Smi_dod
| |
| Wednesday, February 14, 2007 - 3:21 am: |
| 
|
नीलकान्ती... छान! धन्यवाद राधिका,अपर्णा वाट!!! कान्हा.. कान्हा म्हणुन घालते साद रात्रदिनी मी राधा तुझी रे कृष्णा जादू तुझ्या मुरलीची बेभान सुरात न्हाते... विसर पडतो सार्यांचा गोकुळ सगळे...घर.. अनय कोणी कोणीच नसते माझ्या विश्वात....... असते फ़क़्त तु अन मी मागे ही वळुन न बघता गेलास गोकुळातुन अजुनही मागे वेडे मन धावते तुझ्या वाटेवरून रोज असते उभी येथेच येशील परतुनी..... माझी राधा आहे ईथे म्हणुनी व्याकुळ तुझी राधा ईथे ये ना.. ..श्रीरंगा नेत्र पाती उभा तू नयनात ये ना स्मि
|
तमाम मायबोलिकरांतर्फे तुमच मन:पुर्वक स्वागत नीलकांती तुम्ही तुमचा आधीचा मेसेज एडीट करु शकता मेसेज च्या बाजुला असेल्या छोट्या छोट्या ३ खुणा आहेत पहा त्यातल्या कागद पेन्सिलीच्या खुणेवर क्लीक करा सोप्प आहे अगदीच 
|
.... पुढे गायचे नही ही बंद कवाडे बंद क्षणांची ग्वाही डोळ्यांनी आता बोलायाचे नाही परक्यासम येणे समोर ... जाणे निघुनी रेंगाळायाचे कारण नाही काही छेदून निघाल्या भिन्न दिशांना वाटा पण विभिन्न पायी सलतो एकच काटा सल एकच सलतो कळते दोघांनाही कळवळा असूनी हळहळायचे नाही ढळणारी संध्याही छळते एकांती थकलेल्या हृदयांना कोठे विश्रांती मावळतीच्या रंगात मिसळते शाई अश्रूंनी विझवायाची लाही लाही जुळलेले स्वर कातरवेळी स्मरताना अधरांवरती गीते ती थरथरताना लय चुकली कोठे स्पष्ट जाणवत जाई मग थांबायाचे ... पुढे गायचे नाही
|
Shyamli
| |
| Wednesday, February 14, 2007 - 3:59 am: |
| 
|
वाह.. .. .. ..!!!!
|
Jayavi
| |
| Wednesday, February 14, 2007 - 4:00 am: |
| 
|
WOW!!! काय एकसे एक कविता आल्या आहेत....... कुणाकुणाची नावं घ्यायची....!! चुकून इथे यायला उशीर झाला तर खूपच धावपळ होते वाचायसाठी लगे रहो....!
|
Smi_dod
| |
| Wednesday, February 14, 2007 - 4:02 am: |
| 
|
जुळलेले स्वर कातरवेळी स्मरताना अधरांवरती गीते ती थरथरताना लय चुकली कोठे स्पष्ट जाणवत जाई मग थांबायाचे ... पुढे गायचे नाही >>> वैभव!!! सुंदर....
|
Aparnas
| |
| Wednesday, February 14, 2007 - 4:07 am: |
| 
|
मावळतीच्या रंगात मिसळते शाई अश्रूंनी विझवायाची लाही लाही वैभव खासच!!
|
Raadhika
| |
| Wednesday, February 14, 2007 - 4:10 am: |
| 
|
नीरज, स्मि, छान... मानस, 'हे कसले भास आभास'... आवडली तुषार, 'पुन्हा एकदा आजे नव्याने प्रेम जुने ते करून बघावे'... अप्रतिम वैभव, खूपच सुंदर कविता. नीलुताई, welcome ... 'गणिताचं एक बरं असतं...!!!?'
|
Princess
| |
| Wednesday, February 14, 2007 - 4:12 am: |
| 
|
आहा वैभवा... खास एकदम!!! मग थांबायचे, पुढे गायचे नाही... वाह वाह
|
Jayavi
| |
| Wednesday, February 14, 2007 - 4:13 am: |
| 
|
princess , तू म्हणतेच आहेस तर कालच माझ्या Valentine साठी लिहिलेली कविता इथेही टाकतेय दिवस उगवला हळुवार अलार्म पण किणकिणला नाजुक कूस वळवून बघते तर नवरा उभा हसतमुख हातातलं गुलाबाचं फुल त्याच्या गालावरुन फिरलं पिसासारखं " How romantic Jaanu… " मन नाचलं थुईथुई मोरासारखं. लॉनवर नेलं बागेतल्या त्यानं हातात हात घेऊन " Tea ….Your Highness " म्हणाला चहाचा कप देऊन. मूडात होती भलतीच स्वारी म्हटलं घ्यावा थोडा भाव खाऊन जे जे वाटतंय करवून घ्यावं ते ते घ्यावं करवून. "कैसे मिजाज़ है आपके जानम ?" सवाल जेव्हा आला……. म्हटलं, "जायचंय आज मला….. 'सलामे इश्क' बघायला." एरव्ही ह्याला पिक्चरची त्या कायम असते ऍलर्जी आज मात्र चक्क बोलला, "जैसी आपकी मर्जी" हॉलवरची झुंबड बघताच जीव माझा चरकला पण ब्लॅक मधे तिकिट मिळवून मूड त्याने बनवला. पिक्चरनंतर शाही जेवण Dessert मात्र राहिलंच बाई…! "शॉपिंगला नेतो" म्हणताच त्यानं कसं राहिल लक्षात काही…? डिझायनर साडी शोकेसमधली कधीपासून होती खुणावत मॅचिंग ज्वेलरी त्याच्यासोबत वाढवत होती नजाकत मनातले भाव माझ्या सारे दाखवत होता चेहेरा मनासारखं शॉपिंग होऊन खुलत होता चेहरा डोळ्यामधे सवाल होता "आता पुढे काय….?" " Long Drive ला जाऊ या का… क्या है आपकी राय ?" अपुन तो साला खल्लाऽऽऽऽस…….!! मंद सुरावट गाडीमधली सारं बोलून गेली नयनामधली भाषा नयनी सारे समजून गेली तृप्तीची त्या पेंग छानशी आली का अवेळी……… डोळे झाले जड लागली ब्रम्हानंदी टाळी दचकून उठले गाली होता स्पर्श रेशमी करांचा नवरा हलके उठवत होता गुच्छ घेऊनी सुमनांचा स्वप्नामधूनी जागी झाले वास्तव होते स्वप्न परी प्रेमदिनाची पहाट होती आता मात्र खरीखुरी. जयश्री
|
Meenu
| |
| Wednesday, February 14, 2007 - 4:17 am: |
| 
|
... ... ... ... ... ... ...
|
Smi_dod
| |
| Wednesday, February 14, 2007 - 4:18 am: |
| 
|
ओहो जया.... मस्त ग! valantine day...सहि...
|
मारवा रातराणी बहरलेली बघ प्रिये हा गारवा झोप येई ना तुला अन् चढताहे मारवा सूर सूर चांदणे धुंद ही अशी हवा तुझ्या मिठीत सापडे अननुभूत चांदवा स्पर्श तुझे कळलावे साहवेना भार गं ’सकळ’देह जाहला मोहरता ताजवा ताल देती श्वास हे चिंब चिंब भास हा श्वास भास एकजीव ’एकमुखी’ गोडवा पारिजात मखमली ओघळला भूवरी शरीर अवघे जाहले दिव्य एक मारवा
|
Lopamudraa
| |
| Wednesday, February 14, 2007 - 5:43 am: |
| 
|
तुषार,अपर्णा,मानस, स्मिता... जया आणि वैभव..आणि हो अनतयात्री खुप खुप छान.. (हूडा तो रोबिन शब्द काढुन टाका बर नावातुन.. reservation च्या सोडती झाल्या का??? साळवे कडचे काम काय आजकाल लोक पण आपले काम सोडुन रिकामे उद्योग करतात कस होणार या देशाचं...फ़ार फ़ार चिंता वाटते.. ( v&c वरच्या लोकांपेक्षा जास्त.. )
|
वैभव, खूप दिवसांनी कवितेनं डोळे भरून आले. कुठून आणतोस या कल्पना आणि त्यांत इतके चपखल बसणारे शब्द? तुझा एक नियम सांगितला होतास ना मागं की चांगल्या कवितेनंतर त्यदिवशी कविता टाकत नाहीस. तसंच मी तुझ्या कवितेनंतर कुणाचीही कविता वाचणार नाहीये आजतरी.
|
Sarang23
| |
| Wednesday, February 14, 2007 - 6:27 am: |
| 
|
पण विभिन्न पायी सलतो एकच काटा सल एकच सलतो कळते दोघांनाही ...
|
Princess
| |
| Wednesday, February 14, 2007 - 7:24 am: |
| 
|
आज भरुन येतो आठवानी उर माझा जगी असे प्रेमदिन अन दुरदेशी राजा... स्पर्शाच्या आठवणीने येतो बघ शहारा ती आठवण ताजी, अजुन मेहंदीचा रंग कोरा... ये परतुनी आता जीव होई थोडा हे वार्या, हे मेघा माझ्या साजणाला धाडा प्रीत फुलु दे माझ्याही अंगणी हेच एक मागणे देवा आज या प्रेमदिनी. पुनम जयु, श्यामली, तुम्ही म्हणाला म्हणुन पुन्हा इथे टाकतेय.
|
Princess
| |
| Wednesday, February 14, 2007 - 3:14 am: |
| 
|
प्रेमदिनाची भेट हो हो पॉजिटीव आलीये माझी टेस्ट, थॅंक यु देवा. हो आणि धन्यवाद तुला वाह छान आहे प्रेमदिवसाची भेट नरकात पोहचवलस ना मला थेट तु बाहेर जाउन थेर केलेस आणि येउन मला फसवलेस तुझ्या त्या स्पर्शाला मी प्रेम समजले पण तु तर माझे आयुष्यच नासवलेस... सांग आता या दोन लेकरांचे काय करु त्याना कोणाच्या हवाली करु? वाटले होते सुखी आहे माझा संसार पण पण आता तर सारा अंधकार सांग मी असा काय गुन्हा केला शरीराल सोड, मनालाही तुझ्याशिवाय दुसर्या कोणाचा स्पर्श नाही झाला स्त्री जातीचा उपभोग घेणार्या पुरुषा आता मी ही देइन तुला शिक्षा आज मी ही जाउन बसेन शरीराच्या बाजारात अन करेन एका पुरुषाची वाताहात दोन वर्षापुर्वी माझ्या एका मैत्रिणीला आजच्याच दिवशी कळले की ती HIV positive आहे. तिच्या भावनाना मी कवितेत लिहिण्याचा प्रयत्न केलाय.
|
Jayavi
| |
| Wednesday, February 14, 2007 - 6:59 am: |
| 
|
आई गं.... किती भयानक....! पूनम भावना अगदी उतरल्या आहेत गं.
|
हो ना.. मला तर कल्पनाच किती भीषण वाटत्येय आणि हे तर सत्य.
|