोलणे सुद्धा सांगितले.ते ऐकुन मिनोती क्षणभरासाठी सुन्न झाली. पुढे कित्येक दिवस तिला आजुबाजुला काय होते आहे तेच कळत नव्हते. कधी राघव, कधी बाबा, कधी मंदार सगळेच तिला समजावत होते. मंदार तर तिला म्हणाला सुद्धा होता "माझ्याशी लग्न केले नाहीस तरी हरकत नाही पण कोणाशी तरी कर. स्वानुभवावरुन सांगतोय सुख दु:ख वाटुन घेण्यासाठी कोणीतरी जवळ असावे असे सगळ्यानाच कधी ना कधी वाटते. तुझ्या बाबाना तुला दु:खी बघुन किती यातना होत असतील त्याचाही विचार कर." मंदारच्या या बोलण्याचा खुप परिणाम झाला आणि दुसर्याच दिवशी मिनोतीने मंदारला होकार दिला.
|
Runi
| |
| Wednesday, March 07, 2007 - 3:58 pm: |
| 
|
चांगली चाललीये कथा प्रिन्सेस. आणि पटपट येताहेत भाग त्यामुळे सलग वाचायला पण मजा येतेय. रुनि
|
Psg
| |
| Thursday, March 08, 2007 - 12:53 am: |
| 
|
छान लिहित आहेस प्रिन्सेस.. भराभर सरकतीये कथा.. येऊदे पुढचे भाग..
|
Princess
| |
| Thursday, March 08, 2007 - 3:24 am: |
| 
|
"मिनोती तुझे डोळे अगदी पारदर्शक आहेत. सगळे काही वाचता येते त्यात. खरे सांगयचे तर या प्रामाणिक डोळ्यानीच मला भुरळ घातली होती." मंदारच्या अशा बोलण्यावर काय react करावे तेच तिला कळायचे नाही. अशा बोलण्याची नवी नवलाई केव्हाच हरवली होती. मिनोती आल्यापासुन मंदार तर त्याचा भूतकाळ विसरूनच गेला होता. म्हणजे वरुन तरी तसेच वाटायचे. तो पुन्हा खळखळुन हसायला लागला होता. घरी फोन करणे पुन्हा सुरु झाले होते. पण आपण भुतकाळाला सोडले तरी भुतकाळ इतक्या सहजी सोडत नसतो आपल्याला. मिनोती समोर आली की का कुणास ठाउक मितालीने त्याच्याशी केलेला धोका त्याला आठवायचा. सुडाची भावना जागृत व्हायची आणि त्या भरात कधीतरी तो मिनोतीशी अगदी वाईट वागायचा. लग्नातले प्रत्येक सुख तो हिसकावुन ओरबाडुन घ्यायचा. नंतर आपल्याच वागण्याची त्याला प्रचंड चीड यायची. मनात अपराधीपणाची भावना यायची. मंदारच्या मनात मितालीच्या कडु आठवणींनी ठाण मांडले होते. तिचा सुड तो आता मिनोतीवर उगवत होता. मिनोतीचा भूतकाळही सतत तिच्या सोबत होता. फरक एकच होता. मंदारच्या आधीच्या नात्याच्या कडु तर मिनोतीच्या गोड आठवणी. मिताली मनात नसली की मंदार अगदी छान वागायचा मिनोतीशी. मिनोती पण मंदारला आपले मानण्यासाठी खुप प्रयत्न करत होती. पण का कुणास ठाऊक, दोघेही जुन्या नात्याना या नवीन नात्याचा अडसर बनवत होते. "मंदार, अरे तू मिनोतीला घेउन कुठे फिरायला गेला नाहीस अजुन" राघवने विचारले." नाही रे. मला तर हे लग्न ही फार दिवस टिकेल असे वाटत नाही." त्याच्या या अनपेक्षित उत्तराने राघव उडालाच." whatttt? काय बोललास? का काही problem आहे का?" मंदारने आतापर्यंत घडलेले सगळे सांगितले. तो स्वत: कसे चुकीचे वागतोय हे पण त्याने राघवपासुन लपवले नाही. राघवला मंदारबद्दल कणव दाटुन आली. "काय बिचार्याचे नशीब" त्याच्या मनात आले. पण आता यावर काहीतरी उपाय त्यालाच शोधावा लागणार होता. त्याने जमवलेले लग्न होते ना...
