Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 15, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 15, 2007 « Previous Next »

Devdattag
Wednesday, February 14, 2007 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती येते संध्याकाळी
अस्वस्थ मनाची रीत
तो स्पर्श रानफुलांचा
नाजूक हळवी प्रीत

मी धरून पायवाटा
गेल्यांची चाहूल घेतो
शांत थिजल्या मनात
भरून काहूर घेतो

ती तिरीप अंधाराची
घेते कसलेसे रूप
भय कसले दाटले
आला कुठून हा धूप

हे दैवच ऐसे माझे
होती कसलेसे भास
जसा मुग्ध मोगराही
होई वैराग्याचा दास


Princess
Wednesday, February 14, 2007 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद जयु आणि नंदिनी... हो ते सगळे काही खुपच भयानक होते. माझी मैत्रिण पार कोलमडुन गेली या प्रसंगाने

Lopamudraa
Wednesday, February 14, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पदन्यास..

असा दरवळु नको आस पास
व्याकुळ होतो बघ श्वास श्वास
लागती वेध मिटल्या क्षणांना
मग उमलावयाची आस आस..

असा आवळु नको नजरेचा फ़ास
शिशिर होतो मग वसंत मास
मन छेद देते सार्‍या नियमाना
कुठला परिघ कुठला व्यास..

असा हळहळु नको, इतका ss ध्यास
जखमांची मांडु नये आरास
काळजातल्या लखलखत्या वीजांना
होते उगीच पेटाया निमीत्त खास...

असा कुरवाळु नको प्रत्येक भास
होउदे एकदा जिवंत त्यास त्यास
तेव्हा बघ करतांना त्या क्षणांना
दिपतील नजरा असा पदन्यास...!!!












Lopamudraa
Wednesday, February 14, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम व्यथा छांगली मांडलिये..!!! वरची कविताही छाने..
valentine day चा माझाही सहभाग..
देवाची आता वाचली " ती येते.. " मस्तय..
आज वैभवने पुढे गाणच बंद केले.. शब्दच नाहीत खरतर प्रतीक्रियेला


Jayavi
Wednesday, February 14, 2007 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा.... मस्त गं एकदम आवडेश!

Chinnu
Wednesday, February 14, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव खुप हेलावुन टाकलस मनाला! सर्वांच्या कविता मस्त. प्रिंसेस, काय बोलु? शब्द सुचेना..

Shyamli
Wednesday, February 14, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा पाउस असा रुणझुणता? :-)
जबरी आलीये
वैशाली लै ब्येस, मला कधी असM लिहायला येणार

Swaatee_ambole
Wednesday, February 14, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> छेदून निघाल्या भिन्न दिशांना वाटा
पण विभिन्न पायी सलतो एकच काटा
सल एकच सलतो कळते दोघांनाही
कळवळा असूनी हळहळायचे नाही

जियो, वैभव!!!

Princess
Wednesday, February 14, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा छान ग...पदन्यास... very nice

Bee
Wednesday, February 14, 2007 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू धन्यवाद.. .. .. ..

Daad
Wednesday, February 14, 2007 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याच कविता सुंदर आहेत, कुणाकुणाची नाव घेणार?
स्मी, जयश्री, आनंदयात्री, देवा, लोपा मजा आणलीत. वैभवने कहर केलाय. कसं जीवघेणं लिहितो हा! कशा कल्पना, कसे शब्द!
'छेदून निघाल्या भिन्न दिशांना वाटा
पण विभिन्न पायी सलतो एकच काटा.....'
च्च!


Bhramar_vihar
Thursday, February 15, 2007 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा छान. पूनम, काय बोलणार?

Smi_dod
Thursday, February 15, 2007 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा पदन्यास छान..:-)
पुनम.... :-( काय बोलावे?


Devdattag
Thursday, February 15, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवणींच पुस्तक हातात घेउन
मी बसतो बघत एक स्वप्न
घडून गेलेल्या गोष्टींच
चित्र तरळू लागतात डोळ्यासमोर
बरसून येतो सगळा भूतकाळ
त्यातलेच काही क्षण
घराच्या कौलावरन अलगद ओघळून येतात
मग समोर येते
त्या ओघळलेल्या क्षणांची एक कविता
त्यातले शापा उ:शापांचे बळी
कधी निर्व्याज उमललेली कळी
कधी अस्फुट हास्य
कधी नि:शब्द रुंदन
माझं मन हे सगळं अधाशीपणे पीत जातं
थोडंसं जळजळीत उतरतं घशाखाली
बाकीच पसरतं जमिनीवर
मग मन सैरभैर होतं
कासावीस झालेला जीव
सगळ एकत्र करायचा प्रयत्न करतो
मी विचारतो त्याला, ही धडपड कशासाठी
उत्तर येतं: कविता लिहावी म्हणतोय


Vaibhav_joshi
Thursday, February 15, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ! मस्त रे देवा

Shyamli
Thursday, February 15, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा रे देवा जीओ :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators