Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 17, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 17, 2007 « Previous Next »

Neelkantee
Friday, February 16, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटायचं कधी कधी मराठी विरून जाणार आमच्याबरोबरच मातीमध्ये..
मातीमोल...(?) होणार....
ठाउक नव्हतं तेव्हा...इतके दिवे लुकलुकतायत सगळीकडे...
मंद मंद प्रकाशातलं मोनालिसा स्मित
विखुरलय माझ्या चेहेर्‍यावर हलकेहलके...
ही कविता नाहीये...समाधान आहे....तुमचं मराठी वाचून झालेलं...
असेच छान लिहित जा...


Meenu
Friday, February 16, 2007 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा निलकांती कविता नाहीये पण कवितेपेक्षाही खुप छान आहे तुम्ही लिहीलत ते ...

Meenu
Friday, February 16, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रदर्शन

एखादं सुंदर प्रदर्शन पहावं ना हरखुन
तशी मी पहात राहते माणसं
ह्याची कविता, तिचं रुप,
ह्याचं वादन, तिचं गायन
कुणाचं काय तर कुणाचं काय ..
कधी क्षणभर हेवा वाटतो
कधी स्वतःचाच राग येतो
पण आपल्या चेहर्‍यावरचा आव मात्र कायम ..
खिसा भरलेला असल्याचा .. काय करणार ..?
शेवटी आपला फाटका खिसा आपल्यापाशी ..


Shyamli
Friday, February 16, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु वैभवनी सांगितलेला बदल करुन बघ ना...
तशी वाचली तर अर्थ जास्ती स्पष्ट होतोय:-)
ही वेळ नव्हे फुलण्याची
ना दरवळण्याचा ऋतू
का मजला समजत नाही?
मन माझे घनराई...>>>
वाह शलाका....काय सुंदर मांड्लयस
आणि हे "मन माझे घनराई" तर सिक्सरच अगदी.... जिओ
देवा "भेद" जबरी आवडली

नीलुताई (चालेल ना? :-))
तुमच समाधान पाहुन छान वाटल आणि मराठी साहित्याच्या प्रेमापोटी तुमच्या सारखी मोठी व्यकती वेळात वेळ काढुन इकडे डोकावते यातच सगळं काही आलं :-)
agin thnaks to admin



Shyamli
Friday, February 16, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण आपल्या चेहर्‍यावरचा आव मात्र कायम ..
खिसा भरलेला असल्याचा .. काय करणार ..?
शेवटी आपला फाटका खिसा आपल्यापाशी .. >>>

वाह...!!

Lopamudraa
Friday, February 16, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलकांतीजी आपण जे लिहिल ते फ़ार सुंदर आहे..
येत रहा इथे आम्हाला प्रोत्साहन द्यायला... मार्गदर्शन करायला..!!!

शलका मस्तय घनराई.. वाचुनच मन हिरव झाल..
मीनु फ़ारच छान कविता.. मनापासुन आवडली.


Chinnu
Friday, February 16, 2007 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपाला अनुमोदन. नीलु तुम्ही छोटी कविताच लिहीलीत. मायबोली परिवाराचे मी किती आभार मानले तरी कमीच पडतील. हे लुकलुकते दिवे असेच टिमटिमत राहु देत मनामध्ये!
निरुकुल, कही गद्यपंक्ती थोड्या बदलल्यास चांगले. जसं शब्दांनाही आश्चर्य वाटेल ऐवजी काही वेगळी रचना बरी दिसेल, असे मला वाटते. cbdg! .
मीनु प्रदर्शन सही. देवा भेद उच्च!


Swaatee_ambole
Friday, February 16, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाकाताई, सुंदर! :-)

देवाच्या या दोन्ही कविता खूप आवडल्या हे कृपया एखादा दूत त्याला कळवेल काय? :-)


Shyamli
Friday, February 16, 2007 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... .. .. ..
...
होSSSSS :-)

Neelkantee
Friday, February 16, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती आणि तो प्रथमच...
फिरायला बाहेर पडली सहजच...
बोलता बोलता वरवरचं का होइना
समजलं एकमेकांबद्दलचं बरंच....
तरीही रुखरुख... हुरहुर... स्वस्थ बसू देत नव्हती...
वळलीच पावलं वळणावर...
फाटकावर लिहिलं होतं 'इथे लग्नकुंडली बनवून मिळेल'
सराईतासारखी...वर चढली झपाझप...
सहजच जणू...तिने हात धरून त्याचा...
म्हटलं... नातं करेल पक्क... एक थेम्ब रक्ताचा...
प्रश्नचिन्ह चेहर्‍यावरचं त्याच्या...विरलं एका क्षणात...
नर्स.. डाॅक्टर...पांढरा ऐप्रन....
तिचा स्वर साधा सरळ... सोपा...
'दोघांचीही एच. आइ. वी. टेस्ट करा...
रिपोर्टांची मात्र अदलाबदल करा...'



Swaatee_ambole
Friday, February 16, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> 'दोघांचीही एच. आइ. वी. टेस्ट करा...
रिपोर्टांची मात्र अदलाबदल करा...'

hmmm... Interesting!! :-)

Devdattag
Friday, February 16, 2007 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांचे आभार...:-)
मीनु आणि श्यामलि यांचे खास आभार..:-)
वैभव.. हा भेद फक्त वर्ण वरनं आहे..:-)


Jayavi
Friday, February 16, 2007 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलुताई.... तुम्हाला मायबोलीवर बघून खूप खूप आनंद झाला :-) तुम्ही दिलेली लिंक पण बघितली...! फ़ारच सुरेख! वरचं गद्य आणि पद्य दोन्हीही एकदम सही. येत रहा गुलमोहर फुलवायला इथे :-)

मीनु..... वा... सुरेख!!


Neelkantee
Friday, February 16, 2007 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

doctor...कसं लिहायचं?
when i wrote , my copy was showing correctly, but whn previewed smthng went wrong...

Shyamli
Friday, February 16, 2007 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉक्टर.. .... DOkTar
D,O,T कॅपिटल वापरा :-)


Psg
Saturday, February 17, 2007 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलकांती, मस्त :-)
मीनु, आवडली ही कविता :-)


Bhramar_vihar
Saturday, February 17, 2007 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलकांतीजी, मी कमी पडलोय समजण्यामधे! समजावुन सांगता का?

Neelkantee
Saturday, February 17, 2007 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विहार,
नक्की काय समजावू?
ते सांगितलेस तर
...

Neelkantee
Saturday, February 17, 2007 - 12:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नीलुताई म्हटले तरी चालेल...
नीलकान्तीजी टाइप करेपर्यंत श्वास संपतो ना..


Nandini2911
Saturday, February 17, 2007 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलूताई.. तुमची लग्नकुंडली आवडली..
तुमची फ़िल्म तर अप्रतिम होती. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आशय होता.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators