Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 18, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 18, 2007 « Previous Next »

Suvikask
Saturday, February 17, 2007 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार निलुताई,
आपले स्वागत.. इथे मी पण आहे!!! by the way तुम्ही लंडनच्या आजीबाईंची कथा वाचलीत का? पुस्तक आवडलेच असेल सरोजिनी मावशींपर्यत ही भावना पोहोचवा.. आणि यावरचा छान चित्रपट बनविण्याच मनावर घ्याच!!! आणि आजीबाईंची भुमिका अर्थातच तुम्हीच करावी.
तुमची वरची कविताही आवडली.. तुमचा अजुन एक पैलु समजला.


Ganesh_kulkarni
Saturday, February 17, 2007 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलुताई,
एका वेगळ्या विषयाची ही कविता आवडली!


Neelkantee
Saturday, February 17, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजीबाई वाचलं... खूप आवडलं सुद्धा...सरोजमावशीशी सुद्धा बोलले... आजीबाईंच्या मुलाला इ मेल केलय...बघू काय होते पुढे...
मला निश्चितच आवडेल आजीबाई व्हायला लंडनच्या...


Neelkantee
Saturday, February 17, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण हे मराठीच्या मधेच इंग्लिश कसं लिहायचं?


Bhramar_vihar
Saturday, February 17, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलुताई, मला कविता खरच नाही कळली, म्हणजे reports ची अदलाबदल???

मधेच English लिहिण्याकरता त्रिकोणि कंसामधे लिहायच.


Neelkantee
Saturday, February 17, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हात्तिच्या..एव्हढच ना...
म्हणजे manipulation ला वाव नाही... शंकेला जागा नाही... अरे, पूर्वी पत्रिका बघणं आवश्यक होतं... आता HIV + नाही confirm करणं आवश्यक आहे...
पचनी पडलं नाही तरी it's a need of time ... आयुष्याचा प्रश्न आहे... दोघांच्याही...
तो stigma जाणं जरूरीचं आहे...

दोघांच्याही मनात तेच... उपाय खरं तर सोपा असतो....साधा सुद्धा... प्रश्न पुढाकार कोण घेणार एव्हढाच असतो...

आणि हो... AIDS वर VACCIN सापडलं आहे...
३००० लोकांवर प्रयोग सुरू आहेत...
आपल्या पनवेलचा एक डॉक्टर सुद्धा काही अंशी successful झाला आहे...
पण तरीही ती एक टांगती तलवारच आहे...
विषाची परीक्षा घ्या कशाला...

अरे बापरे... हा तर निबंधच झाला
पण मजा येते आहे... अचानक मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग...




Nandini2911
Saturday, February 17, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलु ताई, माझ्या एका मैत्रिणीच्या नात्यातल्या मुलीला लग्न केल्यावर नवर्याला AIDS आहे हे समजले. घरच्याना ठाऊक होते पण त्यानी प्रतिष्ठेपायी लग्न करून दिलं. आणि तिचं आयुष्य खराब केलं.

Princess
Saturday, February 17, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलुताई तुमचे स्वागत आणि आभार सुद्धा... तुमची पहिली मराठी कविता खुप आवडली... टिमटिमणारे दिवे too good पण एड्स ची कविता भ्रमाप्रमाणेच मलाही कळली नव्हती.
आणि दाद, नाव सार्थ करतेस ग दर वेळेला... कधी दाद देउन कधी दाद घेउन. दोन्ही अगदी उत्तम करते.... आहाहा घनराई:-) क्या बात है भाई!!!


Neelkantee
Saturday, February 17, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्ता, १५ फेब.पहाटे ३.४४ ला... छान लिहित होतास...
रुंदन नाही रे सोन्या.... रूदन...म्हणजे आतल्याआत फुटलेलं रडू...
आख्खं archive च खोलून बसले आहे...


Neelkantee
Saturday, February 17, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या वेळेत इतका फरक कसा..?आता ८ वाजलेत रात्रीचे... आणि छापलेली वेळ आहे सकाळी ९.३८...
म्हणजे देवा, तू दुपारी प्रसवलास... २ च्या सुमारास...


Lopamudraa
Saturday, February 17, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलुताई मायबोलि अमेरिकन घड्याळ दाखवते.
तुमचे सगळेच लिखाण खुप छान आहे.
आता संधी मिळालीच आहे तर बोलुन घेते. तुमचा अत्मविश्वास सिनेमा कित्येक जणींना आत्मविश्वास देउन गेला.


Pulasti
Saturday, February 17, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, मीनु, शलाका, आनंदयात्री.. सर्वांच्याच कविता खूप आवडल्या. मला वेळ काढून "दररोज" इथल्या कविता वाचल्या पहिजेत... नाहीतर काहीतरी वाचायचं राहून तर गेलं नाही ना? -- अशी सतत कुणकुण राहते! शिवाय, नीट दाद, प्रतिसाद ही देता येत नाही.
-- पुलस्ति

Daad
Saturday, February 17, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या सगळ्यांचे आभार.
नीलुताई, तुमची कविता नसलेली(??) कविता आवडली. खरय, हे "समाधान" आवश्यक आहे, तुमच्या आमच्या सारख्या मराठीवर आणि मराठीपणावर आत्यंतिक प्रेम करणार्‍या सगळ्यांसाठीच. "लग्नकुंडली" आवडली. (येत रहालच...)
मीनु, "प्रदर्शन" झकासच. परत एकदा तुझ्या कवितांचे विषय वेगळे तर असतातच पण एक सहजभाव आहे शब्दांमध्ये. आवडतात.
पुलस्ति, खरय एक अशी कुणकुण असतेच मनात. मध्ये खूप दिवस आलं नाही की, अधाशासारखं वाचावं लागतं ना?


Neelkantee
Sunday, February 18, 2007 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता दाद द्यायचा नाद लागलाय...
नेट वर आल्यावर साद ऐकू येते
तुम्हा सगळ्यांच्या नावाने एकेक चेहेरा रेखाटलाय मनामध्ये...
कुठे आहात...कसे आहात... काय करता...केव्हढे आहात...
ह्या संदर्भहीन आवाक्यापलिकडची व्यक्ति...
अव्यक्तातून व्यक्त होणारी...
म्हणूनच अधिक भावणारी...


Meenu
Sunday, February 18, 2007 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयसभा

अगदी हक्कानं ज्याची,
मदत मागायला जावं ..
कोर्‍या चेहर्‍यानं त्यानी,
पुढच्या दारी धाडावं ..
खिजगणतीतही नसलेल्या कुणी,
सहज दान देऊन जावं ..
मयसभाच ही दुनिया सारी
दुसरं काय नाव द्यावं ..?


Meenu
Sunday, February 18, 2007 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पदर
एका ठेवणीतल्या साडीचा बेदाग राहीलेला पदर,
असं नाही की कधी अडकला नाही काट्यात,
लोळलाही कामाच्या घाईत कधी खरकट्यात..
पण नाहीच उरला डाग मागे, किंवा ओरखडाही
पदराच्या ताकदीचा आलाच होता अंदाजही..
असाच काट्यात अडकला, अन बेफिकीरपणे ओढला
काटा जरा जास्तच ताकदीचा निघाला..
यावेळी मात्र पदर चांगलाच फाटला..
त्याच रंगाच्या धाग्यानी,
विणीशी एकरुप होणारी विण घालुन शिवला
नेसता येतेय साडी, कदाचित कळणारही नाही कुणाला
पण आता मात्र जपायला लागतो पदर
आता एक काटाही पुरेल साडीचं पायपुसणं व्हायला..


Athak
Sunday, February 18, 2007 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या खजिन्याकडे बरेच दिवसांनी फिरकलो , सगळ्या कविता छानच
काही काही फारच कठिण आहेत बुवा , लगेच डोक्यात प्रकाश पडत नाही :-)
निलुताई तुम्ही छान लिहीता
काल एका मित्राकडे अशीच लग्नकुंडली बद्धल चर्चा सुरु होती , ग्रहतारांच्या चक्रात गोलगोल फिरत राहण्यापेक्षा रक्ताचा एक थेंब सरळ मार्ग .
रिपोर्टाची अदलाबदल करा .. वा छानच
मीनु , कसे इतके छान छान विषय तुला सुचतात ? छान लिहीतेस , दोनदा वाचल्यावर गुढ अर्थ थोडासा डोक्यात शिरतो :-)


Vaibhav_joshi
Sunday, February 18, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू ... मस्त आहेत दोन्ही

सॅटर्डे नाईट

आठवडाभर चालून चालून
थकून भागून पडली होती
शनिवारची रात्र ..
पण डोळ्याला डोळा लागत नव्हता
समोर आ वासून उभी
उद्याची आवरा आवर ....
मग चुकून म्हणता म्हणता
मुद्दाम हाताला लागणार्‍या काही आठवणी
अन सगळं जागच्या जागी लागेपर्यंत
डोळ्यांत तरळणारी
रविवारची विषण्ण संध्याकाळ
सोमवारी सकाळी वाळेपर्यंत ...
शनिवारी संध्याकाळी भिजेपर्यंत ..


Avikumar
Sunday, February 18, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोस्तहो, खुप दिवसांनंतर कविता पोस्ट करण्याचे धाडस करतोय. तुम्हा सगळ्या प्रतिभावंत कवी/कवयित्रींच्या कवितांमध्ये कविता पोस्ट करताना खरेतर खुप अवघडल्यासारखे वाटतंय. सांभाळुन घ्या आपल्या या मित्राला....

प्रिती

तुझ्या मुखीचा शब्द मी, अन तुच माझी वाणी गं
तुझ्या सुरांवाचुन अधुरि, सारीच माझी गाणी गं

तुज संगतीत मिळे मज, ग्रिष्मातही सुखद गारवा
तुजविण भासे श्रावण व्यर्थ, टपटपणारे पाणी गं

मिळताच नजर तुजसवे, वर्षति कितिक प्रेमगिते
वळताच नजर विरह पाझरे, ह्रुदयातुन या विराणी गं

राग जरि हा लटका, अनुराग कळेना कसा करु
प्रितित तव गुरफ़टलेला, मी वेडा अज्ञानी गं

मम गझलेचे तुझ्यासवेचे, साम्य कितीक हे सखये
गझल हि जर काव्याची तर, तु मज दिलाची राणी गं!

--अविनाश

Neelkantee
Sunday, February 18, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कामाचं ओझं वाटल्याक्षणीच....
आपलं गाढव होतं...
ओझ्यानंच निम्मा जीव गुदमरतो...
उरलासुरला निम्मा वैतागतो...

त्यापेक्षा आपण दुःशासन व्हावं...
अन कामाच्या सोग्याला हात घालावा...
श्रीकृष्ण धावणारच मदतीला...
असं वाटता वाटतानाच कदाचित...
काम तमाम केव्हा होइल
कळणार सुद्धा नाही...











 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators