|
Princess
| |
| Thursday, March 01, 2007 - 5:32 am: |
| 
|
सकाळपासुन तिसर्यांदा मिनोती धडपडली, धडपडली कसली चक्क रस्त्यावर लोटांगण घातले तिने... आता मात्र मंदारला हसु आवरेना. "अग चाललय काय तुझे सकाळपासुन? सकाळी चहा सांडलास, नंतर कपाटावर कपाळमोक्ष होता होता वाचला आणि आता हे काय केलेस? रस्त्यात कशाला मला नमस्कार करतेय?" मंदारच्या हसण्याने तिला अजुनच लाज वाटली. रस्त्यावरचे सगळे लोक बघत होतेच तिच्याकडे आणि मंदारच्या गडगडाटी हसण्यामुळे तर सगळेच जाणारे येणारे बघु लागले. मिनोती मात्र गोरी मोरी झाली होती. "उठा आता आणि चला" इति मंदार. पुर्ण रस्त्यात मिनोती एक शब्दही बोलली नाही त्याच्याशी. घरी पोहचल्यानंतर मिनोती पटकन किचनमध्ये आणि मंदार स्टडी मध्ये वळला. जेवणाची पाने लावुन मिनोतीने मंदारला आवाज दिला. आणि पाने वाढुन ती पण जेवायला बसणार एवढ्यात फोनची बेल वाजली म्हणुन ती झटकन वळली तर तिचा धक्का लागुन वाढलेले ताट जमिनीवर पडले. ते पाहुन ती रडायलाच लागली. मंदार मात्र काय करावे हे न समजल्याने तसाच उभा राहिला. दोन क्षणानंतर त्याने मिनोतीला हात धरुन खुर्चीवर बसवले. कितीतरी वेळ ते तसेच बसुन होते. "काय झालय मिनु... सांगशील का मला?" पण मिनोती तशीच मख्ख चेहर्याने बसुन राहिली. जणु तिला काहीच ऐकु येत नव्हते... कुठेतरी हरवल्यासारखी. मंदारने पुन्हा एकदा मिनोती ला हलवले"काय झालय?" "आज तारीख काय आहे?" मिनु पुटपुटली. क्रमश:
|
Maku
| |
| Thursday, March 01, 2007 - 6:44 am: |
| 
|
Princess लग्नाचा वाढदिवस नाहीतर तिचा वाढदिवस ??? काय असेल बरे ?
|
Princess
| |
| Thursday, March 01, 2007 - 1:00 pm: |
| 
|
उणापुरा चौदा महिन्यांचा संसार होता तिचा आणि अभिजीतचा. अजुन नात्यातला गुलाबी रंगही ओसरला नव्हता अन अचानक एक दिवस अभिचा अऽॅक्सिडेंट मध्ये मृत्यु झाला. त्या धक्क्याने मिनोती पार कोसळुन गेली. आयुष्याचा सारीपाट मोठ्या उमेदीने मांडावा अन दैवाने तो चौखुर उधळुन द्यावा असेच काहीसे झाले होते. अभी आणि ती एकमेकाचे जणु जन्मो जन्मीचे साथीदार होते. त्याच्या सहवासात दिवस कसे भुर्रकन उडुन गेले ते मिनोतीला कळले सुद्धा नाही. मिनोतीने M.Sc केले होते पण तिला नौकरी करणे कधी भावलेच नाही. तशा लग्ना आधी एक दोन नौकर्या केल्या होत्या तिने पण मनापासुन तिला कधी ऑफिसला जाणे आवडलेच नाही. त्यामुळे अभिजीतशी लग्न करताना तिने त्याला सांगितले होते "अभि, तु जे काही कमवुन आणशील त्यात मी सुखाने राहिन पण मला नौकरी करायची नाहीये, निदान पैशासाठी तरी नाही. मी घरात राहिन, छान पदार्थ बनवेन, तुझी खुप काळजी घेइन, आणि ... " "आणि काय सांग ना" खट्याळपणे अभिने विचारले होते. "आणि खुप मुलांची आई होइन. त्याना खुप प्रेम देइल..." असे बोलताना देवाघरी गेलेल्या आईच्या आठवणीने मिनोतीचे डोळे भरुन आले होते. अभि अशा हळव्या क्षणाना नेहमीच न्याय द्यायचा. तिला प्रेमाने जवळ घेउन त्याने तिच्या केसातुन हात फिरवला जणु त्या क्षणासाठी तो तिची आईच झाला होता. मिनुला किती बरे वाटले होते त्या स्पर्शाने. सुखदु:ख वाटुन घेणारा समजुतदार सोबती मिळाला होता तिला. लग्न होउन ती अभिजीतच्या घरात आली आणि दोघांचे आयुष्य आनंदाने भरुन गेले. अभि मुळातच हुषार होता. आणि लग्ना नंतर तर त्याचे नशीबच उजळले. मिनोती त्याच्या आयुष्यात येउन फ़क्त सहा महिनेच झाले होते आणि त्याची दुसर्यांदा क्लाएंटकडुन शिफारस झाली होती. मॅनेजर तर खुश होताच पण अभिला पण या नव्या यशाने अगदी सातवे आसमान पर पोहचवले होते."मिनु, मिनु तू आली आणि सगळे काही बदलले बघ. तु लक्ष्मी बनुन आलीये माझ्या जीवनात."त्याचे असे बोलणे ऐकले की मिनोतीला नवर्याचा अभिमान वाटायचा. त्याच्या यशाचे श्रेय तो आपल्याला देतोय ही जणीवच इतकी सुखद वाटायची तिला. "अभि, आपल्या प्रेमाला, तुझ्या या यशाला कोणाची नजर ना लागो, हेच मागते मी देवाकडे. खुप वर्षां नंतर सुख पायाने चालुन आलय माझ्याकडे, ते असेच राहु दे." अभि तिच्या भोळ्या चेहर्याकडे बघुन हसला आणि म्हणाला"मग राणी साहेब आज आम्हाला काय बक्षिस देणार तुम्ही?" आणि लाजुन मिनुने चेहरा झाकुन घेतला. फोनच्या बेलने मिनोती भानावर आली. मंदार फोन घ्यायला उठला. मिनोती पुन्हा विचारात हरवुन गेली... अभिच्या आणि माझ्या लग्नाला आज दोन वर्षेच झालीत आणि मी नवा डाव मांडला. मला माफ कर अभि, करशील ना? आणि या विचाराने तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रुधारा वाहु लागल्यात. क्रमश:
|
Jhuluuk
| |
| Friday, March 02, 2007 - 4:54 am: |
| 
|
गुड गोईंग प्रिन्सेस, पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहोत
|
Manogat
| |
| Friday, March 02, 2007 - 5:04 am: |
| 
|
सहि, भवनांना ओघवणारी कथा आहे, मस्त वाटल वाचुन, पुढचा भाग लवकर पोस्ट कर
|
Princess
| |
| Friday, March 02, 2007 - 6:50 am: |
| 
|
मकु झुळुक आणि मनोगत धन्यवाद. करते पुढचा भाग पोस्ट लवकरच.
|
Good going Princess....waiting for the next part
|
ही एक विंनती समजावी, जमले तर गोष्ट पुर्ण आधीच लिहुन काढावी comp वर जसा जसा personal वेळ मिळेल तसा नी मगच शेवटी इथे post or publish करावी. तसे केले तर बरे वाटते वाचताना ओघ रहातो नाहीतर कंटाळवाणी वाटुन वाचावीशी वाटत नाही पुढे. बहुतेकश्या अर्धवट कथा वाचुन वाचुन मी सोडुन दिल्या आता follow up करायला. जर लिहिण्याची एवढी मेहनत घेता तर वाचक पण पाहीजे ना..... it will be nice if you start caring for readers too as a good author. if for author its a 'boost' to see readers pushing or demanding for next part then we can understand राग नसावा हे माझे मत आहे.
|
Princess
| |
| Friday, March 02, 2007 - 11:07 pm: |
| 
|
मनु, राग मुळीच आला नाही. माझेही हेच मत आहे, गोष्ट लवकर पुर्ण केली तरच वाचकांचा interest टिकुन राहतो. माझी या आधीची गोष्टही मी लवकरच पुर्ण केली होती आणि इथेही खंड पडु देणार नाही. in fact मी सध्या माझ्या मशिनवर पुढचे भाग लिहुन ठेवते आहे. so that i can post them one each day
|
Princess
| |
| Saturday, March 03, 2007 - 3:59 am: |
| 
|
फोनवरचे बोलणे संपवुन मंदार मिनोती जवळ आला. "मिनु,तुझे दु:ख मी समजु शकतो. पण बघ आपल्या दोघानाही एक भुतकाळ आहे. आपल्याला एकत्र राहायचे असेल आणि पति पत्नीच्या नात्याला न्याय द्यायचा असेल तर भुतकाळाला विसरण्याशिवाय पर्याय नाही. तुझा past आठवुन तु मला दु:खी करतेस आणी माझा past तर आहेच वेदनानी भरलेला. ultimately i m sufferring, do you understand this? मंदारच्या आवाजातल्या धारेने मिनोती चमकलीच. मंदारच्या डोळ्यात तिला राग, वेदना, करुणा सगळ्याच भावना दिसल्या. तिने पटकन डोळे पुसलेत आणि उठुन उभी राहिली. "चल मंदार आपण जेवुन घेउया. सकाळी उशीर होइल नाहीतर तुला ऑफिसला." तिचे हे असे क्षणार्धात बदललेले रुप बघुन मंदार गडबडलाच. जणु काही झालेच नव्हते अशा आविर्भावात मिनु जेवायला बसली. हसत खेळत जेवण करुन मिनु किचन मधले आवरायला गेली आणि तिने पुन्हा एकदा अश्रुना वाट करुन दिली. मनात नकळत मंदार आणि अभिजीतची तुलना सुरु झाली. मी अशी हळवी झाली असताना अभि कधीच इतक्या रुक्षपणे वागला नसता. मंदार किती रुक्ष आहे सगळ्याच बाबतीत... कुठे म्हणुन हळुवारपणा नाहीच. रुक्ष नाहीतर हिंस्त्र...शी... विचारानी सुद्धा तिच्या अंगावर काटा आला. कितीतरी वेळ मिनोती बेडवर तशीच तळमळत पडुन होती. सतत काहीतरी विचार डोक्यात. एका क्षणी तिला वाटले, हे डोके फुटुन शकले होउन जातील. कधी अभि, कधी मंदार, कधी आइचा पुसटसा चेहरा... भुतकाळ तिच्या डोक्यात फेर धरुन नाचत होता. "मिनु, उठ. मी निघालो ऑफिसला. दुध गरम करुन ठेवलय मी. चल मी निघतो. दरवाजा बंद करुन घे आणि पुन्हा झोप हवे तर." अंगावरचे पांघरुण फेकुन मिनोती घाईने उठली " अरे हे काय, कित्ती उशीर झालाय. तू मला उठवले का नाहीस? आता डबा पण नाही नेता येणार तुला." "असु दे ग. तु नेहमीच लवकर उठतेस म्हटले आज झोपलीय तर झोपु देउया. बरे बाय." असे बोलुन मंदार घराबाहेर पडला. मिनु खिडकीतुन हात हलवत त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत राहिली.
|
Shyamli
| |
| Sunday, March 04, 2007 - 2:54 am: |
| 
|
अरे वा पुनम मस्त लिहितीयेस ग 
|
Princess
| |
| Sunday, March 04, 2007 - 12:49 pm: |
| 
|
सकाळच्या दोन विजिट्स झाल्यात की आज पुर्ण दिवस मंदार मोकळाच राहणार होता. काम नसले की त्याला प्रचंड अस्वस्थता यायची. नको ते लोक, नको त्या आठवणी मनात गर्दी करायच्यात. म्हणुन विजिट्स आटोपुन तो पुन्हा ऑफिस मध्ये येउन बसला. पण सगळ्या फाइल्स उकरुनही त्याला आज काहीच काम मिळाले नव्हते. damn it, i hate this free time, i hete leisure तो स्वत:शीच बडबडला. रिकामे बसुन राहण्यापेक्षा छान एक कॉफी घ्यावी म्हणजे मग जरा तरतरी येइल या विचाराने तो कॉफी मशिनकडे निघाला. इथेच उभे राहुन मी मितालीला होकार दिला होता, कॉफी पिता पिता मंदारच्या मनात विचार आला. मिताली...माझे पहिले प्रेम, पण ती हरामखोर. आपल्याच विचारानी मंदार जोरात दचकला. वरुन सुसंस्कृत दिसणार्या मंदारच्या मनात असले काही विचार असतील हे कोणा दुसर्याला काय स्वत: मंदारला सुद्धा खरे वाटले नसते. मंदारचे मितालीशी लग्न होउन पाच वर्षे झाली असतील आणि लग्न तुटुनही तितकीच झालीत. लग्न होउन मिताली मंदारच्या घरात आली. मंदारसारखा लाजरा बुजरा मुलगा मितालीने कसा पसंत केला हेच एक कोडे होते. मंदारच्या आयुष्यातली मिताली पहिलीच मुलगी. कॉलेजमध्ये कुठल्याही मुलीशी मंदार कधीच स्वत:हुन बोलला नाही. ऑफिसमध्ये सुद्धा तसा तो मितभाषी म्हणुनच ओळखला जायचा. मितालीशी लग्न झाल्यावर मंदार आमुलाग्र बदलुन गेला. तिच्यावरचे त्याचे प्रेम त्याच्या प्रत्येक कृतीतुन दिसायचे. अगदी दर २ तासाने घरी फोन करणे, घरी जाताना मितालीसाठी रोज एक भेट घेउन जाणे. ऑफिसमध्ये सुद्धा त्याच्या माघारी मंदारच्या बदललेल्या स्वभावाचीच चर्चा व्हायची. मितालीसारख्या सुंदर उच्चशिक्षित मुलीशी लग्न झाल्यामुळे मंदार अगदी खुष होता. पण मिताली...
|
Princess
| |
| Sunday, March 04, 2007 - 1:10 pm: |
| 
|
"बाबा, प्लीज ऐका ना माझे. मला हे लग्न करायचे नाहीये. मला मंदार मुळीच आवडला नाहीये." मितालीच्या डोळ्यात राग आणि गालावर अश्रु ओघळत होते."मिताली, तुझ्या नकाराचे कारण सांग मला. एक ठोस कारण देउ शकलीस तरी मी त्याना नकार कळवेन. पण त्यासाठी मला तु पटवुन द्यायला हवे." मितालीच्या बाबाना मंदार खुप आवडला होता. एवढ्या कमी वयात घर गाडी, चांगली नौकरी सगळे काही होते मंदारजवळ. "सांग मंदारच्या स्थळात काय कमी आहे?" मितालीच्या बाबानी पुन्हा एकदा तिला विचारले. मिताली काहीही न बोलता आत निघुन गेली. पडल्या पडल्या मितालीच्या मनात एकच विचार येत होता. मंदारला नकार कळवायचा कसा. परागवरचे आपले प्रेम बाबा कधीही मान्य करणार नाहीत हे तिला चांगलेच ठाउक होते. पण बाबा म्हणतात तसे एकही ठोस कारण मंदारविरुद्ध ती त्याना देउ शकत नव्हती. खुप वादविवाद होउन अखेरीस मितालीला बाबांचा निर्णय मान्य करावाच लागला. "चट मंगनी पट शादी" करुन ती मंदारच्या घरात आणि आयुष्यात आली खरी पण परागला हृदयात घेउनच. सुरुवातीला तिचे तुटक वागणे नव्या वातावरणाचा परिणाम असेल असे मंदारला वाटायचे. कदाचित एकुलती एक मुलगी असल्याने आइबाबांच्या वियोगाने असे वागत असेल असेही त्याला वाटले. कितीदा तो स्वत: तिला माहेरी सोडुन येत असे. पण मितालीवर मंदारच्या प्रेमाचा काही एक परिणाम झाला नाही. लग्नाच्या तीन चार महिन्यानंतर एके रात्री ती अचानक घरातुन नाहीशी झाली. मंदारसाठी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने परागवरचे प्रेम कबुल केले होते.
|
Princess
| |
| Sunday, March 04, 2007 - 1:18 pm: |
| 
|
श्यामली आपल्या अभिप्राया बद्दल धन्स
|
Sia
| |
| Monday, March 05, 2007 - 12:40 am: |
| 
|
Princess खुप छानच लिहीतीयेस, आजचा भाग वाचल्या वर confusion झाल मिताली अणी मिनोती नावन मधे. पूढच्या भागाची वाट पाहतीये.
|
Jhuluuk
| |
| Monday, March 05, 2007 - 1:59 am: |
| 
|
प्रिन्सेस, नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीची कथा वाटतेय, त्यामुळे वाचायला खरच मजा येतेय..
|
Princess
| |
| Monday, March 05, 2007 - 7:40 am: |
| 
|
मितालीचे असे सोडुन जाणे मंदारला खुप मोठा धक्का देउन गेले. खळखळुन हसायला लागलेला मंदार पुन्हा एकदा त्याच्या कोषात बंद झाला. ऑफिसमध्ये त्याने कोणाला स्वत:हुन सांगितले नसले तरी त्याचे बदललेले वागणे सगळ्याना कळुन येत होते. मंदारच्या डोळ्यातला आनंद हरवला होताच पण त्याच्या बोलक्या डोळ्यात आता कोणालाही वाचता येइल एवढी तिरस्काराची भावना होती. कामातले लक्ष उडुन गेले होते आणि कोणाशीही बोलताना तो आता नजर मिळवु शकत नव्हता. जणु बायकोने दुसर्याचा हात धरुन पळुन जाणे यात त्याचीच चुक होती. लोकांच्या नजरेत त्याच्यासाठीची कणव बघितली की त्याला खुप राग यायचा. त्याच्या निरागस प्रेमाला अव्हेरुन ती निघुन गेली होती कायमचीच. पण मंदारच्या मनावर एक काळा शिक्का सोडुन. प्रेमावरचा विश्वासच उडाला होता त्याचा. मितालीने त्याच्या प्रेमाला तर तुडवले होतेच पण त्याच्या पुरुषी सन्मानाला, इगोलाही चांगलाच मोठा धक्का दिला होता. त्याच्या कामात होणार्या चुका वाढायला लागल्यात तसे एक दिवस त्याला बॉस ने बोलवुन घेतले. "मंदार, तु एक जबाबदार आणि होतकरु मुलगा आहेस. तुझ्या कामाची पद्धत मला नेहमीच आवडते. पण सध्या काय झालय तुला? काही personal problems असतील तर मला सांग. मला तुझ्या मोठ्या भवाच्या जागेवर समज." राघवने अजुन बोलणे संपवले नव्हते आणि मंदारच्या नकळत तो घळा घळा रडायला लागला.इतक्या दिवसाचे साठलेले दु:ख बाहेर पडल्यावर मंदारला खुप हलके वाटले. राघवने त्याला दोन समजुतीचे शब्द सांगितले. पण उगीच दु:ख उगाळण्यापेक्षा त्याने मंदारला इतर बर्याच गोष्टीवर बोलते केले. दुसर्या दिवशीच मंदारला राघवने दिल्ली आणि नैनीतालच्या दोन डील्स साठी दहा दिवसाच्या टुरवर पाठवले. मंदारच्या खांद्यावर हात ठेऊन राघवने सांगितले "अजुन लहान आहेस तू. काही निर्णय चुकतात पण म्हणुन काही आपण जगणे सोडायचे नसते. दुसर्याच्या चुकांची शिक्षा स्वत:ला देउ नकोस." मनातल्या मनात भुतकाळ विसरायचे ठरवुन आणि राघवचे आभार मानुन मंदार ऑफिसमधुन बाहेर पडला... एका नव्या आयुष्याकडे, एका नव्या उमेदीने... क्रमश:
|
Disha013
| |
| Monday, March 05, 2007 - 2:05 pm: |
| 
|
interesting story! लवकर येवुद्यात.
|
Princess
| |
| Monday, March 05, 2007 - 2:13 pm: |
| 
|
धन्यवाद मराठी माणुस, सिया, झुळुक आणि दिशा.
|
Runi
| |
| Monday, March 05, 2007 - 7:39 pm: |
| 
|
छान लिहिताय तुम्ही प्रिन्सेस. येवुद्यात पुढचे भाग लवकर. रुनि
|
|
|