Pulasti
| |
| Tuesday, February 06, 2007 - 9:40 am: |
| 
|
योग - रसरशीत कल्पना आहेत! मतला, थेम्ब, कोम्ब आवडले. मक्त्यातली कल्पना तर अप्रतिम! ("शब्द" शेर अजून मला नीट समजला नाहिये. पण विचार करीन...) जाणकारांकडून जे थोडेफार आजपर्यंत मला उमगले आहे त्यानुसार - तुम्ही रदीफ़ (होता), काफ़िया (त), मतला आणि अलामतही (अ+त) पाळलेली दिसतेय. बहर (मात्रा आणि वृत्त) जुळवून आणली तर ही फारच छान गझल होईल! शुभेच्छा!! --पुलस्ति.
|
Chinnu
| |
| Tuesday, February 06, 2007 - 1:37 pm: |
| 
|
योग, सर्वच शेर महान. तीसरा शेर मन हेलावुन गेले अगदी. शब्दकल्पना अप्रतिम आहेत. विझले आभाळ, तेवता चंद्र, रेलला स्पर्श, सुकला गाव, उभ्या सावलीचा भास, थकली आस आणि टेकलेला दिवस... वाह योग, श्रीमंत आहे तुमची " पोरकी " गझल!
|
Jayavi
| |
| Tuesday, February 06, 2007 - 11:58 pm: |
| 
|
योग.... जबरदस्त!! विझले आभाळ अन चन्द्र तेवत होता सम्पले सहवास अन स्पर्श रेलत होता. हे Ulitimate !
|
Daad
| |
| Wednesday, February 07, 2007 - 1:13 am: |
| 
|
योग, एकदा वाचली आणि पुन्हा पुन्हा वाचली. (पुलस्ति म्हणतात त्याप्रमाणे मलाही चवथा कळला नाही.) बाकीच्या कल्पना मात्र डोळे मिटून परत एकदा आपल्यालाच ऐकवाव्यात इतक्या सुन्दर उतरल्यात. छानच!
|
Chanakya
| |
| Wednesday, February 07, 2007 - 1:50 am: |
| 
|
वा योग मस्त आहेत काही काही शेर.. पुलस्ती म्हणतात तसे वृत्ताकडे ध्यान दिलेत तर मस्त गझल होईल
|
लोचनांच्या पार वेडे हे मनाचे राज्य आहे चन्द्र-इन्द्र, रवि-कवि, सर्व बाकी त्याज्य आहे रंगला हा खेळ येथे विधात्याच्या अंकावरी अंकी त्या नांदणारी हरेक संख्या भाज्य आहे बंध नाहीत येथे उमलण्या-फ़ुलण्यास वा बंधनाच्या पार गेले स्वयंभू साम्राज्य आहे हुन्दक्यांचा गाव आहे, भावनेला वाव आहे अंतरी शमविणारे शांभवी सुराज्य आहे निर्मिकाचे नाव नाही कोठेच येथे सापडे आपलेसे वाटणारे धन्य हे स्वराज्य आहे
|
Manas6
| |
| Thursday, February 08, 2007 - 9:45 pm: |
| 
|
छंद वेग माझ्या पालखीचा मंद होता आसवांचा पूर पण स्वच्छंद होता ओठ राधेचे अता परके तरीही, आजही ओठांवरी 'मकरंद' होता तेच अश्रू ढाळीते, जे तू दिलेले, -काय मज ह्या आसवांचा छंद होता? 'बघ जरा, आलोय मी', तु बोलला पण, जाहला रे श्वास माझा बंद होता मोरपंखी येथला आराम तरीही, झोपडी ती!- वेगळा आनंद होता! ह्या किनाऱ्याची बघा दमछाक झाली, आज हा दरिया कसा 'बेबंद' होता! - मानस६
|
Chanakya
| |
| Friday, February 09, 2007 - 2:28 am: |
| 
|
वा!! आनंदयात्री छान आहे गझल... मानस मस्तच खास करुन राधेचा शेर... माझा पण एक प्रयत्न... कृपया मार्गदर्शन करावे... सुधारण्यास मदत होईल... वाळवंट जीवघेण्या आठवांचे, साचलेले वाळवंट काळजाला दाह देई, भोगलेले वाळवंट ध्यास धरला मी सुखाचा, जन्म गेला शोधण्यात लोचनाला मृगजळासम भासलेले वाळवंट या इथे सारेच दुश्मन, दोस्त बनुनी भेटले शाल काटेरी फुलांची, ल्यायलेले वाळवंट चांदण्यांची माळ आली, वाट मजला दावण्यास कोळुनी अंधार सारा प्यायलेले वाळवंट जीवनाशी झुंज देण्या जागतो मी दिवसरात ऊब स्वप्नांना पुरविण्या झोपलेले वाळवंट संकटांशी आज केली मुक्त हस्ते सोयरीक वादळांच्या काफिल्याला झेललेले वाळवंट तामसी का वाटु लागे आज वाळू रोजचीच बांधवांचे रक्त प्याले बाटलेले वाळवंट
|
धन्यवाद! खरं सांगायचं तर, मी ही शिकतोच आहे गझल लिहायला... सर्व जाणकारांना आग्रहाची विनंती- मार्गदर्शनासाठी!
|
वाह ... काही काही सुंदर कल्पनाविष्कार वाचायला मिळाले. मित्रांनो स्वातीने दिलेल्या लिंक चा वापर करून सुरेश भटांनी दिलेलं गज़लेचं व्याकरण जरूर वाचा .. त्य कोंदणात अश्या कल्पना फारच शोभून दिसतील. शुभेच्छा !!!
|
Chanakya
| |
| Wednesday, February 14, 2007 - 8:17 am: |
| 
|
वैभव - स्वातींनी दिलेल्या link वाचली आहेच आनि त्याप्रमाणे सर्व नियम पाळायचा प्रयत्न केला आहे... परंतु... तुमच्या सारख्या जाणकारांनी काही specific सुचना केल्या... जसे की कुठे नियमात बसत नाहीये... कुठला शेर सपाट झालाय किंवा काहीच दम नाहीये वगैरे तर फ़ार बरे होईल.. गझल अगदी टाकाउ वाटत असेल तर बिनदिक्कत तसे सांगीतलेत तरी चालेल... निदान किती पाण्यात आहोत ते तरी कळेल आम्हास... थोडे spoon feeding होईल पन गझलच्या बाबतीत मी तरी अजुन nursery मध्येच आहे.. :-) चुक भुल द्या घ्या!
|
Pulasti
| |
| Wednesday, February 14, 2007 - 10:15 am: |
| 
|
आनंदयात्री, मनाचे "राज्य" आवडले! मानस - "छंद" छान आहे. झोपडी आणि दरिया शेर विशेष आवडले. चाणक्य - वाळवंटाचे अंत्ययमक तुमच्या सर्व कल्पनांनी ऊत्तमरित्या पेलले आहे. अभिनंदन!! -- पुलस्ति.
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, February 14, 2007 - 8:27 pm: |
| 
|
रंगला हा खेळ येथे विधात्याच्या अंकावरी अंकी त्या नांदणारी हरेक संख्या भाज्य आहे आंनदयात्री क्या बात है. माणस नी चानक्य सही. मजा आली.
|
सोंग तुला विसरायला इतके करावे लागते मला मी कोण हे आधी स्मरावे लागते तुझ्या स्वप्नांवरी ज्या मालकी होती कधी तिथे चोराप्रमाणे वावरावे लागते झिजूनी शब्द गेले फाटक्या नोटांपरी जपूनी फार त्यांना वापरावे लागते नभी अंधारले की सोंग माझे संपते स्वतःचे कातडे मग पांघरावे लागते कधी रे एवढा झालास मोठा ईश्वरा? तुझ्या दारातही धरणे धरावे लागते?
|
वाह !!!! मस्त गज़ल स्वाती ... नभी अंधारले की सोंग माझे संपते स्वतःचे कातडे मग पांघरावे लागते खलास ............... चाणक्य , पुलस्ति ... जाणकार वगैरे सोडा मित्रांनो ... मी as it is जमेल तसं सर्व रचनांवर लिहायचा प्रयत्न करतोच ... थोडासा गडबडीत आहे हे खरं ... पण लवकरच लिहीन
|
झिजूनी शब्द गेले फाटक्या नोटांपरी जपूनी फार त्यांना वापरावे लागते>>. mastach swati
|
स्वाती_अम्बोले "सोंग " वा छान गजल! नभी अंधारले की सोंग माझे संपते स्वतःचे कातडे मग पांघरावे लागते ! क्या बात है!!
|
Princess
| |
| Thursday, February 15, 2007 - 7:04 am: |
| 
|
स्वाती, एकदम खल्लास!!! वैभव आणि स्वातीच्या कवितांचे कौतुक करण्यासाठी सुंदर सुंदर शब्द विकत घेणे आहे...
|
Sarang23
| |
| Thursday, February 15, 2007 - 8:48 am: |
| 
|
वा स्वाती! बहोत खूब! पण ते जपूनी, झिजूनी... नाही आवडलं... अगदी "तूझे" सारखाच feel आला. शेवटच्या शेरात दुसर्या ओळीत प्रश्नचिन्हाची गरज आहे का? मला ते प्रश्नार्थक न उच्चारताच जास्त छान वाटतय. तुझ्या स्वप्नांवरी ज्या मालकी होती कधी तिथे चोराप्रमाणे वावरावे लागते इथे स्वप्नांवरी असं आलय पहिल्या ओळीत... मग खालच्या ओळीत "त्या स्वप्नांमध्ये" असा अर्थ घेऊन पुर्ण अर्थ लागतोय... गडबड वाटते आहे. पण बाकी गझलेतले सगळेच शेर अर्थाच्या दृष्टीने एकदम सशक्त! एकूण गझल आवडली! मतला तर लाजवाब आहे!!
|
धन्यवाद, दोस्त्स. सारंग, तुझ्या सुचवण्यांवर विचार करत्ये. तुला पर्यायी शब्दरचना सुचली तर सांग रे. धन्यवाद.
|