Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 28, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » झुळूक » Archive through February 28, 2007 « Previous Next »

Vasant_20
Monday, February 19, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामाच्या या देशाला
रावणाचाही इतिहास आहे,
प्रगतिच्या नावा खाली,
भ्रष्टाचाराचाच विकास आहे.

वसंत.


Krishnag
Monday, February 19, 2007 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बळी तो कान पिळी
तरी आमच्या बळीच्या फास गळी
रोज एक जातो बळी
परी आमची अळीमिळी गुपचिळी


Meghdhara
Thursday, February 22, 2007 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नभी दाटलेले मेघ
माझी ओंजळ उकली
पुन्हा यायचे आमिष
वारा दावितो वाकुली

नको तुझी ही मिजास
मीही दाखविला तोरा
भेट तुझी पत्थराशी
मला छेडतील धारा.

मेघा


R_joshi
Thursday, February 22, 2007 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसंत, क्रिश छानच:-)
मेघा अप्रतिम चारोळी:-)


R_joshi
Thursday, February 22, 2007 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वळणांच्या भेटिगाठी वळणांची
आठवण करुन देतात
माणसांना पारखायची
ते सवय घालुन देतात

प्रिति:-)


Suvikask
Thursday, February 22, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसाची पारख होते
त्याच्या वळणावरुन
आपलेही वळण आपण
तपासावे चार हातांवरुन

("वळण" हा शब्द "वागणूक" या अर्थी आहे)


Daad
Thursday, February 22, 2007 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वळलास तू शेवट असा
आताच त्या वळणावरी
पण मन तुझे वळले कधीचे
कोणत्या वळणावरी?
-- शलाका


Mankya
Thursday, February 22, 2007 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वळणारा प्रत्येक रस्ता
परीवर्तन का मागतो
अन वळणाला तुझाच
सहवास का लागतो !

माणिक !



Vaibhav_joshi
Friday, February 23, 2007 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो .. गज़लप्रेमी व गज़लेच तंत्र शिकण्यास उत्सुक कवी / कवयित्रींसाठी कार्यशाळा करण्याचा विचार आहे . अधिक माहितीसाठी मराठी गज़ल बीबी वाचावा

R_joshi
Friday, February 23, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वत:चे वळण तपासावे
तर पाऊलखुणा सापडणार
मी कोठे कोठे चुकले
हे तुला किती वेळा सांगणार

प्रिति:-)


Jo_s
Friday, February 23, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या सारख्या सामान्याना
कसला आलाय नेटका आकार
जिवनात आपल्या आहेत
वळणे थोडी वण वण फार


Princess
Friday, February 23, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jo_s , प्रिती, मस्त...

एक माझी पण

वणवण असली तरी,
जगणे चुकत नाही,
सरळ रस्त्यासारखे आयुष्य
सगळ्यानाच मिळत नाही


Mrunmayi
Friday, February 23, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वळलास तु मागे न बघण्या साठी,
त्याच वळणावर अजुनही मी थांबले आहे,
तुझ्या परतीची आशा अजुनही जागते आहे.

वळणाची वळणे, वळणाची वळणे,
आयुष्याच्या भ्रमंतीतली,
थांब्याची काही सुंदर ठिकाणे..

Jo_s सहीच,
हीच वण वण आयुष्याला आकार देते,
सामान्यांनाही कधी कधी असामान्य बनवून जाते

ही वण वण कधी संपूच नये,
आयुष्याला आकार कधी येऊच नये,
ज़गण्याचा अर्थ कधी उमजूच नये,
अन, तो शोधण्यची वण वण कधी थांबूच नये,
खरच आहे या अपुर्णतेतच पुर्णता,
पुर्णते नंतरची शांतता कधी येऊच नये



R_joshi
Friday, February 23, 2007 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो,प्रिन्सेस,मृन्मयी सुंदर कल्पना:-)

जीवन हे सुंदर आहे
वळणांनीच ते रेखाटले आहे
नविन वळण जणु
नविन आयुष्याची सुरवात आहे

प्रिति:-)


Jo_s
Friday, February 23, 2007 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Princess, Mrunmayi धन्यवाद

तुमच्याही छानच आहेत.


Mrunmayi
सामान्यांनाही कधी कधी असामान्य बनवून जाते
खासच

Manogat
Wednesday, February 28, 2007 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीवनाच्या प्रत्येक वळणावर,
खुप लोक भेटले,
पण नकळत माझ्या मनात,
तुझेच अस्तित्व मी रेखाटले.


Manogat
Wednesday, February 28, 2007 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वळणाच अयुष्याशि,
खुप गहर नात आहे,
कारण अयुष्याच जात,
त्यामुळेच तर फिरत आहे.


Suvikask
Wednesday, February 28, 2007 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वळणे सोडुन आता
शोधू सरळ वाट
नाहितर जन्माचे
थांबेल तेथेच रहाट


Bee
Wednesday, February 28, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालिंदीच्या चंद्रकोरी वळणावर
कदंबतरू अजून थांबलेला
गेली राधा; गेला श्रीकृष्ण
वृथा आशेवर जीव उरलेला..


Daad
Wednesday, February 28, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान छान वळण येऊन गेलीत झुळुकीवर किंवा वळणांवरून गेलीय झुळुक? मस्तच वाटल्या सगळ्याच चारोळ्या वाचायला

कुठे न गेली राधा
गेला कुठेच नाही कान्हा
तिथे काळ थांबला, नाचला
जेथे देवकीचा तान्हा
अजुन थबकते कालिन्दी त्या
चंद्रकोरी वळणावरी
अजुन वाजते टिपरीही
मग कदंबाच्या उरी
-- शलाका







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators