|
Raadhika
| |
| Thursday, February 15, 2007 - 6:02 am: |
| 
|
जया, पूनम, v-day च्य कविता छान आहेत. आनंदयात्री, देवदत्त, लोपा... सहीच.
|
Princess
| |
| Thursday, February 15, 2007 - 6:58 am: |
| 
|
देवा, काय सुरेख लिहिलय!!!
|
लोपा पदन्यास छान. देवदत्ता खूपच सुरेख रे.
|
Niru_kul
| |
| Thursday, February 15, 2007 - 9:19 am: |
| 
|
सखे, श्वासही आता तू हळू घे! सखे, श्वासही आता तू हळू घे! वार्याच्या भावनांना छळू दे! तुझ्या अनमोल सहवासाचे महत्व, प्रत्यक्ष वेळेलाही कळू दे! आज ये तू माझ्या इतकी जवळ, की दुराव्याचा कोणताही आभास नसेल्; एकदा मला माझा श्वास, तुझ्या श्वासात मिसळू दे! अशा नाजुकतेने व्यक्त कर तुझ्या भावना, की शब्दांनाही स्वतःचे आर्श्चय वाटेल; शब्दांत अर्थ भरताना, अर्थातून शब्दांना वगळू दे! झाक माझ्या पापण्यांना तुझ्या ओठांनी, स्वप्नं त्यांतील उडू नयेत म्हणून; समाधानाच्या अश्रुंना मग माझ्या, ओठांतून तुझ्या कोसळू दे! तुझ्या मिठीत आता प्रिये, माझ्या जीवाला थारा दे! भावनेला माझ्या आता, नियती तिची मिळू दे!
|
Dineshvs
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:51 am: |
| 
|
<<< होउदे एकदा जिवंत त्यास त्यास >> लोपा, ईथे होऊदे एकदा जिवंत त्याचा त्यास असे हवे होते का ? छान लिहिले आहेस.
|
Chinnu
| |
| Thursday, February 15, 2007 - 4:07 pm: |
| 
|
देवा मस्त. निरु, सहीच! नीलु तुमची फ़िल्म पाहीली नाही अजुन पण तुमचा मेसेज विचार करायला लावणारा आहे हे नक्की.
|
Daad
| |
| Thursday, February 15, 2007 - 10:49 pm: |
| 
|
खूप दिवसांनी पोस्टतेय.... मन माझे घनराई आले फुलून जाई-जाई ही वेळ नव्हे फुलण्याची ना दरवळण्याचा ऋतू का मजला समजत नाही? मन माझे घनराई... किती किती, कसे समजाऊ की, नकोस उजळत जाऊ पर्ण-पाचुचे दीप तू ठाई ठाई मन माझे घनराई... रेलून कदंबा उभा घेऊनी पावा का छेडी व्याकुळ, गर्द-गर्द मारवा मग पर्ण-पर्ण हे कर्ण-कर्ण लवलाही मी माझी राहत नाही मन माझे घनराई... -- शलाका
|
Daad
| |
| Thursday, February 15, 2007 - 10:52 pm: |
| 
|
देवदत्त, किती सुंदर, वाह! नीरज, छानय!
|
Smi_dod
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:10 pm: |
| 
|
वा.. निरु... दाद छान... शलाका मला तुझ्या शब्दातले वेगळे पण भावले खुप.. सुंदर!!!
|
Meenu
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:14 pm: |
| 
|
शलाका तुझी कविता मस्तच वाटते वाचायला कसले गोड शब्द असतात ... मला ते 'लवलाही' नाही कळलं बाकी मस्तच ... देवा दोन्ही कविता सहीच .. पण आठवणींच पुस्तक खास आहे ..
|
Meenu
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:20 pm: |
| 
|
कावळे छोटी छोटी, घरटी करुन, राहतात कावळेसुद्धा ... दुसर्या कावळ्याला, टोचुन टोचुन, मारतात कावळेसुद्धा ...
|
Chinnu
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:25 pm: |
| 
|
फुलुन आले जाई जाई, सुंदर आहे ग शलाका! मीनु विद्रुप सत्य मांडलस!
|
Meenu
| |
| Friday, February 16, 2007 - 1:56 am: |
| 
|
आज मी देवदूत झालीये ..... देवाची कविता पोस्ट करतेय भेद माझ्या घरासमोरल्या दगडांबद्दल, मला फार कुतुहल आहे .. दोन्ही सारख्याच आकाराचे .. पण जाणारा येणारा, त्यातल्या एकाला अडखळून पडतो .. आणि दुसर्याला नमस्कार करून पुढे जातो .. रंगाच महत्व पटतय मलाही ..
|
Jayavi
| |
| Friday, February 16, 2007 - 3:35 am: |
| 
|
निरु, मस्तच! शलाका.... मीनुचं म्हणणं एकदम पटेश खरंच खूप गोड शब्द असतात तुझ्या कवितेत. देवा..... 'भेद' अप्रतिम! मिनु.... कळव गं देवाला
|
Daad
| |
| Friday, February 16, 2007 - 4:02 am: |
| 
|
मीनू, चिन्नु, जयश्री, thanks खरच! मीनू, लवलाही म्हणजे लगेच, क्षणार्धात
|
Raadhika
| |
| Friday, February 16, 2007 - 4:35 am: |
| 
|
शलाका, अप्रतिम... देवदत्तची 'भेद' देखिल आवडली
|
लोपा ... क्षणांचा पदन्यास कल्पना खूप आवडली . नीरज .. छान आहे .. सखे, श्वासही आता तू हळू घे! वार्याच्या भावनांना छळू दे! इथे " वार्यालाही तळमळू दे " असं काहीसं हवं होतं का ? तसेच शब्दांत अर्थ भरताना, अर्थातून शब्दांना वगळू दे! हे खूप आकर्षक वाटलं पण विचार केल्यावर गोंधळलो .. isnt it catch 22? कृपया तुम्हाला अभिप्रेत अर्थ समजावून सांगणार का ? शलाका ... " खूप दिवसांनी पोस्टतेय .... " ही एक मस्त कविता आहे
रेलून कदंबा उभा घेऊनी पावा का छेडी व्याकुळ, गर्द-गर्द मारवा मग पर्ण-पर्ण हे कर्ण-कर्ण लवलाही मी माझी राहत नाही मन माझे घनराई... झकास !!! मीनू .. तुला जे काही म्हणायचंय ते प्रभावी होण्यासाठी दोन्ही कडव्यात (?) " सुध्दा " हा दुसर्या ओळीत हवाय का ? म्हणजे " करून सुध्दा " आणि " टोचूनसुध्दा " असं. एकदा विचार करून बघणार ? देवा .. तू दूतांतर्फे पाठवलेल्या कविता सॉलिड असतात .. हे काय गौड्बंगाल आहे ? हा " भेद " का ? आवडली
|
Raadhika
| |
| Friday, February 16, 2007 - 5:13 am: |
| 
|
नीरज, छान आहे... पण "शब्दांत अर्थ भरताना, अर्थातून शब्दांना वगळू दे! " ... खरंच खूपच आकर्षक आणि थोड अगम्य वाटतंय... अगदी ग्रेस च्या एखाद्या कवितेसारखं.
|
Psg
| |
| Friday, February 16, 2007 - 5:30 am: |
| 
|
लोपा, पदन्यास छान आहे.. निरू_कुल, मस्त आहे कविता तुमची.. देवा, सही कविता आहे! आवडली..
|
Princess
| |
| Friday, February 16, 2007 - 6:15 am: |
| 
|
निरु, छान आहे रे... देवा too good मीनु... सत्य मांडलय दाद, खुपच गोड
|
|
|