|
Dineshvs
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:36 am: |
| 
|
स्वाती मलाहि जुन्या नोटा जपुन वापराव्या लागतात ते पटले नाही. खरे तर त्या वठवणेच कठिण जाते. किंवा त्या कुणाच्या तरी गळ्यात माराव्या लागतात. अर्थशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे, चांगल्या नोटा चलनातुन गायब होतात, कारण त्यांचा संग्रह करायची प्रवृत्ती असते. जुन्या मळक्या नोटाच जास्त हाताळल्या जातात. ... तर अश्याप्रकारे लिहुन मी माझा रुक्षपणा सिद्ध केलाय. पण तुझ्या कवितेवर मोकळेपणी लिहायला काहि वाटत नाही. आवडली म्हणुनच तर लिहिले.
|
दिनेशदा, इथे ' वापरणे' हे ' हाताळणे' या अर्थी आलंय. आपण शब्द ' वापरून गुळगुळीत झाले' म्हणतो की नाही? तश्या ह्या नोटा झिजल्यात, फाटत चालल्यात.. अजून चलनात आहेत, पण कधी पूर्ण फाटून - आहे तीही किंमत घालवून बसतील - सांगता येत नाही. कित्येकदा नातेसंबंधांत होतं ना असं? निष्काळजीपणे शब्द वापरले गेले की किंमत हरवून बसतात ना? मला गुळगुळीत झालेल्या नाण्यापेक्षा नोटांचं रुपक भावलं कारण मुळात ' नोट' हा ' दिलेला शब्द'च असतो ना अर्थशास्त्रानुसार? नाण्याला धातूची तरी किंमत असते. नोट म्हणजे प्रॉमिसरी नोट. ' मैं ग्राहकको पाँच रुपया अदा करनेका वचन देता हूँ' असा ' शब्द' म्हणजे नोट. तो शब्द हीच तिची किंमत.. अन्यथा साधा कागद आहे तो.. वार्याने उडू शकणारा आणि सहज फाटू शकणारा. बघ पटतंय का. बाकी इथल्या कविता रुक्ष माणसांनाही वाचाव्याश्या वाटत असतील आणि विचारात पाडत असतील, तर आम्हा कवीमंडळींसाठी याहून मोठी आनंदाची गोष्ट कुठली?
|
Chinnu
| |
| Thursday, February 15, 2007 - 4:11 pm: |
| 
|
खुप खुप सुंदर स्वाती. सर्वच शेर सुंदर! झिजुन गेलेले शब्द जापायची, जपुन वापरावयाची कल्पना फार सुंदर!
|
Pulasti
| |
| Thursday, February 15, 2007 - 9:49 pm: |
| 
|
स्वाती - छानच गझल! शब्द आणि मक्ता फार म्हणजे फारच आवडला!! मतला मात्र मला जरा गोंधळात टाकतोय. "मला मी कोण ते आठवलं की तुला विसरणं जमेल" असा अर्थ मला जाणवतोय. पण तो अर्थ असेल तर काहितरी चुकल्यासारखं वाटतय. उद्या पुन्हा वाचेन... -- पुलस्ति
|
Daad
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:03 pm: |
| 
|
चाणक्य, गज़लेच्या व्याकरणाबद्दल "जाणकार" भाष्य करतीलच. पण मला सगळ्या कल्पना आवडल्या. अर्थ बोधी पण विचार करायलाही लावणार्या. स्वाती, फिदा, एकदम फिदाच! तुला विसरायला इतके करावे लागते मला मी कोण हे आधी स्मरावे लागते दोन ओळींमध्ये किती किती बोलून गेलीयेस? एका ऐहिक आणि "पारमार्थिक" पातळीवरही किती सही आहे हे? भले! नभी अंधारले.... खूप आवडला हा शेर. you made my day and weekend, too !!
|
Sarang23
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:13 pm: |
| 
|
' मैं ग्राहकको पाँच रुपया अदा करनेका वचन देता हूँ' असा ' शब्द' म्हणजे नोट. तो शब्द हीच तिची किंमत.. अन्यथा साधा कागद आहे तो.. वार्याने उडू शकणारा आणि सहज फाटू शकणारा. क्या बात है!!! किती सुंदर शब्दांत मांडलीस स्वतःची बाजू! मला या लिखाणाला पण कविता म्हणावंस वाटलं!
|
Dineshvs
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:42 pm: |
| 
|
छान खुलासा दिलास स्वाती. केवळ कागद जीर्ण झालाय म्हणुन वचनाला किंम्मत उरली नाही, असाहि अर्थ जाणवायला लागला ( आभार वैगरे मानु का ?) आता सहज थोडीशी आगाऊ माहिती, पुर्वी आपल्याकडे ज्या एक रुपयाच्या नोटा वापरात होत्या, त्या प्रॉमिसरी नोट्स नव्हत्या. त्या मिनिष्ट्री ऑफ़ फ़ायनान्स ने चलनात आणल्या होत्या. मी भेट दिलेल्या काहि देशात, नोटा हेच चलन होते, त्यावर वचन वैगरे काहि नव्हते.
|
Upas
| |
| Friday, February 16, 2007 - 2:56 am: |
| 
|
स्वाती क्या बात है.. गझल मनापासून आवडली..
|
Jayavi
| |
| Friday, February 16, 2007 - 3:32 am: |
| 
|
स्वाती..... खूप खूप छान. तुझ्या कवितेसाठी वाट बघायलाही आवडतं....... कारण ती जेव्हा येते... इतकं काही देऊन जाते ना...!
|
Bairagee
| |
| Friday, February 16, 2007 - 4:50 am: |
| 
|
तुला विसरायला इतके करावे लागते मला मी कोण हे आधी स्मरावे लागते वा! मतला सहज, ओघवता, चांगला आहे. तुझ्या स्वप्नांवरी ज्या मालकी होती कधी तिथे चोराप्रमाणे वावरावे लागते आवडला पण "तुझ्या स्वप्नांवरी ज्या मालकी होती कधी" वाचताना गाडी खाचखळग्यांतून जाते. खालच्या मिसऱ्यासारखी वरची ओळही ओघवती हवी. झिजूनी शब्द गेले फाटक्या नोटांपरी जपूनी फार त्यांना वापरावे लागते झिजूनी, जपूनी कानांना खटकतात. किती हे शब्द झिजले फाटक्या नोटांपरी? अताशा फार जपुनी वापरावे लागते असे काहीसे.बाय द वे, शब्द फाटक्या नोटांपरी आहेत असे म्हटल्यावर झिजणे तसे गरजेचे नाही. नभी अंधारले की सोंग माझे संपते स्वतःचे कातडे मग पांघरावे लागते वरच्या ओळीत नभी का? "नभी" भरीचा आणि धूसरता वाढविणारा. एक शारीर पदर दिसतो आहे. पण नक्की काय म्हणायचे आहे? कधी रे एवढा झालास मोठा ईश्वरा? तुझ्या दारातही धरणे धरावे लागते? ओके. छान!
|
Chanakya
| |
| Friday, February 16, 2007 - 6:52 am: |
| 
|
वैभव तुमच्या सुचनांची वाट बघत आहे पुलस्ति, केदार, दाद खूप आभार स्वाती नेहमीप्रमाणेच उत्तम गज़ल
|
चाणक्य ... आपण तुमची " वाळवंट " चर्चेला घेऊ .. चालेल ? सर्वप्रथम अकारांती अक्षराने संपणारे मिसरे शक्यतो वापरले जात नाहीत. ह्याचं कारण असं की ते शेवटचं अक्षर म्हणताना ओढावं लागतं .. शेर बघू या १ ) जीवघेण्या आठवांचे, साचलेले वाळवंट काळजाला दाह देई, भोगलेले वाळवंट अं .... वाळवंट प्रतिमा वापरताना भोगलेले योग्य ठरेल का ? म्हणजे समजा जीवघेण्या आठवांचे पसरलेले वाळवंट काळजाला जाळणारे तापलेले वाळवंट एकदा का एखाद्य सुंदर कल्पनेने मनात आकार घेतला की ती रुजू द्यावी .. त्याच्या अवतीभवती फिरणारे कित्येक मिसरे येतात जातात आणि कधीतरी अचानक तो एक मिसरा दिसतो .. पण तिथेही प्रकिर्या थांबत नाही .. थांबू नये . त्या मिसर्यातला किंवा पूर्ण शेरामधला एक न एक शब्द आहे तिथे योग्य आहे का , तो शब्द हवाच आहे का , तिथे आणखी काही शब्द आलातर शेराचे सौंदर्य खुलेल का हे भान सतत असणं आवश्यक आहे .. उदा :- ' काळजाला जाळणारे " ह्यातल्या ळ आणि ज ची जी alternate placing आहे त्याने खुमारी वाढते असं माझं मत आहे . अर्थात ह्याचा अर्थ शेर म्हणजे केवळ शब्दच्छल का हो ? असा कुणीही घेऊ नये . त्या सुंदर कल्पनेला पूर्ण वाव द्याय्चा असेल तर हर तर्हेने प्रयत्न करणं आवश्यक आहे . २ ) ध्यास धरला मी सुखाचा, जन्म गेला शोधण्यात लोचनाला मृगजळासम भासलेले वाळवंट वरचा मिसरा उत्तम . खालचा मिसरा शेर सपाट करून टाकतो " व्यर्थ ठरले मृगजळासम लाभलेले वाळवंट " असा काहीसा विचार हवा होता का ? ३ ) या इथे सारेच दुश्मन, दोस्त बनुनी भेटले शाल काटेरी फुलांची, ल्यायलेले वाळवंट छान आहे ४ ) चांदण्यांची माळ आली, वाट मजला दावण्यास कोळुनी अंधार सारा प्यायलेले वाळवंट ह्यात काय म्हणायचे आहे हे समजले नाही . हा आशादायी शेर असेल तर वाळवंट ह्या रदीफ़मुळे त्याला छेद जातोय असे वाटले ५ ) जीवनाशी झुंज देण्या जागतो मी दिवसरात ऊब स्वप्नांना पुरविण्या झोपलेले वाळवंट छान आहे ६ ) संकटांशी आज केली मुक्त हस्ते सोयरीक वादळांच्या काफिल्याला झेललेले वाळवंट परत वरचा मिसरा उत्तम खाली " वादळाच्या काफ़िल्यांनी तुडवलेले वाळवंट " असं काहीसं हवं होतं काय ? ७ ) तामसी का वाटु लागे आज वाळू रोजचीच बांधवांचे रक्त प्याले बाटलेले वाळवंट इतका वेळ मीटर वर असलेली पकड निसटलीये " तामसी वाटे मला वाळू जरी ही श्रांत क्लांत बांधवांचे रक्त दिनभर प्राषलेले वाळवंट " अर्थात मी सुचवलेल्या कुठल्याही बदलांवर मी स्वतः समाधानी नाहीये . पण एकंदर गज़लचा आढावा घेताना हे करणे आवश्यक होते . वेगवेगळ्या अर्थांच्या कमेतकमी पाच द्विपंक्ती आणि प्रत्येक द्विपंक्ती म्हणजे एक स्वतंत्र कविता / कहाणी म्हणजे एक गज़ल असे असले तरीही एक overall मूड प्रत्येक गज़लेला असतो असे माझे प्रांजळ मत आहे . एकमेकांना खूप छेद देणारे शेर आले तर त्या संपूर्ण रचनेचा impact कमी होतो . कदाचित हे अतिशय वादग्रस्त विधान ठरू शकतं पण मी स्वतः ह्याच पध्दतीने विचार करण्याच्या प्रयत्न करत आलोय . अगदी गज़ल च्या नावापासून ( गज़ल ला नावच असू नये असा विचार मांडणारेही त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत हे मान्य करून ) एक मूड तयार होत जातो असे माझे मत आहे . प्रत्येक शेराची त्या गज़ल मधली placement प्रत्येक शब्दाची प्रत्येक शेरातली placement ह्याचं सर्वांगीण भान , उत्स्फूर्तता न जाऊ देता , राखलं जावं असं मला वाटतं . गज़ल ही एक तबीयत आहे . इतर सर्व काव्यप्रकाराप्रमाणेच गज़ल मधून कमीत कमी शब्दात , आकृतीबंधाच बंधन सांभाळत , कवी एखाद्या situation ला react करत असतो आणि आपलं स्वतःचच प्रतिबिंब त्यात दिसणार म्हट्ल्यावर सर्वप्रकारे काळजी घेणं आलंच . मी माझ्यापरीने आपल्या गज़ल वर लिहीण्याचा प्रयत्न केला आहे , गज़लबद्दलची माझी स्वताःची अशी मतं मांडली आहेत . ह्यातून आपल्या विचारांना योग्य दिशा मिळाली तर nothing like it पण काही चुकलंच असेल तर माफ़ करावे
|
Chanakya
| |
| Saturday, February 17, 2007 - 12:39 pm: |
| 
|
वैभव खूप खूप आभार.. आपण एवढ्या सविस्तर विश्लेषण केलेत त्याबद्दल आनी एवढ्या बहुमोल सुचना दिल्याबद्दल "काळजाला जाळणारे तापलेले वाळवंट" वा सही आहे एकदम हा बदल... मनामध्ये पसरलेल्या जीवघेण्या आठवणीमुळे जे भोगलेले आहे त्याचा दाह काळजाला होतो आहे.. अश्या अर्थाने पहिला शेर लिहिला होता.. म्हणून भोगलेले शब्द वापरला.. पण वाळवंट भोगता येते का? हा आपला प्रश्ण एकदम पटला... तसेच जो अर्थ मला व्यक्त करायचा होता तो सुस्पष्टपणे शेर व्यक्त करत नाहीये... " व्यर्थ ठरले मृगजळासम लाभलेले वाळवंट " हे पण खूप आवडले.... पण एक प्रश्ण असा पडला... जसे भोगलेले वाळवंट योग्य वाटत नाही तसे लाभलेले वाळवंट पण योग्य नाही वाटत... पण जर असा विचार केला की वाळवंट हे प्रतिक दर वेळी कशासाठी तरी वापरले गेलेय... जसे पहिल्या शेरामधील पहिला मिसर्यामध्ये वाळवंट आठवणींसाठी वापरले गेलेय तर दुसर्या मिसर्यामध्ये ते भोगलेल्या दुखांसाठी (जे मला नीट मांडता नाही आले)... तसेच प्रत्येक शेरात ते वेगवेगळ्या गोष्टींचे प्रतिक होउन येत आहे... तर मग भोगलेले आणि लाभलेले हे शब्द त्या प्रतिकासाठी चालु शकतील का? (भोगलेले दु:ख, लाभलेले सुख असे....) शेर क्र. ४ हा आशादायीच आहे... जीवनाच्या वाळवंटात अंधार इतका भिनला आहे तरी वाट दाखवायला थोडासा उजेड मला मिळालाच असे मला म्हणायचे होते... पण ते हा शेर नीटपणे मांडत नाहीये तसेच वाळवंट हे रदीफ़ आशादायी अर्थासाठी वापरल्यामुळे गज़लेचा मूड पण बदलतोय हे ही पटले तामसी का वाटु लागे आज वाळू रोजचीच बांधवांचे रक्त प्याले बाटलेले वाळवंट इतका वेळ मीटर वर असलेली पकड निसटलीये हे समजले नाही... गालगागा गालगागा गालगागा गालगाल ह्याच मीटर मध्ये हा शेर बसतोय की नीट... तुम्ही सुचवलेल्या बदलाने अर्थ बदलेल असे वाटते... बाटलेले वाळवंट ह्यातुन 'बाटगाच कट्टर धर्मवेडा' असे सुचवायचे होते मला ते नीट स्पष्ट होत नाहीये असे दिसते तुम्ही केलेल्या सर्वच सुचना बहुमोल आहेत... परत एकदा खूप खूप आभार. असेच मार्गदर्शन कायम मिळत राहो....
|
Yog
| |
| Saturday, February 17, 2007 - 2:47 pm: |
| 
|
vaibhav, chanakya, मस्त. तुमच्या सूचना देवाण घेवाणीत लुड्बूड करू इच्छीत नाही तरी काही गोष्टी : वैभव पहिल्या शेरात सुचवलेला बदल शेराचा "अर्थ" बदलेल. भोगलेले हा प्रथम पुरुषी तर तापलेले हा थोडा तृतीय पुरुषी वाटतो. थोडक्यात स्वतः भोगलेले म्हणून जाळणारे आणी बाहेरचे तापलेले जाळणारे याने गझलकाराच्या अनुभवात बदल होईल असे वाटत नाही का? मला तरी मूळ शेरच योग्य वाटला.प्रतिमा आणि अनुभव एकत्रीतही मान्डता येईल की. ळ आणी ज च पेसिन्ग अधिक छान वाटेल निश्चीत. दुसर्या शेरात पुन्हा सुचवलेला बदल अर्थ बदलतात. भासलेले आणि लाभलेले यात अनुभव / पडताळा हा फ़रक आहे आणि तो तसाच असू द्यावा. अर्थात सर्वच गझले मधे एकच सूर असावा म्हणजे स्वरूप वा स्वानुभव किव्वा त्रयस्थ असे असेल तर किव्वा तसा नियम असेल तर बदल करता येतील. चौथ्या शेरात निव्वळ विरोधाभास आहे असे वाटते. हा विरोधाभास अतीशय