|
Psg
| |
| Monday, February 12, 2007 - 4:48 am: |
| 
|
मिल्या, पॉश आहे, खूप आवडली सन्मी, किती गोड आहे, मस्त
|
Shyamli
| |
| Monday, February 12, 2007 - 5:24 am: |
| 
|
मिल्या :D सन्मी cute 
|
मिल्या.... अगदी झक्कास लिहीलयस!
|
Princess
| |
| Monday, February 12, 2007 - 6:23 am: |
| 
|
वाह वाह वाह मिल्या. मजा आ गया )
|
Himscool
| |
| Monday, February 12, 2007 - 6:40 am: |
| 
|
प्रसाद, मिल्या, मिल्या, मान गये.. सन्मी, कविता मस्त आहे
|
Aparnas
| |
| Monday, February 12, 2007 - 7:29 am: |
| 
|
ती: प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू आणि नदीसारखी स्थिर, शांत मी उन्मत्त वृक्षासारखा वादळाशी झुंजणारा तू आणि जमिनीशी नातं जोडणारी मी क्षितीजाच्यापार झेपावणारा तू आणि किनार्यावरच वाळूचं घरटं जपणारी मी 'साथ देशील का' विचारतोयस खरा पण भीती वाटते मला, हे सगळं कसं काय जमणार मला? **** तो: कोसळणारा प्रपात दिसतो सगळ्यांना पण कड्याच्या टोकापर्यंत शान्त वाहून त्याला शक्ती देणारी नदीच असते ना? वृक्ष जेव्हा झुंजतो वादळाशी मुळं घट्ट धरून ठेवून त्याला आधार देणारी जमीनच असते ना? आणि वेडे, पक्षी क्षितिजापार झेपावला तरी समुद्रावर थोडच विसावणार तो? संध्याकाळी परतून यायला, घरटंच हवं ना त्याला?
|
Psg
| |
| Monday, February 12, 2007 - 11:51 pm: |
| 
|
वा अपर्णा, पण बीबी चुकला
|
Aparnas
| |
| Monday, February 12, 2007 - 11:58 pm: |
| 
|
का गं, गद्य वाटतंय का? मला मनासारखी जमली नाही कविता
|
Kandapohe
| |
| Tuesday, February 13, 2007 - 12:40 am: |
| 
|
प्रसाद, मिल्या, मित्रा जबरीच. मित्रा शेवट गोड आहे. प्रसाद खल्लास तर मिल्या भले शाब्बास. अपर्णा तिचे म्हणणे काहीच्या काहीमधे नको टाकू असे असेल. 
|
Psg
| |
| Tuesday, February 13, 2007 - 12:47 am: |
| 
|
हो अपर्णा.. मला म्हणायचं होतं की ही 'काहीच्या काही' नाही, प्रॉपर कविता बीबीवर टाक.. छान झालीये..
|
Aparnas
| |
| Tuesday, February 13, 2007 - 12:53 am: |
| 
|
धन्स पूनम, केपी खरंतर मला ही नीट जमली नाहीये असं वाटत होतं म्हणून इथे टाकली. आता टाकते कविता बीबीवर.
|
Milya
| |
| Tuesday, February 13, 2007 - 12:56 am: |
| 
|
धन्यवाद सर्वांना अपर्णा अगं छान जमलीय. कविता BB वर हलवायला सांग mods ना.. रविंद्र कविता चांगल्या आहेत पण तुमचा बीबी चुकला... गुलमोहर विभागात फ़क्त स्वत्: लिहिलेले टाकणे अपेक्षित आहे
|
सन्मी सुरेख.. गोड कविता.. मिल्या चा तर प्रशनच नाही.. (बर झाल दुसरी बाजु पण मांडली.. ..
|
प्रसाद, मिल्या सही आहेत कविता. बर जमतं तुम्हा लोकांना असलं.
|
पण मी म्हणतो स्वताची विषामृत ही कथा अर्धवट पडली असताना माणसाना झोपा तरी कशा येतात कुणास ठाऊक? अन आपलं सदान कदा दुसर्याच्या बी बी वर बेल घालीत फिरायचं मेलं!!!
|
प्रतिपक्षाचे वकील माननीय मिल्याजीराव, धन्यवाद. सन्मे, असं कोणी स्वप्नातसुद्धा भेटणं म्हणजे खरंच कैच्च्या कैच अपेक्षा नै??
|
Paragkan
| |
| Tuesday, February 13, 2007 - 2:47 pm: |
| 
|
SM aaNi Milya ... jhakkas re !
|
Princess
| |
| Wednesday, February 14, 2007 - 2:27 am: |
| 
|
आज भरुन येतो आठवानी उर माझा जगी असे प्रेमदिन अन दुरदेशी राजा... स्पर्शाच्या आठवणीने येतो बघ शहारा ती आठवण ताजी,अजुन मेहंदीचा रंग कोरा... ये परतुनी आता जीव होई थोडा हे वार्या, हे मेघा, माझ्या साजणाला धाडा प्रीत फुलु दे माझ्याही अंगणी हेच एक मागणे देवा आज या प्रेमदिनी पुनम.
|
Devdattag
| |
| Wednesday, February 14, 2007 - 2:44 am: |
| 
|
मिल्या,सन्मी,प्रसाद सहीच जमलय.. माझाही एक प्रयत्न ठाऊक आहे मला ते सगळे उगीच लाय म्हणाले म्हणे सुंदर तरुणी दिसल्यावर ते हाय म्हणाले तसा त्यांचा चष्मा फुटला होता तरिही तशी जरा संध्याकाळची वेळ होती तरिही वाटले छातीमध्ये त्यांच्या कळ आली अन आता 'आय ऍम शुअरलि गोइंग टू डाय' म्हणाले म्हणे सुंदर तरुणी दिसल्यावर ते हाय म्हणाले सकाळी सकाळी उठविते मी रोज त्यांना जरा फिरायलाही जा बोलले आज त्यांना थोडी भाजीही आणा म्हणाले चुकून अन माझे दुखतात सखे फार पाय म्हणाले म्हणे सुंदर तरुणी दिसल्यावर ते हाय म्हणाले झाले अनेक वर्षांपूर्वी केस पांढरे खरे ना भांगाविनाही एक दिनही त्यांचा सरे कंटाळलो मी या पांढर्या रंगास आता सांग करू का मी केस माझे डाय म्हणाले म्हणे सुंदर तरुणी दिसल्यावर ते हाय म्हणाले गेले होते खरे एकदा ते वाटेने तिरक्या शुक शुक ही निघाले आवाजात चिरक्या फक्त एक माझे वाक्य कामास आले जेंव्हा बांधेन मी गळ्यास त्या ऐसा टाय म्हणाले म्हणे सुंदर तरुणी दिसल्यावर ते हाय म्हणाले
|
पुनमजी, फार छान! "ये परतुनी आता जीव होई थोडा हे वार्या, हे मेघा, माझ्या साजणाला धाडा" वा!!. काहीच्या काही कविता मध्ये कशाला टाकलीत, कविताBBवर टकावी! गणेश(समीप)
|
|
|