|
Princess
| |
| Thursday, March 08, 2007 - 4:09 am: |
| 
|
मंदारशी झालेल्या रोजच्या बोलण्यातुन राघवला जाणवले की मंदार मिनोतीला मितालीच्या वागण्याची शिक्षा देतोय. राघवने त्याला समजावुन सांगितल्यावर मंदारनेही "यापुढे काळजी घेइन" असे आश्वासन त्याला दिले. मंदारच्या कंपनीने एक नवीन ऑफिस दिल्लीला सुरु करण्याचे ठरवले तेव्हा राघवने नवीन ऑफिस सेट करण्याची सर्व जबाबदारी मंदारवर सोपवली. जाण्याच्या दिवशी मंदारला त्याने बोलवुन घेतले "मंदार, हे ऑफिस अगदी योग्य वेळेवर सुरु होतय असेच वाटतय मला. तुम्ही दोघेही या शहरापासुन दुर जाल तर एकमेकाना अधिक चांगले समजु शकाल असे वाटते मला. गेलेला दिवस विसरुन जा बेटा. सुर्य चंद्राला सुद्धा ग्रहण लागते म्हणुन काही ते उगवणे सोडुन देत नाहीत. आपण तर क्षुल्लक मानव. जे हातात आहे ते क्षण वाया घालवु नकोस. जा यशस्वी हो." राघवला आपल्याबद्दल वाटणारी काळजी बघुन मंदारला वाटले "खरच मनाचे नाते जुळायला समोरच्यावर निस्पृह प्रेम असणे खुप आवश्यक आहे. कोण लागतो मी याचा पण त्याचे प्रेम कुठल्याही प्रसंगात कमी झाले नाही. मी मात्र मिनोतीला, माझ्या पत्नीला, असे निस्पृह प्रेम देण्यात कमी पडतोय." त्या क्षणीच त्याने मिनुला खुप प्रेम देण्याचा, तिला भुतकाळातुन बाहेर काढण्याचा निर्धार केला. दिल्लीला पोहचुन आता दोन दिवस झाले होते. मंदार मिनुला सांगत होता, "हे एक बरय ना, आपण फर्निश्ड फ्लट घेतलाय ते. घर लावण्याची कटकट नाही." "हो ना, खरच हे बरे केलेस तू, घर लावण्यात कितीतरी दिवस गेले असते नाहीतर."मिनोतीचे उत्तर ऐकुन त्याला बरे वाटले. पहिल्यांदा मिनोतीने त्याच्या बोलण्याला असे मनापासुन उत्तर दिले होते. रात्री जेवताना मंदार म्हणाला"मी काय म्हणतोय मिनु, सध्या ऑफिसचे काम जोरात सुरु झाले नाहीये. आपण आताच कुठेतरी फिरुन येउया का? कारण नंतर मला असा निवांत वेळ मिळणे खुप कठिण आहे." मिनोतीचे उत्तर तसे त्याला माहितीच होते पण ती काही बोलण्याच्या आत त्याने बोलणे सुरुच ठेवले "आपण आता जाउन आलोत तर तुलाही change होइल आणि दिल्लीला किती दिवस राहायचे आहे ते अजुन काही नक्की नाही. नंतर मग पुन्हा north india फक्त फिरण्यासाठी येता येईल की नाही कुणास ठाउक..." मिनोती काहीच बोलली नाही, कदाचित ती विचारात पडली होती. "प्लीज नाही म्हणु नकोस मिनु, आपल्या दोघाना एकमेकांना समजुन घेण्यासाठी पुन्हा असा वेळ मिळेल की नाही माहित नाही. let's make this relationship successful
|
Princess
| |
| Thursday, March 08, 2007 - 4:59 am: |
| 
|
मनालीच्या त्या हवेत जणु जादुच होती. देवाने भरभरुन सौंदर्याची पखरण केली होती तिथे. सुरुवातीला थोडीशी आलिप्त असणारी मिनु तिथल्या निसर्ग सौंदर्याने विरघळुन गेली. मंदारचे वागणेही किती हळुवार झाले होते आता. तो मिनुला खुप जपत होता. अभिच्या आठवणीने कधी मिनु बेचैन झाली तर तिची समजुत घालणे, तिचे मन रमवण्यासाठी प्रयत्न करणे हे तो अगदी मनापासुन करत होता. आता मिनुही त्याच्या बोलण्यात रस घेउ लागली होती. त्याची संसाराची स्वप्ने, भविष्याचे plans ऐकलेत की तिला पण ते स्वप्ने आपलेच आहेत असे वाटायचे. त्याच्या यशाचे किस्से ऐकुन तिला मनात अभिमान वाटायचा. मितालीने एवढा चांगला जोडीदार गमावल्यामुळे तिला मितालीची कीव यायची. हळुहळु मिनुच्या मनावरची अभिची छबी पुसट झाली. आता तिथे मंदारचे साम्राज्य तयार झाले होते. मंदारच्या प्रेमाची जीत झाली होती. पुन्हा एकदा मिनुच्या ओठावर शब्द होते "देवा खुप वर्षानी सुख पायाने चालुन आलय माझाकडे त्याला नजर नको लागु देउ." समाप्त.
|
काय हे? मला वाटलं आता कुठे गोष्ट सुरू होईल तेवढ्यात समाप्त... यार अजून थोडे पाणी घालायल हवे होते.
|
Princess
| |
| Thursday, March 08, 2007 - 5:18 am: |
| 
|
नंदिनी, खरय, मला पण तसे वाटले होते पण मग खुप लांबली असती गोष्ट.
|
R_joshi
| |
| Thursday, March 08, 2007 - 5:57 am: |
| 
|
पुनम आटोपशीर कथा असल्याने खरच आवडली.
|
Jhuluuk
| |
| Thursday, March 08, 2007 - 6:23 am: |
| 
|
पुनम, शेवटचा भाग एक्-दोन प्रसंगाने लांबवायचा होता... पण सुखान्त आवडला..
|
Princess , छान आहे गोष्ट... आवडली... ! नंदिनी, पाणी घालून वाढवायला ती काय तुझी गोष्ट आहे?? ;)
|
माझ्या गोष्टीत मसाला पण तितकाच असतो.. आणि कादंबरी आणि कथा यत फ़रक हा असणारच ना?
|
Disha013
| |
| Thursday, March 08, 2007 - 11:46 am: |
| 
|
अरे,एकदम सरळसोट कथा होती की! छान होती पण.
|
PSg , खुप आवड्लि कथा. विषेशत्: मिनोति च पात्र खुपच छान रंगवलय. पण शेवट जर घाइत झाला अस वाटल. त्याॅह एक्मेकांच्या जवळ येण थोड अजुन gradually झाल असत तर वाचायला आवडल असत. हि टिका नाहिये, मी गुंतले होते या गोष्टित म्हणुन सांगावस वाटल. hope, I am not taking too much liberty .
|
Srk
| |
| Thursday, March 08, 2007 - 11:58 am: |
| 
|
पूनम छानच कथा आहे. मंदारला नि:स्पृह प्रेमाची जाणीव होते तो प्रसंग जरा डीटेल असता तर आणखी मजा आली असती. असो. ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं. माझी मेल मिळाली का?
|
Megha16
| |
| Thursday, March 08, 2007 - 12:09 pm: |
| 
|
पुनम, खुप छान कथा होती. पण शेवट फार लवकर केलास तु...
|
|
|