compeling आहे, किम्बहुना एकन्दरीत गझलेच्या सूराला त्याने अधिक वजन येते असे वाटते. सहाव्या शेरात पुन्हा झेललेले यातील अर्थ (हा एक अस्तित्व अभिव्यक्ती जपणारा अनुभव आहे) अन तुडवलेले ( which is destructive experience ) या बदलातील अर्थ पूर्ण वेगळे होतील. मला तरी पहिलाच शब्द बरोबर वाटतो. सातवा शेर मूळचाच उत्कृष्ट वाटतो. वैभव तू सुचवलेल्या बदलात "बाटलेले" हा अतीशय महत्वाचा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षिला जातोय. किम्बहुना बाटलेले यातून non consentive or subtle force प्रकट होतो तर प्राषलेले हा consentive experience आहे. याने मूळ अर्थात फ़ार मोठा फ़रक होईल असे वाटते. meter मला देखिल बरोबर वाटले. मला तरी ही सम्पूर्ण गझल (एक दोन शेर वगळता) एक स्व-अनुभव प्रकटीकरण वाटते. वाळवन्ट ही प्रतिमा, तोच कर्ता अन तोच अनुभव या अर्थी. बाकी तू लिहिलेला शेवटचा परिच्छेद अगदी उत्तम. मि यातला जाणकार नाही, आणि मार्गदर्शक वगैरे तर मूळीच नाही. माझ्या गझल लिहीण्याच्या पहिल्या प्रयत्नावरून हे जाणवले की गझल लिहीणे हे येर्या गबाळ्याचे काम नव्हे. किम्बहुना इतक्या नियम, चौकटी, बन्धात मोजून मापून भावना उतरवणे आणि तरिही सर्व सामान्य वाचकाला त्यातून एक लोभस, आकर्शक अनुभव देणे हे म्हणजे नाडी, पत्रिका, गण, गोत्र, जात, शिक्षण, उन्ची, बान्धा, वर्ण या नियमात बसवून जुळवलेले arranged marriage सारखे आहे आणि त्यातूनही ते जोडपे सर्वाना made for each other किव्वा लोभस, compatible वाटणे हे महाकठीण. तसेच काहीसे. पण मूळ जोडप्याचा तो जसा एक सुन्दर अनुभव असू शकतो तसेच गझलेचेही आहे. शेवट परिणाम काय झाला याला महत्व आहे असे वाटते मग लग्न ठरवताना नारळ सुपारीवरून वाद माजला की कुणि किती पाने घालायची यावरून या चर्चेला जास्त महत्व उरत नाही. आपण म्हणतो नान्दा सौख्यभरे, तसेच लिहा अन वाचा तृप्त मनाने. एकन्दरीत न मागता लिहीलेलेले आणि विषय थोडा भकरटला म्हणून क्षमस्व.
|
वैभव, तुमची कधी काळी पूर्वी इथे टाकलेली "मलाही"आत्ताच वाचली... खूप आवडली... माझ्या "स्वराज्य" मधल्या सुधारणा (त्या आहेतच याची मला खात्री आहे), सुचवल्या तर आवडेल...
|
चाणक्य धन्यवाद ... मीटर वरची पकड सुटली असं ज्या शेरमध्ये म्हट्लय तिथे " वाटु " लागे र्हस्व करावं लागलंय असं म्हणायचं होतं जे सहज टाळण्यासारखं आहे असं वाटलं .. तरीही ते मीटर चुकलं असं म्हणणं चूक होतं हे मी मान्य करतो .. योग ... मला स्वतःला मी सुचवलेले बदल रुचले नव्हतेच हे आधीच नमूद केलंय .. एका छोट्याश्या देवनागरी विंडो मध्ये चाणक्यची मनःस्थिती visualise करून लिहीणं अवघड जात होतं .. विचारधारा पुढे जावी इतकाच हेतू होता ... तुझ्या पोस्टमधल्या बर्याच गोष्टी पटल्या .. आता चाणक्यने ह्या सर्व चर्चेतून त्याच्या " वाळवंट " ह्या गज़लचं final version त्याच्या संग्रही कसं असावं हे ठरवायचं आहे . आनंदयात्री ... वेळ मिळेल तसा जरूर प्रयत्न करतो .. " मलाही " तुम्हालाही आवडली हे कळवल्याबद्दल धन्यवाद .
|
|
|